नमस्कार मित्रांनो, मराठी डिलाइट मध्ये फायनान्स या आर्थिक साक्षर बनविणाऱऱ्या प्रसिद्ध संकेतस्थळाच्या विभागामध्ये आणखी एका नवीन लेखामध्ये आपल स्वागत आहे. या लेखामध्ये आपण शेअर मार्केट काय आहे हे थोडक्यात जाणून घेणार आहोत. त्याच बरोबर सगळ्यात महत्वाचा आणि जास्तीत जास्त जणांना उद्भवणारा प्रश्न म्हणजे आम्ही नवीन आहोत आम्ही शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी? हे ही जाणून घेऊया.
शेअर मार्केट हा एक समुद्रासारखा खोल आणि समृद्ध विषय आहे आणि त्यात बरेच रहस्य आणि धोके आहेत, पण असे अनेक मोती सुद्धा आहेत जे शोधून आपल्याला नफा होईल. नफ्यासाठी सगळ्यात महत्वाच म्हणजे आपल्या भांडवलाची सुरक्षितता, ब्रोकर निवड, स्टॉक निवडणे, हालचालींवर निरिक्षण. चला तर मित्रांनो या समुद्राच्या खोलात जाऊन जाणून घेऊया नक्की शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी ते.
गुंतवणुकीचे महत्व
अनुक्रमाणिका
- 1 गुंतवणुकीचे महत्व
- 2 शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी | share market madhe guntavnuk kashi karavi
- 3 Share market basic information in Marathi | शेअर मार्केट काय आहे? कसे कार्य करते?
- 4 शेअर मार्केट मधील गुंतवणूक म्हणजे नक्की काय?
- 5 उपयोगी साधने आणि व्यासपीठ – Platform to start investing in Marathi
- 6 गुंतवणुकीचे प्रकार – Types of Investments in Marathi
- 7 शेअर मार्केट मध्ये ce काय आहे? what is ce in share market marathi
- 8 शेअर मार्केट मध्ये pe काय आहे? what is pe in share market marathi
- 9 गुंतवणुकीची निवड | How to do profitable investment marathi
- 10 Types of Investments strategies in marathi|गुंतवणुकीची धोरणे|long term, short term, mid term investment in marathi
- 11 शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी | share market madhe guntavnuk kashi karavi
- 12 स्टॉक कसा निवडावा|stock selection in Marathi
- 13 गुंतवणूकदाराची मानसिकता, संयम आणि भावना | Mindset, Patience and emotions in trading marathi
- 14 Conclusion :
- 15 FAQ
- 15.1 मी Groww मध्ये शेअर्स कसे खरेदी करू?
- 15.2 बाजार उघडण्यापूर्वी मी शेअर्स कसे खरेदी करू शकतो?
- 15.3 मी शेअर मार्केटमध्ये 500 रुपये गुंतवू शकतो का?
- 15.4 मी शेअर मार्केटमध्ये 20 रुपये गुंतवू शकतो का?
- 15.5 मी 1000 रुपयांनी स्टॉक ट्रेडिंग सुरू करू शकतो का?
- 15.6 इंट्राडे ट्रेडिंग फायदेशीर आहे का?
- 15.7 मी इंट्राडे साठी F&O स्टॉक कसे निवडू?
- 15.8 इंट्राडे ट्रेडिंगसाठी तुम्ही मार्केट डेप्थ कसा वापरता? तुम्ही स्टॉक डेप्थ कसे वाचता?
- 15.9 शेअर मार्केटमध्ये LTP म्हणजे काय?
- 15.10 अपस्टॉक्समध्ये मार्केट डेप्थ काय आहे?
- 15.11 आपण कधीही स्टॉक खरेदी करू शकता?
- 15.12 इंट्राडे ट्रेडिंगसाठी किती भांडवल आवश्यक आहे?
- 15.13 स्टॉकमध्ये किती पैसे गुंतवावेत?
- 15.14 मी शेअर मार्केटमधून किती पैसे कमवू शकतो?
- 15.15 स्टॉक विकण्यासाठी दिवसातील कोणती वेळ सर्वोत्तम आहे?
- 15.16 तुम्ही ITR मध्ये इंट्राडे नफा कसा दाखवाल?
- 15.17 तुम्ही शेअर्समध्ये गुंतवणूक कशी सुरू करता?
- 15.18 Related
सगळ्यात आधी आपण बघूया शेअर मार्केट मध्ये गुंतवणुकीचे महत्व काय आहे.
गुंतवणुकीचे बरेचसे फायदे आहेत. गुंतवणुकीने आपला आर्थिक ध्येयप्राप्ती करू शकतो, आपले आर्थिक नियोजन ही सहजतेने पार करू शकतो. गुंतवणूक करून आपण आपल भविष्य ही सुरक्षित करू शकतो. कुणाला कुटुंबासाठी कार घ्यायची असते तर कुणाला घर घ्यायच असत, ही आर्थिक नियोजनाशिवाय अशक्य आहे. गुंतवणूक करून आपण हा टप्पा सहजतेने पूर्ण करू शकतो. जर आपण आज 2023 मध्ये कुठेही गुंतवणूक करत नाहीये म्हणजे आपण या काळात 10 वर्ष मागे आहे असे समजावे.
एक नफा मिळवणारी गुंतवणूक करण्यासाठी आधी आपल्याला जी माहितीची आवश्यकता असेल ती म्हणजे शेअर मार्केट काय आहे आणि ते कसे कार्य करते. आपण थोडक्यात जाणून घेऊया म्हणजे पुढील गोष्टी तुम्हाला समजण्यास सोप्या जातील.
मित्रांनो शेअर मार्केट हा एक भला मोठा वित्तीय बाजार आहे, ज्यात काही Companies आणि आपल्यासारखे व्ययक्तिक लोक Shares/Stocks/Equity ची खरेदी-विक्री करू शकतात. या खरेदी विक्री ला शेअर बाजारात ट्रेडिंग असे म्हणतात. एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की शेअर मार्केटला स्टॉक मार्केट किंवा इक्विटि मार्केट असे सुद्धा म्हटले जाते. Stocks, Shares आणि Equity इथे गोंधळून जाऊ नका मित्रांनो. या तिघांचा अर्थ एकच आहे.
तर स्टॉक मार्केट हा असा बाजार आहे ज्याचा वापर करून आपण जे स्टॉक्स लोकांना खरेदी विक्री करण्यासाठी उपलब्ध आहेत त्यांची खरेदी विक्री करू शकतो.. यासाठी आपल्याला एक Demat Account ची गरज भासते.
सोप्या भाषेत सांगायच झाल तर शेअर मार्केट ही लहान मोठ्या व्यवसायांना मोठ बनविण्याच सुद्धा काम करत. जी कंपनी शेअर मार्केट मध्ये येते, तिचे shares आपल्या सारख्या लोकांना विकत घेण्यासाठी उपलब्ध होतात. या सगळ्या खरेदी विक्री मधून जी काही रक्कम येते त्या रक्कमेनुसार Company चे मूल्यमापन होऊन तिची स्केल वाढत जाते. ही माहिती थोडक्यात आहे मित्रांनो शेअर मार्केट हा सुद्धा एक संक्षिप्त विषय आहे, ज्यावर मी लवकरच आपल्या दुसऱ्या लेखामध्ये संक्षिप्त रूपात लिहणार आहे आणि त्याची लिंक तुम्हाला खाली मिळेल.
शेअर मार्केट मधील गुंतवणूक म्हणजे नक्की काय?
थोडक्यात, गुंतवणूक करणे म्हणजे आपल्या भांडवलावर अतिरिक्त व्याज म्हणजेच नफा मिळवणे होय. शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करून व्याज मिळविण्याचे अनेक मार्ग आहेत. परंतु या बद्दल आपल्याला आणखी स्पष्ट माहिती नाहीये, तसेच आपले मराठी जनता शेअर मार्केट पासून लांब राहण्याचाच प्रयत्न करताना दिसते. परंतु खरी गोष्ट वेगळी आहे, शेअर मार्केट म्हणजे अशी गोष्ट आहे जिथे काही लोक घरबसल्या लाखों-करोडो कमवत आहेत. परंतु गुंतवणूक करण्यासाठी पुरेस ज्ञान आणि शिकण्याची तयारी असंन गरजेचं आहे.
उपयोगी साधने आणि व्यासपीठ – Platform to start investing in Marathi
जे शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करू इच्छितात त्यांना Demat Account बद्दल माहिती असल्याशिवाय ते पुढे जाऊ शकत नाहीत. Demat Account हे एक प्रकारे आपले अस्त्र-शस्त्र आहे, याचा वापर करूनच आपण ट्रेडिंग, म्हणजेच Stocks ची खरेदी विक्री करू शकतो. Demat Account चे ही बरेच प्रकार आहेत. आपल्या निवडीच्या गुंतवणुकीनुसार आपल्याला Demat Account ही निवडावे लागते.
उदाहरणार्थ, नावाजलेल्या Brokers पैकी थोडक्यात यादी,
- Angel One
- Zerodha
- Grow
आणि इतर काही, हे आपल्याला Demat Account बनविण्यास आणि वापर करण्यास सोय करून देतात.
गुंतवणुकीचे प्रकार – Types of Investments in Marathi
गुंतवणूक करताना लक्षात घेण्यासारख्या काही गोष्टी आहेत, ज्यामध्ये गुंतवणुकीचे प्रकार, योग्यता, मूल्यमापन, विश्लेषण इत्यादींच्या सहाय्याने आपण गुंतवणूक ठरवू शकतो.
Types of Investments in Marathi
A. स्टॉक/Stocks
Stock म्हणजेच equity, हे कंपनीचे एक assets आहे जे की तिने आपल्या सारख्या खरेदी विक्री करणाऱ्या लोकांसाठी उपलब्ध करून ठेवले आहे, जर का आपण स्टॉक मध्ये गुंतवणूक केली तर आपण त्या company चे तेवढ्या percentage चे भागीदार बनतो. कंपनी नफ्यात असेल तर आपल्याला ही नफा होतो आणि तसेच तोट्यात असेल तर तोटा.
उदाहरण, खालील स्टॉक्स ही nifty मधील आहे ज्यांची मागील कामगिरी इथे देण्यात आली आहे.
B. Bonds
बॉन्ड हे सरकार कडून उपलब्ध असलेले एक धोरण आहे ज्यामध्ये आपण गुंतवणूक करू शकतो, पैश्यांच्या बदल्यात आपल्याला एक agreement करावी लागते आणि संपूर्ण certificates म्हणजेच कागदोपत्री महत्वाची माहिती आपल्याला मिळते. नियमित कालावधी संपल्यानंतर आपल्याला आपली गुंतवणूक आणि त्यावर मिळालेला व्याज ही परत मिळते. Agreement मध्ये व्याजदर , गुंतवणूकदाराची संपूर्ण माहिती, गुंतवणूक सगळ काही उपलब्ध असते आणि ते दोनही पार्टी करून हस्ताक्षरीत असतात.
C. Commodities
यामध्ये आपण सोन, चांदी, natural gas, agriculture products ची खरेदी विक्री करू शकतो. आपण यांच्या भविष्यातील किमतीचा अंदाज लावून गुंतवणूक करू शकतो. Commodity मार्केट मध्ये मुख्यतः कच्चा माल असून त्याच्या बाजार मूल्यानुसार खरेदी आणि विक्री केला जातो. यात नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेले, जसे की सोने , चांदी, कॉफी, तेल, खनिजे यांचा समावेश होतो.
D. Mutual Funds
Mutual Funds मध्ये एक Financial Manager किंवा त्याला आपण Fund Manager म्हणू शकतो, जो आपल्यासारख्या हजारो गुंतवणूकदारांचे पैसे व्यवस्थापित करून आपल्या कोशल्याच्या जोरावर जास्तीत जास्त परतावा मिळवून देतो. Mutual Fund मध्ये हजारो लाखों गुंतवणूकदारांचे पैसे असतात जे की ते आपल्या एखाद्या Demat Account च्या सहाय्याने भरतात किंवा SIP च्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला थोडी थोडी ठराविक रक्कम ही भरत असतात. लाखों गुंतवणूकदारांचे पैसे Fund Manager हा शेअर मार्केट मध्ये टाकतो आणि आपल्याला चांगला परतावा मिळवून देत असतो. बऱ्याच मोठ्या मोठ्या companies चे Mutual Fund उपलब्ध आहेत त्यामध्ये Aditya Birla Sun Life Digital, India Fund Direct-Growth , Nippon India Small Cap Fund Direct- Growth इत्यादिंचा चा समावेश आहे.
Sip in Mutual Funds
SIP चा full form हा Systematic Investment Planning हा आहे, नावाप्रमाणेच यात आपण Systematic पद्धतीने Investment करू शकतो. आज आपल्याला सगळेच मार्केट Brokers SIP ची सुविधा प्रदान करतात. SIP मध्ये आपण ठराविक रक्कम प्रत्येक महिन्याला, ठरवलेल्या तारखेनुसार भरू शकतो. निवडलेल्या Mutual Fund नुसार, त्याच्या कामगिरीनुसार आपल्याला नफा हा होत असतो. Mutual Funds आणि SIP मध्ये आपल्याला कंपाऊंड इंट्रेस्ट हा मिळत असतो.
Compound interest meaning in Marathi
सोप्या भाषेत, या मध्ये आपल्याला मिळालेल्या व्याजावर सुद्धा व्याज मिळते.
उदाहरणार्थ, आपण 100000 (एक लाख रुपये) गुंतवणूक केली आहे आणि वर्षभरात/12 महिन्यात त्यावर 10000 व्याज ही जोडले गेले आहे. आता आपल्या खात्यात व्याजाचे 10000 रुपये मिळून पूर्ण 1 लाख 10 हजार रुपये आहेत. तर 13 व्या महिन्यात आपल्या भांडवलावर तसेच आपल्या व्याजावर म्हणजेच 1 लाख 10 हजार रुपयांवर व्याज मिळणार आहे. Compound Interest म्हणजे आपल्या भांडवलावर तसेच व्याजावर व्याज मिळणे. जर आपली गुंतवणूक ही Long Term असेल तर Compound Interest चा आपल्याला अधिक फायदा मिळू शकतो.
E. Options
ऑप्शन ट्रेडिंग ही Derivatives या भागामध्ये येते. करोना काळानंतर ट्रेडिंग मध्ये बरीच जागरूकता झाली आणि ऑप्शन ट्रेडिंग, intraday trading कडे लोक वळू लागले. भारतातील 70% लोक ही ऑप्शन ट्रेडिंग करन्यास पसंती दर्शवतात. यामध्ये खूप पटीने जास्त नफा मिळवू शकतो तसेच यासाठी आपल्याला जास्त भांडवलाजी गरज भासत नाही. शिवाय यामध्ये Broker आपल्याला चांगले Margin उपलब्ध करून देतो ज्याचा वापर करून आपण कमीत कमी गुंतवणुकीमध्ये जास्त नफा कमवू शकतो. ऑप्शन ट्रेडिंग मध्ये call Option यांनी Put Option असे प्रकार असतात. ज्यामध्ये जर मार्केट वरच्या बाजूला जात असेल तर शेअर व्यापारी call Option विकत घेतात आणि खाली जात असेल तर Put Option.
call आणि put नीट समजून घेण्यासाठी तुम्हाला derivatives काय आहे ते समजून घेण गरजेच आहे.
ज्या मालमत्तेचे मूल्य हे स्वतावर अवलंबून नसून तिच्या दुसऱ्या एखाद्या स्त्रोतावर म्हणजेच वस्तु किंवा मालमत्तेवर अवलंबून असते त्याला आपण Derivative म्हणून शकतो. मार्केट च्या भाषेत मूळ स्त्रोताला आपण underlying asset असे म्हणतो.
उदाहरणातून समजविण्याचा प्रयत्न करतो,
जस कापड उद्योग हा कापसावर अवलंबून आहे, जर कापुस नसेल तर कापड उद्योगात मंदी येऊ शकते. इथे कापूस हा underlying asset आहे आणि कापडउद्योग हे Derivatives.
वरील Nifty आणि banknifty मध्ये कंपन्यांचा ग्रुप असतो. त्या companies जशी कामगिरी करतील तसा Nifty आणि banknifty च्या प्राइस मध्ये बदल होईल. Nifty आणि banknifty वर जणार की खाली कोसळणार हे सगळ त्या companies च्या ग्रुप वर अवलंबून असते.
1. CE
ऑप्शन ट्रेडिंग मध्ये CE ला call option अस म्हणतात. हा एक वित्तीय करार आहे ज्याचा वापर करून ट्रेडर्स स्टॉक एका विशिष्ट किंमतीच्या स्ट्राइक प्राइस वर खरेदी विक्री करू शकतात. जर शेअर मार्केट मध्ये ट्रेडर्स Banknifty, Nifty किंवा कुठलाही विशिष्ट शेअर वर ऑप्शन ट्रेडिंग करू शकतो, ज्यात ट्रेडर्स स्वतः त्या शेअर ची प्राइस ही वर जाणार की खाली घसरणार याच संशोधन आणि विश्लेषण करून PE खरेदी करायचा की विकायचा ते ठरवतो.
उदाहरणार्थ: TCS कंपनीचा स्टॉक हा आज ३३०० पार करणार अस वाटत असल्यास आपण TCS 3300 CE विकत घेऊन ठेऊ शकतो.
CE कधी खरेदी करावा?
जेव्हा तुम्हाला वाटते की त्या स्टॉक ची किंमत आता वर जाईल तेव्हा , जेणेकरून तुम्ही कमी किमतीत घेतलेला CE हा जास्त किमत झाल्यावर विकून नफा होईल.
CE कधी विकावा?
जेव्हा तुम्हाला वाटते की मार्केट आता घसरेल तेव्हा , जेणेकरून तुम्ही ज्या किमतीत घेतलेला CE हा किंमत कमी झाल्यामुळे नफा होईल. म्हणजे यात होते असे की, तुम्ही जास्त किंमत असताना स्टॉक विकत घेऊन ठेवतात आणि कमी किंमत झाल्यावर त्याला ट्रेडर्स तो पुनः वर जाईल या आशेने विकत घेतात तेव्हा आपण त्याला विकावा.
2. PE
ओप्शन ट्रेडिंग मध्ये pe ला put option अस म्हणतात. हा एक वित्तीय करार आहे ज्याचा वापर करून ट्रेडर्स स्टॉक एका विशिष्ट किंमतीच्या स्ट्राइक प्राइस वर खरेदी विक्री करू शकतो. जर शेअर मार्केट मध्ये ट्रेडर्स Banknifty, Nifty किंवा कुठलाही विशिष्ट शेअर वर ऑप्शन ट्रेडिंग करू शकतो, ज्यात ट्रेडर्स स्वतः त्या शेअर ची प्राइस ही वर जाणार की खाली घासरणार याचा संशोधन आणि विश्लेषण करून pe खरेदी करायचं की विकायचा ते ठरवतो.
जर शेअर ची price घसरणार हा अंदाज असेल तर traders put खरेदी करतात, म्हणजेच Bajaj 2000 असेल तर ते Bajaj 1900 खरेदी करतात. जेणेकरून price घसरली तर त्यांना नफा होईल.
या बाबतीमध्ये आपण सविस्तर माहिती नवीन लेखात जाणून घेऊया.
गुंतवणुकीची निवड | How to do profitable investment marathi
आपण शेअर मार्केट आणि शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठीच्या पायऱ्या बघितल्या म्हणजेच कश्या प्रकारे गुंतवणूक करायची आहे, Demat Account वैगेरे. आता सगळ्यात महत्वाच म्हणजे गुंतवणुकीची निवड. गुंतवणुकीचे विविध प्रकार आहेत. जसे की लोंग टर्म , शॉर्ट टर्म अँड मिड टर्म. या तिघंही प्रकारांमद्धे आपण Stock च्या योग्यतेनुसर आणि आपल्या Financial Goal नुसार गुंतवणूक करू शकतो.
आपण तीनही गोष्टी सविस्तर जाणून घेऊया.
Types of Investments strategies in marathi|गुंतवणुकीची धोरणे|long term, short term, mid term investment in marathi
A. दीर्घकालीन गुंतवणूक | Long Term Investments marathi :
या मध्ये आपण एखादा स्टॉक संपूर्ण विश्लेषण केल्यानंतर त्याची योग्यता, स्थिरता आधारे निवडून त्यामध्ये दीर्घकालीन गुंतवणूक म्हणजेच जास्त कालावधी साठी गुंतवणूक करतो. जेणेकरून त्यातून आपल्याला चांगला मोबदला किंवा नफा मिळेल. जितका स्टॉक घेऊन वर्ष निघत जातील तितकी स्टॉक ची किंमत ही वाढत जाईल. परंतु स्टॉक ची निवड चांगली असावी. दीर्घकालीन गुंतवणूकीमध्ये आपल्याला Compound Interest चा फायदा होतो म्हणजेच आपल्याला मिळत असलेल्या नफ्यावर सुद्धा आपल्याला काही टक्केवारी व्याज गणना होऊन आपल्या खात्यात जमा होतो.
यामध्ये आपण कुठल्याही गुंतवणुकी सोबत जाऊ शकतो, जसे की, Mutual Funds, Stocks, Bonds, etc.
आपल्याला हवे असलेले आर्थिक लक्ष्य साधण्यासाठी या गुंतवणुकीचा उपयोग केला जातो जसे की मुलांचे शिक्षण, लग्न इत्यादि. याचा कालावधी साधारण 15 वर्षे, 20 ते 30 वर्षापर्यंत असू शकतो.
B. मध्यावधी गुंतवणूक | Mid Term Investments marathi :
या गुंतवणुकीमध्ये आपण आपले लक्ष्य ठरवून त्याप्रकारे गुंतवणूक करून आपला आर्थिक लक्ष्य साध्य करू शकतो. जसे की sip, liquid mutual funds इत्यादि. या मध्ये आपण आपले लक्ष्य जसे की एखादी down payment, Mobile, Refrigerator विकत घेणे, एखादी Holiday Trip plan करणे इत्यादि करू शकतो. म्हणजेच 1 तो 5 वर्षात आपल्याला गुंतवणुकीवर आपल्याला काहीतरी नफा मिळेल आणि आपण ती रक्कम आपल्या ठराविक लक्ष्यावर वर खर्च करू शकू.
मध्यावधी गुंतवणूक साधारण 1 तो 5 वर्ष कालावधीची असते. ही गुंतवणूक ही दीर्घकालीन गुंतवणूकीच्या मानाने थोडी कमी कालावधीची असते. जर स्टॉक ची निवड चांगली असेल तर नक्कीच यामध्ये आपल्याला चांगले नफा हा कमवता येतो.
C. अल्पकालीन गुंतवणूक | Short Term Investments marathi :
अल्पकालीन गुंतवणूक ही सामन्यात काही दिवस, महीने किंवा काही वर्षासाठी आपल्याला करता येते. ज्यामधुन आपल्याला काहीसा नफा हा कमवता येतो. तसेच जर अल्पकालीन गुंतवणूक ही दैनंदिन shares ची खरेदी विक्री म्हणजेच ट्रेडिंग असेल तर आपण खूप नफा यातून मिळवू शकतो. यामध्ये आपल्या कडे मूलभूत शिक्षण आणि Skills असायला हवेत. अल्पकालीन गुंतवणूक ही सगळ्यात जास्त risk असलेली गुंतवणूक आहे. ज्यामध्ये आपण आपले संपूर्ण पैसे गमाऊ ही शकतो आणि त्याचप्रकारे खर्चाच्या १०० ते १००० पटीने जास्त कमवूही शकतो. वैशिष्ट म्हणजे तोटा तेव्हढाच होईल जेवढा आपण पैसे लावला आहे परंतु नफा हा अनलिमिटेड होऊ शकतो. ट्रेडिंग मध्ये बरेच प्रकार आहेत जसे की सगळ्यात जास्त नावाजलेल intraday trading आहे ज्यामध्ये आपण रोजच शेअर मार्केट या समुद्रातून आपल्याला हवे तितके पैसे कमवू शकतो, परंतु याला कौशल्य आणि अनुभवाची जोड हवी.
आपण वर बघितलेल्या गुंतवणुकीच्या प्रकारांमधून आपल्याला हव्या असलेल्या लक्ष्यानुसार निवड झालेली असल्यास आपण शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यास सज्ज होतो. आता सर्वप्रथम आपल्याला आपल्या Demat Account म्हणजेच Angel One, Grow किंवा Zerodha या Application मध्ये किंवा त्यांच्या संकेतस्थळावर खाते उघडून login करावे लागेल. त्या नंतर जो काही Stock, Mutual Fund निवडलेला असेल त्यास सर्च करून त्याची माहिती घ्यावी लागेल आणि Demat Account च्या उपलब्धेनुसार buy now वर क्लिक करून आपण विकत घेऊ शकतो. आपल्या Demat Account मध्ये पैसे भरण्यासाठी बँक अकाऊंट लिंक करण्यासची आवश्यकता असते.
गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला डेमट खाते उघडावे लागेल ही नक्की.
ब्रोकर किंवा सल्लागारकडून गुंतवणूक :
या गुंतवणुकीच्या प्रकारामध्ये तुम्हाला काहीही करावे लागत नाही. आपल्याला आपल्या सल्लागाराला गुंतवणुकी बाबतच सल्ला विचारायचा आणि त्याप्रमाणे गुंतवणूक करावी. ही गुंतवणूक सल्लागार स्वतः broker असल्यास करू शकतो.
स्टॉक कसा निवडावा|stock selection in Marathi
सगळ्यात प्रथम म्हणजे स्टॉक सुरक्षितता – आपले भांडवल पूर्णपणे सुरक्षित आहे याची खात्री करणे आणि एक broker निवूडून पुढे जाणे. व्याज कमावण्याच्या नादात जर आपण आपल मुद्दल भांडवल च गमावून बसलो तर कस होईल. त्यासाठीच आपले भांडवलाची सुरक्षितता ही आपली प्राथमिक गरज आहे.
संशोधन आणि विश्लेषण : गुंतवणूक करण्याआधी योग्य प्रकारे स्टॉक चे संशोधन आणि विश्लेषण करणे. इंडस्ट्री कुठली आहे, ट्रेंड काय आहे याची माहिती काढणे.
आपण जो कुठला स्टॉक खरेदी करणार आहोत त्याबद्दल आपल्याला खोलात जाऊन माहिती काढावी लागेल. त्यासाठी बऱ्याच प्रकारच्या संकेतस्थळांना तुम्ही भेट देऊ शकतात आणि आपली गुंतवणूक करू शकतात. आपण स्टॉक चे संपूर्ण विश्लेषण, त्याने मागिल 6 महिन्यात, वर्षात म्हणजेच त्याच्या भूतकाळात कशी कामगीरी केलीये, त्याचा आलेख कसा आहे , हे तपासून बघू शकतो. चांगल्या दर्जाच्या माहितीचा आधार घेऊन आपण एक उच्च परतावा मिळवणारा स्टॉक निवडू शकतो.
त्यासाठी आपण moneycontrol, finology, tradingview , investing, nse india , bse india , economic times या संकेतस्थळांना भेट देऊ शकता.
व्याज : आपण जो कोणता stock निवडला असेल त्यावर योग्य तितका परतावा, व्याज आपल्याला मिळतंय का आणि मिळेल तर किती मिळेल? याचा एक अंदाज घेणे.
Liquidity : आपण गुंतवणूक केलेल्या रककमेमधून आपल्याला काही रक्कम गरजेनुसार काढत येईल का? किंवा संपूर्ण रक्कम आपल्याला काढत येईल का? या साठी आपल्याला लॉक इन पीरियड चेक करण्याची गरज असते.
हालचालींवर निरीक्षण करणे | Chart reading in marathi | गुंतवणूक केल्यानंतर काय करावे?
स्टॉक च्या किंवा आपण करत असलेल्या किंवा केलेल्या गुंतवणुकीवर आणि हालचालींवर लक्ष ठेवणे हा चांगल्या गुंतवणूकदाराचा प्रमुख मार्ग आहे. जेव्हा आपल्या स्टॉक निवडायचा आहे तेव्हा ही आपण हालचालींवर लक्ष ठेऊ शकतो आणि गुंतवणूक केल्यानंतर ही आपण लक्ष ठेऊ शकतो. ज्यामुळे जर काही धोके असतील ते कमी होतील आणि तोटा कमी होईल. तसेच हालचालींवर लक्ष ठेऊन असल्यामुळे आपल्याला आपण किती नफा कमावतोय , आपला स्टॉक कसं कामगिरी करतोय, हे वेळो वेळी आपल्याला कळेल.
गुंतवणूकदाराची मानसिकता, संयम आणि भावना | Mindset, Patience and emotions in trading marathi
शेवटच म्हणजे patience, म्हणजेच संयम – जर आपल्याकडे संयम नसेल तर वरील सगळ्या गोष्टी अपूर्ण आहेत.
संयम आणि दररोज काहीतरी शिकणे हेच आपल्याला स्टॉक मार्केट मध्ये एक गुंतवणूकदार म्हणून खास बनविते. इथे मानसिकतेला खूप महत्व आहे. जर आपली मानसिकता ही योग्य प्रकारे आपण हाताळू तितक आपल्याला स्टॉक मार्केट सोप जाईल. मानसिकता आणि भावना यांना स्टॉक मार्केट किंवा ट्रेडिंग करण्यामध्ये अणण्यसाधारण महत्व आहे.
Conclusion :
अशाप्रकारे मित्रांनो मी तुम्हाला शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक कशी करावी? म्हणजेच share market madhye guntavnuk kashi karavi याबद्दल महिती दिलेली आहे. आशा करतो तुम्हाला असलेल्या प्रश्नांची उत्तरे मी या लेखामध्ये दिली आहेत. लवकरच आपण नवीन लेखामध्ये शेअर मार्केट बद्दल संक्षिप्त स्वरूपात जाऊन घेऊया.
FAQ
मी Groww मध्ये शेअर्स कसे खरेदी करू?
यासाठी तुम्हाला Groww या android application मध्ये खाते उघडावे लागेल आणि बँक खाते जोडावे लागेल. जय शेअर ला आपल्याला विकत घयचा आहे त्याचा तपशील बघून आपण त्याला buy करू शकतो.
बाजार उघडण्यापूर्वी मी शेअर्स कसे खरेदी करू शकतो?
मार्केट सुरू होण्याआधी ८ ते १० मिनिटे ऑर्डर्स स्वीकारल्या जातात. म्हणजेच ९:०१ ते ९:०८ मिनिटे या दरम्यान तुम्ही शेअर ची खरेदी करू शकतात. या दरम्यान च्या ऑर्डर्स रीजेक्ट होण्याचा चान्स अधिक असतो.
मी शेअर मार्केटमध्ये 500 रुपये गुंतवू शकतो का?
होय, तुम्ही शेअर मार्केट मध्ये अगदी १ rs सुद्धा गुंतवू शकतात. परंतु तुम्हाला तसा स्टॉक शोधावा लागेल. स्टॉक एक्स्चेंज वर तुम्ही १ रुपायापासून ते १ लाख रुपये आणि त्याहूनही जास्त रकमेचा व्यवहार करू शकता.
मी शेअर मार्केटमध्ये 20 रुपये गुंतवू शकतो का?
होय, तुम्हाला त्या किमतीचा स्टॉक शोधावा लागेल.
मी 1000 रुपयांनी स्टॉक ट्रेडिंग सुरू करू शकतो का?
होय, स्टॉक एक्स्चेंज वर तुम्ही १ रुपायापासून ते १ लाख रुपये आणि त्याहूनही जास्त रकमेचा व्यवहार करू शकता.
इंट्राडे ट्रेडिंग फायदेशीर आहे का?
होय, परंतु intraday हे अतंत्य धोकादायक प्रकारात येते. यामध्ये ट्रेडिंग करण्यासाठी तुम्हाला आवश्यक कौशल्य आणि अनुभव गरजेचं आहे. यामध्ये जर तुम्ही सिद्ध असलेले धोरण वापरले तर नक्कीच ही खूप फायदेशीर आहे.
मी इंट्राडे साठी F&O स्टॉक कसे निवडू?
यासाठी तुम्हाला स्टॉक विश्लेषण करायची गरज असते. त्यात स्टॉक च्या जुन्या माहितीच्या आधारे, आलेख, liquidity आणि ट्रेंड च्या आधारे चांगला स्टॉक निवडू शकतो.
इंट्राडे ट्रेडिंगसाठी तुम्ही मार्केट डेप्थ कसा वापरता? तुम्ही स्टॉक डेप्थ कसे वाचता?
तुम्ही निवडलेल्या स्टॉक वर काही उपलब्ध असलेल्या applications आणि tools च्या मदतीने खोलात जाऊन संशोधन करू शकता. त्यासाठी आपण moneycontrol, finology, tradingview , investing, nse india , bse india , economic times या संकेतस्थळांना भेट देऊ शकता.
शेअर मार्केटमध्ये LTP म्हणजे काय?
शेअर मार्केट मध्ये LTP ही शेअर ची शेवटची किंमत आहे म्हणजेच Last Trade Price.
अपस्टॉक्समध्ये मार्केट डेप्थ काय आहे?
जसे बाकीच्या applications मध्ये स्टॉक research साठी लागणाऱ्या गोष्टी असतात तसेच upstocks मध्ये ही सेवा देण्यात आलेल्या आहेत
आपण कधीही स्टॉक खरेदी करू शकता?
नाही, मार्केट सुरू असेल तेव्हाच आपण स्टॉक खरेदी आणि विक्री करू शकतो.
इंट्राडे ट्रेडिंगसाठी किती भांडवल आवश्यक आहे?
कमीत कमी किमतीमद्धे आपण सुरू करू शकता. जर स्टॉक ची किंमत १ रुपया असेल आणि तुम्हाला १ लॉट ७५ shares चा घ्यायचा असेल तर ७५ रुपयातही तुम्ही intraday ट्रेडिंग सुरू करू शकता.
स्टॉकमध्ये किती पैसे गुंतवावेत?
तुम्हाला पाहिजे तितके पैसे तुम्ही गुंतवू शकतात. पण, जर तुम्ही नौकरी करणारे असाल तर आपल्या घाम गाळलेल्या पैश्यांमधून ५ ते १० % च तुम्ही स्टॉक मध्ये गुंतवावे. जारी जास्त पैसे गुंतवायचे असल्यास सल्लागारांचा सल्ला नक्की घ्यावा.
मी शेअर मार्केटमधून किती पैसे कमवू शकतो?
अनलिमिटेड, तुम्ही शेअर मार्केट मध्ये कितीही कमवू शकता.
स्टॉक विकण्यासाठी दिवसातील कोणती वेळ सर्वोत्तम आहे?
या बद्दल प्रत्येकाचा दृष्टिकोण हा वेगळा असू शकतो.
तुम्ही ITR मध्ये इंट्राडे नफा कसा दाखवाल?
इन्कम टॅक्स स्लॅब नुसार आपल्या नफ्यावर टॅक्स लागू होतो.
तुम्ही शेअर्समध्ये गुंतवणूक कशी सुरू करता?
याबद्दल ची सर्व माहिती ही वरील लेखामध्ये दिलेली आहे.