ms dhoni mahiti in marathi | एम एस धोनी यांची मराठीत माहिती

नमस्कार मंडळी,

आजच्या लेखामध्ये आपण बघणार आहोत ms dhoni mahiti in marathi. महेंद्रसिंग धोनी यांच्या बद्दल संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. ह्या लेखात आपण एम एस धोनी यांचे जीवन चरित्र, धोनी याच्या जीवनातील जीवन संघर्ष, क्रिकेट खेळाविषयी त्यांचे प्रेम आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या विषयी अजून काही तथ्य या लेखात आपण जाणून घेणार आहोत. महेंद्रसिंग धोनी हे एक यशस्वी क्रिकेटपटू खेळाडू आहेत.

धोनी याने आपल्या क्रिकेटच्या जीवनात सुरुवात कुठून केली कशी केली आणि क्रिकेटच्या जगात तो कसा यशस्वी झाला, आजच्या लेखात आपण बघणार आहोत. एम एस धोनी विषयी काही रोचक तथ्य माहिती करून घेण्यासाठी एम एस धोनी माहिती ms dhoni mahiti in marathi या लेखात दिली गेली आहे. हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा आणि महेंद्रसिंग धोनी याचे जीवन चरित्र संपूर्ण जाणून घ्या.

Feature Image Credit : Pixel Max

Table of Contents

महेंद्रसिंग धोनी बायोग्राफी | ms dhoni biography in marathi 

 एम एस धोनी बायोग्राफी ms dhoni mahiti in marathi पुढीलप्रमाणे :-

पूर्ण नावमहेंद्रसिंग धोनी
टोपणनावकॅप्टन कूल, माही, एम एस ,एम एस धोनी
जन्मतारीख7 जुलै 1981
जन्मस्थळरांची (बिहार) 
वडिलांचे नावपान सिंग धोनी
आईचे नावदेवकी देवी पानसिंग धोनी
बहिणीचे नावजयंती गुप्ता
भावाचे नावनरेंद्र सिंह धोनी
पत्नीचे नावसाक्षी सिंह रावत
मुलीचे नावजीवा धोनी 
राष्ट्रीयत्वभारतीय
रोलफलंदाज आणि विकेट कीपर
फलंदाजाची पद्धतउजव्या हाताने
गोलंदाजी पद्धतराईट आर्म मिडीयम
पहिली टेस्ट मॅच2 डिसेंबर 2005 विरुद्ध श्रीलंका
शेवटची टेस्ट मॅच24 डिसेंबर २०१४ विरुद्ध ऑस्ट्रेलिया 
पहिली ओडीआय मॅच23 डिसेंबर 2004 विरुद्ध बांगलादेश 
शेवटची ओडीआय मॅच9 जुलै 2021 विरुद्ध न्यूझीलंड
पहिली T-20 मॅच 1 डिसेंबर 2006 विरुद्ध साऊथ आफ्रिका
 शेवटची T-20 मॅच27 फेब्रुवारी 2019 विरुद्ध ऑस्ट्रेलिया 
reference : विकिपीडिया

ms dhoni mahiti in marathi

एम एस धोनी याचे क्रिकेटचे जगात आगमन

एम एस धोनी यांचा जन्म 7 जुलै 1981 रोजी झाला. धोनी हा 2008 ते 2014 पर्यंत भारतीय आणि राष्ट्रीय संघाचा कर्णधार होता. एम एस धोनीला आज क्रिकेटच्या विश्वातील एक महान कर्णधार, फिनिशर आणि यष्टीरक्षक फलंदाज याने संबोधित केले जाते. एम एस धोनी याची क्रिकेटची सुरुवात सेंट्रल कोल फील्ड लिमिटेड या संघासाठी 1998 मध्ये निवड झाली. ट्रॉफी अंडर-16 चॅम्पियनशिप जिथं एम एस धोनी याने आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यावेळेस बिहार क्रिकेटचे  असोसिएशनचे माजी  अध्यक्ष देवल सहाय यांनी धोनी याची जिद्द, चिकाटी, मेहनत आणि क्रिकेट ची केलेली चांगले कामगिरी पाहता धोनी याला प्रथम क्रिकेट खेळाची संधी प्राप्त करून दिली.

यानंतर एम एस धोनी याने 2001 ते 2003 पर्यंत पश्चिम बंगालमधील मीदनापूर येथील दक्षिण पूर्व रेल्वेच्या खरगपूर येथे रेल्वे स्टेशनवर प्रवासी तिकीट परीक्षक म्हणून काम केले. भारत देशा अंतर्गत एम एस धोनी हा प्रथम बिहार आणि नंतर झारखंड या संघाकडून  खेळला. 2002-03 या सालामधील धोनीच्या केलेल्या क्रिकेटच्या कामगिरीमध्ये रणजी ट्रॉफी यातील तीन अर्ध शतके आणि देवधर ट्रॉफी मधील दोन अर्धशतकांचा समावेश होता. या कार्याने धोनीला हार्ड  हीटिंग फलंदाजी या शैलीसाठी ओळखू जाऊ लागले. धोनीने रणजी ट्रॉफी मध्ये नाबाद 68 धावांची खेळी खेळली आणि या दोघी चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर धोनीने देशांतर्गत क्रिकेट खेळायचे ठरविले.

2003  रोजी जमशेदपूर येथे टॅलेंट रिसॉर्ट डेव्हलपमेंट विंगच्या सामन्यात खेळताना प्रकाश पोतदार यांनी बघितले आणि पोतदार यांनी धोनीने खेळलेल्या क्रिकेटच्या कामगिरीबद्दल राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीला सांगितले. यामुळे एम एस धोनी याची अंडर-19  संघात निवड झाली. 2003-04  मध्ये झिंबाब्वे आणि केनिया दौऱ्यासाठी भारत अ- संघाची निवड करण्यात आली. झिंबाब्वे 11 विरोधी पहिला सामन्यात धोनी हा भारत अ- संघाचा यष्टीरक्षक होता आणि या सामन्यांमध्ये धोनी याने चेंडू एकूण सात वेळा झेलला. ms dhoni mahiti in marathi या लेखात पुढे बघूया.

यानंतरही पाकिस्तानला सलग दोनदा पराभूत करण्यामध्ये धोनीने चांगली कामगिरी बजावली आणि या सामन्यांमध्ये धोनीने दोन वेळेस अर्थ शतक झळकावले. एम एस धोनी याने तीन देशांबद्दल जी क्रिकेट बद्दल कामगिरी केली होती याबद्दल जो भारतीय संघाचा राष्ट्रीय कर्णधार होता सौरव गांगुलीने धोनीची कौतुक केले.

2003-04 मध्ये सतत  चांगले कामगिरी केल्याने एम एस धोनी याची निवड 23 डिसेंबर 2004 रोजी चितगाव येथे बांगलादेश विरुद्ध एक दिवसीय  करण्यात आली. आणि एम एस धोनी  ने क्रिकेटमध्ये आपले पदार्पण केले. यानंतर एका वर्षानंतर धोनीने श्रीलंके विरुद्ध आपली पहिली कसोटी खेळली.  श्रीलंके  विरोधात खेळत असताना एम एस धोनीने अत्यंत उत्कृष्ट अशी कामगिरी केली 299 धावांचे उद्दिष्ट समोर ठेवून त्याने 145 चेंडूत 183 धावांची नाबाद खेळी पूर्ण केली. त्याने या सामन्यात असंख्य विक्रम मोडीत काढले. आणि केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला मालिकावीर सन्मान देण्यात आला.

अजून एका वर्षानंतर धोनीने आपला पहिला टी-20 दक्षिण आफ्रिके विरुद्ध खेळला. यानंतर धोनीला पाकिस्तान विरुद्ध च्या एक दिवसीय  सामन्यासाठी निवडण्यात आले. यामध्ये६८ धावा, नाबाद ७२, २ धावा (नाबाद), आणि ७७ (नाबाद)एम एस धोनी याने नाबाद धावा केल्या. संघाच्या ४-१ अशा  मालिकेत आपले या विजयात योगदान दिले आणि २० एप्रिल २००६ रोजी, एम एस धोनीने  आपल्या चमकदार कामगिरीने रिंकी पाँटिंगला ICC ODI क्रमवारीत वरच्या स्थानावर नेले. यानंतर राहुल द्रविड कडून 2007 मध्ये एम एस धोनीने एक दिवसासाठी कर्णधार पद स्वीकारले आणि त्याला भारताचा T-20 कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आणि त्याचबरोबर 2008 सालामध्ये एम एस धोनी याची कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार पदाची निवड करून देण्यात आली. 

एम एस धोनी याचे कर्णधार पदी केलेले कामगिरी

एम एस धोनी याला 2008 मध्ये कर्णधार पद मिळाले. या अगोदर भारताचे कर्णधार पद राहुल द्रविड हा सांभाळत होता. एम एस धोनी याची कर्णधारपदी निवड करण्यामागे सचिन तेंडुलकर आणि राहुल  द्रविड या दोघांचे मोठे योगदान होते. एम एस धोनीला कर्णधार पद मिळवून देण्यासाठी सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांनी बी सी सी आय सी योग्य ती चर्चा केली, आणि एम एस धोनी याला कर्णधार पद मिळवून दिले. एम एस धोनी याने कर्णधारपदी भारताचे खूप चांगल्या प्रकारे नेतृत्व केले आहे ते बघूया आपण पुढील प्रमाणे:-

साल 2009 मध्ये आयसीसी कसोटी क्रमवारी मध्ये भारताला अव्वल स्थानावर पोचवले आणि यानंतर एक एप्रिल 2011 रोजी श्रीलंके विरोधात 2011 च्या आयसीसी क्रिकेट विश्व करंडक सामन्यात विजयी झाल्यानंतर एम एस धोनी याचे चाहते मोठ्या प्रमाणात वाढले आणि 2011 च्या आयसीसी क्रिकेट विश्व करंडक सामन्यात विजयी झाल्याचे श्रेय सचिन तेंडुलकर याने एम एस धोनी यास दिले. सचिन तेंडुलकर म्हणतो की एम एस धोनी याचा स्वभाव खूप शांत मेहनती असा आहे. एम एस धोनी याला सामन्यामध्ये परिस्थितीचा कितीही दबाव असला तरी योग्य ती खेळायची क्षमता धोनी मध्ये दिसून येते. 

त्यानंतर 2013 मार्चमध्ये एम एस धोनी ने 49 कसोटी सामन्यांमध्ये सौरव गांगुली  याचा विक्रम मोडून काढला. सौरव गांगुली एकूण 21 वेळेस विजय झालेला होता. हा विक्रम म्हणून एम एस धोनी याने भारताचा सर्वात यशस्वी आणि अविश्वसनीय कर्णधार म्हणून स्वतःला सिद्ध केले. भारताने आयसीसी ट्रॉफी एम एस धोनी याच्या नेतृत्वाखाली जून 2013 मध्ये जिंकली. धोनीचा कर्णधार पदाच्या नेतृत्वाखाली इंग्लंडला पाच धावांनी पराभूत केले. एम एस धोनी याच्या अनेक उत्कृष्ट  केलेल्या कामगिरीबद्दल एम एस धोनीला भारताचा सर्वात जास्त यशस्वी कर्णधार म्हटले जाते.

एम एस धोनी कर्णधार असताना केलेली सर्वोत्कृष्ट कामगिरी | ms dhoni mahiti in marathi

  • 2007 सप्टेंबर मध्ये एम एस धोनी आणि दक्षिण आफ्रिकेत झालेल्या आयसीसी विश्व T-20 सामन्यामध्ये भारतीय संघाला विजय मिळवून दिला.
  • 2007 मध्ये T-20 सामन्यांमध्ये भारतीय संघाला विजय मिळवून दिला असता एम एस धोनी याला एक दिवसासाठी कर्णधार पद देण्यात आले आणि धोनी याने एक दिवसीय कसोटी सामन्यांमध्ये आपल्या कर्णधार पदाची योग्य जबाबदारी निभावली.
  • 2009 मध्ये भारतीय संघाला एम एस धोनी याने आयसीसी कसोटी क्रमवारी भारताला प्रथम स्थानावर नेले.
  • एम एस धोनी हे कर्णधार असताना दोन वेळेस विश्वचषक कसोटी मध्ये आपले योगदान दिले आहे 2011 मध्ये झालेल्या विश्वचषक धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकला होता.
  •  2015 च्या विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताने अगोदरच उपांत्य  फेरीत प्रवेश देखील केला होता. 

2007 मध्ये विश्वचषक टी-ट्वेंटी एम एस धोनी

एम एस धोनीला 2007 मध्ये पहिल्यांदा विश्वचषक T-20 सामना खेळण्यासाठी निवडले गेले होते या सामन्यांमध्ये स्कॉटलंड विरुद्ध कर्णधार पदावर धोनीने प्रवेश केला परंतु हा सामना तेव्हा संपला होता. त्यानंतर एम एस धोनीने दक्षिण आफ्रिकेतील आयसीसी विश्वचषक एकदम T20 सामन्यामध्ये भारताला पाकिस्तान विरोधात विजय प्राप्त करून दिला आणि कपिल देव नंतर विश्वचषक T-20 जिंकणारा एम एस धोनी हा दुसरा कर्णधार बनला.

2011 मधील क्रिकेट विश्वचषक एम एस धोनी

275 धावांची आव्हाने एम एस धोनी यांच्यासमोर होते. एम एस धोनीच्या नेतृत्वाखाली 2011 मधील विश्वचषक हा खेळण्यात आला आहे. 275 धावांचा पाठलाग करीत श्रीलंकेविरुद्ध फायनल मध्ये धोनीने आपली यशस्वी फलंदाजी सगळ्यांसमोर दाखवली. एम एस धोनी सोबतच गौतम गंभीर याने देखील चांगले फलंदाजी करत धावा वाढवल्या. एम एस धोनी याने ७९ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ९१ धावा केल्या आणि 2011 मध्ये विश्वचषक भारताला जिंकून दिला. या सामन्यामध्ये धोनीला मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार प्राप्त झाला.

2015 मधील क्रिकेट विश्वचषक एम एस धोनी 

या अगोदर एम एस धोनीने 2011 मधील विश्वचषक सामना जिंकला होता. 2015 मधील विश्वचषक सामन्यांमध्ये एम एस धोनी डिसेंबर 2015 रोजी बीसीसीआयने 30  सदस्य संघ चा  कर्णधार म्हणून निवडले. परंतु भारत उपांत्य फेरीपर्यंत प्रवेश मिळवू शकला नाही. या अगोदर भारताने फायनल मध्ये बांगलादेशचा पराभव केला होता परंतु ऑस्ट्रेलियाकडून भारताला उपांत्य फेरीत  पराभव मिळाला. या विश्वचषक सामन्यांमध्ये  भारताने सलग सात सामने जिंकले आणि विश्वचषक सामन्यांमध्ये अकरा सामने भारताने जिंकले होते. 

महेंद्रसिंग धोनीला  मिळालेले पुरस्कार

एम एस धोनी याला मिळालेले पुरस्कार पुढीलप्रमाणे:- 

  • टी ट्वेंटी मध्ये दोन वेळेस, आयपीएल मध्ये पाच हजार पेक्षा अधिक धावा करणारा एम एस धोनी हा सातवा क्रिकेटपटू आहे आणि सोबतच यष्टीरक्षक  आहे. 
  • एम एस धोनी आला 2007  मध्ये  राजीव गांधी  खेळ रत्न हा पुरस्कार प्राप्त झाला. राजीव गांधी खेळ रत्न हा पुरस्कार क्रीडा जगातला सर्वात मोठा पुरस्कार आहे. 
  • एम एस धोनी याला 2008 मध्ये भारताचा सर्वोच्च क्रीडा सन्मान ध्यानचंद खेळ रत्न पुरस्कार प्राप्त झाला. 
  • 2009 मध्ये एम एस धोनीला भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री देऊन गौरवण्यात आले.
  • 2018 मध्ये एम एस धोनी याला भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण देऊन गौरविण्यात आले. 

एम एस धोनी हा असा एकमेव कर्णधार आहे ज्याला क्रिकेट विश्वचषक, आयसीसी पुरुषांचा टी-२० विश्वचषक आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी, तिन्ही ट्रॉफी एम एस धोनी आणि  जिंकल्या आहेत.एम एस धोनी आला एक महान क्रिकेटपटू म्हणून 2011 मध्ये देशाची सेवा केल्याबद्दल भारतीय लष्कराने भारतीय प्रादेशिक सैन्याच्या पॅराशूट रेजिमेंटमध्ये लेफ्टनंट कर्नलची जागा प्रदान करण्यात आले होते. 

एम एस धोनी हा संपूर्ण जगातील क्रिकेटपटून पैकी एक महान क्रिकेटपटू आणि एक लोकप्रिय भारतीय क्रिकेटपटू म्हणून मानला जातो. एम एस धोनी हा भारतातील क्रिकेटपटून पैकी एक आघाडीचा ब्रँड एंडोर्सर सेलिब्रिटी आहे.एम एस धोनी हा प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) चा कर्णधार आहे, या संघाला एम एस धोनी याने दहा वेळेस अंतिम फेरीत नेले आणि लीगच्या 2010, 2011, 2018, 2021 आणि 2023 ह्या सालच्या ट्रॉफी जिंकली. त्याचबरोबर 2010 आणि 2014 मध्ये ही चॅम्पियनस  लीग जिंकल्या.

एम एस धोनी याने भारतीय संघाला 2008 मध्ये मालिका जिंकवून दिली आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध बॉर्डर गावस्कर ट्रॉफी प्राप्त केली. एम एस धोनी हा असा पहिला क्रिकेटपटू कर्णधार आहे ज्याने तीनही मोठ्या आयसीसी ICC ट्रॉफी जिंकल्या आहेत. एम एस धोनी हा कर्णधार असताना त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 2011 मध्ये विश्वचषक 2007 मध्ये आयसीसी ICC विश्व टी ट्वेंटी, आणि 2013 मध्ये आयसीसी ICC ट्रॉफी जिंकली. या व्यतिरिक्त एम एस धोनी याने अजून 2010 व 2016 च्या SAALI आशिया कप मध्येही एम एस धोनी आणि भारताला विजय मिळवून दिला एम एस धोनी च्या नेतृत्वाखाली भारताने 2010 आणि 2011 ICC कसोटी सामना आणि 2013 ICC ODI चॅम्पियनशिप देखील जिंकली. 

एम एस धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 17 हजार 266 धावा केल्या आहेत. याचबरोबर आंतरराष्ट्रीय सामन्यात एम एस धोनी याने  दहा हजार हून अधिक धावा केल्या आहेत. 

एम एस धोनी माहिती | MS DHONI INFORMATION IN MARATHI

एम एस धोनी म्हणजेच महेंद्रसिंग धोनी याला क्रिकेटच्या विश्वात एक महान क्रिकेटर मानले जाते. एम एस धोनी याला एक महान यष्टीरक्षक आणि एक महान कर्णधार म्हणून हे ओळखले जाते. त्याचबरोबर एक चांगला यष्टीरक्षक आणि योग्य असा फलंदाज हे एम एस धोनी याला संबोधले जाते. एम एस धोनी याच्या फलंदाजाची पद्धत उजव्या हाताने आहे. एम एस धोनी ला एक शांत स्वभावाचा कर्णधार म्हणून ओळखले जाते आणि त्याचबरोबर अत्यंत कठीण परिस्थितीत ही सामने पूर्ण करण्यासाठी एक चांगला फिनिशर म्हणूनही ओळखला जातो. एम एस धोनी हा इंडियन प्रीमियर लीग मधील चेन्नई सुपर किंग्स कर्णधार आहे. 

एम एस धोनी फॅमिली

आपण बघणार आहोत एम एस धोनी फॅमिली बद्दल माहिती, एम एस धोनी यांचा जन्म सात जुलै 1981 रोजी राजपूत घराण्यात झाला. एम एस धोनी यांचा जन्म झारखंड मधील रांची या शहरात झालेला आहे. महेंद्रसिंग धोनी यांना एम एस धोनी आणि माही या नावाने ओळखले जाते. या सोबतच कॅप्टन कूल या नावाने सर्व कडे नेहमीच चर्चा असते ती म्हणजे महेंद्र सिंग धोनी यांची. एम एस धोनी यांचे वडील मेकोन मध्ये (पोलाद मंत्रालयाच्या अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील संस्था) कनिष्ठ व्यवस्थापकीय ह्या पदावर कार्यरत होते.

महेंद्रसिंग धोनी यांची आई गृहिणी होती आणि त्यांच्या आईचे नाव देवकी देवी असे आहे . एम एस धोनीला एक मोठा भाऊ व एक मोठी  बहीण आहे. धोनीच्या मोठ्या भावाचे नाव नरेंद्र सिंह धोनी तर बहिणीचे नाव जयंती असे आहे. धोनी यांचे मोठे भाऊ राजकारणामध्ये कार्यरत आहेत आणि बहिण जयंती ही शिक्षिका आहे. एम एस धोनी हे मूळचे उत्तराखंड येथील आहेत एम एस धोनी हा राजपूत घराण्यातील आहे. 

एम एस धोनी याचे वैयक्तिक आयुष्य

एम एस धोनी चे वैयक्तिक आयुष्य नेहमी रोचक राहिलेले आहे. एम एस धोनी हा क्रिकेटच्या इतिहासात एक यशस्वी पूर्ण कर्णधार आहे. एम एस धोनी चे वैयक्तिक आयुष्य त्यांचे लक्ष वेधून घेते. एम एस धोनीच्या बायोपिक मध्ये हे दिसून आले आहे की एम एस धोनी यांची प्रियंका झा नावाची खूप चांगली मैत्रीण होती आणि प्रियंकाशी धोनी याचे चांगले रिलेशनशिप देखील होते. प्रियंका झा ही 2002 मध्ये एका कार अपघातात मृत्यू  पावली.

धोनी आणि प्रियंका  झा यांचे हे रिलेशन खूप काळ टिकू शकले नाही. प्रियंकाझाच्या मृत्यूने एम एस धोनी हा खूप निराश झाला. ज्या दिवशी प्रियंका झा चा अपघात झाला त्यावेळी  धोनी हा प्रवासामध्ये होता आणि तो भारत अ संघमार्फत खेळायला जात होता. ही अपघाताची बातमी धोनी याच्या कानावर पडली असता ध्वनी खूप निराश झाला आणि ह्या नैराश्यामधून एम एस धोनी याला बाहेर निघायला जवळपास एक वर्ष लागले.  

पुन्हा एकदा नव्याने सुरुवात झाली धोनीच्या प्रेमाच्या आयुष्याची. 2008 सालामध्ये एम एस धोनी हा आणि त्याचा ग्रुप एका हॉटेलमध्ये थांबला होता आणि ह्या हॉटेलमध्ये त्याची भेट साक्षी रावत तिच्याशी झाली. साक्षी रावत ही त्या हॉटेलमध्ये  इंटर्न होती. साक्षी रावतेच हॉटेल मॅनेजमेंट हे शिक्षण झालेलं आहे आणि हॉटेल मॅनेजमेंटची पदवी साक्षी रावतीने औरंगाबाद येथून घेतली आहे. साक्षी रावत ही मूळची डेहराडून (उत्तराखंड)येथील आहे.

हॉटेल मधल्या भेटीनंतर साक्षी आणि एम एस धोनी दोघेही एकमेकांना वारंवार भेटू लागले. धोनी आणि साक्षी हे बालपणाचे सवंगडी होते. धोनी आणि साक्षी हे एकाच बालपणी शाळेत शिकलेले आहेत आणि म्हणूनच ते लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते. साक्षी रावत हे एम एस धोनी पेक्षा तब्बल सात वर्षांनी लहान असल्याचे दिसून येते. परंतु दोघांनीही एकमेकांशी विवाह करायचे ठरवले आणि ह्या दोघांचा विवाह 4 जुलै 2010 रोजी विवाह संपन्न झाला.

एम एस धोनी याच्या जीवनावर आधारित चित्रपट धोनी: द अनटोल्ड स्टोरी | Ms Dhoni The Untold Story

MS Dhoni The Untold Story
MS Dhoni The Untold Story

एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी हा चित्रपट भारतीय क्रिकेटपटू एम एस धोनी याच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट 23 सप्टेंबर 2016 मध्ये प्रदर्शित झाला. भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी यांच्या जीवनावर असलेला हा चरित्रात्मक चित्रपट नीरज पांडे यांनी दिग्दर्शित केला. ह्या चित्रपटांमध्ये एम एस धोनी याच्या रांची मधून सुरू झालेले त्याचे आयुष्य आणि क्रिकेटच्या विश्वात यशस्वी आणि सर्वोत्कृष्ट कर्णधार बनण्याचा संपूर्ण प्रवास या चित्रपटात दर्शविण्यात आला आहे.

या चित्रपटांमध्ये एम एस धोनीचा वैयक्तिक आयुष्य, त्याच्या आयुष्यात झालेल्या घडामोडी,त्याच्या जीवनातील झालेले संघर्ष, व्यवसायामधील संघर्ष, त्याने केलेले दृढ निश्चय आणि अजून बऱ्याच काही विविध दृश्यांचं महत्त्वपूर्ण सादरीकरण करण्यात आलेले आहे. सुशांत सिंग राजपूत यांनी चित्रपटांमध्ये एम एस धोनी यांची भूमिका साकारलेली दिसून येते. त्याचबरोबर कियारा अडवाणी, दिशा  पाटणी, अनुपम खेर यांसारख्या दिग्गज कलाकारांनी ह्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

चित्रपटात एम एस धोनी च्या आयुष्यातल्या अत्यंत महत्त्वपूर्ण पैलू दाखविले आहेत. ह्या चित्रपटाची सुरुवात धोनीच्या बालपणापासून होते महेंद्रसिंग धोनी याला लहानपणापासूनच क्रिकेट विषयी असलेले आवड कशाप्रकारे निर्माण झाली, आणि आपला आवडता खेळ क्रिकेट या खेळाचा पाठलाग म्हणजेच क्रिकेट याविषयी असलेले त्याचे प्रेम त्याच्या स्वप्नांचा पाठलाग करताना त्याने केलेले संघर्ष दाखविले आहेत. चित्रपटात अजून क्रिकेट खेळाविषयी केलेली एम एस धोनी यांनी कामगिरी आणि भारतीय संघाचा कर्णधार म्हणून केलेली त्याची नियुक्ती आणि कर्णधार असताना त्याने केलेली सर्वोत्कृष्ट कामगिरी याची चित्रपटात अतिशय चांगल्या प्रकारे सादरीकरण केले गेले आहे. एम एस धोनी यांची अधिक माहिती Ms dhoni mahiti in marathi जाणून घेण्यासाठी हा चित्रपट एकदा नक्की बघावा.

महेंद्रसिंग धोनीची निवृत्ती |mahendra singh dhoni retirement in marathi 

एम एस धोनी याने 30 डिसेंबर 2014 रोजी कसोटी मधून निवृत्ती जाहीर केली. ही वेळ सर्वांसाठी खूप कठीण होती. त्यानंतर 2017 मध्ये मध्ये T20 आणि ODI चे कर्णधारपद  धोनीने  सोडले आणि शेवटी 15 ऑगस्ट 2020 रोजी एम एस धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. जरी ह्या कसोटी मधून एम एस धोनी याची निवृत्ती झालेली असली तरी एम एस धोनीने आयपीएल खेळणे मात्र सुरूच ठेवले आहे आणि 2023 मध्ये एम एस धोनी याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्स यांनी चॅम्पियन ट्रॉफी सुद्धा जिंकली आहे. 

ही ही वाचा

वारंवार विचारले जाणारे प्रश्न | FAQ

एम एस धोनी यांचे पूर्ण नाव | ms dhoni full name 

एम एस धोनी यांचे पूर्ण नाव महेंद्रसिंग पानसिंग धोनी असे होते.

एम एस धोनी यांच्या वडिलांचे नाव |ms dhoni father name

एम एस धोनी यांच्या वडिलांचे नाव पानसिंग धोनी असे होते.

एम एस धोनी विकिपीडिया | ms dhoni wikipedia

एम एस धोनी यांच्या बद्दल विकिपीडियावरून अधिक माहितीसाठी गुगल येथून विकिपीडियावर जा.

महेंद्रसिंग धोनी यांची मराठीत माहिती | Mahendra Singh Dhoni in marathi mahiti

एम एस धोनी यांचा जन्म 7 जुलै 1981 सालामध्ये  झारखंड येथील रांची या शहरात झाला.एम एस धोनी  हे एक महान कर्णधार यष्टीरक्षक-फलंदाज,आणि सर्वोत्कृष्ट फिनिशर होते. एम एस धोनी यांच्या वैयक्तिक, क्रिकेट या खेळातील, त्यांच्या व्यवसायामधील, त्यांच्या विवाहाबद्दल, एम एस धोनी च्या आयुष्यात झालेले संघर्ष, आणि त्यावर केलेली त्यांनी  मात, यासाठी आणि एम एस धोनी बद्दल अधिक माहितीसाठी वरती दिलेली संपूर्ण लेख आवर्जून वाचा. ms dhoni mahiti in marathi या लेखामध्ये माहिती पूर्ण वाचा.

एम एस धोनी यांचे वय|ms dhoni age 

एम एस धोनी यांचे वय ही जन्म 7 जुलै 1981 नुसार 42 वर्षे इतके आहे. 

Leave a Comment