सूर्यनमस्कार माहिती | Surya Namaskar information in marathi

नमस्कार मंडळी,

सूर्यनमस्कार माहिती या लेखात आपण बघणार आहोत, एक सुप्रसिद्ध असलेली योगसाधना “सूर्यनमस्कार”. या साधनेला सर्व योगासनांपैकी अधिक उत्तम योगासन मानले जाते. सूर्यनमस्कार ही योगसाधना पुरुष, महिला लहान मुले आणि तरुण वर्ग या सर्वांसाठीच लाभदायक आहे, चला तर मग आपण आजच्या लेखात सूर्यनमस्कार माहिती surya namaskar information in marathi जाणून घेणार आहोत. सूर्यनमस्कार योग साधनेच्या अधिक माहितीसाठी हा लेख पूर्ण वाचा.

Table of Contents

सूर्यनमस्कार माहिती | Surya Namaskar information in marathi

उरसा शिरसा दृष्ट्या वचसा मनसा तथा ||

पदाभ्या, कराभ्या, जाणूभ्या प्रणाम: अष्टांग युच्यते ||

– संदर्भ विकिपीडिया

या श्लोकाचा अर्थ असा आहे की,

आपली दृष्टी, मन आणि वाणी हे एकाग्र करून 1 छाती, 1 मस्तक, 2 हात, 2 पाय, 2 गुडघे, या आठांनी जो नमस्कार आपण घडवतो त्याला साष्टांग नमस्कार असे म्हणतात.

भारतामध्ये हिंदू धर्मामध्ये सूर्याला अधिक महत्त्वपूर्ण असे मानले जाते. सूर्याला शंकर आणि विष्णूचे रूप मानले जाते. पौराणिक ग्रंथांमध्ये आणि वेदांमध्ये सूर्याची अनेक उपासना केल्याबद्दल दिसून आले आहे. सूर्योदयाच्या वेळेला आणि सूर्यास्ताच्या वेळेस सूर्याला साष्टांग दंडवत करणे अधिक उपयोगी मानले जाते. जे व्यक्ती सूर्याला नमस्कार करतील त्यांना कधीही काही कमी पडत नाही असे देखील म्हटले जाते. याव्यतिरिक्त त्यांच्या घरी दारिद्र्य येत नाही असे हे म्हटले जाते. 

सूर्यनमस्कार महत्त्व | Surya Namaskar importance in marathi

सूर्यनमस्कार योग साधनेमध्ये महत्वपूर्ण अशी योगसाधना आहे. महत्वपूर्ण अशा योग साधनेमुळे जगातील भरपूर प्रमाणात लोक सूर्यनमस्कार ही साधना आकारतात. सूर्यनमस्कारामुळे आपल्या आरोग्य अधिक सुधारते आणि सुदृढ बनते. सूर्यनमस्कार केल्याने पूर्ण अंगाचा सर्वांग योगासन व्यायाम होतो आणि त्याचबरोबर मानसिक शारीरिक आणि आत्मिक आरोग्य सुदृढ होते. सूर्यनमस्कार ही योगसाधना जागतिक स्तरावर अधिक लोकप्रिय आहे. सूर्यनमस्काराचे बहुगुणी फायदे आपल्या शरीराला होतात. ही सगळे फायदे आणि महत्व आपण surya namaskar information in marathi या लेखामध्ये बघणार आहोत.  

शारीरिक फायदे

सूर्यनमस्कार हा संपूर्ण अंगाचा व्यायाम आहे आणि या व्यायामामुळे शरीराच्या सर्व स्नायूंची तडजोड होते. या व्यायामामुळे पूर्ण अंगात लवचिकता आणि स्नायू एकमेकांचा तग धरणामध्ये सक्षम बनतात. सूर्यनमस्कार या साधनेमध्ये छाती, पोट, पाठ, हात, पाय यांसारखे प्रमुख स्नायू त्यांना गेल्यामुळे आपल्या शरीरास हा व्यायाम अधिक महत्त्वपूर्ण ठरतो.

हृदयासंबंधीत आरोग्य

सूर्यनमस्कार या साधनेमुळे  हृदयातील रक्तवाहिन्यांबरोबर होणारा सतत प्रवाह सुधारतो आणि यामुळे रक्ताभिसरण वाढते, आणि हृदयासंबंधीत आरोग्य सुदृढ बनवते. सूर्यनमस्कारामुळे आपले हृदय निरोगी बनते.

मानसिक संतुलन

सूर्यनमस्कारा दरम्यान होणाऱ्या श्वासोच्छ्वास च्या हालचालींमुळे मानसिक ध्यान या परिस्थितीला प्रोत्साहन मिळते. सूर्यनमस्काराच्या योगसाधनेमुळे मन शांत आणि एकाग्रता वाढते. 

ऊर्जा पातळीत वाढ

नियमितपणे सूर्यनमस्कार केल्यास आपल्या शरीरात नवचैतन्य आणि भरभरून ऊर्जेची वाढ होताना दिसते. अनेक जणांचे असे मानणे आहे की सूर्यनमस्कार ही योग साधना केल्यावर उत्साह अधिक वाढतो. 

वजन व्यवस्थापन

वारंवारपणे सूर्यनमस्कार केल्यामुळे आपल्या वजन नियंत्रित होऊ लागते. शरीराप्रती केलेला सूर्यनमस्कार या व्यायामाने अतिरिक्त कॅलरी खर्च होण्यास मदत मिळते. surya namaskar information in marathi या लेखात पुढे वाचा.

पाचक आरोग्य

सूर्यनमस्कार या योग साधने पुढे वाकणे आणि मागे वळणे हा प्रकार समाविष्ट असल्यामुळे पचन होणाऱ्या अवयवांना प्रोत्साहन मिळते आणि पाचक आरोग्य सुधारते.

सूर्यनमस्कारचा शोध कोणी लावला

सूर्यनमस्कार हा योग साधनेचा एक क्रम असून सूर्यनमस्कार याचा शोध कोणी लावला असा विचार करणे अयोग्य आहे, एकाच व्यक्तीला याचे श्रेय देता येणार नाही. सूर्यनमस्कारामध्ये शतकानुशतके बदल विकसित झालेले आहेत. शारीरिक ऊर्जेचा स्त्रोत वाढवण्यासाठीआणि सूर्य देवाचा सन्मान करण्यासाठी ही प्रथा प्राचीन काळापासून उपयोगात आहे. सूर्य देवाला नमन्यासाठी किंवा सूर्याला नमस्कार घालण्यासाठी ही प्रथा जगभरामध्ये अनेक संस्कृतीमध्ये बघितली जाते. जगभरातील ही संस्कृती अध्यात्मिकेचा एक भाग आहे. surya namaskar information in marathi च्या या लेखामध्ये आपण सूर्य नमस्काराबद्दल ची संपूर्ण माहिती बघणार आहोत.

भारतामध्ये सर्व संस्कृतीमध्ये सूर्याची उपासना केली जाते. सूर्यनमस्काराचे आधुनिक स्वरूप हे प्रसिद्ध योगशिक्षक स्वामी शिवानंद यांनी 1987 ते 1963 आणि सोबतच त्यांच्या शिष्य स्वामी विष्णू देवानंद 1927 ते 1993 ह्या कालावधीत, दोघी गुरुजींनी सूर्यनमस्कार या योग अभ्यासाला लोकप्रिय केले. स्वामी शिवानंद हे अध्यात्मिक योग गुरु होते. स्वामी शिवानंद यांनी भारतातील ऋषिकेश येथे डिव्हाईन लाईफ सोसायटीची स्थापना केली आणि स्वामी विष्णू देवानंद यांनी सर्वत्र योगाचा प्रचार केला. स्वामी  शिवानंद यांचे शिष्य स्वामी विष्णू देवानंद यांना स्वामी विष्णू म्हणून ही ओळखले जाते.

स्वामी विष्णू देवानंद यांनी 1950 आणि 1960 च्या दशकास पश्चिमांत्य देशांमध्ये योग साधनाच्या शिकवणी दरम्यान एक पद्धतशीर योग साधना म्हणून सूर्यनमस्कार याची ओळख करून दिली आणि त्याचबरोबर “द कम्प्लीट इलस्ट्रेटेड बुक ऑफ योग”या पुस्तकांमध्ये एक मूलभूत भाग म्हणून सूर्यनमस्कार योगाला जागतिक स्तरावर अधिक लोकप्रियता दिली. आधीच्या काळात सूर्यनमस्काराला प्राधान्य देत या दोघेही योगशिक्षकांनी आपली महत्त्वाची भूमिका बजावली आहे.  surya namaskar information in marathi या लेखात सूर्य नमस्कार कधी करावे हे पुढे वाचा .

सूर्यनमस्कार कधी करावे 

सूर्यनमस्कार हा आज आधुनिक जगत तुम्ही दिवसाच्या कोणत्याही वेळेला करू शकता. परंतु सामान्यता सूर्यनमस्कार ही योग साधना सकाळी लवकर सूर्योदयाच्या वेळी केली जाते. सकाळी सूर्योदयाच्या वेळी केलेला सूर्यनमस्कार हा अधिक फायदेशीर म्हणला जातो.

याची कारणे पुढील प्रमाणे,

नैसर्गिक वातावरण

सूर्योदयाच्या वेळी सूर्यनमस्कार केल्याने निसर्गाशी संबंध जोडून येतो. नैसर्गिक लयांशी संपर्क आपल्याला जोडता येतो. असं म्हणतात की उगवणारा सूर्य नवीन सुरुवात, चैतन्य आणि ऊर्जेचे प्रतीक मानले जाते आणि येणारा आपला दिवस आनंदात जातो.

शांत वातावरण

पहाटेची वेळ ही साधारणपणे अधिक शांत असते आणि यामुळे योगासन किंवा ध्यान अभ्यासाला शांत वातावरण मिळते.  

स्वच्छ आणि ताजी हवा

पहाटे येणारी हवा ही अधिक शुद्ध आणि ताजी असते यामुळे व्यायामाला अधिक चालना मिळते. 

शरीराला उत्तेजित करणे

सूर्यनमस्कार ही अशी एक योगसाधना आहे जी रात्रभर विश्रांती घेतल्यानंतर तुमच्या शरीराला दुसऱ्या दिवशी उत्साहित करते. 

 ऊर्जा  वाढणे

सकाळच्या वेळेला नियमितपणे सूर्यनमस्कार केल्यामुळे दिवसभर आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा भरभरून वाढते. 

सूर्यनमस्कार हा असा एक योगा आहे जे तुम्ही दिवसभरात कधीही तुमच्या वेळेप्रमाणे करू शकतात. surya namaskar information in marathi या लेखामध्ये दिल्याप्रमाणे काही योग शिक्षकांना सूर्यनमस्कार हा सूर्यास्ताच्या वेळी केलेला फायदेशीर वाटते. याचे कारण असे की दिवसाच्या शेवटी सूर्यनमस्कार केल्यामुळे सूर्यनमस्कार हा योग माणसाला तणाव मुक्त करतो. तुम्ही संध्याकाळी सकाळी किंवा तुम्हाला मिळेल अशा वेळेत सूर्यनमस्कार करू शकतात. सूर्यनमस्कार नियमित केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक लाभ होतो. 

सूर्यनमस्कार नावे | Surya Namaskar names in marathi

सकाळी सूर्योदयानंतर एका क्रमाने केलेली बारा प्रकारची योगसाधना म्हणजेच सूर्यनमस्कार किंवा साष्टांग नमस्कार. याने आपले आरोग्य सुधारते. सूर्यनमस्कार हा बहुगुणी असा व्यायाम आहे. सूर्यनमस्कारामध्ये 12 क्रमांचा समावेश आहे त्या सूर्यनमस्कारांची नावे पुढीलप्रमाणे,

 सूर्यनमस्काराचे प्रकार | Surya Namaskar information in marathi

  1. प्रणामआसन अथवा नमस्कारासन
  2. हस्त उत्तासन
  3. पादहस्तासन
  4. अश्वसंचालनसान
  5.  पर्वतासन
  6. अष्टांग नमस्कार
  7. भुजंगासन
  8. पर्वतासन
  9. अश्वसंचालनसान
  10. पादहस्तासन
  11. हस्त उत्तासन
  12. प्रणामासन

सूर्यनमस्कार घालताना एकूण किती मंत्र म्हणावेत | Surya Namaskar mantra in marathi 

सूर्यनमस्कार घालत असताना प्रथम सूर्याचे नाव घ्यायचे असते, ते याप्रमाणे “ओम मित्राय नमः” आणि यानंतर प्रत्येक आसन करताना बारा प्रकारची सूर्याची नावे घ्यायची असतात. सूर्यनमस्काराची बारा आसने करताना घ्यायची बारा नावे ती पुढील प्रमाणे,

  1. प्रणामआसन अथवा नमस्कारसन – ओम मित्राय नमः
  2. हस्त उत्तासन – ओम सूर्याय नमः
  3. पादहस्तासन – ओम खगाय नमः
  4. अश्वसंचालनसान – ओम हिरण्यगर्भाय नमः 
  5.  पर्वतासन – ओम आदित्य नमः 
  6. अष्टांग नमस्कार – ओम अकार्य नमः
  7. भुजंगासन – ओम रवये  नमः
  8. पर्वतासन – ओम भानवे नमः
  9. अश्वसंचालनसान – ओम पूष्णवे  नमः
  10. पादहस्तासन – ओम मरीचवे नमः
  11. हस्त उत्तासन – ओम सवित्रे  नमः
  12. प्रणामसन – ओम भास्करय नमः
Surya Namaskar Mantra compress
Surya Namaskar mantra in marathi

सूर्य नमस्कार कसे करावे | Surya Namaskar steps in marathi

Surya Namaskar names in marathi

प्रणामासन

आपल्या चटईवर सरळ उभे रहा. आपले दोघी पाय समान अवस्थेत ठेवा आणि आपले दोनही हात प्रणाम या अवस्थेत म्हणजे नमस्कार करताना आपण जसे हात ठेवतो. त्या अवस्थेत आपल्या छाती पाशी ठेवा. आपण केलेल्या नमस्कार आपल्या छाती च्या मध्यभागी लावून ठेवा जेणेकरून आपली बोटं छातीकडे वाकलेली आणि पंजा जमिनीकडे वळलेला दिसेल. आपल्या हाताचे दोन्ही कोपर समान अवस्थेत ठेवा छातीचा भाग पुढे घ्या आणि खांदे मागे ढकलून ताठ उभे राहा आणि आपली नजर समोर ठेवा. थोडा वेळ असेच उभे राहा. आपण जोडलेल्या हात स्थिर आणि शांत आहेत याची काळजी घ्या. ही मुद्रा आपले लक्ष केंद्रित करून कृतज्ञता दर्शविते. surya namaskar information in marathi या लेखामध्ये पुढे वाचा हस्त उत्तासन.

हस्त उत्तासन

आपल्यासाठी वर सरळ उभे राहा आणि आपले दोघी पाय समान अवस्थेत ठेवा, श्वास घ्या आणि आपले नमस्कार स्थितीत असलेले हात वर करा. आता आपली पाठ ताठ करा, याने तुमचं शरीर पूर्ण पणे वर्तनला जाईल. हस्त उत्तासन ही मुद्रा विश्वापर्यंत पोहोचवण्याची प्रतीक आहे. 

पादहस्तासन

हस्त उत्तासण या क्रियेमध्ये घेतलेला श्वास सोडा आणि पाठीचा कणा सरळ ठेवून सरळ उभे असलेल्या स्थितीतून कमरेच्या दिशेने खाली वाकून घ्या. तुम्हाला शक्य होईल तेवढा खाली वाकायचा प्रयत्न करा. या मुद्रेमध्ये आपली हनुवटी छातीला टाकायचा प्रयत्न करा आणि कपाळ गुडघ्याला टेकायचा प्रयत्न करा, आपले हात जमिनीला किंवा पायांच्या बोटाला टेकवण्याचा प्रयत्न करा. ही मुद्रा नम्रता आणि शरणागती दाखविण्याचा प्रयत्न करते. 

अश्वसंचालनसान

श्वास घ्या आणि तुमचा डावा गुडघा मागे घेण्याचा प्रयत्न करा. डावा पाय जो मागे घेतलेला आहे तो जमिनीवर पक्का ठेवायचा प्रयत्न करा. डावा पायाचा गुडघा जमिनीवर ठेवायचा प्रयत्न करा. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवण्याचा प्रयत्न करा आणि ह्या उजव्या पायावर आपल्या शरीराच्या संपूर्णपणे पूर्ण भार जसे की मांडीचा भाग आपले धड याचा पूर्ण भाग हा उजवा पायावर येईल. आपले दोन्ही हात नमस्कार अवस्थेत वर उचला छातीचा भाग पुढे घ्या खांदे वर करा आणि डोक्याचा भाग मागे झुकवा. ही मुद्रा नियंत्रणाचे प्रतीक साधते. मराठी डिलाइट च्या surya namaskar information in marathi लेखामध्ये पर्वतासन पुढे वाचा.

पर्वतासन

तुम्ही ज्या पोझिशन मध्ये आहेत त्याच पोझिशन मध्ये राहून श्वास सोडत असताना आपले दोन्ही हात पुढे टेकवा आणि दोन्ही पाय मागे टेकवा म्हणजे जेणेकरून डोके आणि छातीचे वजन हे हातावर जाईल. आता पोटरी आणि मांड्यांचे वजन हे पायांवर जाईल. आपले दोन्ही तळपाय एकमेकांनी जवळ घ्या आणि दोन्ही हातही जवळजवळ ठेवा म्हणजे पायाच्या गुडघ्याला गुडघा आणि पायाच्या घोट्याला घोट्या टेकवा.पायापासून तर डोक्यापर्यंत शरीराचा आकार तिरकस ठेवा आणि आपली नजर जमिनीच्या दिशेने असू द्या. ही मुद्रा शक्ती प्रदान करते.

अष्टांग नमस्कार

मागच्या पोझिशनमध्ये जशी अवस्था होती त्या अवस्थेत असताना गुडघे जमिनीवर टेकवा आणि हात कोपरामध्ये वाकून खाली टेकवा आपली हनुवटी छातीला टेकवता येईल याचे प्रयत्न करा. साष्टांगनमस्कारासन या स्थितीमध्ये गुडघे पाय छाती हात आणि कपाळ जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करा. आपल्या हाताचे दोन्ही  कोपरे आपल्या शरीरा जवळ घ्या व शरीराला पोटातून वर उचलून घ्या. यासोबत कमरेचाही भाग वर उचलायचा प्रयत्न करा. ही मुद्रा आदर करण्यास दर्शविते. 

भुजंगासन

मागच्या पोझिशनमध्ये आपल्या हात ज्या ठिकाणी होते त्याच ठिकाणी हात टेकवलेल्या असू द्या आणि कोपरा मधील वाक  काढून हातावर पूर्ण शरीराचा भार देण्याचा प्रयत्न करा. हात सरळ ठेवा, खांदे आणि छातीचा भाग ताट ठेवा, डोक्याचा भाग मागे  खेचावा. पोटाचा आणि कमरेचा भाग दोन्ही हातांच्या मधोमध असू द्या. पायाच्या खोटे एकमेकांना टेकविलेले असू द्या आणि मोठा श्वास घेऊन आपली नजर वर आकाशाच्या दिशेने असू द्या. ही मुद्रा नाग नाग ज्या अवस्थेत आपली फण काढतो त्याचे प्रतीक दर्शवते.

पर्वतासन

ह्या पोझिशनमध्ये तुमचे हात ज्या ठिकाणी तुम्ही टेकवलेले आहेत त्याच ठिकाणी असू द्या व जिकडे तुम्ही पायाचे घोटेही टेकलेले आहेत त्याच ठिकाणी पायाचे घोटेही असू द्या, आणि आपल्या शरीरातील संपूर्ण भाग वर उचलून घ्या पायाची टाच पूर्णपणे जमिनीवर आणि हाताचे पंजा पूर्णपणे जमिनीवर असू द्या . बाकी संपूर्ण शरीराचा भाग वर उचललेला असू द्या. हाताचे कोपर आणि पायाचे गुडघे हे सरळ असले पाहिजेत, पाठीच्या भागानेच आपल्या डोक्याचाही भाग खाली वाकलेला राहिला पाहिजे आणि आता हनुवटी छातीच्या भागाला टेकवायचा प्रयत्न करा. ही मुद्रा पर्वतासारखं मजबूत राहायचा मार्ग दर्शविते.

अश्वसंचालनसान

मागच्या पोझिशनमध्ये जिथे तुमच्या हात टाकलेले होते तिकडे डाव्या हाताजवळ आपला डावा पाय आणि उजवा पाय मागे घेतलेला असू द्या. ह्या आसन मध्ये आपल्या डाव्या पायावर बसायचा प्रयत्न करा. उजव्या पायाचा गुडघा जमिनीवर टेकवा. दोन्ही हात सामान अवस्थेत वर उचला आणि नमस्कार स्वरूपामध्ये मागे झुकण्याचा प्रयत्न करा, छातीचा भाग पुढे डोक्याचा भाग वर मागे खेचून खांदे वर उचला.

पादहस्तासन 

आता तुम्ही ज्या पोझिशन मध्ये आहात त्या डाव्या पायाजवळ आपला उजवा पाय ही आणा आणि अगदी हळू आपले गुडघे सरळ करा. आता उभे राहून दोन्ही पाय जवळ घ्या. कमरेचा भाग वर घेऊन सहज खाली जेवढे वाकता येईल तेवढा वाकायचा प्रयत्न करा. लक्षात असू द्या की ह्या पोझिशनमध्ये आपल्या गुडघ्यांवर ताण यायला नको, खाली वाकण्याच्या पोझिशनमध्ये आपले कपाळ गुडघ्याला टेकविण्याचा प्रयत्न करा.

हस्त उत्तासन

आता पुन्हा पूर्व अवस्थेत येऊन सरळ उभे रहा. दोन्ही पाय एकमेकांजवळ घ्या आणि आपले दोन्ही हात नमस्कार या पोझिशनमध्ये आपल्या छातीशी घ्या. या पोझिशनमध्ये हाताचे बोटे आणि हाताचे पंजे चिकटलेले असावेत. नमस्कार स्वरूप येत असलेल्या आपल्या हाताचा अंगठा छातीशी टेकवा, कोपराचा भाग जमिनीकडे असू द्या. नजर समोर असू द्या आणि दोघे हात वर उचला जेणेकरून पाठीला आणि खांद्यांना ताण पडेल. यामध्ये तुमचे सर्व स्नायू मोकळे  होतील.

प्रणामसन

सरळ उभे राहून दोन्ही हात नमस्कार स्थितीमध्ये घ्या आणि पूर्व परिस्थितीत परत या म्हणजेच आपल्या हात प्रार्थना या पोझिशनमध्ये असू द्या. 

या बारा पायऱ्यांमधून सूर्यनमस्काराचा एक फेरा पूर्ण होतो. मन शांत आणि प्रसन्न करण्यासाठी सूर्यनमस्काराचा आपल्या शरीरावर अधिक परिणाम होतो असतो.

सूर्यनमस्काराचे फायदे मराठी | Surya Namaskar benefits in marathi

सूर्यनमस्कार हा असा व्यायाम आहे ज्यामुळे कमी वेळात शरीराची अधिक कसरत होऊन आपले शरीर निरोगी बनते.

सूर्यनमस्काराचे फायदे पुढील प्रमाणे,

नियमितपणे सूर्यनमस्कार केल्यास आपल्या शरीर अधिक तंदुरुस्त राहते. 
सूर्यनमस्कार हे एक शरीराची एका प्रकारची कसरत आहे आणि या कसरतीमध्ये स्नायू वर तग धरण्याची क्षमता सुधारते.
सूर्यनमस्काराच्या हालचालींमुळे हृदयामधील रक्तवाहिन्यांचा प्रवाह सुधारतो आणि यामुळे आपले हृदय निरोगी होऊ लागते.
निरोगी आहारासोबतच नियमित प्रमाणे सूर्यनमस्कार केल्यास आपले वजन आपण नियंत्रित करू शकतो.  
सूर्यनमस्कार हे मन शांत आणि प्रसन्न करण्यासाठी सर्वात चांगली योगसाधना आहे.
सूर्यनमस्कारा दरम्यान केलेल्या हालचालीमुळे आपला श्वासोच्छ्वास सुधारून आपल्याला विश्रांती अधिक मिळते आणि तणावामधून मुक्ती मिळते.
सूर्यनमस्कार केल्याने एकाग्रता करण्याची क्षमता ही वाढते.
सूर्यनमस्कार करत असताना मुळे झालेल्या हालचालींमुळे पचन व्यवस्था सुधारून आतड्यांसंबंधीत आरोग्य सुधारते.
सूर्यनमस्कार करताना स्नायू मध्ये लवचिकता वाढते.
नियमित सूर्यनमस्कार केल्यानंतर मणक्यांमधील त्रास कमी होतो.
सूर्यनमस्कारामुळे फुफ्फुसे आणि श्वसन क्रिया चांगली होते.
सूर्यनमस्कार केल्याने दिवसभरातील आपली ऊर्जा जशी तशी टिकून राहते.
सूर्योदयाच्या वेळी सूर्यनमस्कार केल्याने निसर्गाशी आपले एक अतूट नाते तयार होते.

जर तुम्ही नेहमीप्रमाने सूर्यनमस्कार करत असाल तर सूर्यनमस्काराचे फायदे तुम्हाला नक्की जाणवतील. परंतु यासाठी सूर्यनमस्काराचे पोजेस उत्कृष्टरित्या पार पाडणे अधिक आवश्यक आहे. surya namaskar information in marathi मध्ये दिल्याप्रमाणे जर तुम्ही सूर्य नमस्कार करत असाल तर तो योग्य आहे असा समजावा.

हे ही वाचा,

वारंवार विचारले जाणारे प्रश्न | FAQ

सूर्यनमस्कार कधी करावे?

सूर्यनमस्कार हा सूर्योदयाच्या वेळेस किंवा सूर्यास्त च्या वेळेला तुम्ही करू शकतात

सूर्यनमस्कार घालताना एकूण किती मंत्र म्हणावेत?

सूर्यनमस्कार घालताना एकूण सूर्याची बारा नावे म्हणजेच बारा प्रकारचे मंत्र म्हटले जातात.

सूर्यनमस्काराचे किती प्रकार आहेत? 

वरील लेखात surya namaskar information in marathi मध्ये दिल्याप्रमाणे सूर्यनमस्काराचे एकूण बारा (12) प्रकार आहेत.

सूर्यनमस्कारासाठी सर्वोत्तम वेळ कोणती?

सूर्यनमस्कारासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे सूर्योदय होय. 

स्ट्रेचिंग साठी सूर्यनमस्कार चांगला आहे का?

स्ट्रेचिंग साठी सूर्यनमस्कार हा एक चांगला पर्याय आहे. सूर्यनमस्कारामुळे पूर्ण अंगाचा व्यायाम होऊन स्नायू बळकट होतात तसेच स्ट्रेच होतात.

सूर्यनमस्कार हा व्यायाम प्रकार काय विकसित करण्याचा मुख्य प्रकार आहे ?

सूर्यनमस्कार हा व्यायाम श्वसन प्रक्रिया, हृदयासंबंधीत आरोग्य, वजन नियंत्रण, स्नायू बळकट करण्यास उपयुक्त ठरतो.

सूर्यनमस्काराने वजन कमी करता येते का? 

surya namaskar information in marathi या लेखामध्ये दिल्याप्रमाणे नियमितपणे सूर्यनमस्कार केल्यामुळे वजन कमी करता येते. सूर्यनमस्कारामध्ये पूर्ण शरीराची कसरत होते. ज्याला सर्वांग व्यायाम म्हटले जाते म्हणूनच वारंवार किंवा नियमित प्रमाणे सूर्यनमस्कार केल्यास वजन कमी करता येऊ शक.

Leave a Comment