माहिती तंत्रज्ञान म्हणजे काय | Information technology in marathi

मित्रांनो आपण आज Information technology in marathi या विषयावर मराठी delight च्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. या लेखामध्ये मी माहिती तंत्रज्ञानाबद्दल चे महत्व आणि त्याचे उपयोग सांगणार आहे. 

आज 21 ह्या शतकात माणसांपेक्षा जास्त महत्व टेक्नॉलॉजीला मिळतंय हे म्हटल तरी अयोग्य ठरणार नाही. नुकत्याच आलेल्या CHAT-GPT ने कित्येक लोकांच्या नौकऱ्या हिराऊन घेतल्यात. माहिती तंत्रज्ञान हे इतक पुढे जाईल याची कल्पना ही करवत नाही. आपण आपला ग्रह तर सोडाच पण बाहेरच्या ग्रहांवर जाऊन तेथील माती, पानी, हवा याच संशोधन करण म्हणजे वाखाण्याजोगे आहे. हे सगळ शक्य आहे ते माहिती तंत्रज्ञानामुळेच. चला तर Information technology in marathi या लेखामध्ये सविस्तर चर्चा करूया. 

Table of Contents

माहिती तंत्रज्ञान म्हणजे काय | Information technology in marathi

माहिती तंत्रज्ञान ही एक भलेमोठे क्षेत्र आहे ज्यामुळे आपण नव-नवीन संशोधणे, जसे की Rocket Science , Smartphones , तसेकच इतर नव-नवीन टेक्नॉलॉजी चा उपभोग घेत आहोत. माहिती तंत्रज्ञान म्हणजे आजच्या या आधुनिक युगाला अधिक समृद्ध करणारा एक भाग आहे. माहिती तंत्रज्ञान हे एक खूप मोठे क्षेत्र आहे जे माहिती साठवण्यासाठी, त्यावर नव-नवीन प्रक्रिया करण्यासाठी, आणखी माहिती प्रसारित करण्यासाठी आणि ती माहिती पुन प्राप्त करण्यासाठी वापरतात.

या सर्वकाही प्रक्रियेसाठी लागणारे संगणक, न मोजता येणारे सॉफ्टवेअर, विविध इलेक्ट्रोनिक प्रणाली तसेच विविध नेटवर्क चे जाळे यांचा यात समावेश आहे. आपल्या आधुनिक आणि डिजिटल जगाचा एक अविभाज्य घटक असलेल्या माहिती तंत्रज्ञानामुळे आज कित्येक घर आपले पालन पोषण करत आहेत. आपण जगत असलेले जीवन हे अधिक सुखदायी आणि सोप्पे बनविणारे माहिती तंत्रज्ञान आज जगात सर्व ठिकाणी आहे. 

माहिती तंत्रज्ञानातील महत्वाचे घटक 

माहिती तंत्रज्ञानामध्ये अनेक महत्वाचे घटक येतात, जे माहितीचे व्यवस्थापन आणि देवाण घेवाण करण्यासाठी एकत्रित येऊन काम करतात. Information technology in marathi मध्ये आपण पुढे बघूया.

सॉफ्टवेअर  

संगणक , मोबाइल फोन्स आणि इतर उपकरणांवर, प्राथमिक संगणकावर चालणारे, उपकरणांवर चालणारे प्रोग्राम्स यांना सॉफ्टवेअर असे म्हणतात. यात विविध प्रकारचे सिस्टम जसे की विंडोज 11, म्हणजेच Operating System, नवीन नवीन उत्पादक सॉफ्टवेअर्स , डेटाबेसेस, इत्यादि गोष्टी तसेच Applications यांचा समावेश असतो. छोट छोटे प्रोग्रॅम्स मिळून एक संपूर्ण सॉफ्टवेअर ही तयार होत असते.  

हार्डवेअर 

 हार्डवेअर हा संपूर्ण इन्फॉर्मेशन टेक्नॉलजी चा एक महत्वाचा घटक मानला जातो ज्यामध्ये संगणक, संगणकाला पूरक किंवा लागणारे हार्डवेअर जसे की रॅम, रोम, स्टोरेज, बोर्ड, सर्वर्स, नेटवर्किंगला लागणारे बोर्डस इत्यादि फिजिकल असेट्स चा उपयोग होतो. हार्डवेअरच्या कॉनफिगरेशन मुळे डेटा प्रोसेसिंग, स्टोरेज करणे तसेच इलेक्ट्रोनिक संवाद म्हणजेच कम्युनिकेशन शक्य होत असते.   

नेटवर्क

हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांना जोडणारा महत्वपूर्ण भाग म्हणजे नेटवर्किंग. नेटवर्कच्या कनेक्शन मुळे उपकरणांमधील कामे ही सहज रीतीने होत असतात. यामुळे सहज पूर्ण सिस्टम चालत असून यामध्ये  LAN, WAN इत्यादि उपकरिणय कनेक्शन्स चा समावेश होतो.    

डेटा व्यवस्थापन

यामध्ये माहिती व्यवस्थापन , स्टोरेज आणि ते परत मिळवणे म्हणजे त्या माहितीची पुनप्राप्ती करणे यांचा समावेश होतो. माहितीची अचूकता , उपलब्धता आणि सुरक्षिततेबरोबरच सर्वर्स, Connections ही यात महत्वपूर्ण भूमिका बजावतात. माहिती पुन मिळवण्यासाठी डेटाबेस सिस्टम, सेर्वर्स यांचा प्रामुख्याने उपयोग होत असतो. डेटा ईविश्लेषण, डेटा मायनिंग, अश्या विविध प्रकारच्या संकल्पना यात येतात.    

सायबर सुरक्षा  

सायबर सुरक्षा या मध्ये विविध प्रकारचे चोरी करणारे हॅकर्स जसे की Grey Hat Hacker , Black Hat Hacker यांचा समावेश होतो. आपल्या डेटा मध्ये अनधिकृत प्रवेश, Hacking च्या धमक्या आणि संपूर्ण सिस्टम चे संरक्षण यावर सायबर सुरक्ष ही लक्ष घालते. यात विविध प्रकारचे Antivirus , सायबर सिस्टम्स, फायरवाल, विविध Encryption पद्धती, अनधिकृत प्रवेश detection system यांचा समावेश आहे. ज्यामुळेच गुप्त तसेच संवेदनशील माहितीचे संरक्षण होते आणि माहिती तंत्रज्ञानाची अखंडता राखली जाते. 

क्लाऊड Computing | Information technology in Marathi

सॉफ्टवेअर क्षेत्रातील क्लाऊड कम्प्यूटिंग Information technology in marathi ही नुकतीच आलेली संकल्पना आहे ज्यामुळे विविध कामे फिजिकल स्टोरेज न घेत करता येतात. इंटरनेट जगतातील सर्वर, डेटाबेस, स्टोरेज, सॉफ्टवेअर आणि विविध गोष्टी ह्या क्लाऊड कम्प्यूटिंग मुले सहज शक्य होतात. ही मोठ्यात मोठी स्टोरेज उपलब्धता तसेच माहिती जतण करणे म्हणजेच scalability, इलॅस्टिक म्हणजेच लवचिकता प्रधान करते.

यामुळे व्यवसाय करणाऱ्या, आपली स्वतःची वेबसाइट असणाऱ्या आणि जगाच्या कानयकोपऱ्यापर्यंत सहज आपला व्यवसाय पसरविण्यासाठी उपयुक्त ठरते. परंतु यासाठी आपल्याला खिशाला परवडणारी रक्कम मोजावी लागू शकते.   

माहिती तंत्रज्ञानाचे उपयोग | Importance of Information Technology in Marathi

माहिती तंत्रज्ञानाचे अनन्यसाधारण महत्व –

माहिती तंत्रज्ञानाचा आपल्या जीवनावर आणण्यासाधारण असा प्रभाव पडतो. यामध्ये माहितीचे देवाण घेवाण, प्रवेश, व्यवस्थापन इत्यादिंंचा समावेश होतो.

माहितीची देवाण घेवाण

यामध्ये माहितीची परस्परामद्धे होणारा संवाद हा प्रत्यक्ष असतो, टेक्स्ट मेसेज च्या स्वरूपात संवाद, विडियो कॉन्फ्रेंसिंग द्वारे संवाद, तसेच आजच्या काळात अत्यंत्य वेगाने वापरली जाणार सोशल मीडिया प्लॅटफॉर्मस अधिक सक्षम आणि सहज करून जगात नवीन क्रांति आणली आहे. सोशल मीडिया व्यासपीठांमुळे जागतिक स्तरावर लोक जोडले गेले आहेत परिणामी आपण सहज आपला व्यवसाय विदेशात पोचवू शकतो. तसेच कुठलीही विदेशी वस्तु आपलं मिळवू शकतो. यामुळे माहितीची देवाण घेवाण ही सहजरित्या होते ज्यामुळे आज जगात क्रांति आली आहे.  या लेखात Information technology in marathi पुढे आपण आणखी महत्व बघूया.

माहिती प्रवेश क्षमता 

माहिती तंत्रज्ञानामुळे मोठ्या प्रमाणावर माहिती आज सहज उपलब्ध झाली आहे, कुठलीही माहिती आपण सहज सर्च करून मिळवू शकतो. ज्यात प्रामुख्याने Google कंपनीच्या प्रॉडक्ट चा उपयोग केला जातो. गूगल सर्च इंजिन, यूट्यूब यासारख्या व्यासपीठांमुळे आज आपण प्रत्येक गोष्ट शिकू शकतो. विविध प्रकारची सर्च engines , डेटाबेस आपल्याला माहिती मिळवण्यासाठी सहज प्रवेश देतात आणि अचूक ती माहिती आपल्याला प्रदान करतात. एक बोटावर लागणारी संपूर्ण माहिती आपण आज मिळवू शकतो ती या Information technology in marathi मुळेच.  

व्यवसाय कार्यक्षमता 

खर्चात बचत करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान व्यवसाया मधील operations वाढवते आणि त्याची कार्यक्षमता सुधारण्यात मदत करते. ऑटोमेशन च्या माध्यमातून सर्व प्रकारची प्रक्रिया ही व्यवस्थित चालते आणि वेगवेगळ्या साधनांचे व्यवस्थापन व्यवस्थित करते. परिणामी उत्पादकता आणि खर्च या मध्ये बचत होते. 

आरोग्यसेवा संस्थानची प्रगती 

माहिती तंत्रज्ञानामुळे इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड्स (EHRs), मेडिकल इमेजिंग टेक्नॉलॉजी, टेलिमेडिसिन तसेच अनेक आरोग्य सेवा देणाऱ्या संस्था सेवेत क्रांती केली आहे. हे अचूक रेकॉर्ड व्यवस्थापन करते, योग्य तो निदान आणि उपचार अधिक सुधारित पद्धतीने ट्रॅक करता येते. रुग्णाची देखरेख ही सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर ने एकत्रित बनलेल्या मचीनच्या देखरेखीखाली सुद्धा होऊ शकते.  आरोय सेवांमध्ये वापरल्या जाणाऱ्या असंख्य अश्या मशीन आहेत ज्यामुळे देखील आरोग्य क्षेत्रात खूप मोठी क्रांति आली आहे.

शिक्षण 

माहिती तंत्रज्ञानामुळे शिक्षणावर खूप मोठा प्रभाव पडला आहे. आधी फक्त ऑफलाइन अभ्यासक्रम विविध शाळा, कॉलेज तसेच कोचिंग क्लाससेस च्या माध्यमतून चालत असत. परंतु आता विविध ई-लर्निंग प्लॅटफॉर्म उबलब्ध असून आपण कुठनही शिक्षण घेऊ शकतो. माहिती तंत्रज्ञानामुळे आपल्याला ऑडिओ, विडियो कॉन्फ्रेंसिंग च्या माध्यमातून आपला शिक्षण, क्लास पूर्ण करता येऊ शकतो. यामुळे विद्यार्थी त्याच्या कुशालतेप्रमाणे सर्व काही शिकू शकतो आणि जगातला कुठलाही अभ्यासक्रम एक सेकंदात मिळवू शकतो. 

मनोरंजन  

जितकी क्रांति इतर क्षेत्रांमध्ये आली आहे त्या पेक्षाही नक्कीच दुप्पट मनोरंजन या क्षेत्रात आली असेल. संपूर्ण मनोरंजन उद्योगाला आकार देण्याच काम हे माहिती तंत्रज्ञानामुळे शक्य झाल आहे. या विभागामध्ये IT च्या माध्यमातून विविध डिजिटल , सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, स्ट्रीमिंग सेवा, संवाद, ऑनलाइन गेमिंग इत्यादि अनुभव प्रदान केलेल जातात. मनोरंजन उद्योग भरारी घेण्यामद्धे ग्राफिक्स डिझाईन, सॉफ्टवेअर, विविध फोटो एडिटिंग, विडियो एडिटिंग, अेनिमेशन सॉफ्टवेअर यांचा समावेश आहे.  मनोरंजन या क्षेत्रामध्ये Information technology in marathi ने आश्चर्याजनिक कामगिरी केली आहे.

कनेक्टिविटी

माहिती तंत्रज्ञानामुळे समाजात अनन्यसाधारण असे बदल झाले आहेत. माहिती तंत्रज्ञानामुळे कनेक्टिविटी मध्ये येत असलेले अडथळे लांब केलेत. भौगोलिक रित्या आपण कुठेही संदेश, संवाद , व्यवसाय माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पोहोचवू शकतो. आतराष्ट्रीय व्यापार आणखीन सुलभ, व्यवहार, आणि इतर देवाण घेवाण सहज होतात. ज्यामुळे जागतिक स्तरावर खूप मोठा बदल हा कार्यपद्धतीती झाला आहे.

माहिती तंत्रज्ञानातील नवीन कल | Emerging Trend in Information Technology in Marathi

माहिती तंत्रज्ञान हे एक झपाट्याने वाढणार आणि सत्य परिस्थितीत वाढलेला क्षेत्र आहे चे सतत नवीन नवीन आव्हानांना तोंड देत आणखी संधी विकसित करत आहे.  माहिती तंत्रज्ञानात आणखीन काही बदल झालेत ज्याने एक नवी क्रांती या जगात आली आहे.

चला तर आपण पुढे बघूया माहिती तंत्रज्ञानातील नवीन कल जसे की चॅट जीपिटी तसेच नवनवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे मार्केटमध्ये खूप चर्चेत आहेत.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग

मानव बुद्धिमत्तेची आवश्यकता असणारे कार्य जसे की गेमिंग जसे की एखादी आर्टिकल लिहिणे अशा बऱ्याच प्रकारची कार्य आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या माध्यमातून आज सेकंदांमध्ये होताना दिसतात.  संगणक आणि सिस्टीमच्या माध्यमातून आर्टिफिशियल इंटेलिजन्स असलेले सॉफ्टवेअर हे तयार केले जातात आणि त्यांचा वापर करून एक मानव बुद्धिमत्तेची क्षमता असणारे कामी केली जाऊ शकतात हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ने आज दाखवून दिले आहेत.

आपण सगळ्यांना माहीतच आहे की चॅट जीपीटीने आज काय धुमाकूळ घातलेला आहे.  आपल्या डोक्यातील कुठल्याही प्रश्नाचं उत्तर आपण मिळवू शकतो जसे गुगल सर्च इंजिन कार्यकर्ते तसे कार्य करत असते परंतु या दोघींमध्ये फरक आहे. गुगल हे सर्च इंजिन आहे आणि चॅट जीपीटी हे आस्क इंजिन आहे.  जीपीटी आपल्या इंटेलिजन्स चा वापर करून जे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपला प्रश्नाचे उत्तरे शोधतात आणि आपल्यासमोर ठेवतात.

लवकरच आपण chat-GPT वर सविस्तर आणि आपल्या मराठी भाषेत एक नवीन लेखात जाणून घेणारच आहोत.

इंटरनेट ऑफ थिंग्स | IoT

इंटरनेट ऑफ थिंग्स मध्ये कोणकोणते घटक येतात, जसे की सॉफ्टवेअर आणि मशीन कनेक्टिव्हिटी करण्यासाठी वापरण्यात आलेले भौतिक उपकरण, नेटवर्किंग, वेगवेगळ्या सेंसर जसे की आपण मोबाईल वापरतो त्यामध्ये आपण मोबाईल घेताना आपण चेक करतो की याच्यात कुठल्या सेन्सर आहेत. जर जिओ लोकेशन सेंटर असेल तर आपण आपल्या मोबाईल वरती मॅप युज करू शकतो. Information technology in marathi मध्ये पुढे बिग डेटा म्हणजे काय ही बघूया.

यामध्ये अगदी औटोमाटेड वॉशिंग मशीन्स, Refrigerators, Fans, स्मार्ट होम्स बनवण्यासाठी च्या इलेक्ट्रॉनिक उपकरणे यांचा समावेश होतो. 

Big Data Analytics in Marathi | बिग डेटा म्हणजे काय?

बिग डेटा म्हणजे आज असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून माहितीच्या आदान प्रदान हे अतिशय वेगवान पद्धतीने आणि मोठ्या प्रमाणामध्ये तयार होणारा डिजिटल डेटा आहे. दिवसाला संपूर्ण जगात 2.7 डेटा हा तयार होत असतो. 

इतक्या मोठ्या प्रमाणात तयार होणारा होणाऱ्या डेटा साठी एक शक्तिशाली प्रणाली काम करत असते ही प्रणाली अनेक उपकरणे सॉफ्टवेअर आणि डेटा अनालिसिस साठी लागणारी सामग्री या माध्यमातून प्रचंड वेगाने काम करत असते.  या प्रणालीच्या आधारे डेटाचे एनालिसिस केले जाते व अचूक असा डेटा युजरला दिला जातो.  या पद्धतीने युजरला जाहिराती दाखवल्या जातात म्हणजेच इंटरेस्ट बेस्ड आणि इतर गोष्टी या व्यवस्थापित केल्या जातात. 

जसं की Information technology in marathi लेखामध्ये दिलेल्या उदाहरणाप्रमाणे, 

जर गूगल वर तुम्ही एखादी प्रोडक्ट सर्च केला असेल तर तुमचा जो डेटा तो गुगलचा डेटाबेसला स्टोअर होतो आणि गुगल मग तुमच्या इंटरेस्ट नुसार तुम्ही जो प्रॉडक्ट सर्च केला असेल त्यानुसार तुम्हाला ॲडवर्टाइजमेंट दाखवायला सुरुवात करतो आणि तुम्ही ते ऍडव्हर्टाइजमेंट अगदी युट्युबच्या विडियो मध्ये, एखाद्या वेबसाईटच्या पेज वरती आणि इंस्टाग्राम चे पेज वरती बघू शकता. 

ब्लॉकचैन तंत्रज्ञान माहिती | Blockchain information in Marathi

ब्लॉकचेन तंत्रज्ञान हे नवीन आणि शक्तिशाली तंत्रज्ञान आहे, जे की गुप्त व्यवहार किंवा महत्त्वाचे व्यवहार जसे की क्रिप्टो करेंसी सारख्या गोष्टींना पारदर्शकता आणि सुरक्षा प्रदान करते.  ब्लॉक चेन मध्ये नावामध्येच दिल्याप्रमाणे डेटाचे ब्लॉक असतात प्रत्येक ब्लॉक मध्ये डेटा हा स्टोअर होत असतो. एका ब्लॉकची स्टोरेज क्षमता पूर्ण झाल्यानंतर तो डेटा दुसऱ्या ब्लॉक मध्ये स्टोअर होऊ लागतो, अशी डेटाची एक चैन तयार होते, साखळी तयार होते यालाच Blockchain तंत्रज्ञान असे म्हणतात.

या तंत्रज्ञानामध्ये डेटा हा इन्क्रिप्टेड स्वरूपात असतो म्हणजे की कोणीही त्याला वाचू किंवा एडिट करू शकणार नाही या स्वरूपाचा डेटा हा असतो.  ज्याचा इन्क्रिप्शन सॉफ्टवेअर चा वापर करूनच डिक्रीप्ट करता येतो. ब्लॉकचैन ही तंत्रज्ञान Information technology in Marathi मध्ये एक नवीन तंत्रज्ञान आहे.

सायबर सिक्युरिटी

जसे की नवीन नवीन तंत्रज्ञान हे विकसित होत आहे तसेच हॅकिंग आपला डेटा चोरीला जाणे अनाधिकृत प्रवेश या गोष्टीही वाढत आहेत.  वेगवेगळ्या प्रकारचा धोका आपल्याला या डिजिटल युगातील चोरांकडून होत असतो.  कधी कधी आपला बँक अकाउंट ही हॅक होऊ शकतं आणि त्यावर अनाधिकृत ट्रांजेक्शन होऊ शकतं.  असे धोके माहिती तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आता कमी होऊ लागले आहेत,  सायबर हल्ले डेटा चोरीला जाणे आणि त्याचा गैर उपयोग होऊ नये हे होऊ नये यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित होऊ लागले आहेत आणि वापरकर्त्यांना समाधान देणारे आहेत. 

आम्ही Information technology in marathi संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. या इन्फॉर्मेशन टेक्नॉलजी च्या अधिक माहितीसाठी विकिपीडिया पेज वर जाऊ शकता. लेख आवडला असल्यास कृपया आपला अभिप्राय खाली दिलेल्या कमेन्ट बॉक्स मध्ये कमेंट करून कळवा.

हे ही वाचा,

शेअर मार्केट म्हणजे काय?

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी?

FAQ | वारंवार विचारले जाणारे प्रश्न

माहिती तंत्रज्ञान कशासाठी वापरले जाते?

माहिती तंत्रज्ञान हे प्रत्येक त्या ठिकाणी उपयोगी पडते जिथे मनुष्याला मशीन आणि नवीन टेक्नॉलजी ची गरज असते. संगणक, सॉफ्टवेअर, मशीन्स, सर्वर्स आई डेटाबेस या सगळ्या गोष्टींचा वापर करून आपली दैनंदिन कामे सहज आणि सोपपई ह्या माहिती तंत्रज्ञानामुळे झाली आहे.

माहिती तंत्रज्ञानामुळे समाजात काय बदल झाले?

माहिती तंत्रज्ञानामुळे समाजात काय बदल झाले

माहिती तंत्रज्ञानामुळे समाजात अनन्यसाधारण असे बदल झाले आहेत. माहिती तंत्रज्ञानाने आजचे जग निर्माण केले आहे असे म्हंटले तरी चालेल. एके काळी पत्र व्यवहार करणारे आपण , या गावाहून त्या गावी जाण्यासाठी बैलगाडी वापरणारे आपण आज विमानात उडू शकतो, एक कॉल वर संवाद करू शकतो , विडियो कॉल सुद्धा करू शकतो, या पेक्षा मोठा बदल आणखी कुठला असेल. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळेच आपण चंद्रयान वैगेरे मोहीम राबवतो आणि चंद्र , इतर ग्रहांपर्यंत पोहोचण्याची जिद्द ही ठेवतो.

तंत्रज्ञान इतक्या वेगाने का विकसित झाले आहे?

प्रत्येक वर्ष, दिवस आणि महिन्यांमध्ये काहीना काही वाटचाल ही माहिती तंत्रज्ञानामद्धे होत आहे त्याच कारण म्हणजे सातत्याने करत असलेल्या नाव नवीन शोधांमध्ये बदल करणे व ते वेळो वेळी अपडेट करणे. मागील तुलनेत प्रत्येक वेळी ते प्रॉडक्ट किंवा ती टेक्नॉलजी ही अपडेट होते आणि तंत्रज्ञान ही झपाट्याने विकसित होत आहे. माणसाला प्रत्येक वेळी काहीतरी नवीन आणि जलद गोष्टी पाहिजे आहेत. काही वस्तु किंवा उपकरणे ही त्याला कमी कमी साइज मध्ये पाहिजे आहवेत जसे की मोबाइल , संगणक, काही इतर यंत्र , उपकरणे. Information technology in marathi मध्ये आणखी माहिती आपण वाचू शकता.

तंत्रज्ञानाने जग कसे बदलले आहे?

तंत्रज्ञानामुळेच आपण आज मोबाइल वर तासं तास संवाद करू शकतो, कुठलीही वस्तु किंवा प्रॉडक्ट एक क्लिक वर घेऊ शकतो. आपले बँकिंग व्यवहार सोप्पे झालेत. हा माझा लिहिलेला लेख आज वाचताय.

 

Leave a Comment