Sachin Tendulkar marathi mahiti | सचिन तेंडुलकर मराठी माहिती

नमस्कार मंडळी,

आजच्या लेखात आपण बघणार आहोत क्रिकेट च्या विश्वातील देवाबद्दल म्हणजेच आज आपण सचिन तेंडुलकर यांच्याबद्दल मराठीत माहीती ह्या आजच्या लेखात आपण बघणार आहोत. जर तुम्हाला सचिन तेंडुलकर यांचे जीवनचरित्र, त्यांना मिळालेले एकूण पुरस्कार, शिक्षण, घर, परिवारविषयी, संपूर्ण माहिती हवी असेल तर ह्या लेखात आम्ही तो देण्याचा प्रयत्न केला आहे. तर सचिन तेंडुलकर यांच्या सविस्तर माहितीसाठी Sachin Tendulkar marathi mahiti हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

Feature Image Credit : Pixel Max

सचिन तेंडुलकर यांचे जीवनचरित्र | Sachin Tendulkar biography in marathi

अनुक्रमाणिका

पूर्ण नाव (Full name) सचिन रमेश तेंडुलकर 
टोपण नाव (Nick name)मास्टर ब्लास्टर, टेंडल्या, सच्चू, क्रिकेटचा देव, द मास्टर 
जन्म (Birthdate)२४ एप्रिल १९७३ 
जन्मस्थान (Birthplace)मुंबई (महाराष्ट्र) 
वय (Age)२०२३ पर्यन्त ४९ वर्ष 
वडिलांचे नाव (father’s name) रमेश तेंडुलकर 
आईचे नाव (mother name)रजनी तेंडुलकर 
पत्नीचे नाव (wife name)अंजली तेंडुलकर
भावाचे नाव (brother name)अजित तेंडुलकर, नितिन तेंडुलकर 
बहिणीचे नाव (sister name) सविता तेंडुलकर 
मुलाचे नावअर्जुन तेंडुलकर 
मुलीचे नाव सारा तेंडुलकर
विशेषताफलंदाज  
फलंदाजीची पद्धत उजखोरा 
गोलंदाजिची पद्धतउजव्या हाताने (लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, मध्यमगती)
सामने२०० 
धावा१५,९२१ 
सर्वोच धाव संख्या२४८ 
सेवा निवृत्ती तारीख१६ नोव्हेंबर २०१३ 
पुरस्कारभारत रत्न पुरस्कार, द ग्रेटेस्ट इंडियन, अर्जुन पुरस्कार,
खेलरत्न पुरस्कार,पद्मविभूषण पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार
महाराष्ट्र भूषण आणि अनेक पुरस्कार देऊन गौरवन्यात आले.  

सुरवातीचे जीवन | Sachin Tendulkar life 

सचिन रमेश  तेंडुलकर यांचा जन्म 24 एप्रिल 1976 रोजी मुंबई येथे झाला. सचिन तेंडुलकर हे एक मध्यमवर्गीय कुटंबतील होते. सचिन तेंडुलकर यांचे वडील रमेश तेंडुलकर यांचे आवडते संगीतकार सचिन देव बर्मन यांच्या नावावरून त्यांचे सचिन हे नाव ठेवण्यात आले. सचिन तेंडुलकर हे त्यांचे वडील रमेश तेंडुलकर यांच्या दुसर्‍या पत्नीचा मुलगा आहे.

सचिनने शारदाश्रम विद्यामंदिर येथे सुरवातीचे शिक्षण घेतले. शाळेमधील क्रिकेटचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्याकडून प्रशिक्षण घेतले. शाळेमधील सचिनचा मित्र (सहखेळाडू) विनोद कांबळी होता. हॅरीस शील्ड सामन्यात ६६४ धावांची खेळी खेळली आणि येथूनच ते मुंबई संघात सचिनने पदार्पण केले. 1988 सालामध्ये सचिन आपल्या पहिल्या प्रथम श्रेणी सामन्यामद्धे नाबाद खेळले. हा सामना तो मुंबई संघाकडून गुजरात विरुद्ध खेळत होता. ह्या सामान्यदरम्यान त्यांचे वय 15 वर्षे 232 दिवस येवढे होते. त्यावेळी पहिल्या सामन्यात शतकी खेळणारा सर्वात तरुण खेळाडू सचिन तेंडुलकर होता.

सचिन तेंडुलकर यांची मराठीत माहिती | Sachin Tendulkar information in marathi 

सचिन तेंडुलकर हे क्रेकेटच्या जगातील डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर जागतिक स्तरावर सर्वोत्तम उच्च खेळाडू म्हणून मानले जातात. सचिन तेंडुलकर यांचे पूर्ण नाव सचिन रमेश तेंडुलकर. सचिन तेंडुलकर यांचा विवाह आनंद मेहता गुजरातचे उद्योगपती अंजली मेहता यांच्याशी 1995 साली झाला. अंजली मेहता ह्या व्यवसाया ने बालरोग तज्ञ होत्या. सचिन तेंडुलकर यांना दोन मुले आहेत. सारा तेंडुलकर (ओक्टोंबर 1997) आणि (अर्जुन तेंडुलकर 2000 साल) अशी यांची नावे आहेत.

Sachin Tendulkar information in marathi
Image Credit : Commons.wikimedia.org

सचिन तेंडुलकर हे आपल्या सासुतर्फे चालविणाऱ्या अपणालय नावाच्या मुंबईच्या स्वयंसेवी संस्थेमार्फत दरवर्षी 200 मुलांना आर्थिक किवा कोणत्याही प्रकारची गरज असलेली मदत करतो. मीडिया मार्फत ह्या कार्याची चर्चा असली तरी सचिन ह्या विषयी गोपनीयता ठेवणे आधिक पसंत करतात. सचिन तेंडुलकर यांची माहिती मध्ये सचिनचे वडील कादंबरीकार तर आई विमा एजंट होत्या. त्यामुळे घरातील वातावरण हे अत्यंत शिस्तप्रिय होत.

सचिन तेंडुलकर यांना लहानपणी टेनिस हा खेळ खूप आवडायचा. सचिनचे आदर्श जॉन मॅकनरा ( टेनिस खेळाडू) हे होते. सचिन तेंडुलकर हे क्रिकेटच्या जगातील नावाजलेले खेळाडू आहेत. सचिन तेंडुलकर बर्‍याचदा आपली गाडी फेरारी 360 मॉडेना मध्ये फिरताना दिसतात. परंतु ही गाडी सचिन साठी एक मोठी डोकेदुखी बनली होती कारण असे की सचिन तेंडुलकर यांना ही गाडी फियाट कंपनीने माइकल शुमाकरच्या हस्ते भेट दिली होती पण कस्टमने ह्या गाडीवरील करमध्ये सूट दिल्या कारणाने ह्या गाडीचे प्रकरण वादात घडले. त्यांनतर फियाट कंपनीने हा कर भरून हा वाद मिटवला.

सचिन तेंडुलकर यांना मिळालेले पुरस्का | Awards and honors Sachin Tendulkar in marathi 

सचिन तेंडुलकर यांना मिळालेले पुरस्कार पुढीलप्रमाणे,

  • सचिन तेंडुलकर यांना 2014 भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न प्राप्त झालेला आहे.
  • सचिन तेंडुलकर यांना 2012 मध्ये ऑस्ट्रेलियन सरकारने दिलेल्या ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलियाचा मानक सदस्य झालेल्या आउटलूक इंडियाच्या द ग्रेटेस्ट इंडियन या सर्वेमध्ये सचिन हे सातव्या क्रमांकावर होते.
  • सचिन तेंडुलकर यांना 2010 मध्ये एलजी पीपल्स चॉईस अवॉर्ड मिळाला.
  • सचिन तेंडुलकर यांना 2008 मध्ये पद्मविभूशन भारताचा दूसरा सर्वोच्च नागरी  पुरस्कार  देऊन गौरव करण्यात आला.
  • सचिन तेंडुलकर यांना 2011 मध्ये क्रिकेटर ऑफ द इअर हा ही पुरस्कार देऊन गौरविण्यात आल आणि याची चर्चा संपूर्ण जगात झाली. 
  • सचिन तेंडुलकर यांना 2001 मध्ये महाराष्ट्र भूषण म्हराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आला.
  • सचिन तेंडुलकर यांना 1997 मध्ये क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार राजीव गांधी खेलरत्न  पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळणारे ते पहिले क्रिकेटपटू आहेत.
  • सचिन तेंडुलकर यांना 1999 मध्ये पद्मश्री पुरस्कार भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
  • सचिन तेंडुलकर यांना 1994 मध्ये क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • सचिन तेंडुलकर यांना 1997 मध्ये  विस्डन  क्रिकेटर ऑफ द इयर. 
  • 1998 ते 2010 मधील विस्टेन जगातील आघाडीचा क्रिकेटर सचिन तेंडुलकर
  • सचिन तेंडुलकर यांच्या नावावर 2001 मध्ये मुंबई येथील वानखेडे  स्टेडियमच्या एका स्टॅन्डचे नाव सचिन तेंडुलकर यांच्या नावावर ठेवले
  • सचिन तेंडुलकर यांना २००२ साली  – टेस्ट क्रिकेटमध्ये डॉन ब्रॅडमनच्या २९ शतकांची बरोबरी करण्याच्य सचिनच्या पराक्रमाच्या साठी, फॉर्म्युला वन (F1) संघ फेरारीने 23 जुलै रोजी ब्रिटीश ग्रँड प्रिक्सच्या पूर्वसंध्येला F1 जगाकडून फेरारी 360 मोडेना मिळवण्यासाठी सचिन तेंडुलकर यांना पॅडॉकमध्ये आमंत्रित केले.
  • सचिन तेंडुलकर यांना 2003 साली विश्वचषक स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू मानले जाते.
  • सचिन तेंडुलकर यांना 2006-07, 2009-10 या वर्षातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू साठी पॉली उमरीगर पुरस्कार प्रदान करण्यात आला. 
  • सचिन तेंडुलकर यांना 2010 साली सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूसाठी प्राप्त झाला.
  • 2010 साली  सचिन तेंडुलकर यांना हवाई दलाने मानद  ग्रुप कॅप्टन बनवले. 
  • सचिन तेंडुलकर यांना 2011 साली कॅस्ट्रॉल इंडियन क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्काराणे गौरविण्यात आले.
  • सचिन तेंडुलकर यांना 2013 साली इंडिया पोस्ट ने सचिन तेंडुलकर यांचे स्टॅम्प जारी केले  आणि महत्त्वाचे म्हणजे मदर तेरेसा यांच्या नंतर त्यांच्या हयातीत  स्टॅम्प जारी करणारे ते दुसरे भारतीय ठरले. 
  • सचिन तेंडुलकर यांना 2014 साली क्रिकइन्फो क्रिकेटर ऑफ द जनरेशन पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • सचिन तेंडुलकर यांना 2017 साली  आशिया खंडातील आशियाई पुरस्कारांमध्ये आशियाई पुरस्कार  फेलेशिप  पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 
  • सचिन तेंडुलकर हे 2019 साली ICC क्रिकेट हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट झाले.
  • सचिन तेंडुलकर यांना 2020 मध्ये सर्वोत्कृष्ट स्पोर्टिंग मोमेंटसाठी लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड देण्यात आला.

आणि 14 एप्रिल 2023 रोजी सचिन तेंडुलकर  यांच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त शारजाह क्रिकेट स्टेडियम मधील   वेस्ट स्टॅन्डचे “सचिन तेंडुलकर स्टॅन्ड” असे  नाव ठेवण्यात आले. सचिन तेंडुलकर माहिती(Sachin Tendulkar marathi mahiti) जाणून  घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. सचिन तेंडुलकर हे आतापर्यंतचे सर्वात तरुण अधिक पुरस्कार प्राप्त करणारे प्रथम खेळाडू आहेत.

सचिन तेंडुलकर यांची राजकीय कारकीर्द 

2012 मध्ये राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी सचिन तेंडुलकर यांची राज्यसभा सदस्य म्हणून निवड केली. हा सन्मान मिळविणारे ते पहिले यशस्वी खेळाडू आणि क्रिकेटपटू ठरले. 4 जून रोजी सचिन तेंडुलकर यांनी ह्या पदाची शपथ घेतली. हे पद मिळाल्यानंतर त्यांना दिल्ली मधील एक भवन देखील रहायला मिळाले. परंतु त्यांनी ह्या भवनात राहण्यास सक्त मनाई केली. सचिन तेंडुलकर त्यावेळेस असे म्हणाले की मी मुंबईत राहत असल्याने हा पैशांचा आपव्यय आहे. सचिन तेंडुलकर यांना  राज्यसभेचे खासदार पदाचा ही मान त्यांना मिळाला आहे.

सचिन तेंडुलकर यांचे क्रिकेटचे जगात आगमन| Sachin Tendulkar information in marathi 

Sachin Tendulkar marathi mahiti.

सचिन तेंडुलकर म्हणतात की क्रिकेटच माझं पहिलं प्रेम आहे. सचिन तेंडुलकर यांनी 11 व्या वर्षीच क्रिकेट मध्ये यायचे स्वीकारले. सचिन तेंडुलकर यांच्या क्रिकेट खेळा विषयाच्या आवडीमुळे सचिन तेंडुलकर यांना 12 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांनी त्यांना योग्य भविष्य  ठरविण्यात सांगितले व त्यांना क्रिकेट ॲकॅडमी दाखल केले. सुरुवातीस सचिनने सीजन बॉल ने सराव केला. रमाकांत आचरेकर हे सचिन तेंडुलकर यांचे मार्गदर्शक होते. सचिन तेंडुलकर हे क्रिकेटच्या जगातील डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर जागतिक स्तरावर अधिक लोकप्रिय मानले जाणारे भारतीय क्रिकेटपटू आहे.

सचिनने 14 नोव्हेंबर 1987 रोजी म्हणजेच वयाच्या चौदाव्या वर्षी १९८७-८८ हंगामासाठी रणजी करंडक स्पर्धेत मुंबईचे प्रतिनिधीत्व साकारण्यासाठी सचिन तेंडुलकर यांची निवड करण्यात आली, पण कोणत्याच सामन्यात अंतिम 11 साठी सचिन तेंडुलकर यांची निवड करण्यात आली नाही. सचिन तेंडुलकर यांना  बऱ्याचदा पर्यायी क्षेत्ररक्षक म्हणून वापरले जात होते. १५ नोव्हेंबर १९८९ रोजी पाकिस्तानविरुद्ध कराची येथे सोळाव्या वर्षी कसोटी सामन्यात सचिनने पदार्पण केले वर्षाच्या कालावधीनंतर सचिन यांना 11 डिसेंबर 1988 रोजी, वयाच्या 15 वर्षे आणि 232  दिवसाचे ते होते. सचिन तेंडुलकर यांनी गुजरात विरुद्ध मुंबई स्टेडियमवर पदार्पण केले आणि पहिल्याच सामन्यात त्यांनी शतक झळकावला. नाबाद 100 धावा ही अतिशय कौतुकास्पद बाब होती.

पहिल्याच सामन्यात शतक पार पाडणारे ते पहिले भारतीय तरुण क्रिकेटपटू ठरले. या खेळाच्या कामगिरीनंतर तब्बल 1 वर्षांनंतर सचिन यांना 11 महिन्यानंतर भारताकडून पाकिस्तान विरोधात पदार्पण केले. वयाच्या 16 व्या वर्षी सचिन तेंडुलकर यांनी पाकिस्तान विरोधात पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. या सामन्यामद्धे सचिनच्या नाकास दुखापत झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव ही झाला.

परंतु सचिन यांनी आपल कर्तव्य बजावत, उत्कृष्ट कामगिरी करत अतिशय चांगल्याप्रकारे पाकिस्तान ला पराभूत केले आणि चांगलेच षटकार ही झळकावले. सचिन तेंडुलकर यांच्या कार्याची खरी सुरवात 1991-92 सालच्या औस्ट्रोलिया पर्थ(औस्ट्रोलिया राज्याची राजधानी ) येथे अतिशय उत्कृष्ट कामगिरी ने झाली, या सामन्यात सचिनने शतक पार पाडले. तेंडुलकर यांना आतापर्यंतच्या 11 वेळेस सामन्यामद्धे “सामनावीर”चा बहुमान मिळाला सामनावीरचा बहुमान हा त्या खेळाडूंना मिळतो जे खेळाडू आपल्या खेळात चांगल्या पद्धतीने खेळतात अश्या खेळाडूंना हे परितोषिक दिले जाते.

सचिन तेंडुलकर हे 2 वेळेस “बॉर्ड- गावस्कर चषक”औस्ट्रोलियात मालिकावीर राहिले आहेत. भारत आणि औस्ट्रोलिया यांच्या कसोटी क्रिकेट सामन्यात विजयी संघाला देण्यात येणार्‍या चषकला “बॉर्ड- गावस्कर चषक” असे नाव देण्यात येते. हे नाव आऊस्ट्रोलियाचा माजी कर्णधार व अष्टपैलू खेळाडू एलण बॉर्डर व भारताचा माजी कर्णधार आणि आघाडीचा फलंदाज सुनील गावस्कर यांच्या सन्मान प्रीत्यर्थ मालिकेला दिले गेले आहे. सचिन यांनी आपले पहिले एकदिवसीय सामन्यामधील शतक कोलंबो, श्रीलंका येथे ऑस्ट्रेलिया विरोधात नोंदवले. सचिन तेंडुलकर माहिती (sachin tendulkar marathi mahiti) आवडत असल्यास संकेतस्थळालाला नक्की फौलो करा.

सचिन तेंडुलकर यांना आंतर राष्ट्रीय एकदिवसीय शतक नोंदव्ण्यासाठी 79 सामन्याची वाट बघावी लागली. सचिन तेंडुलकर हे असे एकमेव खेळाडू आहेत की ज्यांनी दुलिप चषक, रणजी चषक आणि इराणी चशकामद्धे आपली पहिल्याच सामन्यांमद्धे शतक झळकावले. विस्डेनने 1997 साली सचिन तेंडुलकर यांना 1997 सालचा सर्वोत्तम  क्रिकेटपटू खेळाडू घोषित केले. ह्याच वर्षी सचिनने पहिल्यांदा कसोटी सामन्यात 1000 धावा केल्या. 1999, 2001, आणि 2002 साली सचिनने दिलेल्या प्रत्येक वर्षी 1000 धावांची पूर्तता केली. सचिन तेंडुलकर यांच्या नवे एका वर्षात 1000 धावा करण्याचा विक्रम नोंदवला गेला आहे. एका वर्षात 1000 धावा करण्याचा पराक्रम एकूण 6  वेळेस सचिन यांच्या नावावर आहे. (1994, 1996, 1997, 1998, 2000, आणि 2003) साली 1000 धावा केल्या आहेत. 1988 साली सचिनने 1894 (एकदिवसीय) एका दिवसात धावा करायचा विक्रम केलेला आहे. सचिन तेंडुलकर यांचा हा विक्रम अजून पर्यन्त कोणीही मोडलेला नाही. त्यांनातर अशाच काही कसोटी सामन्यामद्धे 49 शतके आणि वन-डे मध्ये 59 शतक त्याने झळकावले आणि हे दोन्ही ही विक्रम आजपर्यंत कोणी मोडू शकले नाही.

सचिनने वयाच्या सोळाव्या वर्षी कसोटी सामन्यात (क्रिकेट) मध्ये पदार्पण केले आणि जवळजवळ ते चोवीस वर्षे आंतर- राष्ट्रीय व मुंबई आंतर्राष्ट्रीय पातळीवर अतिशय अस उत्कृष्ट अशी कामगिरी (प्रतींनिधीत्व) केली. साल 2002 मध्ये आपल्या कारकिर्दीच्या पलिकड्ल्या विस्डेन क्रिकेटर च्या अ‍ॅलमॅनॅकने त्याला डॉन ब्रॅडमन आणि व्हिव्ह रिचर्ड्सच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा वनडे फलंदाज म्हणून स्थान दिले. सर्वात मोठा वन-डे फलंदाज मिळणे हा बहुमान सचिन तेंडुलकर यांना मिळाला. सचिन तेंडुलकर यांनी आतापर्यंत म्हणजे 6 वर्ल्डकप मध्ये ते खेळले आहेत परंतु सहा वर्ल्डकप पैकी आपल्या कारकिर्दीच्या शेवटी शेवटी म्हणजेच 2011 मध्ये सचिन तेंडुलकर यांनी भारतास विजय मिळवून दिला. सहा वर्ल्डकप पैकी भारतासाठी मिळालेला सचिनच्या कारकीर्दतला हा पहिला विजय होता.

सचिन तेंडुलकर यांची गोलंदाजी

सचिन तेंडुलकर यांची गोलंदाजी अति उत्कृष्ट अशी मानली जाते. सचिन नेहमी गोलंदाजी जरी करत नसला तरी तो अतिशय चांगला  एक फलंदाज आहे. सचिनने गोलंदाजी मध्ये एक दिवसीय सामन्यात 132 आणि 365 व 142 या प्रकारचे कामगिरी केली आहे. सामन्यांमध्ये ज्यावेळेस महत्त्वाचे गोलंदाज अपयशी दिसत होते. त्यावेळेस सचिनला गोलंदाजी करण्यास सांगत आणि सचिन आपली गोलंदाजी अति उत्कृष्ट पणे पार पाडत. ज्यावेळेस काही गोलंदाज अपयशी ठरत होते त्यावेळेस सचिनला गोलंदाजी करण्यास सांगत असून सचिन यश मिळवण्यात यशस्वी होत होता. सचिनची गोलंदाजी जवळपास सरासरी 50 च्या वर होती. जर समजा फलंदाजीची चांगली जोड जरी जमत असली तरी सचिन जोडी फोडण्यात यशस्वी ठरत. सचिनला जोडी फोडणारा हात गुण असे संबंधित देखील म्हटले जाते.

सचिन तेंडुलकर यांचा भारताच्या विजयामध्ये अनेक वेळा महत्त्वाचा वाटा ठरला आहे. बऱ्याच वेळा सचिनची गोलंदाजीची नोंद घेता आली आहे ती कशी तुम्ही बघू शकता खालील प्रमाणे:-

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत कोची येथे 1997- 98 मध्ये पाच बळींची कामगिरी सचिनने बजावली. २६९ धावा करायच्या असून 31 व्या षटकात ऑस्ट्रेलियाची २०३/३ अतिशय अशी मजबूत परिस्थिती होती. परंतु अशा वेळेस सचिनने दहा षटकात केवळ 32 धावा देऊन एम.जी.बेवन, एस.आर.वॉ, डी.एस.लेमन, टी.एम.मुडी आणि डी.एम.मार्टीन ह्यांना बात करून हा सामना भारताच्या बाजूस वळवला. 

दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात 1993 साली हीरो कप सामन्यातील शेवटच्या शतक फटकावले. हा सामना जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला एक षटक  शिल्लक असताना सहा धावांची गरज होती अशा परिस्थितीत सचिनने तीन चेंडू टाकत एकही धाव दिली नाही व संपूर्ण षटकात भारताला हा सामना जिंकून अंतिम सामन्यापर्यंत पोहोचण्यात सचिनने आपली कामगिरी दाखवली.

वेस्टइंडीज विरुद्ध शारजा मध्ये ४/३४ची कामगिरी दाखविली. आणि या कामगिरीमुळे वेस्टइंडीज चा डाव 145 धावांमध्ये आटोपला गेला. 

1998 मध्ये आय सी सी उपांत्य फेरीमध्ये ढाक्का  येथे १२८ चेंडूंत १४१ धावा करून ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार बळी मिळवले व भारताचा  उपांत्य फेरीमध्ये पोहोचविण्याचा मार्ग मोकळा केला. 

ही होती सचिन तेंडुलकर माहिती (sachin tendulkar marathi mahiti) सचिन तेंडुलकर यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी हा लेख शेवट पर्यन्त नक्की वाचा.

सचिन तेंडुलकर यांनी केलेली कामगिरी 

कसोटी क्रिकेट

कसोटी कारकीर्दीतील सचिन तेंडुलकर यांची ठळक कामगिरी पुढील प्रमाणे:-

डॉन ब्रॅडमन नंतरच्या विस्डेन तर्फे दुसऱ्या नंबरचा सर्वोत्तम सर्व उत्कृष्ट फलंदाजांचा बहुमान मिळाला. 

सुनील गावस्कर यांच्या नावे ३४ शतके हा विक्रम होता हा विक्रम मोडीत सचिन तेंडुलकरने 35 शतकांचा नवीन विक्रम बनवला. हा विक्रम सचिन तेंडुलकर यांनी 2005 साली दिल्लीमध्ये श्रीलंके विरुद्ध खेळत असतांना नोंदविला.

सचिन तेंडुलकर आतापर्यंत एकूण 52 मैदानांवर क्रिकेट खेळले आहेत. सर्वाधिक क्रिकेट मैदानावर खेळायचा हाही विक्रम सचिनने सर्वांचा मोडून काढला आहे. या आधी हा विक्रम मोहम्मद अझरुद्दीन 48, कपिल देव 47, इंजमाम उल हक 46, आणि वसीम अक्रम 45 या सर्वांचा विक्रम मोडून हाही विक्रम सचिनने आपल्या नावी केला आहे.

दहा हजार(10000) सर्वात अधिक जलद कसोटी सामन्यांमध्ये करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरने आपल्या नावावर आणि ब्रायन लारा या दोघांच्या नावावर आहे हा विक्रम दोघांनीही 195 डावांमध्ये साकारला आहे.

सचिन तेंडुलकर यांचा सर्व कसोटी धावांमध्ये पहिला क्रमांक लागतो.

सचिन यांची सर्वोच्च फलंदाजीची सरासरी ५३.७९.एवढी आहे आणि ही सरासरी कुठलाही 11000 धावा केलेल्या फलंदाजापेक्षा अधिक जास्तीची आहे.

दहा हजारापेक्षा जास्त धावा करणारा कसोटी सामन्यात सचिन तेंडुलकर हा भारतीय दुसरा फलंदाज आहे. 

सचिन याच्या नावे कसोटी सामन्यात 37 बळी घेतल्याचा पराक्रम आहे.

ब्रायल लारा ने 177  डावा मध्ये एकूण 9000 धावा केल्या. आणि सचिन तेंडुलकर यांनी 179  गावामध्ये 9000 धावा केल्याचा कामगिरी केली. कसोटी सामन्यात 9000 धावा करणारा सचिन तेंडुलकर हा दुसरा भारतीय फलंदाज आहे .

एक दिवसीय क्रिकेट

एक दिवसीय क्रिकेट मधील सचिन तेंडुलकर यांची केलेली ठळक कामगिरी पुढील प्रमाणे:-

सचिन तेंडुलकर यांच्या नावे सर्वात जास्त एक दिवसीय सामने खेळण्याचा विक्रम नोंदविला गेला आहे.

सचिन तेंडुलकर यांच्या नावे सर्वात जास्त पन्नास वेळा सामनावीर बनविण्याचा विक्रम आहे.

सर्वात जास्त 79 वेगवेगळ्या मैदानावर क्रिकेट खेळायचा विक्रम सचिन तेंडुलकर यांच्या नावावर आहे. 

सचिन तेंडुलकर यांनी सर्वाधिक धावा म्हणजेच  18426 धावा केल्या आहेत.

एक दिवसीय सामन्यात सर्वाधिक अधिक शतके अर्थातच 49 शतके सचिन तेंडुलकर यांनी केल्या आहेत.

सचिन तेंडुलकर यांनी ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, झिंबाब्वे आणि श्रीलंका या संघांविरुद्ध अधिक शतके केली आहेत.

सर्वांमध्ये जलद धावा ओलांडणारा फलंदाज सचिन तेंडुलकर यांनी १०,०००, ११,०००, १२,०००, १३,००० आणि १४,०००, १५,०००, १६,०००, १७,०००, १८,००० एवढ्या धावांचा पाढा पार पाडला आहे.

सचिन तेंडुलकर हा असा एकमेव फलंदाज आहे ज्याने  एक दिवसीय सामन्यांमध्ये पंधरा हजार(15000) धावांचा टप्पा पार पडला आहे.

सचिनने एक दिवसीय क्रिकेटमध्ये 100 डावांमध्ये 50 पन्नास किंवा त्याहून अधिक धावा करणारा एकमेव फलंदाज आहे.

एक दिवसीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर यांनी 24 मार्च 2011 पर्यंत शंभरून अधिक बळी घेतले आहेत.

एक दिवसीय क्रिकेटमध्ये खूप वेळेस सचिन तेंडुलकर यांनी एका वर्षात 1000 अथवा त्याहून अधिक धावा केल्याचा विक्रम केला आहे ही अति उत्कृष्ट अशी कामगिरी सचिनने आतापर्यंत सहा वेळेस बजावली आहे. 

सन 1998 मध्ये सचिनने एक दिवसीय क्रिकेटमध्ये 1894 धावा केल्या होत्या.सचिनचा हा विक्रम अद्यापही कोणी मोडू शकलेला नाही. 

सचिन तेंडुलकर यांनी 1998 साली  एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण नऊ शतके झळकावली. एक दिवसीय क्रिकेटच्या सामन्यात आत्तापर्यंत एवढी शतके कोणीही अद्याप झळकवू शकलेला नाही सचिन हा एकमेव असा व्यक्ती आहे की ज्याने एका दिवसात नऊ शतके फटकारले.

2010 मध्ये दक्षिण आफ्रिके विरुद्ध ग्वाल्हेर मध्ये सचिन तेंडुलकर याने एक दिवसीय क्रिकेटच्या सामन्यात इतिहासात  पहिल्यांदाच 200  धावा करणारा सचिन हा एकमेव क्रिकेटपटू आहे. एक दिवसीय क्रिकेटमध्ये दोनशे धावा करण्याचा विक्रम सचिनच्या नावावर केला गेला आहे सचिन तेंडुलकर यांची ही कामगिरी अतिशय कौतुकास्पद होती. 

सचिनने सरासरी दहा हजारापेक्षा जास्त धावा केलेल्या फलंदाजांपैकी एक फलंदाज सचिन तेंडुलकर ही आहे. 

विश्व चषक क्रिकेट सामने

सचिन तेंडुलकर यांनी विश्वचषक मधली  केलेली ठळक कामगिरी पुढील प्रमाणे::-

59.72 या सरासरीने 1732 धावा यांनी विश्वचषक  च्या इतिहासातील सर्वाधिक धावा करणारे सचिन तेंडुलकर हे आहेत.

आयसीसी क्रिकेट 2003  साल मध्ये विश्वचषकात मालिकावीर  बनण्याचा सन्मान सचिन तेंडुलकर यांना मिळाला.

सचिन तेंडुलकर यांनी आयसीसी क्रिकेट  2003 साली विश्वचषकामध्ये 673 धावा केल्या होत्या आजपर्यंत इतक्या धावा कोणत्याही क्रिकेटपटू ने  विश्वचषकामध्ये केलेल्या नाहीत. ह्या गावांचे प्रमाण अधिक जास्ती होते आणि ही बाब खूप आणि अधिक कौतुकास्पद होत..

सचिन तेंडुलकर यांची माहिती याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण लेख पूर्ण वाचा. तिसऱ्या पंचांकडून धावचित केला गेलेला सचिन तेंडुलकर हा पहिला फलंदाज आहे आणि हा निर्णय दक्षिण आफ्रिके विरुद्ध खेळताना दक्षिण आफ्रिकेमध्ये 1992 साली देण्यातआला. 1992 साली सचिन तेंडुलकर हे न्यॉर्क शायर क्रिकेट काउंटिंग क्लब मध्ये खेळणारा पहिला परदेशी फलंदाज आहे. विस्डेनने सचिन तेंडुलकर यांच्या कोणत्याही प्रकारच्या कामगिरीची नोंद शंभर फलंदाजामध्ये केलेली नाही याचे मुख्य कारण अद्यापही समजू शकलेले नाही. सचिन तेंडुलकर  यांना लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड २०२० प्राप्त झाला. सचिन तेंडुलकर यांच्या नावावर अनेक असे विक्रम आहे जे आजवर कोणीही मोडू शकलेले नाही. 

सचिनला आत्तापर्यंत कसोटी क्रिकेटच्या सामन्यांमध्ये एकूण दहा(10) पुरस्कार प्राप्त झाले आहेत. आणि आंतरराष्ट्रीय एक दिवसीय क्रिकेटच्या सामन्यांमध्ये एकूण बावन्न  (52) पुरस्कार प्राप्त झाले आहेत सचिन तेंडुलकर यांच्या विषयी ही बाब अतिशय कौतुकास्पद आहे व उल्लेखनीय आहे.

सचिन तेंडुलकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट

महान भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट 2017 मध्ये प्रदर्शित केला गेला. या चित्रपटाचे नाव “सचिन: अ बिलियन ड्रीम्स”नावाचा डॉक्युमेंटरी चित्रपट बनविला गेला. जेम्स एरस्काइन यांनी दिग्दर्शित केलेला “सचिन: अ बिलियन ड्रीम्स” चित्रपट हा जीवन चरित्रात्मक आहे या चित्रपटांमध्ये सचिन तेंडुलकर यांच्या बालपणापासून ते  आत्तापर्यंतचा प्रवास या चित्रपटांमध्ये दाखविला आहे. चित्रपटांमध्ये सचिन तेंडुलकर माहिती, sachin tendulkar marathi mahiti, सचिनच्या जीवनातील सुरुवातीचे क्षण, क्रिकेट विषय असलेले आवड,सचिन हा प्रसिद्ध कसा झाला, क्रिकेटच्या कारकीर्दीतील सचिनला आलेल्या अनुभव, sachin tendulkar information in marathi आणि अजून या चित्रपटांमध्ये सचिनच्या सामन्याचे खरोखरचे फुटेज, सचिनची स्वतःची मुलाखत त्यांचा परिवार सहकारी व क्रिकेटच्या युगातील असलेले काही मार्गदर्शक काही सोबती इतर प्रमुख व्यक्ती यांच्या बद्दल माहिती देण्यात आली आहे.

डॉक्युमेंटरीनुसार असलेले सचिन तेंडुलकरचे वैयक्तिक जीवन क्रिकेट बद्दल असलेले त्याचे प्रेम,क्रिकेट खेळामध्ये सचिनला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला क्रिकेटचा आयकॉन म्हणताना त्याला अनेक काही आव्हान मिळाली  ही आव्हाने देखील या चित्रपटांमध्ये दाखवली गेली आहेत.ह्या चित्रपटांमध्ये सचिन तेंडुलकर यांचे वैयक्तिक जीवन आणि क्रिकेट बद्दलचे त्यांचे प्रेम अतिशय चांगल्या पद्धतीने दाखवले गेले आहेत या चित्रपटांमधून सचिन तेंडुलकर यांच्या विषयी अशा काही गोष्टी समोर आल्या आहेत ज्या कधी आपण ऐकल्याही नाही आणि बघितल्या सुद्धा नाहीत हा चित्रपट एकाच वेळी मराठी इंग्रजी आणि हिंदी ह्या तिघाही भाषांमध्ये याचे चित्रीकरण करण्यात आला आहे तसेच 26 मे 2017 रोजी तमिळ व तेलगू भाषेत हा चित्रपट  डब करण्यात आला. सचिन: अ बिलियन ड्रीम्स हा चित्रपट छत्तीसगड महाराष्ट्र केरळ कर्नाटक आणि ओडिषा या राज्यांमध्ये करमुक्त घोषित करण्यात आला. 

हा चित्रपट दोन कथांचा अवलंबन करतो. पहिल्या कथेत सचिनचे बालपण आणि 1999 पर्यंत त्यांनी केलेली कारकीर्द याबद्दल वर्णन केले गेले आहे त्यानंतर सचिनने जिंकलेला दुसरा विश्वचषक जिंकेपर्यंत आणि त्याला “क्रिकेटचा देव” म्हणून झालेल्या परिवर्तनावर अधिकरित्या लक्ष केंद्रित करतो. ह्या चित्रपटात विविध सेलिब्रिटी अभिनेते आणि क्रिकेटपटू सहकारी दृश्यांचे वर्णन करतो. चित्रपटातील बहुतेक चित्री करणे अजून काही बहुतांश दृश्य सचिन तेंडुलकर यांचे वैयक्तिक आयुष्य, त्यांच्या मुलाखती ,आणि क्रिकेट सामन्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग द्वारे चित्रीकरण करण्यात आले आहे.

चित्रपटांमध्ये सचिनची मुलगी सारा तेंडुलकर हिच्या जन्माची क्लिप देखील दाखवण्यात आले आहे. चित्रपटांमध्ये हेही दाखवले गेले आहे सचिनने विनोद कांबळी सोबत 664 धावांची भागीदारी केल्यामुळे त्याला अधिक प्रसिद्ध मिळाली. चित्रपटांमध्ये सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर यांची भेट कशी झाली, आणि लग्न कसे झाले याबद्दल ही माहिती दिली गेली आहे. दुर्दैवाने सचिन तेंडुलकर यांच्या वडिलांचे निधन विश्वचषक सुरू होण्यापूर्वी 1999 मध्ये झाले. या विश्वचषकामध्ये भारत अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही. परंतु तरीही सचिनने नैराश्यात अतिशय चांगला परफॉर्मन्स दिला.

सचिन तेंडुलकरच्या या धाडसाचे सर्व कडे चांगले कौतुक करण्यात आले. सचिन तेंडुलकरच्या वडिलांच्या निधनानंतर दोन आठवड्यानंतर सचिनच्या घरी अर्जुन तेंडुलकर (सचिन तेंडुलकर यांचा मुलगा) जन्माला येतो. सचिन तेंडुलकर हे लहानपणापासूनच अर्जुन तेंडुलकर यांच्यासोबत क्रिकेटचा सराव करत असतात आणि त्याला एक चांगला क्रिकेटर बनविण्याचे स्वप्न बघत असतात. सचिन तेंडुलकर यांच्या बऱ्याच पराक्रमामुळे भारताला अधिक गौरव मिळाला आहे. सचिन तेंडुलकर यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट अतिशय बघण्यासारखा आहे जर आपल्याला सचिन तेंडुलकर माहिती sachin tendulkar marathi mahiti अधिक जाणून घ्यायची असेल तर हा चित्रपट एकदा नक्की बघावा.

अधिक माहितीसाठी सचिन तेंडुलकर विकिपिडिया पेज ला भेट द्या.

ही ही वाचा,

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

सचिन तेंडुलकर माहिती/sachin tendulkar mahiti 

सचिन तेंडुलकर ज्यांना लिटल ब्लास्टर किंवा मास्टर ब्लास्टर असे म्हणून संबंधित केले जाते. हा माजी भारतीय क्रिकेटपटू आणि क्रिकेटच्या इतिहासातील महान फलंदाजांपैकी एक सर्वोत्कृष्ट असा एक फलंदाज आहे. सचिन तेंडुलकर यांचा जन्म 24 एप्रिल 1973 रोजी मुंबई येथे झाला सचिन तेंडुलकर यांना क्रिकेटचा लेजंड म्हणून ओळखले जाते सचिनला फक्त भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावरही क्रिकेटचा आयकॉन मानले जाते. सचिनला लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्याचा छंद होता क्रिकेट खेळण्यासाठी सचिनला कुटुंबाकडून अधिक प्रोत्साहन मिळाले.

सचिनने आपल्या वयाच्या सोळाव्या वर्षीच 15 नोव्हेंबर 1989 रोजी कराची येथे पाकिस्तान विरोधात भारतीय संघाकडून पदार्पण केले. त्यावेळेस कसोटी क्रिकेट खेळणारा सचिन तेंडुलकर हा सर्वात तरुण भारतीय होता. सचिन तेंडुलकर हे उजव्या हाताचे फलंदाज होते अधिक जास्त आणि उच्च धावा करण्यासाठी सचिनला ओळखले जाते. सचिन तेंडुलकर यांच्या नावावर  अनेक विक्रम आहेत. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू हा सचिन तेंडुलकर आहे सचिन तेंडुलकर यांनी 100 आंतरराष्ट्रीय शतके (कसोटीमध्ये 51 आणि एक-दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 49) झळकावली,हा विक्रम अद्यापही कोणी मोडू शकलेला नाही.

सचिन तेंडुलकर यांच्या संपूर्ण कारकिर्दीत सचिनला राजीव गांधी खेल रत्न, अर्जुन पुरस्कार, पद्मश्री, पद्मविभूषण आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे भारतरत्न भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार याने गौरवण्यात आले आहे सचिनला या पुरस्कारांसह अजून असंख्य असे पुरस्कार प्राप्त झाले आहेत आणि सन्मानही करण्यात आला आहे. सचिन तेंडुलकर यांनी 16 नोव्हेंबर 2013 रोजी मुंबईमध्ये वेस्टइंडीज विरोधात दोनशे (200)वा कसोटी सामना खेळल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही सचिनने सामाजिक कार्यांमध्ये ही भाग घेतला क्रिकेटच्या खेळावर सचिनचा विश्वास नेहमी सचिनने आपल्या क्रिकेट या खेळातून दाखवले क्रिकेट या खेळाला भारत व पूर्ण जगभरात अधिक लोकप्रियता दिली जाते भारतातील क्रिकेटपटूंच्या सर्व पिढीला सचिन तेंडुलकर यांनी एक चांगला आदर्श दिलेला आहे. आणि सर्व क्रिकेटपटूंना प्रेरणा देण्याचे काम सचिन तेंडुलकर यांनी चांगल्या प्रकारे दिले आहे याच्या श्रेय सचिन तेंडुलकरला नेहमी राहील. सचिन तेंडुलकर याला सर्वोत्तम  क्रिकेटपटून पैकी एक सर्वोत्तम क्रिकेटपटू मानले जाते. 

सचिन तेंडुलकर फॅमिली | Sachin Tendulkar family 

सचिन तेंडुलकर माहिती sachin tendulkar marathi mahiti मध्ये एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सचिन तेंडुलकर यांचा परिवार सचिन तेंडुलकर यांच्या फॅमिली बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा. सचिन तेंडुलकर यांचे लग्न 2४ मे १९९५ रोजी अंजली मेहता यांच्याशी झाले अंजली मेहता ह्या गुजरातच्या असून त्या एक बालरोग तज्ञ आहेत सचिन आणि अंजली यांचे दोन मुले आहेत. सचिनच्या मुलीचे नाव सारा तेंडुलकर आणि मुलाचे नाव अर्जुन तेंडुलकर आहे. अर्जुन तेंडुलकर यांचा जन्म, 24 सप्टेंबर 1999 रोजी झाला. आणि मुलगी सारा तेंडुलकर 12 ऑक्टोबर 1997 रोजी जन्मली.सचिन तेंडुलकरच्या फॅमिलीने सचिन तेंडुलकरला आपल्या कारकीर्दीत नेहमी प्रोत्साहन दिले आहे .

सचिन तेंडुलकर वाढदिवस | Sachin Tendulkar birthdate 

सचिन तेंडुलकर यांचा जन्म 24 एप्रिल 1973 रोजी मुंबई महाराष्ट्र येथे झाला. सचिन तेंडुलकर हे एक मध्यमवर्गीय कुटुंबातून असून सचिन तेंडुलकर यांच्या वडिलांचे नाव रमेश तेंडुलकर आणि आईचे नाव रजनी तेंडुलकर असे आहे. 

सचिन तेंडुलकर चे शिक्षण |Sachin Tendulkar education

सचिन तेंडुलकर यांचे प्राथमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल येथे झाले. आपल्याला नवल वाटेल की सचिन तेंडुलकर यांचे शिक्षण दहावीपर्यंत आहे. सचिन तेंडुलकर याचे शालेय शिक्षण फक्त दहावीपर्यंत पूर्ण झाले आहे. लहानपणापासूनच क्रिकेटच्या आवडीमुळे सचिनचे अधिक शिक्षण झालेले नाही. सचिन तेंडुलकर याने वयाच्या सोळाव्या वर्षीच भारताकडून कसोटी सामन्यात पदार्पण केले सचिनच्या संपूर्ण कारकीर्दीत संपूर्ण लक्ष त्याचे फक्त आणि फक्त खेळावरच राहिले.जरी सचिन तेंडुलकर यांनी उच्च शिक्षण घेतले नसून त्यांना त्यांच्या यशस्वी आणि प्रख्यात क्रिकेट च्या प्रवासातून “क्रॅश कोर्स” मिळाला. 

सचिन तेंडुलकर भारतरत्न पुरस्कार

नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात दरबार हॉल येथे सचिन तेंडुलकर यांना 4 फेब्रुवारी 2014 राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते (भारतरत्न भारताचा सर्वोच्च पुरस्कार) सचिन तेंडुलकर यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. 16 नोव्हेंबर 2013 मध्ये काँग्रेस सरकारने सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न पुरस्कार द्यायची घोषणा केली होती. भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे 40 वर्षाचे सचिन तेंडुलकर हे सर्वात कमी वयाचे प्रथम खेळाडू आहेत. या अगोदर भारतरत्न हा पुरस्कार क्रीडा क्षेत्रात कोणालाही मिळाला नव्हता भारतरत्न पुरस्कार मिळविण्याचा सर्वोच्च बहुमान सचिन तेंडुलकर यांना मिळाला आहे. 

सचिन तेंडुलकर क्रिकेटचा देव , गुरु 

सचिन तेंडुलकर यांना क्रिकेटच्या विश्वातील देव मानले जाते परंतु सचिन तेंडुलकर याचे श्रेय नेहमी त्यांचे गुरु रमाकांत आचरेकर यांना देतात सचिन तेंडुलकर म्हणतात मी नेहमीच रमाकांत आचरेकर गुरुजींचा ऋणी राहील.

Leave a Comment

Discover more from Marathi Delight

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading