नमस्कार मंडळी,
आजच्या लेखात आपण अर्ध मच्छिंद्रनासान माहिती मराठीमध्ये बघणार आहोत. या लेखामध्ये आपण मच्छिंद्रासन या आसनाचे नाव कशाप्रकारे पडलं, या आसनापासून होणारे आपल्या शरीरास फायदे, हा व्यायाम कधी करायचा, आणि कशाप्रकारे करायचा याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. ardha matsyendrasana information in marathi विषयी जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.
अर्ध मच्छिंद्रनासन मराठी माहिती|Ardha Matsyendrasana information in marathi
अनुक्रमाणिका
- 1 अर्ध मच्छिंद्रनासन मराठी माहिती|Ardha Matsyendrasana information in marathi
- 2 अर्ध मच्छिंद्रनासन कसे करावे
- 3 अर्ध मच्छिंद्रसणाचे फायदे |Ardha Matsyendrasana precautions
- 4 अर्ध मच्छिंद्रनासना मध्ये घ्यायची काळजी |Precautions to be taken in Ardha Machhindranasana
- 5 अर्ध मच्छिंद्रनासन कधी करावे | When to do Ardha Machhindranasana?
अर्ध मच्छिंद्रनासन मराठी माहिती ardha matsyendrasana information in marathi पुढे बघूया. अर्ध मच्छिंद्रनासन ज्याला “हाफ लॉर्ड ऑफ द फिश” या नावाने ही ओळखले जाते. कथेनुसार असे म्हंटलं जाते की मच्छिंद्रसन ज्याला “हाफ स्पाइनल ट्विस्ट पोज” ह्या नावानेही परिचित असलेले हे आसन “गुरु मच्छिंद्रनाथ” यांचे आवडते आसन होते. नवनाथांपैकी योगी असलेले थोर ‘योगी मच्छिंद्रनाथ’ त्या अवस्थेत बसत.
त्या बसलेल्या आसनाला “मच्छिंद्रनासन आसन” असे म्हणतात. मच्छिंद्रनाथ ज्या अवस्थेत बसत ही पोझिशन अधिक विकसित झाली आणि या विकसित होण्यामागे याचे कारण म्हणजे ह्या मुद्रेने अधिक चांगले लाभ होऊ लागले. ही मुद्रा अधिक महत्त्वपूर्ण आहे. त्याचबरोबर “अर्ध मच्छिंद्रनासन” हे नाव अशा प्रकारे पडले की “अर्ध” आणि “मत्स्य”, “इंद्र” या दोघही शब्दांना एकत्रित करते. या शब्दांचा अर्ध असा की “अर्ध मत्स्य” म्हणजे “अर्धा मासा”आणि ” इंद्र” म्हणजे “देव”,”इंद्र देव” याला परिपूर्ण करतो.”अर्ध मच्छिंद्रनासन”.
अर्ध मच्छिंद्रनासन कसे करावे
हे आसन योग्यरीता कसे करायचे याचे वर्णन खाली दिलेल्या ओळींमध्ये थोडक्यात करण्यात आले आहे. आसन योग्यरित्या शिकूनच ते अमलात आणावं अर्ध मच्छिंद्रनासन कसे करावे ते पुढील प्रमाणे:
- एक चटई घेऊन त्यावर बसा.
- जमिनीवर बसल्यानंतर आपले पाय सरळ करा.
- पाय पुढे पसरवलेले असताना तुमचा डावा पाय गुडघ्यामद्धे दुमडून उजव्या मांडीखाली ठेवा.
- डाव्या पायाची टाच आपल्या जनेंनिंदियाखाली घ्या.
- डाव्या टाचेवर शरीराचे भार देऊन उजवा पाय वर उचलायचा प्रयत्न करा .
- वर उचललेला उजवा पाय गुडघा दुमडून त्याला डाव्या माडींच्या बाजूस डाव्या बाजूला ठेवा.
- एक मोठा श्वास घेऊन पाठीचा कणा ताठ ,पोट मध्ये आणि ताठ पणे बसायचा प्रयत्न करा.
- घेतलेला श्वास सोडा, श्वास सोडताना तुमचं धड उजव्या बाजूला वळवा.
- धड उजव्या बाजूस वळवताना आधारासाठी डावा हात जमिनीवर टेकवा.
- डाव्या हाताने उजव्या पायाची टाच पकडा.
- आपल्या धडा सोबत मान व डोकेही उजव्या बाजूस वळवा.
- आपल्या उजव्या पायाचा गुडघा, अंगठा , हनुवाटी ,डावाखांदा आणि उजवा खांदा सरळ एका रेषेत ठेवा.
- हे सर्व करत असताना श्वासोच्छ्वास खोलवर घ्या.
- या सर्व करत असताना पाठीचा कणा अगदी सरळ ठेवावा.
- या सर्व क्रमामध्ये मानेची पोझिशन आरामदायक असावी.
- खोलवर श्वास घेऊन ह्या पोझिशनमध्ये 30 सेकंद किंवा एक मिनिटभर बसावे.
- अर्ध मच्छिंद्रसणाची ही शेवटची पोझिशन आहे.
- ही पोज सोडण्यासाठी हळूहळू घेतलेले वळण सोडण्याचा प्रयत्न करा
- उजवा पाय डाव्या पायाच्या खाली ठेवून आणि डावीकडे वळवून पुनरावृत्ती मध्ये या.
हे असं तुम्ही सुरुवातीस काही सेकंद आणि नंतर 30 सेकंद आणि हळूहळू झालेला सरावानंतर एक मिनिटभर करू शकतात .
अर्ध मच्छिंद्रसणाचे फायदे |Ardha Matsyendrasana precautions
अर्धा मच्छिंद्रसनाचे फायदे पुढील प्रमाणे:
- या आसनामध्ये पाठीच्या घेतलेल्या वळणामुळे मणक्याची लवचिकता वाढण्यास मदत होते. पाठीच्या केलेल्या हालचालीमुळे पाठ दुखी कमी होऊ लागते.
- हे आसन ओटी पोटामधील अवयवांना मालिश करते. आणि यामुळे पचनक्रिया आणि डिटॉक्सिफिकेशनला मदत मिळते.
- अर्ध मच्छिंद्रसनामध्ये नितंब, मांड्याआणि ग्लुटस तानते आणि यामुळे आपल्या हिपची लवचिकता वाढते.
- हे मुद्रा वारंवार केल्यामुळे मुद्रा योग्य होते आणि त्याचे फायदे दिसू लागतात.
- ह्या मुद्रामुळे पाठीच्या वळणामध्ये मणक्याची ऊर्जा अधिक वाढते.
- पाठीच्या खालच्या भागात म्हणजेच नितंबा मध्ये तणाव कमी होऊन ज्या लोकांना सायटिका असेल म्हणजेच सायटिकाग्रस्त लोकांसाठी ही मुद्रा अधिक महत्त्वपूर्ण ठरू शकते सायटिका ग्रस्त लोकांना अर्ध मच्छिंद्र सणाचा अधिक फायदा मिळतो.
- श्वासोच्छ्वास आणि दमा संबंधित आजाराला कमी करण्याचे काम अर्ध मच्छिंद्रसन करू शकते. आपले धड या आसनामध्ये वळवले जाते आणि या हालचालीमुळे फुफुसाची क्षमता सुधारण्यास अधिक मदत मिळते.
- हे व्यायाम नेहमीप्रमाणे केल्याने पोटासंबंधीत विकार दूर होतात.
- मधुमेहा साठी हे अर्ध मच्छिंद्रनासन हा व्यायाम अधिक महत्त्वपूर्ण आहे.
- छाती आणि खांदे मोकळे होतात.
- ज्या स्त्रियांना मासिक पाळी मध्ये तीव्र वेदना होत असतील त्यासाठी हा व्यायाम अधिक लाभदायक आहे.
- मासिक पाळीच्या विकारांसाठी हा व्यायाम नियमितपणे करावा..
- अर्ध मच्छिंद्रनासन मज्जासंस्थेला उत्तेजित करण्यासाठी अधिक प्रभावशाली ठरते.
- आतड्यांसंबंधीत विकार बरे होतात.
- अर्ध मच्छिंद्रनासन पाचक अवयवांना उत्तेजित करते.
- हा व्यायाम नियमित प्रमाणे केल्याने मानसिक संतुलन सुधारते.
- अर्ध मच्छिंद्रचनाने स्नायू बळकट होतात.
परंतु जर तुमच्या मणक्यांना, पाठीला, नितंबाला किंवा गुडघ्याला काही जुन्या दुखापती असतील तर हा व्यायाम करणे टाळावा. गर्भवती स्त्रियांनी शक्यतो ही मुद्रा करायची टाळावी जर गर्भवती स्त्रिया अर्ध मच्छिंद्रनासन करत असतील तर त्यांनी हा व्यायाम अतिशय सावधगिरीने किंवा आपल्या योगा प्रशिक्षक यांच्या सल्ल्याने करावे. जर तुम्हाला मणक्या संबंधी काही त्रास असतील तर किंवा पोटातील काही विकार असतील तर आपला योगा प्रशिक्षकाच्या सहाय्याने हा व्यायाम करायचा सराव तुम्ही करू शकतात.
अर्ध मच्छिंद्रनासना मध्ये घ्यायची काळजी |Precautions to be taken in Ardha Machhindranasana
कोणत्याही व्यायामामध्ये आपले शरीर आपल्याला कुठे पर्यंत प्रोत्साहन करते हे अधिक महत्त्वाचे आहे आणि यानुसारच आपल्या शरीराचे ऐकूनच स्वतःला व्यायामाचे पोज मध्ये घ्या. अर्ध मच्छिंद्रनासन करण्यापूर्वी स्वतःला थोड्यावेळ उबदार बनवा आणि जर तुम्ही कुठलाही प्रकारचा व्यायाम पहिल्यांदाच करत असाल तर योग प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली हा व्यायाम करावा. कुठल्याही प्रकारची शारीरिक दुखापत असल्यास हा व्यायाम करणे टाळावा.
बऱ्याच योगासनांप्रमाणेच हे आसन करताना पोट रिकामे असणे अधिक आवश्यक आहे. रिकाम्या पोटी अर्ध मच्छिंद्रनासन हा व्यायाम करणे अति उत्तम आहे. जर हा व्यायाम तुम्ही संध्याकाळच्या वेळी करत असाल तर नाष्ट्यानंतर एक दोन तासाभराचा अंतर ठेवावा आणि जेवणानंतर तीन ते चार तासाचा अंतरा असावा. अर्ध मच्छिंद्रनासारखा स्ट्रेचिंग व्यायाम करण्यापूर्वी शरीर उबदार करणे अधिक गरजेचे आहे. अर्ध मच्छिंद्रनासन ह्या व्यायामाच्या पोज मध्ये जाण्यापूर्वी पाठीचा कणा, खांदे आणि नितंब हलके करण्यासाठी शरीराला अधिक बनवा.
अर्ध मच्छिंद्रनासन कधी करावे | When to do Ardha Machhindranasana?
अर्ध मच्छिंद्रनासन हे असं शक्यतो सूर्योदयाच्या वेळेस करणे अधिक लाभदायक असते. बरेचशे व्यायाम हे सूर्योदयाच्या वेळी केले जातात, कारण सकाळचे वेळी व्यायाम केल्याने तुमचा दिवस ऊर्जेने भरलेला असतो. सकाळी केलेल्या व्यायामाचा सराव हा शरीराला जागृत करण्यासाठी आणि दिवसभर ऊर्जा मिळण्यासाठी अधिक उत्तम असतो. अर्ध मच्छिंद्रनासन हा व्यायाम तुम्ही संध्याकाळी ही करू शकता. हा व्यायाम संध्याकाळी केल्याने दिवसभरातील तणाव कमी होतो आणि रात्री शांत झोप लागत.
Ardha Matsyendrasana information in marathi
मंडळी, वरील लेखामध्ये आम्ही Ardha Matsyendrasana information in marathi यामध्ये संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.
हे ही वाचा,
वारंवार विचारले जाणारे प्रश्न | FAQ
अर्ध मच्छिंद्रनासन म्हणजे काय?
अर्ध मच्छिंद्रनासन म्हणजे माशाचा अर्धा देव असे संबोधित होते. अर्ध मच्छिंद्रनासान हे एक आसनास्थ योगासन आहे. योगी मच्छिंद्रनाथ यांच्या नावावरून अर्ध मच्छिंद्रनासन या आसनाचे नाव पडले आहे.
अर्ध मच्छिंद्रनासान केल्यावर कुठले फायदे होतात?
अर्ध मच्छिंद्रनासनामध्ये पाठदुखी चे विकार, मणक्यांमध्ये असलेली दुखापत, पाचकव्यवस्था, आतड्यांचे विकार, पोटाचे विकार, पाठीचा कणा आणि नितंब सुधारण्यामध्ये महत्त्वपूर्ण आहे.
अर्धा मच्छिंद्रनासन कोणत्या व्यक्तींनी टाळावे?
अर्ध मच्छिंद्रनासन ज्या लोकांना पाठीमध्ये किंवा मणक्यामध्ये काही वेदना असतील त्या लोकांनी हा व्यायाम करणे टाळावे. गर्भवती महिलांनी अर्ध मच्छिंद्रनासन आपला योग प्रशिक्षकाच्या सल्ल्यानुसार करावे.
अर्ध मच्छिंद्रनासन किती काळासाठी करावे?
अर्धा मच्छिंद्रनासन सुरुवातीस 30 सेकंद आणि नंतर एक मिनिट भर करावे.