Benefits of exercise in marathi | जाणून घ्या मराठीत व्यायामाचे फायदे

नमस्कार मंडळी, आजच्या ह्या लेखात आपण व्यायमचे फायदे काय आहेत? हे बघणार आहोत ..

आपल्याला सर्वांना माहिती आहे व्यायाम करणे किती चांगले आहे ते, परंतु आपल्याला हे माहीत आहे का की व्यायम करणे आपल्या आरोग्यासाठी किती फायद्याचे आहे? वैज्ञानिक संशोधनानुसार सुरक्षित जीवन जगण्यासाठी नियमितपणे व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे. आजच्या धावपळीच्या जगात किवा कामाच्या गडबडीत बरेच लोक वाढत वजन, मधुमेह, कोलेस्ट्रॉल यासारख्या आजारांशी लढा देत आहेत, अश्या परिस्थितीत आपन ह्या रोगांपांपासून सुरक्षित कसे राहू तर यासाठी नियमित व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे. व्यायाम करणे पुरुष, महिला, लहान मूल, म्हातारी मानस सर्वांसाठी फायद्याचे आहे.

चला तर मग आजच्या ह्या लेखात आपण बघूया Benefits of exercise in marathi काय आहे. व्यायामाचे फायदे मराठीत जाणून घेण्यासाठी हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

Table of Contents

व्यायामचे महत्व | Vyayam che mahatva in marathi 

चांगले आरोग्य ठेवण्यासाठी किवा चांगले शरीर ठेवण्यासाठी व्यायाम करणे खूप गरजेचे आहे. Vyayam che mahatva in marathi या भागामध्ये आपण व्यायामाचे महत्व बघणार आहोत. व्यायाम ही एक अशी निर्मिती आहे जी आपल्या शरीराला आकार द्यायचं काम करते. नियमित व्यायाम करणे हा निरोगी जीवन जगण्याचा एक महत्वाचा घटक आहे. व्यायामाचे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर असंख्य असे चांगले फायदे होतात. नियमित व्यायाम केल्याने शारीरिक हालचालींमद्धे तंदूरस्ती राहते, हृदय व रक्तवाहिन्याचे आरोग्य वाढते, शारीरिक ऊर्जा वाढते आणि शरीराचे वजन निरोगी राहण्यास मदत होते. याव्यतिरिक्त, हृदयविकार, मधुमेह, कर्करोग यासारख्या विविध रोगांना प्रतिबंधित करण्यासाठी किंवा व्यवस्थापित करण्यात व्यायाम महत्त्वपूर्ण आहे.

शारीरिक फायद्यांव्यतिरिक्त, व्यायामाचे मानसिक फायदे देखील आहेत, जसे स्त्रीयांना मासिक पाळी नियमित यावी म्हणून एंडोर्फिनच्या हार्मोन्स वर कंट्रोल करता येते नियमित व्यायम केल्याने फील गुड नावाचे हार्मोन्स तयार होतात जे चिंता कमी करण्यास, तनाव कमी करण्यास नैराश्य जीवनाचा सामना करण्यास मदत करतात. आपण नियमित व्यायाम केल्याने सकारात्मक होतो, चांगल्या कार्याला प्रोत्साहन मिळते. नियमित व्यायमाचे फायदे  स्नायू आणि हाडे मजबूत करण्यासाठी, लवचिकता, मानसिक आरोग्य आणि मानसिक संतुलन वाढवण्यासाठी आणि एकूण शारीरिक कार्यक्षमता सुधारण्यासाठी व्यायाम हा उत्कृष्ट असा एक मार्ग आहे. धावणे, सायकल चालवणे किंवा पोहणे यासारखे व्यायाम हृदय , हृदयविकार व रक्तवाहिन्यासंबंधी क्रिया असलेले , किंवा वेटलिफ्टिंग, योगासने असो, असा प्रत्येक व्यायाम प्रकार शरीराच्या विविध भागांना अधिक फायदे पोहचवण्याचे काम करतो.  

व्यायाम म्हणजे काय? vyayam mhanje kay in marathi 

व्यायाम म्हणजे काय तर संपूर्ण आरोग्य किंवा शारीरिक तंदुरुस्ती सुधारण्यासाठी केलेली शरीराची हालचाल म्हणजेच व्यायाम होय. ज्यामध्ये जॉगिंग, पोहणे, सायकलिंग किंवा नृत्य, सतत हालचालींचा समावेश असतो यामुळे आपल्याला फिट राहन्यास मदत होते, स्नायू बनवणे आणि मजबूत करणे,अश्या क्रियेला आपण व्यायाम म्हणू शकतो.  

व्यायामाचे फायदे |vyaymache fayde in marathi 

आपल्याला सर्वांना माहितीच आहे की व्यायाम केल्याने आपल्या शरीराला किती फायदे होतात प्रामुख्याने व्यायाम केल्याने शारीरिक आणि मानसिक दोन्ही आरोग्यासाठी फायदे मिळतात. वाढते वजन , हृदयरोग चांगल्या त्वचेसाठी नियमितप्रमणे व्यायम करणे खूप गरजेचे आहे.  

व्यायामाचे प्रमुख फायदे |Benefits of exercise in marathi 

वजन नियंत्रित राहन्यास मदत  

नियमित व्यायाम केल्याने वजन नियंत्रित रहण्यास मदत होते. निरोगी शरीराचे वजन योग्य ठेवण्यासाठी व्यायाम अतिशय मुख्य भूमिका बाजवतो. व्यायामाने कॅलरीज बर्न होण्यास मदत होते.  व्यायाम केल्याने शरीरातातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. संतुलित आहारासोबतच व्यायाम हे वजन कमी करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावते. यासाठी तुम्ही घरातली रोजची काम स्वतः करू शकतात. लिफ्टच्या ऐवजी तुम्ही जिना चढ उतार करू शकतात. सकाळी किवा संध्याकाळच्या वेळेला बाहेर जाऊन काही वेळासाठी पायी चालू शकतात.

हृदय व रक्तवाहिन्यासंबधितचे आरोग्य सुधारेल 

आपल्या शरीरात वाढलेला रक्तप्रवाह शरीरात ऑक्सीजन ची पातळी वाढवत असतो, ज्यामुळे कोरोनरी धमनी रोग उच्च कोलेस्ट्रॉल, आणि हृदयविकारचा झटका ह्या रोगांची शक्यता असते. ऐरोबिक व्यायाम जसे की पोहणे, धावणे किवा मग सायकल चालवणे हे सर्व व्यायाम हृदयाला बळकट करतात आणि यामुळे रक्त पंप होण्याची क्षमता वाढते. नियमितपणे व्यायाम केल्याने रक्तदाब कमी होतो, सोबतच रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित रहण्यास मदत मिळते. शरीरातील रक्ताभिसरण सुधरून हृदय मजबूत बनते.

Benefits of exercise in marathi marathidelight
Benefits of exercise in marathi 

हाडे आणि स्नायू बळकट होतात

स्ट्रेंथ ट्रेनिंग व्यायाम, जसे की वेटलिफ्टिंग किंवा रेझिस्टन्स ट्रेनिंग, स्नायू तयार आणि मजबूत करण्यास मदत करतात. यामुळे शारीरिक शक्ती वाढते,  सोबतच स्नायूंची सहनशक्ती सुधारते आणि एकूण शारीरिक कार्यक्षमता वाढते. नियमितप्रमाणे व्यायाम केल्यास स्नायूंचे सामर्थ्य वाढवण्यास मदत होते. शरीराला बळकटपणा ही येतो.  

जुन्या आजारांचा धोका कमी 

नियमित व्यायाम केल्याने उच्च रक्तदाब आणि मधुमेह यसारख्या रोगांना नियत्रित करता येते. नियमित व्यायामामुळे हृदयविकार,  मधुमेह, विशिष्ट प्रकारचे कर्करोग (जसे की कोलन आणि स्तनाचा कर्करोग) आणि ऑस्टिओपोरोसिस याचबरोबर विविध जुनाट आजारांचा धोका कमी होतो

मानसिक आरोग्य व मनस्थिती सुधारण्यास मदत 

व्यायामाचा आपल्या मानसिक आरोग्यावर अधिक परिणाम होतो. हे एंडोर्फिन सोडण्यास उत्तेजित करते, जे नैसर्गिक मूड बूस्टर आहेत आणि कॉर्टिसोल सारख्या तणाव संप्रेरकांची पातळी कमी करते. नियमित व्यायामामुळे नैराश्याची लक्षणे दूर होण्यास, चिंता कमी करण्यास, संज्ञानात्मक कार्य सुधारण्यास आणि एकूणच मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत मिळते व्यायामातून आपल्याला तणवातून मुक्तता मिळते.  

चांगली झोप येणे 

व्यायाम केल्याने शरीरास आधिक चालना मिळते. शारीरिक हालचालीमुळे झोपेची पद्धत सुधारते. नियमितप्रमाणे व्यायाम केल्यास लवकर झोप येते त्याचप्रमाणे शांत आणि खोल झोप येते. आरोग्यातील झोपेची गुणवत्ता सुधारते. जर तुम्ही इनसोम्नियाने त्रासले असणार तर शारीरिक हालचालीमुळे तुम्ही ते सावरू शकतात.  

ऊर्जा पातळी वाढते 

जर तुम्ही नियमित व्यायाम करत असाल तर आपली भूक वाढ होते आणि अश्या मध्ये जर तुम्ही स्वताला काही पोषक अन्न खायला दिले तर तुमची ऊर्जा वाढेल. नियमित व्यायाम केल्याने ऊर्जा पातळी वाढते व थकवा कमी जाणवतो. शरीराची आक्सिजन आणि पोषकता वाढते म्हणजेच चैतन्य वाढवते व थकवा कमी करते. Benefits of exercise in marathi या लेखामध्ये आपण आणखी काही फायदे पुढे बघणार आहोत.

मेंदूचे आरोग्य

व्यायाम हा मेंदूच्या कार्याशी आणि तुमच्या सकारात्मक क्षमतेशी जोडला गेलेला आहे. याने तुम्हाला स्मरणशक्ती,एकाग्रता आणि मानसिक आरोग्य स्थिरावते.  

दीर्घायुष्य 

नियमित व्यायाम केल्याने जुन्या आजारांचा धोका कमी होतो व दीर्घायुष्य लाभते. नियमित केलेल्या शारीरिक हालचालीमुळे हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठ पन्ना ह्या विकारांपासून मुक्ति मिळते व आरोग्य लाभते.

त्वचा टवटवीत होते 

नियमित व्यायाम केल्याने ब्लड फ्लो म्हणजेच रक्तभिसरण चांगले राहते आणि यामुळे तव्चेला ऑक्सीजन आणि न्यूट्रिएंट्स मिळतो व तव्चा अधिक सुधारते तसेच शरीराच्या चयपचयच्या गतीमध्ये सुधारणा होते.  

शरीरातील चरबीचे व्यवस्थापन होते 

नियमित व्यायाम केल्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी किंवा Fat loss होण्यात मदत होऊन आपण आणखी उत्साही आणि हलके होऊ शकतो. अतिरिक्त चरीबीमुळे सुद्धा अनेक आजारांचा सामना करावा लागतो,

गुड्गेदुखी,सांधेदुखी,यासारख्या आजारांचा धोका कमी होतो 

साहजिक आहे, योग्यरीतीने व्यायाम केल्याने गुड्गेदुखी, सांधेदुखी यासारख्या आजारांचा धोका कमी होतो. आपण व्यायामामध्ये लेग, शोल्डर अश्या सर्व प्रकारच्या व्यायामाचा समावेश करत असल्याने आपले स्नायू हे बळकट झालेले असतात.  

व्यायामाने शरीर बांधेसुद आणि निरोगी बनते

व्यायाम केल्याने शरीर हे निरोगी आणि बांधेसुद बनते. तुमच्या शरीराची बनावट ही एक खेळाडू सारखी होते. ज्याने तुम्ही पटकन उठू बसू शकतात आणि आपले कामे करू शकतात. व्यायाम केल्याने कोणतेही कार्य पटकन होते, स्र्फुती मिळते, आत्मविशावस वाढतो.  

नियमित प्रमाणे व्यायम केल्यास कोलेस्ट्रॉल कमी होतो 

नियमित व्यायामाने शरीरातील कोलेस्ट्रॉल चे प्रमाण कमी होण्यास मदत होते व तुम्ही आणखी ताजेतवाने असता.  

व्यायामाने दिवसभर आळस सुद्धा येत नाही 

व्यायाम केल्याने दिवासभराचा थकवा आणि आळस हा नाहीस होतो. दिवसभर आपण ऊर्जावाण असतो.

व्यायामामुळे रोगप्रतिकार शक्ति वाढते 

व्यायामामुळे रोगप्रतिकार शक्ति वाढण्यास मदत होते, जेणेकरून आपण नको नको त्या आजारांपासून लांब असतो. एखादी जखम, आजार असल्यास लवकर बरा होण्यास मदत होते.  

व्यायामामुळे नैराश्य दुरावते 

व्यायामामुळे आपल्याला असलेले नैराश्य दुरावते.

अधिक माहितीसाठी आपण WHO – या World Health Organization या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

व्यायामाचे प्रकार 

व्यायामाचे अनेक प्रकार आहेत, व्यायाम हा शारीरिक तंदूरस्ती साठीच असतो. व्यायामाचे काही प्रकार पुढीलप्रमाणे,

  • एरोबिक व्यायाम / aerobic exercises
  • अनेरोबिक व्यायाम / Strength exercise
  • स्ट्रेचिंग व्यायाम /Flexibility exercises
  • संतुलन आणि समतोल व्यायाम / Balance and stability exercises
  • कमीत कमी परिणाम करणारे व्यायाम /Low-impact exercises
  • कार्यात्मक व्यायाम/ Functional exercises
  • फिटनेस वर्ग /Group fitness classes
  • खेळ आणि मनोरंजनात्मक /Sports and recreational activities
  • मन-शरीर व्यायाम /Mind-body exercises

वारंवार विचारले जाणारे प्रश्न | FAQ 

दररोज किती तास व्यायाम करावा

मुले-  
12-17 वर्षातील मुलांनी दररोज 60 मिनिटे जोरदार तीव्र वेगाने व्यायाम केला पाहिजे, यामध्ये एरोबिक व्यायाम, स्नायू-मजबूत करणारे क्रिया आणि हाडे मजबूत करण्याच्या क्रिया ते करू शकतात.

प्रौढ (18-64 वर्षे)
दररोज 30 मिनिटाचा व्यायाम तरी करावा. अमेरिकन हार्ट असोसिएशन आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या संशोधनानुसार दर आठवड्याला किमान 150 मिनिटे मध्यम-तीव्रता एरोबिक क्रियेचा किंवा 75 मिनिटे जोमदार – तीव्रता एरोबिक क्रिया व्यायाम करायला हवा.  

वयस्कर प्रौढ (65 वर्षे आणि त्याहून अधिक)
वृद्ध प्रौढांसाठी, मार्गदर्शक तत्त्वे सामान्यतः प्रौढांसाठी सारखीच असतात. परंतु वैयक्तिक आरोग्य परिस्थिती लक्षात घेऊन वैयक्तिकृत व्यायाम करणे अधिक चांगले. अधिक महितीसाठी आरोग्य संस्थांचा सल्ला घेणे.

व्यायमाची नावे कोणती?| Exercise name

किकबॉक्सिंग, झुंबा, दोरीउड्या, पोहणे, धावणे, सायकलिंग, पुश-अप, विविध प्रकारची योगासने, स्ट्रेचिंग अशा अनेक प्रकारांचा व्यायामात समावेश होतो. अधिक माहिती साठी वर दिलेल्या Benefits of exercise in marathi लेखामध्ये व्यायामाचे प्रकार हा भाग वाचावा.

Leave a Comment