Mutual fund information Marathi | म्युच्युअल फंड गुंतवणूक कशी करावी ?

मित्रांनो मराठी Delight च्या आणखी एका लेखामध्ये आपल स्वागत आहे, आम्ही मराठी Delight आपणास आर्थिक स्वाक्षर आणि नव-नवीन माहिती आपल्या मराठी भाषेमध्ये देण्यासाठी प्रतिबद्ध आहोत. 

आज आपण Mutual fund information marathi या लेखात म्यूचुअल फंड बद्दल सविस्तर शिकणार आहोत. 

पूर्वी म्हणजेच आजपासून २० वर्षे कुणीही इतक आर्थिक रित्या स्वाक्षर नव्हत किंवा कोणीही अशी गुंतवणूक करत नसे. आजचे युग वेगळे आहे, आज गुंतवणुकीला सगळ्यात जास्त महत्व दिल जाते. अशात आपण गुंतवणूक कशामध्ये करतोय हे ही महत्वाच ठरत. तशीच एक गुंतवणूक म्हणजे  म्युच्युअल फंड गुंतवणूक. चला तर मग आपण शिकूया म्यूचुअल फंड म्हणजे काय आणि म्युच्युअल फंड गुंतवणूक कशी करावी ते. 

म्युच्युअल फंड म्हणजे काय | Mutual fund information Marathi

अनुक्रमाणिका

म्यूचुअल फंड ही गुंतवणुकीचे एक शस्त्र आहे ज्यामध्ये अनेक गुंतवणूकदारांकडून वेगवेगळ्या साधानांमध्ये म्हणजेच securities मध्ये गुंतवणूक करण्यात येते जसे की स्टॉक्स, बॉन्डस, इतर साधने. जे की गुंतवणूकदाराला त्याच्या अपेक्षित व्याजदर किंवा नफा मिळवून देतात.

म्यूचुअल फंड कसे काम करते?

म्यूचुअल फंड मध्ये एक फंड मॅनेजर असतो ज्याला आपण आपल्या मराठीमध्ये निधी व्यवस्थापक म्हणूया. प्रत्येक म्यूचुअल फंड साठी एक निधी व्यवस्थापक असतो जो की गुंतवणूक दारांचे पैसे गोळा करून ते इतर साधने जसे की स्टॉक्स, बॉन्डस यामध्ये गुंतवणूक करतो. हा व्यवस्थापक एक उच्च शिक्षित किंवा वित्तीय संस्था आणि बाजारामद्धे कायम सक्रिय आणि निपुण असतो. त्याची माहितीनुसार व कलेनुसार तो पैसे गुंतवणूक करतो जेणेकरून त्याला त्यातून नफा होईल. त्याला नफा झाला म्हणजे आपल्याला आपण गुंतवणूक केलेल्या पैश्यांवर सुद्धा नफा होणार आहे. 

सोप्या भाषेत सांगायच झाले तर फंड व्यवस्थापक हा आपल्या माहिती आणि अनुभवाच्या जोरावर आपल्यासारख्या गुंतवणूक दारांच्या वतीने गुंतवणूक करतो. अश्याप्रकारे म्यूचुअल फंड हे काम करते.   

म्यूचुअल फंड मध्ये गुंतवणूक कशी करावी?

  1. आपपल्याला ऑनलाइन किंवा ऑफलाइन कश्या पद्धतीने गुंतवणूक करायची आहे ही ठरवा.
  2. आपला ब्रोकर निवडा, जसे की Groww, Zerodha, Angel One
  3. आपली KYC, म्हणजेच डिजिटल verification करून घ्या.
  4. म्यूचुअल फंड कारेडि करण्याबाबतचे नियम व अटी वाचून घ्या.
  5. DO’s and Don’ts वाचून घ्या.
  6. ज्या म्यूचुअल फंड मध्ये गुंतवणूक करायची आहे त्याची नीट तपासणी कराय ज्याप्रमाणे या लेखामध्ये मी नमूद केले आहे.
  7. याप्रमाणे तुम्ही म्यूचुअल फंड गुंतवणूक करण्यासाठी तयार आहात.

हे ही वाचा,

म्युच्युअल फंडात गुंतवणूक का करावी?

म्यूचुअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याची अनेक करणे असू शकतात.

  1. मुलांच्या शिक्षणासाठी बचत करणे.
  2. फॅमिली ट्रीप किंवा एखादी गरजेच्या गोष्टीसाठी गुंतवणूक करणे.
  3. आर्थिक उद्दिष्ट साध्य करणे.
  4. नवीन घरासाठी बचत करणे.
  5. पगारामधल्या कर वजाबाकी साठी 80 C अंतर्गत लाभ मिळावा म्हणून गुंतवणूक करणे.
Why Invest in Mutual Funds
Why Invest in Mutual Funds

Benefits of investing in mutual funds | म्युच्युअल फंड फायदे मराठी

तर मित्रांनो म्यूचुअल फंड चे बरेचे फायदे आहेत. जसे की कमीत कमी भांडवलामध्ये आपण इथे गुंतवणूक करू शकतो. इथे आपल्याला पैसे बुडण्याचा धोका खूप कमी असतो. चल तर आपण बघूया म्युच्युअल फंड चे फायदे काय आहेत ते. 

१. व्यावसायिक व्यवस्थापन | Professional Level Management 

म्यूचुअल फंड मध्ये आपले पैसे गुंतवणूक करणारा व्यवस्थापक हा एक स्टॉक मार्केट मधील जाणकार असतो आणि तो व्यवस्थितरित्या आपल्या अनुभवाच्या जोरावर गुंतवणूक करत असतो. इथे आपला धोका टाळतो आणि आपल्याला आपल्या अनुभवाशिवाय यातून नफा मिळवता येतो. इथे आपला स्वतः स्टॉक निवडून त्याचे विश्लेषण करणे, त्याचा परिणाम , मागील वर्षाचा किंवा त्याच्या भूतकळचा अभ्यास करून गुंतवणूक करणे याची गरज पडत नाही, कारण आपल्या फंड व्यवस्थापक हा आपल्यासाठी ते करत असतो. 

२. विविध स्टॉक्स मध्ये गुंतवणूक करणे 

म्यूचुअल फंडच्या माध्यमातून आपण स्वतः स्टॉक मध्ये पैसे गुंतवणूक करत नाही परिणामी त्या प्रत्येक गुंतवणुकीचा धोका आपला कमी होतो. जर आपण स्वतः गुंतवणूक केली तर आपल्याला त्या प्रत्येक स्टॉक च्या हालचाली बघाव्या लागतात त्या आपल्याला इथे बघायची गरज पडत नाही. तसेच विविध स्टॉक च्या एवजी आपण फक्त आपल्या म्यूचुअल फंड च्या हालचालींवर नजर ठेवतो. 

३. कमी भांडवल गुंतवणूक 

म्यूचुअल फंड मध्ये गुंतवणुकीचे भांडवललीची अपेक्षा ही कमी असते, या मध्ये गुंतवणूकदाराला SIP च्या माध्यमातून कमीत कमी पैसे दर महिन्याला भरण्याची मुभा मिळते. म्यूचुअल फंड चा स्ट्रक्चरच असे बनविले गेले आहे की इथे कोणीही सहज रित्या पैसे गुंतवू शकतो. 

४. Liquidity | गुंतवणुकीची तरलता 

इथे आपण गुंतवणूक केलेले पैसे एकाच दिवशी त्या म्यूचुअल फंड ला विकून त्यातून काढू शकतो किंवा आपण कधीही आपले भांडवल हे नफ्या सहित तेथून काढू शकतो. म्हणजे जर का आपल्याला त्य पैश्यांची खूप गरज आहे, जसे की दवाखान्याच काम, एखादी मोठी खरेदी वैगेरे तेव्हा आपल्याला आपली गुंतवणूक बंद करण्याची मुभा मिळते.

५.  सुरक्षितता आणि स्पष्टता 

म्यूचुअल फंड ची पाहणी विविध वित्तीय अधिकाऱ्यांकडून केली जाते म्हणजेच नियमानुसार हे चालत असत. त्यामुळे आपलाला आपल्या गुंतवणूक केलेल्या भांडवलाचा धोका कमी होतो. यामध्ये आपल्याला कधीही केव्हाही म्यूचुअल फंड कसा काम करतोय, आपले पैसे सुरक्षित आहेत का, तसेच आपल्याला किती आणि कसा नफा मिळतोय हे वेळोवेळी बघता येते. 

Types of Mutual Funds in Marathi | म्यूचुअल फंड्ज चे प्रकार 

म्यूचुअल फंड चे विविध प्रकार आहेत, गुंतवणूकदर आपल्या ध्येयाप्रमाणे यामध्ये गुंतवणूक करू शकतो. 

१. इक्विटि फंड्ज

यामध्ये प्राथमिक गुंतवणूक ही स्टॉक्स मध्ये होत असते. जर आपण दुसऱ्या प्रकारांबरोबर तुलना केली तर या प्रकारामध्ये उच्च जोखीम असते परंतु नफा किंवा परतावा ही अधिक असतो. हा प्रकार दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी उपयुक्त असतो. 

इक्विटि फंड मध्ये काही प्रकार आहेत जसे की mid-cap, small-cap, larg-cap आणि विशिष्ट क्षेत्र. 

Large-cap funds

या प्रकारामध्ये मोठ मोठ्या स्थिर आणि सुस्थापित कंपण्यामध्ये गुंतवणूक होते. यामध्ये गुंतवणुकीचे भांडवल ही खूप जास्त असू शकते.

Mid-cap funds

या प्रकारामध्ये गुंतवणूक ही मध्यम वर्गीय कंपन्यांमध्ये होते.

Small-cap funds

या प्रकारामध्ये गुंतवणूक ही लहान वर्गीय कंपन्यांमध्ये होते. ज्या की नवीन आहेत किंवा कमी भांडवल, मालमत्ता असलेल्या आहेत. 

विशिष्ट क्षेत्र :

यामध्ये एक विशिष्ट क्षेत्र जसे की बँकिंग, ऊर्जा, आरोग्यसेवा, तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रिक संस्था यामध्ये गुंतवणूक ही होत असते. इथे लहान मोठ्या सर्व प्रकारच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक होत असते.  

Types of Mutual Funds in Marathi
Types of Mutual Funds in Marathi

२. मनी मार्केट फंड

 यामध्ये आपण कमी धोक्याची आणि कमी व्याजदर अपेक्षा करू शकतो. हा प्रकार आपल्या भांडवलाची स्थिरता आणि सुरक्षितता प्रधान करण्यासाठी बनविले गेले आहेत. ज्या गुंतवणूकदारांना कमी जोखीम आणि स्थिरता हवी आहे ते यामध्ये गुंतवणूक करू शकतात. 

३. बॉन्डस फंड

 हे इक्विटि फंड प्रकारच्या तुलनेत कमी जोखमीचे असते. त्याचबरोबर ही सरकारी, कॉर्पोरेट आणि municipal भागांमध्ये निश्चित परतावा मिळविण्यासाठी बनविले गेले आहे. इथे आपण नियमित परतावा मिळवू शकतो. 

४. सेक्टर फंड

 या प्रकार मध्ये आपण अर्थव्यवस्थेच्या किंवा वित्तीय धोरणाच्या एक विशिष्ट क्षेत्रावर लक्ष केंद्रित करू शकतो जसे की ऊर्जा, आरोग्यसेवा, तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रिक संस्था. एक विशिष्ट प्रकारच्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करू इच्छिनाऱ्या गुंतवणूक दारांसाठी हा फंड एक वरदान आहे. 

५. इंडेक्स फंड्ज

 इंडेक्स फंड्ज हे नावाप्रमाणेच आपल्याला इंडेक्स म्हणजेच निफ्टि ५०, Bank-nifty, S&P ५०, सारख्या निर्देशांकावर गुंतवणूक करण्याची मुभा देतात. विविध फंड्ज च्या प्रकारामध्ये कमी भांडवला मध्ये आपण इथे गुंतवणूक करू शकतो.   

How to Choose a Mutual Fund in Marathi | म्यूचुअल फंड कसा निवडावा 

म्यूचुअल फंड मध्ये गुंतवणूक करताना काही बाबी लक्षात घ्याव्या लागतात जेणेकरून आपण करत असलेली गुंतवणूक ही योग्यरित्या व्हाही आणि आपल्याला चांगला परतावा मिळावा. 

१. मूल्यांकन आणि ऐतिहासिक माहिती तपासणे

आपण करत असलेल्या म्यूचुअल फंड गुंतवणुकीमध्ये मागील वर्षी म्हणजेच ऐतिहासिक परतावा कसा आहे, त्या फंड ची कामगिरी कशी आहे हे तपासने जेनेकरून योग्य फंडामध्ये आपण गुंतवणूक केली आहे याचे समाधान मिळते.  

२. गुंतवणुकीचे ध्येय

आपल गुंतवणूक करण्यामागच ध्येय लक्षात घ्या, तुम्ही किती जोखीम पत्करू शकता? तुम्हाला परतावा कसा पाहिजे? तुम्ही किती वर्षासाठी किंवा महिन्यासाठी गुंतवणूक करू इच्छित आहात जेणेकरून तुम्ही करत असलेल्या गुंतवणुकीचे आर्थिक उद्दिष्ट साध्य होईल.

३.   निधी व्यवस्थापक निवडणे

आपण करत असळलेल्या गुंतवणुकीचा फंड मॅनेजर म्हणजेच निधी व्यवस्थापक कोण आहे, त्याची ऐतिहासिक कामगिरी कशी आहे. त्याने आतापर्यंत सांभाळलेल्या म्यूचुअल फंड पैकी गुंतवणूकदारांना लाभ झाला आहे का, या सगळ्या प्रश्नाची उत्तरे तपासून पाहणे.  म्यूचुअल फंड मध्ये गुंतवणूक करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे निधी व्यवस्थापक निवड आहे, जेणेकरून त्याच्या अनुभवाने आणि कष्टाने तो आपल्याला परतावा चांगला मिळवून देईल.

४. गुंतवणुकीचे विश्लेषण आणि खर्च

आपण करत असलेल्या गुंतवणुकीमुळे आपल्याला किती परतावा मिळेल, आपण किती गुंतवलेल तर आपल्याला किती टक्केवारी मिळेल?  या म्यूचुअल फंड ची वार्षिक सरासरी भांडवल किती आहे.  तसेच आपल्याला आलेल्या परताव्यावर काही खर्च म्हणजेच deductions आहेत का हे तपासणे .

५. निधी विविधता आणि उद्दिष्टे

ज्या म्यूचुअल फंड मध्ये आपण गुंतवणूक केली आहे त्याचे वेळोवेळी परिक्षण करणे, यामध्ये जे holdings आहेत ते आपल्या ध्येयाशी जुळतात का ते तपासणे. यात जोखीम किती आहे? कशी आहे? तसेच इतर मार्केट कॅप्स आणि क्षेत्रे तपासणे.   

म्यूचुअल फंड मधील गुंतवणुकीचे धोरणे | Mutual fund investment strategies in Marathi : 

आपल्याला म्यूचुअल फंड मध्ये कश्या प्रकारे गुंतवणूक करायची आहे. जसे की एक रकमी, दर माह किंवा कधीही पैसे काढू शकतो अशी योजना. पुढे आपण बघूया म्यूचुअल दुंड मध्ये कश्या प्रकारची गुंतवणूक आपण करू शकतो.  

१. Lump-Sum Investment | एकरकमी योजना

या म्यूचुअल फंड योजनेच्या अंतर्गत आपण एकरकमी गुंतवणूक करू शकतो. म्हणजेच गुंतवणूक करायची असल्यास आपण एकतर १० हजार , १ लाख, १० लाख रुपये भरू शकतो आणि त्य भांडवलावर, गुंतवणुकीवर सुरुवातीपासूनच जास्त परतावा मिळवू शकतो. 

उदाहरण: जसे की सुमित ने बजाज large cap fund मध्ये पैसे गुंतविले, तर त्या रकमेवर, आपण १ लाख मानून घेऊया. त्या १ लक्ष रुपयांवर दर दिवशी, महिन्याला किंवा वर्षाला तो म्यूचुअल फंड जशी कामगिरी करेल तसा परतावा जमा होत जाईल. आपण १ लक्ष रुपयांवर दर वर्षी १० टक्केवारी धरली तर १ लाखाला १० हजार परतावा मिळेल म्हणजेच आपले भांडवल ही १ वर्षात १ लाख १० हजार एवढी होईल. 

२. SIP Systematic Investment Planning | पद्धतशीर गुंतवणूक योजना 

या योजनेमध्ये आपण म्यूचुअल फंड गुंतवणूक ही सोप्या पद्धतीने करू शकतो. जसे आपले काही EMI असतात तसेच आपण इथे दर माह निश्चित केलेल पैसे भरू शकतो. जसे की आपण ५ वर्ष गुंतवणूक करायची ठरवल आणि आपल्याला SIP करायची आहे. तर आपल्याला ५ वर्ष म्हणजेच ६० महिन्यापर्यंत दर माह ५००० रुपये किंवा जितके आपण निश्चित केले आहे तेवढी रकम गुंतवणूक म्हणून भरावी लागेल. परंतु यात परतावा हा सुरुवातीला कमी असू शकतो. 

उदाहरण : जर सुमित ने ५००० रुपयांची SIP ५ वर्षासाठी काढली आहे. आधीचे २ महीने त्याने गुंतवणुकीचे रक्कम भरली म्हणजेच १०००० तर त्याला तेवढ्याच रकमेवर परतावा मिळेल, आणि पुढच्या महिन्याला त्या पूर्ण रकमेवर आणखी परतावा मिळत जाईल. 

एक रकमी गुंतवणुकीच्या तुलनेत ही योजना कमी परतावा मिळवून देते. 

३. SWP | Systematic Withdrawal Plan| पद्धतशीरपणे पैसे काढण्याची योजना

या योनेअंतर्गत गुंतवणूकदार कधीही आपले पैसे काढू शकतो. काही योजना अश्या असतात ज्यांना lock in period असतो, त्यातून आपल्याला वारंवार पैसे काढत येत नाहीत. जेव्हा निक्षित कालावधी पूर्ण होतो तेव्हाच आपण पैसे काढू शकतो. परंतु या योजेनेमध्ये आपण पद्धतशीरपणे पैसे काढू शकतो. 

उदाहरण : सुमितला पैश्यांची गरज ही दर माह असते , तर तो आलेल्या परताव्या मधून थोडे पैसे दर माह काढु शकतो. 

Mutual Funds Risk | म्यूचुअल फंड गुंतवणुकीमधील जोखीम 

म्यूचुअल फंड मध्ये गुंतवणूक करणे आणि चांगला परतावा मिळणे याबरोबरच इथे काही जोखीमसुद्धा आहेत. त्या आपल्यासारख्या गुंतवणूकदाराला कळंण गरजेच आहे. 

मार्केट जोखीम

वित्तीय बाजारात असलेली कुठलीही गुंतवणूक ही परतावा देण्याची कुठलीही हमी देत नाही. हा बाजार हा स्टॉक्स किंवा इतर साधनांची ऐतिहासिक माहिती आणि कामगिरीच्या आधारे चालत असतो. इथे शेअर मार्केट मधीळ चढ उतार ही लक्षात घेणे महत्वाचे आहे. मार्केट मधील चढ उतारावर आपल्या गुंतवणुकीची स्थिति ही अवलंबून असते. इथे जितका परतावा आहे तितकी जोखीम सुद्धा आहे. 

क्रेडिट जोखीम

ही पूर्णपणे म्यूचुअल फंडशी आधारित जोखीम आहे. म्यूचुअल फंडमधील कंपणीच्या कर्जदारांनि जर कर्जाची रकम आणि व्याज दिल नाही तर थेट परिणाम आपल्या म्यूचुअल फंडवर म्हणजेच परताव्या वर होऊ शकतो. 

व्याजदारवारील जोखीम

व्याजदर हा पूर्णपणे कर्ज निधीवर अवलंबून आहे. कर्ज निधीमद्धे झालेली घट ही कमी व्याजदारला कारणीभूत ठरू शकते. 

तरलता जोखीम|Liquidity Risk

यामध्ये आपण प्रत्येक वेळेस प्रत्येक म्यूचुअल फंड मधून आपले पैसे जेव्हा हवे असतील तेव्हा काढू शकतो अस नसत. कधी कधी म्यूचुअल फंड वर असलेल्या कपातींमुळे आणि त्यावर अवलंबून असलेल्या साधनामुळे आपल्याला फंड विकण्यात थोडा त्रास सहन करावा लागू शकतो. 

कार्यरत जोखीम | Operational Risk |

म्यूचुअल फंड सही निगडीत त्रुटींमुले आणि विकण्यात येत असलेल्या अडचणी, प्रोसेस मध्ये वित्तीय संस्थांमध्ये येत असलेल्या अडचणींमुळे ही आपल्याला जोखीम असते. 

Tax on Mutual funds in Marathi | म्यूचुअल फंड मध्ये असलेले कर   

म्यूचुअल फंड मध्ये आपण गुंतवणूक करतो तेव्हाच ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. त्यावर लागत असणारे कर आणि त्याची वसूली होण्यासंदर्भात ही अभ्यास करणे गरजेचे आहे. 

१.  भांडवलावर मिळणाऱ्या लाभावरील कर

आपण जो परतावा मिळवतो त्यावर ही आपल्याला कर भरण्याची आवश्यकता असते. म्यूचुअल फंड याची परिपक्वता झाल्यास त्यातून मिळणाऱ्या परताव्यावर ही कर भरावा लागत असल्यामुळे या हालचालींवर ही लक्ष ठेवणे ही सोयीचे ठरते. त्या म्यूचुअल फंडच्या मुदतीवर कराची रकम ही ठरलेली असते. 

२. लाभांश वितरण कार | DDT Dividend Distribution Tax 

म्यूचुअल फंड च्या विक्रीमधून आलेल्या पैश्यांवर DDT हा आधीच कापला जातो आणि गुंतवणूक दाराला उर्वरित रक्कम परत मिळते. नियमांच्या आधारे हे कर कापले जातात जे की वित्तीय संस्थामार्फत कधीही बदलू शकतात. 

३. Tax Saving Mutual Funds | ELSS

याला Equity Liquid Saving Scheme अस सुद्धा म्हटल जाते. यामध्ये गुंतवणूक दाराला ८०C या कर बचतीचा उपभोग घेता येतो आणि करावरील पूर्णपणे बचत होते. या फंडचा एक कालावधी असतो, हे कालावधी वेग वेगळ्या म्यूचुअल फंडनुसार असतात जसे की ३ वर्ष ५ वर्षे.  

तुम्ही म्युच्युअल फंड कसे खरेदी करता?

१. म्यूचुअल फंड खरेदीसाठी आपण ब्रोकर द्वारे ऑनलाइन किंवा offline गुंतवणूक करू शकतो. 
२. आपपण स्वतः ऑनलाइन अधिकृत संकेतस्थळे म्हणजेच ब्रोकर ऑनलाइन व्यासपीठांच्या माध्यमातून म्यूचुअल फंड खरेदी करू शकतात. 
३. आपण वेगवेगळ्या banks च्या माध्यमातून त्यांच्या अप्प्स च्या माध्यमातूनही म्यूचुअल फंड खरेदी विक्री करू शकतो

म्युच्युअल फंडात पैसे कसे गुंतवायचे?

कृपया लेख वाचा, Mutual fund information Marathi या लेखामध्ये म्युच्युअल फंडात पैसे कसे गुंतवायचे याची सविस्तर माहिती दिलेली आहे.

नवशिक्यांसाठी म्युच्युअल फंड म्हणजे काय?

म्यूचुअल फंड मध्ये गुंतवणूक दारांचा पैसा हा एक निधी व्यवस्थापकाकडे जमा होतो जो अनुभवी आणि कौशल्य प्रधान असतो. त्या पैश्यांवर तो ट्रेडिंग करून, शेअर मार्केट मध्ये टाकून पैसे कमावतो. त्याच बरोबर आपल्यालाही लाभ होत असतो.

मी किती म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करावी?

याच तंतोतंत उत्तर नाही, तुम्ही जेवढी तुम्हाला झेपेल तेवढी गुंतवणूक करू शकता. फक्त त्या म्यूचुअल फंड चा अभ्यास करायला विसरू नका.

तुम्ही एका फंडात गुंतवणूक करावी की अनेक?

गुंतवणूक दर इच्छुक असल्यास अनेक म्यूचुअल फंड मध्ये सुद्धा गुंतवणूक करू शकतो.

म्युच्युअल फंडातून तुम्ही मासिक उत्पन्न कसे मिळवाल?

होय, तुम्ही 2 पंढहतीने म्यूचुअल फंडातून मासिक उत्पन्न मिळवू शकता.
1. Monthly dividend option
2. SWP, ज्याची माहिती वरील लेखामध्ये देण्यात आली आहे.

Groww अॅपद्वारे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित आहे का?

हो, groww ही एक SEBI registered broker असून NSE, BSE आणि AMFI Registered Mutual Fund distributor आहे.

म्युच्युअल फंड माहिती मराठीत काय आहे?

या लेखामध्ये आपल्याला या बद्दल ची माहिती मिळेल.

म्युच्युअल फंडात गुंतवणूक का करावी?

याची अनेक करणे आहेत, जसे की आपल भविष्य सुरक्षित करणे, आपले आर्थिक ध्येय गाठणे, आपली कुठलीही गरज भागवणे जशी की एखादी फॅमिली ट्रीप प्लान करणे, मुलांचे शिक्षण इत्यादि.

म्युच्युअल फंडाचा सर्वोत्तम प्रकार कोणता आहे?

इक्विटि | Equity फंड हा प्रकार सगळ्यात लाभदायी आहे.

पोर्टफोलिओ म्हणजे काय

गुंतवणूकदाराच्या मालकीचे साधनांचा (Securities) संग्रह म्हणजे पोर्टफोलियो होय. जेथून गुंतवणूकदार कधीही आपल्या गुंतवणुकीच्या हालचालींवर लक्ष ठेवू शकतो.

म्युच्युअल फंड फायदे काय आहेत?

म्यूचुअल फंड चे अनेक फायदे आहेत, वरील लेखामधील Benefits of investing in mutual funds या भागामध्ये आपणास माहिती मिळेल.

Leave a Comment

Discover more from Marathi Delight

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading