नमस्कार मित्रांनो
मराठी डिलाइट मध्ये फायनान्स या आर्थिक साक्षर बनविणाऱ्या प्रसिद्ध संकेतस्थळाच्या विभागामध्ये आणखी एका नवीन लेखामध्ये आपल स्वागत आहे. आज आपण या लेखामध्ये बघूया की शेअर मार्केट म्हणजे काय? आणि ते कसे कार्य करते?
शेअर मार्केट मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत ज्याच ज्ञान आवश्यक आहे, जेणेकरून आपण एक यशस्वी गुंतवणूकदार आणि ट्रेडर होऊ शकतो. आपल्या मराठी बांधवांना share market information in marathi बद्दलची माहिती मुद्देसुदपणे मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न मी या लेखामध्ये केला आहे.
अनुक्रमाणिका
- 1 शेअर मार्केट म्हणजे काय ? | Share market information in Marathi
- 2 IPO इन शेअर मार्केट | IPO म्हणजे काय?
- 3 प्रायमरी मार्केट म्हणजे काय? | What is Primary Market
- 4 सेकंडरी मार्केट | Secondary Market in Marathi
- 5 Importance of Share Market in Marathi | शेअर मार्केट चे महत्व
- 6 शेअर मार्केटचे फायदे | Advantage of Share Market in Marathi
- 7 BSE आणि NSE in Marathi | BSE आणि NSE काय आहे?
- 8 निफ्टि म्हणजे काय | Nifty Information in Marathi | Nifty mhanje kay
- 9 बँक निफ्टि म्हणजे काय | Bank Nifty Information in Marathi | BankNifty mhanje kay
- 10 ब्रोकर | Demat Account
- 11 ट्रेडिंग अकाऊंट | Trading Account
- 12 शेअर मार्केट मधील बुल आणि बियर | Bull and bear in share market Marathi
- 13 शेअर मार्केट टाइमिंग इन मराठी | share market timing in Marathi
- 14 Types of Trading in marathi | ट्रेडिंग चे प्रकार |
- 15 Orders types in share market in Marathi | शेअर मार्केटमधील ऑर्डरचे प्रकार
- 16 निष्कर्ष | Conclusion
- 17 FAQ
शेअर मार्केट हे एक भलेमोठे Financial Market आहे जिथे Shares ची देवाणघेवाण म्हणजेच खरेदी विक्री होत असते. जर तुम्ही हर्षद मेहता यांवर आधारित असलेली Scam १९९२ जर बघितली असेल तर तुम्हाला कळेल की आधी शेअर मार्केट मधील देवाण घेवाण ही तोंडी असायची, १००० जन तिथे शेअरच नाव ओरडायचे, त्याचा Open-Close जोरात ओरडायचे. मग आपल्या सारखे सामान्य ट्रेडर्स हे त्यांना आपली गुंतवणूक किंवा ट्रेड सांगून पैसे द्यायचे आणि त्या मोबदल्यात त्यांना एक कागद पुरावा म्हणून मिळायचा.
परंतु आता शेअर मार्केट चे संपूर्ण स्वरूप बदलले आहे. आता नवनवीन शेअर मार्केट चे दलाल आपल्याला ट्रेडिंग करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतात जसे की Angel One , Zerodha. त्यामधून आपण shares ची खरेदी विक्री करतो, आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे यात आपण ट्रेडिंग करताना विक्री किंवा खरेदी करणाऱ्याला ओळखतही नाही.
आपण बघतो, शेअर मार्केट मध्ये मोठ मोठ्या कंपन्या आहेत. मोठे मोठे नाव आहेत, एक सामान्य माणूस सहजच त्यांचा share ही घेऊ शकत नाही. शेअर घ्यायचा असेल तर आपल्याला आपली आर्थिक प्लॅनिंग करावीच लागते. परंतु आधी गोष्ट खूप वेगळी होती. सुरुवातीला या कंपन्या खूप लहान असतात, जसे जसे त्यांची प्रगती होते आणि त्यांना मोठ्या जागेची किंवा तिचे जाळे आणखी काही ठिकाणी पसरविण्याची गरज भासते. तेव्हा ते शेअर मार्केट मध्ये एक स्वप्न बघून येतात आणि अर्थशास्त्रात पारंगत तज्ञांच मार्गदर्शन घेऊन बाजारात आपला शेअर आणतात, त्याला IPO असे म्हणतात.
शेअर मार्केट मध्ये सामील झाल्यानंतर आपल्या सारख्या सामान्य माणसांना शेअर विकत घेत येतो. त्या शेअर च्या एकत्रिक पैश्यांमुळे कंपनीच्या भांडवलाला हात भर लागतो आणि ती कंपनी जितकी पुढे जाईल तितका गुंतवणूकदारालाही फायदा होत जातो. आपण पुढील भागात IPO सविस्तर जाणून घेऊया.
IPO इन शेअर मार्केट | IPO म्हणजे काय?
आपण वरील भागामध्ये बघितल्या प्रमाणे जेव्हा कंपनीला आपला स्तर मोठा करायचं असतो, सोप्या भाषेत सांगायच झाल तर तिला तिची स्केल वाढवायची असते, तिचा व्यवसाय हा चांगला असेल, तिच्याकडे कस्टमर किंवा उत्पादन मोठ्या प्रमाणावर असेल तर नक्कीच तिला आणखी जागा आणि नोकरदार वर्गाची गरज भासते. कंपनी आपले ब्रांचेस वाढविण्याचा प्रयत्न करते जेणेकरून ती आणखी यशस्वी होईल.
यासाठी कंपन्यांना खूप मोठ्या प्रमाणात भांडवलाची गरज भासते, आणि हीच गरज त्यांना शेअर मार्केट पूर्ण करून देते, ते कसे?
या लहान कंपन्या व्यावसायिक गुंतवणूक प्रधान करणाऱ्या कंपन्यांकडे जाऊन किंवा ही सोय असलेल्या एखाद्या बँकेकडे जाऊन आपला IPO शेअर मार्केट मध्ये आणतात. IPO चा अर्थ Initial Public Offering असा होतो म्हणजेच सगळ्यात सुरुवातीचा शेअर जो सामान्य व्यक्तींना घेता येऊ शकेल.
आपण उदाहरणातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया,
XYZ कंपनी एक investment बँकेकडून आपला IPO प्रस्ताव अर्ज करते. Investment bank कामाची सगळी माहिती, कामगारांची संख्या, कंपनीचे सगळे assets जसे की माल, उपकरणे, खुर्च्या, जागा, उत्पादन , इत्यादि वर आधारित विश्लेषण करून त्या सगळ्या assets चे एक मूल्य ठरवते. त्या assets value नुसार कंपनीचे shares मध्ये विभाजन होते आणि एक एक शेअर ची किंमत ठरवली जाते.
कंपनी ४० ते ६० % shares हे आपल्याकडे म्हणजेच आपल्या बॉडी किंवा बोर्डकडे सुरक्षित ठेवते आणि ४० ते ६० % किंवा उर्वरित shares ही मार्केट मध्ये आणते. इथून पुढे आता कंपनीच्या कामावर आणि प्रगती वर त्या shares ची price ही अवलंबून असते. जशी कंपनी कामगिरी कारेल तशी शेअर ची किंमत ही रोजच्या रोजच बदलत जाणार, म्हणजेच खाली वर होणार. गुंतवणूकदारांचे पैसे शेअर वर लागलेले असतात आणि त्यातूनच त्यांना नफा किंवा तोटा हा होत असतो.
प्रायमरी मार्केट म्हणजे काय? | What is Primary Market
जेव्हा एखादी नवीन कंपनी शेअर मार्केट मध्ये येते किंवा जिचा IPO तयार होतो, त्याला प्रायमरी मार्केट मार्केट म्हणतात. म्हणजे एखादी कंपनीचे नवीन shares सामान्य व्यक्तींना खरेदी विक्री साठी खुले होतात म्हणजेच इश्यू केले जातात. हे सगळ प्रायमरी मार्केट मध्ये होत असत. पूर्ण माहिती आपण वर बघितली आहे की कशाप्रकारे IPO तयार होतो, कश्याप्रकारे कंपनीचे मूल्य ठरवल्या जाते.
आणखी सोप्या भाषेत सांगायच झाल तर असा प्राथमिक बाजार जिथे नवीन साधने जसे की स्टॉक्स, बोंडस कंपन्यांद्वारे IPO च्या माध्यमातून खरेदी विक्री साठी जारी केले जातात.
सेकंडरी मार्केट | Secondary Market in Marathi
आता प्रायमरी मार्केट मध्ये जसे नवीन IPO येतात आणि ट्रेडर्स ते विकत घेतात तसेच सेकंडरी मार्केट मध्ये आधीच विकले गेलेले सेक्यूरिटीज म्हणजेच स्टॉक्स, बोंडस हे ट्रेडर्स दुसऱ्या ट्रेडर्सना विकतात.
आणखी सोप्या भाषेत उदाहरणासहित बघूया,
इथे होत काय, जे आधीच उपलब्ध असलेले स्टॉक्स आहेत ते investors मध्ये ट्रेड केले जातात म्हणजेच खरेदी विक्री केले जातात. समजा संजय ने एक कंपनी चा IPO आल्यानंतर पटकन तिचे स्टॉक्स विकत घेऊन ठेवलेत आणि आता त्यांची प्राइस ही त्याच्या अपेक्षेनुसार झाली आहे. आता संजयला नफा कधी होणार जेव्हा तो ते स्टॉक्स दुसऱ्या एखाद्या ट्रेडर ला विक्री करेल, बरोबर?
आता संजय ने ते स्टॉक्स विकले आणि एका ट्रेडर ने ते विकत घेतले. ही सगळ काही ज्या मार्केट मध्ये होत त्याला सेकंडरी मार्केट अस म्हणतात.
शेअर मार्केट मध्ये गुंतवणुकीचे अनेक फायदे आहेत. ऐकलंच असेल ना “शेअर मार्केट ऐक ऐसा कुवा ही जो सारे देश की प्यास बुझा सकता है” खर तर शेअर मार्केट ला तळे म्हणणे पण चुकीचे आहे. शेअर मार्केट हा समुद्र आहे जो पूर्ण जगाची तहान भागवू शकतो. सगळ्यात महत्वाच म्हणजे तुम्हाला कोणतीही बँक किंवा कंपनी कमी कालावधीत जास्त व्याज देऊ शकणार नाही जेव्हढे आपण शेअर मार्केट च्या माध्यमातून कमवू शकतो. मग तुम्ही FD करा किंवा saving account सुरू कर. शेअर मार्केट शी कसली बरोबरी होऊ शकत नाही . जर योग्य पद्धतीने नियोजन आणि शेअर मार्केट च ज्ञान आत्मसात केले तर नक्कीच तुम्ही एक यशस्वी ट्रेडर बनू शकता. शेअर मार्केट मध्ये जर आपण पैसे गुंतवले तर आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टींचा फायदा होईल ते आपण पुढील भागांमध्ये बघूया.
अ. आर्थिक उन्नती आणि संपत्ति
गुंतवलेल्या पैश्यांवर व्याजाच्या स्वरूपपाणे आपले पैसे , भांडवल हे वाढत जाणार. आपण आपले स्टॉक्स , बोंडस कधीही विकून पैसे काढून घेऊ शकतो. आपण भविष्यात नक्कीच आर्थिक समृद्ध होऊ शकतो. वर्षानुवर्षे आपण संपत्ति समृद्ध आणि आर्थिक रित्या बळकट होत जातो. आपण गुंतवणूक माध्यमातून आपला एक संपत्ति स्त्रोत हा आपण आपल्याकडे ठेवलेला असतो. इथे केलेली गुंतवणूक ही तुमची पैश्यांची बचत आहे असेही आपण म्हणू शकतो.
ब. तरलता आणि गुंतवणुकीच्या संधि
एका गुंतवणुकीबरोबरच आपल्याला अनेक गुंतवणुकीच्या संधि सुद्धा उपलब्ध होतात. जेणेकरून आपण आपले भविष्य आधीच सुरक्षित करू शकतो. आपण केलेली गुंतवणूक जेव्हा आपल्याला नफ्यामद्धे नेईल तेव्हा आपण कधीही कुठल्याही क्षणी विकून आपले व्याजसकट पैसे मिळवू शकतो. जेव्हा कधी आपल्याला पैश्यांची अतंत्य आवश्यकता आहे , जसे की काही अघटित घटना, काही मोठी खरेदी वैगेरे साठी लागणार पैसा आपल्याला लगेच काढत येतो.
क. सुरक्षितता आणि पारदर्शकता
जसे की आपल्याला माहीतच आहे, शेअर मार्केट ही लीगल आणि रुल्स अँड रेग्युलेटरी बॉडी च्या माध्यमातून वर्षानुवर्षे काम करत आहे. हे मार्केट कुठल्याही प्रकारच्या frauds कंपन्यांसारख नाहीये की जे तुमचे पैसे घेऊन पळून जाईल , किंवा मध्येच बंद होईल. इथे सुरक्षितता ही तेव्हढीच आहे. महत्वाच म्हणजे शेअर मार्केट ही पूर्णपणे पारदर्शक आहे, ते कसे?
गुंतवणूक दाराला आपल्या एक एक transactions बद्दल माहीती असते, तो खरेदी विक्री केलेल्या shares ची माहिती एका क्लिक वर रिपोर्टस च्या माध्यमातून काढू शकतो. वेळ, तारिख , कुठला शेअर, कधी, कसं ही सगळी माहिती आपल्याला यात मिळू शकते.
ड. विश्लेषण आणि नियंत्रण
आपण कधीही गुंतवणूक केलेल्या स्टॉक ची माहिती बघू शकतो. त्याचे संपूर्ण टेक्निकल माहिती, फंडामेंटल माहिती, त्याचा दिवसाचा , महिन्याचा हाय लो प्राइस, तसेच विविध चार्टस च्या माध्यमातून आपण माहिती बघू शकतो आणि आपले विश्लेषण आणि हालचालींवर नजर ठेऊ शकतो.
BSE आणि NSE in Marathi | BSE आणि NSE काय आहे?
BSE आणि NSE हे भारतातील प्रमुख स्टॉक exchanges आहेत. भारतीय शेअर बाजारात ही खूप महत्वाच कार्य करतात. BSE आणि NSE शिवाय भारतीय शेअर बाजार हा अपूर्ण आहे अस म्हटल तरी चालेल. आपण संक्षिप्त रूपात बघूया NSE आणि BSE नक्की आहे तरी काय. BSE आणि NSE ही दोघी SEBI registered असून, दोघांचेही trades ही अत्यंत पारदर्शन आणि लवचिक असतात.
SEBI हा सेक्युर्टी एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया आहे , ही एक कार्यकारिणी विभाग आहे जे NSE आणि BSE सारख्या सेंसेक्स इंडेक्स ला तपासते आणि चालना देते.
BSE in marathi | BSE म्हणजे काय ? | bombay stock exchange information in marathi
BSE म्हणजे काय? हा प्रश्न शेअर मार्केट मध्ये नवीन असलेल्या प्रत्येकाला पडतो. त्यासाठीच आपण या लेखामध्ये त्याची सुद्धा माहिती मिळवणार आहोत.
BSE ला बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज असे म्हटले जाते. BSE मध्ये भारतातल्या प्रमुख सर्वात चांगली कामगिरी करणाऱ्या कंपन्यांचा समावेश असतो. BSE हे १८७५ साली सुरू झाले असून हे भारतातील सगळ्यात जुन्या स्टॉक एक्स्चेंज पैकी एक आहे. BSE चे कार्यालय हे मुंबई ला असून याला BSE सेंसेक्स किंवा फक्त सेंसेक्स असंही म्हणतात.
BSE च्या माध्यमातून आपण equity , बोंडस, म्यूचुअल फंड्ज आणि options आणि derivatives आणि आणखी काही आर्थिक साधानांमद्धे गुंतवणूक आणि व्यापार करू शकतो.
आणखी माहितीसाठी आपण व्यवसायिक संकेतस्थळाला भेट देऊ शकता BSE INDIA
NSE in marathi | NSE म्हणजे काय ? | National stock exchange information in marathi
NSE ला नॅशनल स्टॉक एक्स्चेंज म्हणतात जे की १९९२ साली भारतात कार्यरत झाले. NSE हे भारतातील सगळ्यात जास्त व्यापार होणाऱ्या स्टॉक एक्स्चेंज पैकी एक आहे. इथे सगळ्यात जास्त ट्रेड घेतले जातात.
NSE मध्ये प्रामुख्याने निफ्टि ५० ची ट्रेडिंग केली जाते जो की भारतातल्या टॉप ५० कंपन्यांच्या कामगिरीवर, चढाव-उतारावर अवलंबून असतो. NSE व्यापाऱ्याला Equity , बोंडस, आणि options आणि derivatives , ETF आणि आणखी काही आर्थिक साधानांमद्धे व्यापार करायला मदत करते.
आणखी माहितीसाठी आपण व्यवसायिक संकेतस्थळाला भेट देऊ शकता NSE India.
निफ्टि म्हणजे काय | Nifty Information in Marathi | Nifty mhanje kay
निफ्टि हे National Stock Exchange मधले एक निर्देशांक असून याला निफ्टि ५० किंवा निफ्टि निर्देशांक असेही म्हटले जाते. जस नावातच ५० आहे तसंच यात सगळ्यात चांगली कामगिरी करणाऱ्या टॉप ५० कंपन्यांचा समावेश असतो. या ५० कंपन्या त्यांच्या कामगिरी नुसार बदलत असतात.
उदाहरणार्थ, टॉप ५० कंपन्यांमध्ये बजाज नाहीये पण मागील एक महिन्यात बजाज ने चांगली कामगिरी केली आणि ती आता एक कंपनीला ५० व्या स्थानावरून काढून तिची जागा घेईल. म्हणजेच बजाज इन अँड अदर आउट. म्हणजेच Nifty मधील 50 कंपमान्यांची इंडेक्स ही स्थिर नाहीये, ही बदलत असते. आपण निफ्टि मध्ये ही गुंतवणूक करू शकतो. तुम्ही ब्रोकर च्या demat account वर जाऊनही कुठल्या ५० कंपन्या आहेत ते तपासू शकता. निफ्टि मध्ये डायरेक्ट इंडेक्स वर पण ट्रेड करू शकता आणि options आणि derivatives वर पण ट्रेड करू शकता.
बँक निफ्टि म्हणजे काय | Bank Nifty Information in Marathi | BankNifty mhanje kay
BankNifty mhanje kay हा सुद्धा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. हे सुद्धा निफ्टि ५० प्रमाणे एक निर्देशांक आहे, फरक फक्त इतकंच आहे की निफ्टि मध्ये टोटल कंपन्या येतात बँक निफ्टि मध्ये टॉप banks येतात. जस नाव आहे तस banknifty च काम आहे, हे टॉप banks च्या कामगिरी नुसार banknifty ची प्राइस ही ठरत असते, म्हणजेच banks चांगली कामगिरी करत असतील तर प्राइस मध्ये वाढ होते नाहीतर घसरण.
ब्रोकर | Demat Account
गुंतवणूक करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ब्रोकर किंवा demat account. शेअर मार्केट चे जाळे डिजिटल पसरल्यानंतर आणि प्रत्येकाच्या हातात मोबाइल आल्यानंतर शेअर मार्केट मध्ये बरेच बदल झाले, त्या बादलाचाच एक भाग म्हणजे डीमॅट अकाऊंट.
गुंतवणूकदाराला गुंतवणूक करण्यासाठी याची गरज भासते. डीमॅट अकाऊंट च्या माध्यमातून गुंतवणूकदार गुंतवणूक करू शकतो.
ब्रोकर म्हणजे आपल्याला आपल्या हक्काच स्टॉक खरेदी विक्री करण्यासाठीच व्यासपीठ होय. यांचे वेगवेगळे charges असतात, त्यांच्या रुल्स नुसार हे बदलू पण शकतात, हा हक्क त्यांच्याकडे आहे. जसे की एकाद्या मोठ्या व्यवहाराला २० रुपये पर ट्रेड असंही लागू शकतात आणि याच माध्यमातून ते आपला नफा मिळवतात.
ट्रेडिंग अकाऊंट | Trading Account
Demat account सुरू केल्यानंतर ग्राहकाला म्हणजेच गुंतवणूक दाराला ट्रेडिंग account मिळते ज्याचा वापर करूनच तो व्यवहार करू शकतो. Demat account ही shares ची सुरक्षितता प्रधान करते तर ट्रेडिंग अकाऊंट वापरुन आपण आपले गुंतवणुकीचे व्यवहार करू शकतो.
मार्केट मधील हालचाल होण्यासाठी दोनही बेअर आणि बुल हे महत्वाची भूमिका बजावतात. share market information in marathi मध्ये पुढे सविस्तर बघूया.
शेअर बाजारात सातत्याने वाढ करणे म्हणजेच शेअर बाजाराला वरच्या दिशेने घेऊन जाणे हे बुल चे काम असतात. बुल म्हणजे असे मोठ मोठे गुंतवणूकदार ज्यांच्या गुंतवणुकीमुळे आणि खरेदी विक्री मुले बाजाराची दिशाच बदले अर्थात वर जाते त्यांना शेअर मार्केट मधीळ बुल असे म्हणतात. म्हणजेच ज्यांना मार्केट वर गेल्यानंतर नफा होतो आणि मार्केट ला वर जाण्याला पण ज्यांचा हात असतो ते बुल.
तुम्ही ऐकलंच असेल राकेश झुणझुणवाला, त्यांना मार्केट चा बुल म्हणायचे. त्यांनी आपल्या ५००० रुपयांच्या भांडवलामधून ३२ हजार करोंड रुपये एवढ मोठ साम्राज्य निर्माण केल होत.
जस बुल हा मार्केट ला वर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातून नफा कमविण्याचा प्रयत्न करतो. तसेच बेअर हा मार्केट ला खाली पडून त्याच्या टाळूवरच लोणी खाण्याचा प्रयत्न करतो. आता तुम्हाला प्रश्न पडेल की जर मार्केट खाली जाते तर यात हा नफा कसं कामावणार. share market information in marathi मध्ये पुढे शेअर मार्केटच्या वेळेबद्दल बोलूया.
तर होत काय, बेअर ही मार्केटचे विश्लेषण करून आधीच जास्त किमतीमद्धे shares विकून ठेवतात आणि त्यांना माहीत असत की मार्केट किंवा या स्टॉक ची प्राइस ही खाली घसरणार. जेव्हा त्यांच्या अपेक्षेणूसार स्टॉक ची प्राइस कमी होते तेव्हा हे शेअर सोडतात आणि नफा कमावतात.
शेअर मार्केट मध्ये ट्रेडिंग करण्याचा वेळ हा नियमावली नुसार ठरवलं गेला आहे. गुंतवणूकदर आणि स्टॉक्स चे व्यापारी दिवसा ९:१५ वाजेपासून ते दुपारी ३:३० वाजेपर्यंतच ट्रेड करू शकतात. आणि हा कालावधी फक्त सोमवार ते शुक्रवार असतो. म्हणजेच सोमवार ते शुक्रवार दिवसा ९:१५ वाजेपासून ते दुपारी ३:३०. सकाळी ९:१५ वाजता मार्केट ही सुरू होते आणि दुपारी ३:३० वाजता पूर्णपणे बंद होते. लक्षात घेण्यासारख म्हणजे तुम्ही या वेळेअतिरिक्त स्टॉक चा कामगिरी तपासू शकता फक्त खरेदी विक्री करू शकता नाही.
Types of Trading in marathi | ट्रेडिंग चे प्रकार |
स्टॉक मार्केट मध्ये ट्रेडिंग करण्याचे बरेच प्रकार आहेत. गुंतावणूक दर किंवा स्टॉक चा व्यापारी वेग वेगळ्या पद्धतीने त्याला सोयीस्कर असेल अशी ट्रेडिंग करत असतो. आता आपण बघूया की trading चे कोणकोणते प्रकार आहेत आणि ते कसे करावे. यात इंटराडे आणि डिलीवरी हे प्रॉडक्ट टाइप्स आहेत. share market information in marathi च्या माध्यमातून सर्व ट्रेडिंग चे प्रकार बघूया.
अ. Intraday trading in marathi | Day trading in शेअर market
इंटराडे ट्रेडिंग मध्ये व्यापऱ्यांना जो ट्रेड म्हणजेच स्टॉक घेतलेला असेल तो त्याच दिवशी विकाव लागतो. सोप्या भाषेत इंटराडे ट्रेडिंग म्हणजे स्टॉक चा एकाच दिवसात केलेला व्यवहार म्हणजेच खरेदी आणि विक्री होय.
व्यापारी स्टॉक विकत घेतो आणि दिवसाच मार्केट बंद होण्याआधी तो विकतो. या प्रकारामध्ये गुंतवणूकदर हा कौशल्यापूर्ण असावा लागतो. त्याचा अभ्यास , स्टॉक चे विश्लेषण झालेले असते. कमी कालावधीत जास्तीत जास्त नफा कमावणे हाच उद्देश त्यांचा असतो.
मार्केट दिवसा ९:१५ वाजेपासून ते दुपारी ३:३० पर्यन्त असते या वेळेत स्टॉक विकत घेऊन ते पुनः विकणे या वेळेतच करावे लागते.
ब. स्विंग ट्रेडिंग | Swing trading in Marathi
इंटराडे ट्रेडिंग या भागात बघितले की, ट्रेड चा व्यवहार त्याच दिवशी पूर्ण करावा लागतो तसंच swing trading मध्ये केलेल्या व्यवहार हा काही दिवसांसाठी म्हणजेच एकापेक्षा जास्त दिवस ते एक आठवडयापर्यंत करता येतो. एखादी स्टॉक हा २ दिवसासाठी किंवा १ आठवड्या साठी आपल्याकडे विकत घेऊन ठेवने swing trading प्रकारात येत जेणेकरून आपण काही दिवसांनी त्याला विकून नफा कमवू शकतो.
क. Delivery Trading किंवा Positional Trading
या ट्रेडिंग प्रकारात स्टॉक्स व्यापारी काही महिन्यापर्यन्त किंवा त्यापेक्षाही जास्त काळ स्टॉक जपून ठेवतात आणि चांगल्या वेळेला स्टॉक विकून त्यातून नफा कमावतात.
ड. फंडामेंटल ऑर टेक्निकल ट्रेडिंग
या प्रकारात व्यापारी आपल्या स्टॉक च्या विश्लेषणानुसार स्टॉक जपून ठेवतो आणि वेळ आल्यावर विकून टाकतात. यात ते टेक्निकल आणि फंडामेंटल विश्लेषण करतात, यात स्टॉक्स चा आलेख कसा आहे, fundamental analysis, Technical Analysis तसेच त्याची मागील कामगिरी कशी आहे, याचा विचार करतात.
ई. Scalping
या प्रकारामध्ये व्यापारी स्टॉक विकत घेऊन त्याचा आलेख आपल्या लॅपटॉप वर किंवा मोबाइल वर सुरू ठेऊन बसलेला असतो, आणि जस स्टॉक वर खाली होतो तसा तो ट्रेड विकतो किंवा घेतो. यात कालावधी हा सेकंदांपासून ते काही मिनिटे तास एवढंच असतो. स्टॉक हा आलेखावर कॅन्डल च्या रूपात वर खाली होत असतो. समजा स्टॉक विकत घेतला आणि दुसरी कॅन्डल मध्ये तो वर गेला की लगेच scalper हा तो स्टॉक विकून टाकतो आणि नफा कमावतो.
परंतु scalping हा प्रकार एक नवीन गुंतवणूकदारासाठी खूप धोक्याचा ठरू शकतो.
ऊ. Foreign Exchange Trading
या ट्रेडिंग प्रकारात आपण currency ani Commodity मध्ये ट्रेडिंग करू शकतो. Foreign Exchange मध्ये रुपया – डॉलर सारख्या currency यांच्या किमतीच्या फरकावर ट्रेडिंग होत असते.
उदाहरणार्थ, जर अमित ने USDINR मध्ये ट्रेड घेतला असेल तर, डॉलर ची प्राइस जशी वर जाईल तसा त्याला तोटा होऊ शकतो. जसा आपला रुपया डॉलर च्या तुलनेत थोडा भक्कम झाला तसा अमित ला फायदा होईल.
Foreign Exchange ट्रेडिंग आपण स्वातंत्र्य लेखामध्ये बघणारच आहोत.
स्टॉक खरेदी करताना आपल्या समोर विविध प्रकारचे पर्याय समोर येतात, यात तुम्हाला कशाप्रकारे आपली स्टॉक खरेदी किंवा विक्री करायची आहे हे कळते त्यांना ऑर्डर टाइप असे म्हणतात. जसे की तुम्हाला बाजार भावाणूसार स्टॉक विकत घ्यायचा आहे की काहीतरी तुम्ही ठरविलेल्या किमतीमद्धे विकत घ्यायचा आहे. आपण सविस्तर जाणून घेऊया,
Orders types in share market in Marathi
अ. मार्केट ऑर्डर
मार्केट ऑर्डर हे ऑप्शन सिलेक्ट केले म्हणजे आपण सध्याच्या बाजारभावाणूसार आपला स्टॉक हा विकत घेतोय असा अर्थ होतो. जेव्हा मार्केट सुरू असते तेव्हा स्टॉक चा भाव प्रत्येक सेकंदाला, सेकंदालाच काय मिलीसेकंदाला सुद्धा बदलत असतो अशा मध्ये जर आपल्याला मार्केट भावात स्टॉक विकत घ्यायचा असेल तर या ऑर्डर चा उपयोग होतो.
ब. लिमिट ऑर्डर
या ऑर्डर प्रकारात आपल्याला स्टॉक चा भाव स्वतः टाकावा लागतो, जेव्हा कधी स्टॉक चा भाव हा आपण टाकलेल्या भावा एवढा झाला म्हणजे आपली ऑर्डर ही execute होते. म्हणजेच आपले स्टॉक हे खरेदी किंवा विक्री ची प्रोसेस पूर्ण होते. सोप्या भाषेत आपल्याला एक विशिष्ट किमतील आपला स्टॉक हा खरेदी किंवा विक्री करता येतो.
क. स्टॉप लॉस ऑर्डर
या ऑर्डर प्रकारामध्ये आपण नावाप्रमाणेच जास्त लॉस होण्यापासून वाचवू शकतो. हे एक उदाहरणा द्वारे समजविण्याचा प्रयत्न करतो.
आपल्याला जो स्टॉक घ्यायचा आहे त्या स्टॉक ची ऑर्डर देताना आपल्याला ऑर्डर टाइप लिमिट ही दिसते, तिथे आपण जर स्टॉक १०० रुपयांचा आहे आणि अस वाटतय की हा आता वर जाईल तेव्हा SL = 90 रुपये ठेऊ शकतो.
मार्केट ही आपण ठरविल्याप्रमानेच वर जाईल अस नाहीये, परंतु जर मार्केट अपेक्षेणूसार न जाता जर घसरले तर आपण लावलेला स्टॉप लॉस मध्ये ती ऑर्डर बंद होइल म्हणजेच आपला लॉस हा फक्त १० रुपये होणार. मार्केट प्राइस ९० वर आल्यानंतर तो आणखी घसरू ही शकतो. परंतु आपल्या स्टॉप लॉस मुले आपल्याला जास्त तोटा होण्यापासून वाचवता येते.
ड. स्टॉप लिमिट ऑर्डर
यात नावाप्रमाणेच आपल्याला दोघींचे कॉम्बिनेशन म्हणेजेच स्टॉप लॉस अँड लिमिट ऑर्डर लावता येते. आपल्याला एक विशिष्ट किमतील स्टॉक विक्री किंवा खरेदी करता येतो आणि त्या सोबतच जर प्राइस अपेक्षेनुसार कामगिरी करत नसेल तर स्टॉप लॉस लावून त्या होणाऱ्या मोठ्या नुकसानापासून वाचताही येत.
ई. GTC ऑर्डर
या ऑर्डर प्रकारामध्ये आपल्याला नावाप्रमाणेच म्हणजेच Good till cancel प्रमाणेच फायदा मिळतो. जर GTC ऑर्डर केली असेल तर ती ऑर्डर मध्ये स्टॉक प्राइस येईपर्यंत तो ऑर्डर ही सुरुच राहते, जशी प्राइस अपेक्षेनुसार वर आली तशी ऑर्डर execute होते. जोपर्यंत व्यापारी ती ऑर्डर स्वतः कॅन्सल करत नाही तोपर्यंत ती ऑर्डर तशीच पडून राहते. जोपर्यंत execute होत नाही तोपर्यंत किंवा व्यापारी कॅन्सल करत नाही तोपर्यंत ती ऑर्डर तशीच राहते.
बरेच ब्रोकर हे ही ऑर्डर टाइप GTT प्रमाणे देतात म्हणजेच Good till trade.
ई. Fill or Kill ऑर्डर
या ऑर्डर प्रकारात नावाप्रमाणेच आपण टाकलेली ऑर्डर एकतर execute होते किंवा एक्जिट होते. जर आपण दिलेल्या स्ट्राइक प्राइस ला आपल्या quantity प्रमाणे स्टॉक नसतील तर ऑर्डर ही कॅन्सल होतेर.
उदाहरण, जर सुमित ने रिलायन्स कंपनीचे २०० स्टॉक्स प्रत्येकी ४०० रुपयांप्रमाणे खरेदी केले आणि आता फक्त १५० स्टॉक्स च उपलब्ध आहेत तर सुमित ची ऑर्डर कॅन्सल होणार म्हणजेच किल होणार.
ऊ. Immediate or cancel ऑर्डर
या प्रकारामध्ये आपण दिलेली quantity मध्ये स्टॉक्स उपलब्ध नसतील तर जितके असतील तितके स्टॉक खरेदी किंवा विक्री होतात आणि जर स्टॉक उपलब्ध च नसतील तर ऑर्डर ही cancel होते.
उदाहरण, जर सुमित ने बजाज चे १०० स्टॉक्स ७० RS पर शेअर प्रमाणे खरेदीसाठी ऑर्डर दिली, परंतु फक्त ८० स्टॉक्स आता सध्या उपलब्ध आहेत तर तेव्हढे स्टॉक्स सुमित ला मिळतील म्हणजेच ऑर्डर लगेच execute होईल. जर स्टॉकच उपलब्ध नसतील तर ऑर्डर कॅन्सल होईल.
निष्कर्ष | Conclusion
मित्रांनो Share market information in Marathi या लेखामध्ये मी प्रामाणिकपणे जेवढी शक्य होईल तितक्या सोप्या मराठी भाषेत शेअर मार्केट म्हणजे काय याबद्दलची माहिती दिलेली आहे. माहिती आवडली असल्यास शक्य तितकी आपल्या मित्रांसोबत शेअर करा, काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारा.
आणखी नवनवीन माहिती साठी मराठी डिलाइट च्या सोशल मीडिया accounts ना फॉलो करायला विसरू नका.
FAQ
मराठीत स्टॉक मार्केट चा अर्थ काय आहे?
स्टॉक मार्केट हा असा वित्तीय बाजार आहे जिथे कुणीही सार्वजनिकरित्या ट्रेडिंग करू शकतो, म्हणजेच शेअर्स ची खरेदी विक्री करू शकतो.
शेअर मार्केट कसे शिकावे?
Free : वरील “शेअर मार्केट म्हणजे काय?” या लेखामध्ये दिलेल्या माहितीनुसार तुम्ही शेअर मार्केट शिकू शकता, तसेच अनेक यूट्यूब आणि संकेतस्थळाचा वापर करूनही स्टॉक मार्केट शिकत येत.
Paid : अनेक वेगवेगळे institutes बाजारात उपलब्ध आहेत, जे की शेअर मार्केट चे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत प्रशिक्षण देतात आणि यासाठी मोठी फी आकारतात.
खरेदी विक्री व्यापार कसा चालतो?
आपल्याकडे असलेल्या Demat Account/Trading account असलेल्या अॅप्लिकेशन वरुण आपण खरेदी विक्रीचा व्यवहार करू शकतो जो पूर्णपणे सुरक्षित असतो.