पिसीओडी म्हणजे काय? PCOD meaning in marathi

नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपले आजच्या पिसीओडी म्हणजे काय? (PCOD)meaning in marathi या लेखात .  

आजच्या काळात महिलांना अनेक आजार उद्भवताना दिसत आहेत. गर्भधारणा, मासिक पाळी अनियमित असणे अशा अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. तसेच काही काळापासून पीसीओडी (PCOD) ही अनेक महिलांमध्ये दिसून येत आहे. बर्‍याच वेळा गर्भधारणा न होणे, मासिक पाळी अनियमित होणे अशी काही कारणे सांगितल्यास पिसीओडी ची लक्षणे दिसून येतात. चला तर मग आजच्या लेखात आपण बघूया पिसीओडी म्हणजे काय?(PCOD)meaning in marathi. अधिक माहिती साठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

Table of Contents

पीसीओडी फुल फॉर्म | PCOD Full Form In Marathi

PCOD full form-Polycystic Ovarian Disorder “पोलिक्सिचियन्स व ओव्हरियन डिसऑर्डर”  पीसीओडीची व्याख्या मराठित सांगायची झाली तर पॉलिसिस्टिक अंडाशय रोग असे म्हणले जाते.

पिसीओडी म्हणजे काय? | PCOD meaning in marathi

PCOD म्हणजे पॉलीसिस्टिक ओव्हेरियन डिसॉर्डर (PCOD full form in marathi ) ही महिलांमध्ये दिसणारी एक   एंड्रोकाइन विकाराची समस्या आहे. या विकारात अंडशयांचा विकास न होऊन बारीक सीस्ट्स बनणे, नियमितपणे मासिक पाळी न येणे, वजन वाढणे, हार्मोन्स बदल, तव्चेवरील समस्या, चुकीचा आहार, अशा अनेक कारणामुळे महिलाना पिसीओडी ह्या विकारस सामोरे जावे लागत आहे. हे पिसीओडी चे मुख्य कारण आहेत.

PCOD (पॉलीसिस्टिक ओव्हेरियन ) ह्या रोगाचे महिलांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येत आहे. स्रियांच्या हार्मोनल बदलांमुळे अनेक अंडाश्यामद्धे सिस्ट होतात. सिस्ट मुळे  असलेल्या अशुद्ध अंडीच्या तळाशी ओव्हेरियन्सच्या भागात ते साठते ह्या परिस्थितीत हार्मोन्स च्या बदलांमुळे महिलांच्या शरीरात (एंड्रोजन ) पुरुष हार्मोन्स ची वाढ होते आणि छोट्या आकाराचे अशुद्ध अंडीचा निर्माण होत असते. यामुळे ह्या अंडीची घाण संक्रमण होण्यास सुरुवात होते आणि ह्या कारणामुळे मासिक पाळी अनियमित होऊन पीसीओडी ह्या विकरास सामोरे जावे लागते.

PCOD चे कारने | PCOD cause in marathi 

हार्मोनल असंतुलन

PCOD च्या महत्वाच्या करणांमध्ये एक मुख्य कारण म्हणजे हार्मोन्सचे असंतुलन. हार्मोन्स म्हणजे शरीरात वाहणारा एक प्रवाह असतो. ह्या प्रवाहामुळे अंडाशयाचा विकास आणि मासिक पाळी नियमित पणे येणे हे बांधून ठेवते. 

अनुवंशिकता in PCOD meaning in marathi

आपल्या कुटुंबातील एखादी महिलेला पिसीओडी असेल तर आपल्याला ही पीसीओडी होण्याची शक्यता असते. PCOD अंनुवंशिकतेमुळे ही होऊ शकतो.

लठ्ठपणा

जर आपल्या शरीरात अतिरिक्त चरबी जमा होत असल्यास PCOD होण्याची संभावना होऊ शकते. अतिरिक्त वजन वाढण्याणे लठ्ठपणा येऊ शकतो.

व्यायमाची कमतरता

आजकालच्या धावपळीच्या युगात बर्‍याच महिला व्यायमासाठी दुर्लक्ष करतात मात्र तुम्ही जर  नेहमी व्यायाम करत असाल तर तुम्ही PCOD पासून बचाव करू शकतात.

PCOD चे लक्षणे | PCOD symptoms in marathi 

PCOD, ज्याचा अर्थ पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम आहे, हा एक हार्मोनल विकार आहे..प्रत्येक स्त्रीला PCOD ची वेगवेगळी लक्षणे असू शकतात. PCOD ची सर्व सामान्य लक्षणे खालीलप्रमाणे:

अनियमीत मासिकपाळी

मासिक पाळी सरासरी 28 दिवसांपेक्षा जास्त किंवा कमी असू शकते. प्रत्येक महिन्याला स्त्रीयांच्या गर्भाशयातून स्त्रीबीज बाहेर येते ह्या प्रक्रियेलाच मासिक पाळी असे म्हणतात. मात्र PCOD मुळे स्त्रीबीज तयार होण्यास अडथळे येतात व मासिक पाळी ची प्रक्रिया लांबते.  

मासिकपाळी वेळेवर न येणे हे PCOD चे प्रमुख लक्षण आहे. नियमितपणे येणारी मासिक पाळी अचानक लांबत जाने, रक्तस्राव आधिक होणे, मासिक पाळीमद्धे अनेक महिन्यांचा गॅप असणे, ही PCOD ची लक्षणे आहेत. PCOD च्या प्रमुख लक्षणामद्धे मासिक पाळी ची अनियमितता हे प्रमुख लक्षण आहे.

अंडाशयात असंतुलन

PCOD असलेल्या महिलांमध्ये अंडाशयच्या विकासात असंतुलन होते. अंडाशयात किवा पोटात तीव्र वेदना होणे, मांसपेशी वाढणे, अंडाशयात असंतुलन निर्माण करते.

अतिरिक्त वजन

PCOD असलेल्या महिलांमध्ये वजन वाढणे सामान्य आहे. हार्मोनल संतुलन बिघडून हार्मोन्सचे असंतुलन होते किंवा हार्मोन्स अधिक वाढण्याच्या प्रकियेमुळे वजन वाढीची समस्या होते.

त्वचेवर होणार्‍या समस्या

PCOD असलेल्या महिलांमध्ये तव्चेवर हार्मोन्स च्या असंतुलनामुळे ही अनेक समस्या होऊ लागतात. ह्यामुळे तव्चेवर पिंपल्स, डार्क स्पॉट, अक्ने ही दिसू लागतात. ज्या महिलाना PCOD असेल त्यांना हिवाळ्यात अस्थमाचा त्रास देखील होऊ शकतो. 

आरोग्य समस्या

PCOD असलेल्या महिलांमध्ये मानसिक आरोग्य, उच्च रक्तदाब प्रमाण, शुगर होणे, हार्ट रोग, आणि अनेक वैद्यकीय समस्या दिसू लागतात.

डोके दुखणे

हार्मोनल संतुलन बिघडल्या कारणाने आपल्या प्रत्येक अवयवावर याचा परिणाम होऊ लागतो. काही महिलांना PCOD मध्ये प्रचंड डोकेदुखीचा त्रास सहन करावा लागतो 

केस गळणे

हार्मोन्स च्या बदलमुळे PCOD मध्ये महिलांचे केस ही अधिक प्रमाणात गळू लागतात. 

केसांची जास्ती वाढ होणे

स्त्रीयांच्या चेहर्‍यावर, छातीवर, पोटावर किवा शरीराच्या कोणत्याही भागावर जास्ती वाढ होऊ शकते. हे सर्व शरीरातील एंड्रोजन (पुरुष संप्रेरक) च्या पातळीत वाढ झाल्यामुळे होते.  

मुरूम

PCOD असल्यास शरीराच्या कुठल्याही भागावर मुरूम येण्याची शक्यता असते. 

मूड बदल

PCOD असलेल्या महिलाना नैराश्य, चिंता, थकवा जाणवू शकतो, तसेच त्यांचा वेळे वेळी मूड स्विंग होऊ शकतो.  

PCOD चे लक्षणे/PCOD symptoms in marathi 
PCOD चे लक्षणे/PCOD symptoms in marathi 

PCOD मुळे होणारी गर्भधारनेची समस्या 

पिसीओडी म्हणजे काय? तर PCOD (पॉलीसिस्टिक ओव्हेरियन रोग). आजच्या काळात बर्‍याच महिलाना मुलबाळ होण्यास अडथळे निर्माण होतात, त्यातलच हे एक प्रमुख कारण म्हणजेच  PCOD. PCOD मुळे होणारी गर्भधारनेची समस्या असलेल्या महिलांमध्ये गर्भधारनेची क्षमता कमी होऊ लागते. ह्या रोगाचे कारण म्हणजे  हार्मोन्सच्या असंतुलनता असते. ह्या रोगामद्धे गर्भावस्थेत अंडाशयातील अंडे परिपक्व होत नाहीत. अंडाशयातील प्रगती होत नाही, अंडाशयांच्या परिस्थितीतही बदल जाणवतो.

PCOD मध्ये स्त्रीची स्वास्थ्य समस्या 

PCOD (पॉलीसिस्टिक ओव्हेरियन रोग) असलेल्या महिलांमध्ये स्वास्थ्य समस्यांच प्रमुख कारण म्हणजे हार्मोन्सच्या असंतुलनानाणे होते. अंडाशयाची समस्या PCOD मध्ये अंड्याची प्रगती थांबते आणि ह्यामुळे अंडी परिपक्व होत नाही. आहारात बदल तसेच  जीवनशैलीत सुद्धा बदल होतो. अनुपयुक्त आहार, अव्यवस्थित जीवनशैली, अतिरिक्त वजन, आणि तनाव ह्या समस्या अद्भवू लागतात. थायरॉइड असल्यास या  संबंधित असंतुलन अंडाशयांच्या कार्यक्षमतेवर प्रभाव होऊ शकतो.

PCOD (पॉलीसिस्टिक ओव्हेरियन रोग) चा निदान आणि उपचार | PCOD treatment in marathi 

औषधांची तपासणी

डॉक्टरांनी दिलेली औषधे व्यवस्थित तपासून पाहा. डॉक्टरांनी दिलेली औषधे तुमच्या हार्मोन्सच स्तर योग्यरित्या ठेवतील याची काळजी घ्या.

चुकीचा आहार

जंक फूड, मैदा असलेले पदार्थ, अति साखरयुक्त असलेले पदार्थ, भेसळ केलेले पदार्थ, तळलेले पदार्थ, फास्ट फूड, पॅकिंग असलेले फूड खाणे याचाही शरीरावर परिणाम होतो. तुम्ही ज्या पदार्थांचे सेवन करताय ते पदार्थ अधिक फायबरयुक्त, प्रोटीणयुक्त असलेले असावेत याची काळजी घ्या.

व्यायम करणे

दररोज नियमितपणे व्यायम करणे, चालणे, फिरणे, आसन करणे, झुंबा डांस करणे नियमितपणे 60 मिनिटे तरी रोजचं व्यायम करावा.

हार्मोन्स थेरपी

कुठल्याही प्रकारच्या औषधांचा अतीवपर केल्याने हार्मोनल मध्ये बदल होऊ शकतो, कोणतीही औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार च घ्यावीत.  

पीसीओडी साठी आपल्या जीवनशैलीत आवश्यक त्या प्रकारचे बदल करा, नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. नियमितप्रमाणे व्यायम करा, आवश्यक असलेली औषधे घेऊन हार्मोन्स नियत्रित ठेवा याने सहजरीत्या गर्भ धारणा होऊ शकते.  

PCOD संबधित होणार्‍या समस्या 

  • नैराश्य 
  • लिव्हर ला सूज येणे 
  • गर्भाशयात रकत्स्त्रव होणे 
  • वंध्यत्व
  • गर्भाशयाचा कॅन्सर 
  • मधुमेह 
PCOD संबधित होणार्‍या समस्या
PCOD संबधित होणार्‍या समस्या

PCOD ची तपासणी कशी करावी | How to test PCOD in Marathi 

प्रत्येक महिलाला मासिक पाळी येते. मासिक पाळीमध्ये स्त्रीयांच्या गर्भाशयात परिपक्व झालेले स्त्रीबीज बाहेर पडते यालाच मासिक पाळी असे म्हणतात. PCOD असल्यास मासिक पाळीमध्ये रक्तस्त्राव अधिक होतो यासाठी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य ती तपासणी करावी. पीसिओडी साठी सर्वप्रथम पोटाची सोनोग्राफी केली जाते. सोनोग्राफी केल्यांनातर डॉक्टरांना तुमच्या स्त्री बिजाविषयी माहिती मिळते. तुम्हाला जर पीसीओडी हा विकार असेल तर डॉक्टर अगोदर सोनोग्राफी चा सल्ला देतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच सोनाग्राफी करावी. ज्यामधे तुमच्या स्त्रीबिजाची वाढ समजेल. जर तुम्हाला पीसीओडी असेल तर याचा परिणाम तुमच्या स्त्रीबीज वाढीवर होतो. पीसीओडी असल्यास गर्भधारणा होण्यास ही अडथळे निर्माण होतात यासाठी डॉक्टर मासिक पाळीची अनियमितपना अंड्याची संख्या, अंड्याची क्षमता, अंड्यांचा आकार व अंड्यांची गुणवत्ता तपासून घेतात.

हार्मोनल तपासणी

हार्मोन्स तपासणी करून आपणास पीसीओडी ची समस्या असेल तर लक्षात येईल. हॉर्मोनल तपासणी मध्ये एस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रोन, टेस्टोस्टेरोन, ल्युटेनाइझिंग हॉर्मोन (LH), फोलिकल स्टिमुलेटिंग हॉर्मोन (FSH) अशा हार्मोनल टेस्ट करायचा डॉक्टर सल्ला देतात.

PCOD साठी स्वतः घ्यायव्याची काळजी 

संतुलित आहार

पीसीओडी असलेल्या महिलांसाठी चांगला आहार घेणे आवश्यक आहे. पालेभाज्या, फळभाज्या, उच्च फायबर असलेले पदार्ध, दूध, दही, फळे, तिल तेल, डाळिंब अश्या पद्धतीचा संतुलित आहार घ्यावा. सकाळी उठल्यावर प्रोटीणयुक्त पदार्थ खावेत.   

नियमित व्यायाम

पीसीओडी सारख्या समस्या दूर करण्यासाठी नियमित व्यायाम करणे खूप गरजेचे आहे. तुम्ही घरी योगा, यूट्यूब वरुण काही व्यायमाचे प्रकार, झुंबा डांस, स्विमिंग, जॉगिंग अश्या पद्धतीचे व्यायाम नियमितपणे करू शकतात.

वजन व्यवस्थापन

पीसीओडी असल्यास वजन वाढायची क्षमता अधिक असते, यासाठी तुम्ही योग्य तो डाएट, नियमित पणे व्यायाम करून आपले वाढणारे वजन नियंत्रित करू शकतात.

प्रत्येक महिलेसाठी PCOD चे उपाय वेगळे असू शकतात. जर आपणास पीसीओडी ची समस्या वाटत असेल डॉक्टरांना भेटून त्याचा इलाज करावा.

PCOD आणि गर्भधारणा 

पीसीओडी असलेल्या महिलांमध्ये गर्भधारनेची समस्या असू शकते. पीसीओडी म्हणजे अंड्याची सिस्ट ची संक्रमण करणारी परिस्थिति आहे. याचा परिणाम गर्भधारनेवर होत असतो. मासिक पाळी अनियमितता, स्त्रीबिजाजी कमतरता, हार्मोलन असंतुलन, इंसुलिन अतिरिक्त वजन हे सर्व प्रकार गर्भधारनेच्या प्रक्रियेवर अडथळे निर्माण करू शकतात. जर आपणास पीसीओडी असेल तर योग्य आहार घेऊन व्यायाम करून पीसीओडी ला हरवू शकतात. गर्भवती होण्यासाठी ओव्हूलेशन होणे गरजेचे असते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ओव्हूलेशन वर योग्य तो उपचार आपण करू शकतो. उपचारामद्धे अल्ट्रा साऊंड पद्धतीचा उपचार करून डॉक्टर ओव्हूलेशन कधी होईल याचा अंदाज देतात. ओव्हूलेशन च्या दरम्यान सेक्स केल्याने तुम्हाला गर्भधारणा होऊ शकते. जर तुमचं वाढत वय असेल तर तुम्ही आयु.आय आणि आय. व्हि. एफ च्या सहाय्यणे देखील गर्भवती होऊ शकतात. प्रत्येक पीसीओडी असलेल्या महिलेच्या प्राकृतिनुसार डॉक्टर योग्य तो सल्ला देतात.

अधिक माहितीसाठी आपण या Unicef संकेतस्थळाच्या च्या लिंक वर जाऊ शकता.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ) 

PCOS म्हणजे काय?

PCOS म्हणजे पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम हा एक हार्मोनल विकार आहे जो वाढत्या वयाच्या स्त्रियांमध्ये दिसतो.
PCOS मध्ये, अंडाशय सामान्य पेक्षा जास्त प्रमाणात एन्ड्रोजन (पुरुष हार्मोन्स ) तयार करतात, ज्यामुळे मासिक पाळी वेळेवर येत नाही आणि अंडाशयांवर लहान लहान सिस्ट म्हणजेच गाठी तयार होतात. PCOS अंनुवंशिक किवा जीवनशैलीत होणार्‍या बदलमुळेही होऊ शकतो.
PCOS मध्ये अनियमित मासिक पाळी, केसांची जास्त वाढ (हर्सुटिझम), पुरळ, पिंपल्स आणि वजन वाढणे अशी काही लक्षणे दिसू शकतात. PCOS असलेल्या महिलाना मधुमेह, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्टेरॉल, झोप न येणे अश्या विकारांना सामोरे जावे लागते.
PCOS असलेल्या महिलांनी घरगुती उपचारासाठी नियमित व्यायाम करणे, दररोजच्या जेवणात चांगला निरोगी आहार घेणे, मासिक पाळीचे व्यवस्थापन आणि एंड्रोजनची पातळी कमी करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेऊ शकतात.

PCOD आणि PCOS मध्ये काय फरक आहे?

PCOD म्हणजेच  (पॉलीसिस्टिक ओव्हेरी डिसीज) आणि PCOS म्हणजेच (पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम) असा याचा फूल फॉर्म आहे. PCOD मुळे अंडाशयावर लहान सिस्ट म्हणजेच गाठी तयार होतात यामुळे हार्मोनल संतुलन बिघडते आणि अनियमित मासिक पाळी, केसांची जास्त वाढ, पुरळ असे  हार्मोनल विकार होतात.
ज्यांचा अंडाशयांवर परिणाम होतो. PCOS (पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम) मध्ये हार्मोनल असंतुलन, अनियमित मासिक पाळी, अ‍ॅन्ड्रोजन (पुरुष संप्रेरकांचे) जास्त प्रमाण, इन्सुलिन प्रतिरोधकता आणि लठ्ठपणा यांचा सामना करावा लागतो. पीसीओडी आणि पीसीओएस या दोन्ही परिस्थितीत अंडाशयचे कार्य आणि हार्मोनल असंतुलन ह्या दोन्ही परिस्थितीचा सामना करावा लागतो. सकस आहार घेऊन नियमितपणे व्यायम करून आपण PCOD व PCOS ह्या विकारावर मात करू शकतो.

PCOD असल्यास गर्भधारणा होऊ शकते का ?

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेऊन तुम्ही हार्मोन्स नियंत्रित करू शकतात आणि गर्भवती होऊ शकतात. जर तुमच्या गर्भधारनेत अधिक प्रमानात अडचणी असतील तर IVF च्या मदतीने तुम्ही पिसीओडी वर मात करू शकतात. तुम्ही मराठी delight च्या Pcod meaning in marathi या लेखामध्ये अधिक माहिती घेऊ शकतात.

Leave a Comment