नमस्कार मंडळी,
आजच्या युगामध्ये प्रत्येक व्यक्तीला आपल्या आवडीनुसार शिक्षण निवडण्याची अनुमती आहे. आणि प्रत्येकाने आपल्या आवडीनुसार शिक्षण निवडायला पाहिजे. बहुतेक विद्यार्थ्यांना डिजिटल मध्ये आवड असते तर बहुतेक विद्यार्थ्यांना सोशल वर्क करण्यामध्ये आवड असते. ज्या विद्यार्थ्यांना सोशल वर्क करायचे आवडते त्यांच्यासाठी एम एस डब्ल्यू हा कोर्स अधिक उपयुक्त आहे. आजच्या या लेखांमध्ये Msw course information in marathi आपण या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
Msw course information in marathi-बहुतेक लोकांना प्रश्न पडतो की एम एस डब्ल्यू कोर्स म्हणजे नक्की काय असतं? विद्यार्थी मित्रांनो एम एस डब्ल्यू कोर्समध्ये सामाजिक कार्याविषयी अधिक माहिती दिली जाते. सविस्तर माहितीसाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. या लेखांमध्ये एम एस डब्ल्यू कोर्स विषयी संपूर्ण माहिती मराठीमध्ये दिली गेली आहे.
एम एस डब्ल्यू कोर्स फुल फॉर्म | Msw course full form in marathi
अनुक्रमाणिका
- 1 एम एस डब्ल्यू कोर्स फुल फॉर्म | Msw course full form in marathi
- 2 नक्की काय आहे एम एस डब्ल्यू कोर्स? What is Msw course in marathi
- 3 एम एस डब्ल्यू कोर्स करण्यासाठी लागणारी पात्रता | Eligibility msw course in marathi
- 4 एम एस डब्ल्यू कोर्स मध्ये प्रवेश कसा घ्यायचा? Admission msw course tips in marathi
- 5 एम एस डब्ल्यू कोर्स साठी लागणारा कालावधी | MSW course duration in marathi
- 6 एम एस डब्ल्यू कोर्सची फी | msw course fees in marathi
- 7 एम एस डब्ल्यू फोर्स केल्यानंतर नोकरीच्या संधी | msw course job opperchunity
- 7.1 क्लीनिकल सोशल वर्कर
- 7.2 वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता
- 7.3 शालेय सामाजिक कार्यकर्ता
- 7.4 बाल व कौटुंबिक सामाजिक कार्यकर्ता
- 7.5 जेरियाट्रिक सोशल वर्कर
- 7.6 समुदाय संघटक किंवा विकास कार्यकर्ता
- 7.7 पदार्थ दुरुपयोग समुपदेशन
- 7.8 मानसिक आरोग्य समुपदेशक
- 7.9 धोरण विश्लेषक किंवा संशोधक
- 7.10 फॉरेन्सिक सोशल वर्कर
- 7.11 नानफा कार्यक्रम व्यवस्थापक
- 7.12 खाजगी प्रॅक्टिस थेरपिस्ट
- 8 एम एस डब्ल्यू कोर्स केल्यानंतर यामध्ये तुम्ही स्पेशलिस्ट होऊ शकतात.
- 9 एम एस डब्ल्यू कोर्स केल्यानंतर रोजगार मिळणारी क्षेत्र
- 10 Here are some common employment areas for MSW professionals in marathi:
- 10.1 Healthcare Settings
- 10.2 Mental Health and Counselling
- 10.3 Schools and Educational Settings
- 10.4 Child and Family Services
- 10.5 Gerontology and Aging Services
- 10.6 Policy and Research
- 10.7 Community and Nonprofit Organizations
- 10.8 International and Humanitarian Organizations
- 10.9 Employee Assistance Programs (EAP)
- 10.10 Substance Abuse Treatment Facilities
- 10.11 Housing and Homelessness Services
- 11 वारंवार विचारले जाणारे प्रश्न | FAQ
“Msw” म्हणजे “मास्टर ऑफ सोशल वर्क” ही एक पदव्युत्तर पदवी असून यामध्ये सामाजिक कार्याविषयी अधिक खोलवर माहिती दिली जाते. एम एस डब्ल्यू कोर्स मध्ये सामाजिक कार्याविषयी माहिती देऊन त्यासाठी सराव देखील करून घेतला जातो. सामाजिक कार्य करणे हे अधिक चांगले आहे.जे समुदायाचे कल्याण करण्यासाठी व समाजाची गुणवत्ता सुधारण्यासाठी केले जाते.आजच्या काळामध्ये समुपदेशन, समर्थन अशा गोष्टी करण्यासाठी विविध प्रकारच्या सेवा करण्यासाठी बाहेरील प्रगत देशांमध्ये सुद्धा सामाजिक कार्यासाठी मास्टर ऑफ सोशल वर्क msw ही पदवीची आवश्यकता असते.
नक्की काय आहे एम एस डब्ल्यू कोर्स? What is Msw course in marathi
मास्टर ऑफ सोशल वर्क msw ही एक पदवी असून सामाजिक कार्याचा क्षेत्रांमध्ये प्रगतिशील शिक्षण देण्यात प्रोत्साहित करते. एम एस डब्ल्यू कोर्स मध्ये विद्यार्थ्यांना सामाजिक व व्यावसायिक कार्यकर्ते तयार करण्यासाठी आवश्यक असे ज्ञान देते. मास्टर ऑफ सोशल वर्क msw-हा कोर्स विशेषतः जे लोक समाजाच्या कल्याणासाठी प्रयत्न करीत आहेत अशा लोकांसाठी बनवला गेला आहे.
ज्या लोकांना समाज कल्याण करायची अधिक आवड असते, समाजामध्ये जनजागृती घडविणे हे त्यांचे ध्येय असते त्या लोकांसाठी एम एस डब्ल्यू हा कोर्स अधिक उपयुक्त आहे.आजच्या काळामध्ये समाजासाठी झाड झटणारे बहुतेक लोक आहेत. बऱ्याच लोकांना असे वाटते की आपल्या समाजामध्ये गरिबी नाहीसे होऊन सर्व लोक आपापल्या आयुष्यात यशस्वी व्हायला पाहिजे अशा लोकांसाठी एम एस डब्ल्यू हा कोर्स बनविला गेला आहे.एम एस डब्ल्यू कोर्स मध्ये सामाजिक सेवेचे ज्ञान प्रदान करण्यात येते..
त्याचबरोबर एम एस डब्ल्यू कोर्समध्ये सामाजिक समस्यांचे निवारण शिकविण्यात येते. एम एस डब्ल्यू कोर्स मध्ये गरीब व्यक्ती, समाजामधील अडचणी, कुटुंबाचे निवारण अशा विविध प्रकारच्या न्यायासाठी एम एस डब्ल्यू कोर्स मध्ये आवश्यक असलेले ज्ञान व कौशल्य प्रदान केले जातात.
एम एस डब्ल्यू कोर्स करण्यासाठी लागणारी पात्रता | Eligibility msw course in marathi
एम एस डब्ल्यू कोर्स मध्ये लागणारी पात्रता ही काही विद्यापीठानुसार व देशानुसार बदलू शकते परंतु आम्ही या Msw course information in marathi लेखांमध्ये एम एस डब्ल्यू कोर्स साठी लागणारी पात्रता सामान्य परिस्थितीत काय असू शकते हे तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे.
खाली दिलेले एम एस डब्ल्यू साठी सामान्य निकष आहे जे प्रत्येक विद्यापीठ किंवा इतर देशांच्या ठिकाणी तुम्हाला गरजेचे असतात.
शैक्षणिक पात्रता
Msw course information in marathi -एम एस डब्ल्यू कोर्स करण्यासाठी तुमची शैक्षणिक पात्रता किमान बॅचलर डिग्री पूर्ण असावी लागते. तुमची बॅचलर डिग्री ही मान्यता प्राप्त विद्यापीठातून झालेली असावी. डस्टर डिग्री मध्ये तुम्ही बीएसडब्ल्यू किंवा एम एस डब्ल्यू ला लागून काही पदवी असतील त्याही केल्या तरी चालतील. बहुतेक विद्यापीठांमध्ये बीएसडब्ल्यू च्या ऐवजी तुमची कोणत्याही प्रकारची सामाजिक कार्यामध्ये असलेली बॅचलर डिग्री पदवी सुद्धा चालते.परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की जर तुम्हाला एम एस डब्ल्यू कोर्स करायचा असेल तर बीएसडब्ल्यू त्या अगोदर करून त्या गोष्टीला सर्वात जास्त प्राधान्य देण्यात येते.
GPA
बहुतेक विद्यापीठांमध्ये एम एस डब्ल्यू चा कोर्स साठी जीपीए ची आवश्यकता असते.आवश्यकतेनुसार GPA बदलू शकतो परंतु अनेकदा 4.0 स्केलवर 3.0 च्या आसपास असतो.ज्या विद्यार्थ्यांकडे मजबूत पदवीची पात्रता असेल त्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी विचार केला जाऊन जीपीएची थोड्या कमी प्रमाणात असलेल्या विद्यार्थ्यांचा सुद्धा काही ठिकाणी प्रदेशासाठी विचार केला जातो.
अभ्यासक्रम
बहुतेक विद्यापीठांमध्ये सामाजिक शास्त्र, सांख्यिकी,मानसशास्त्र, मानसी विकास यांसारख्या पदवी असायला हव्यात. तुम्ही ज्या ठिकाणी एम एस डब्ल्यू कोर्स करणार आहे त्या ठिकाणी ह्या पदवीची आवश्यकता आहे का हे निश्चित करून घ्या.
शिफारस पत्र
बहुतेक विद्यापीठांमध्ये एम एस डब्ल्यू चा कोर्स साठी शिफारस पत्र सुद्धा देण्यात येते. शिफारस पत्र ही सामाजिक कार्यामध्ये असलेल्या व्यक्ती किंवा समाजामध्ये असलेले आदर्श व्यक्ती यांच्याकडून घेतलेली असावी जे तुमच्याकडून चांगल्या प्रकारे बोलू शकतात किंवा तुमची विनंती तुमच्या विद्यापीठांसमोर मांडू शकतात.
प्रवेश परीक्षा
बहुतेक विद्यापीठांमध्ये एम एस डब्ल्यू चा कोर्स साठी प्रवेश परीक्षा घेण्यात येते. जसे की GRE (ग्रॅज्युएट रेकॉर्ड परीक्षा) किंवा MAT (मिलर अनालॉगिज टेस्ट) अशा प्रकारच्या प्रवेश परीक्षा सुद्धा घेण्यात येतात. आणि ह्या घेतलेल्या प्रवेश परीक्षांमध्ये तुम्हाला चांगले गुण मिळणे आवश्यक असते.
मुलाखत
बहुतेक विद्यापीठांमध्ये तुमची एम एस डब्ल्यू चा कोर्स साठी पात्रता बघण्यासाठी मुलाखत सुद्धा घेतली जाते. ही मुलाखत तुझी वैयक्तिकरित्या प्रत्यक्ष बसवून घेतली जाऊ शकते. एम एस डब्ल्यू चा कोर्स साठी तुम्ही किती उत्कृष्ट आहात अशा या मुलाखतीवरून अंदाज लावू शकतात.
एम एस डब्ल्यू चा कोर्स मध्ये पात्रतेसाठी नियम हे विद्यापीठानुसार बदलत असतात. यासाठी तुम्ही ज्या ठिकाणी प्रवेश घेत आहात त्या विद्यापीठाबाबत अधिक माहिती जाणून घेणे महत्त्वाच्या आहे. त्या विद्यापीठातील नियम कसे आहेत प्रवेश घेण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे हे जाणून घ्या आणि मगच आपला प्रवेश निश्चित करा.
एम एस डब्ल्यू कोर्स मध्ये प्रवेश कसा घ्यायचा? Admission msw course tips in marathi
Msw course information in marathi -मास्टर ऑफ सोशल वर्क msw मध्ये प्रवेश घेण्यासाठी विविध प्रकारचे नियम असतात. हे नेहमी लक्षात असू द्या की ज्या विद्यापीठामध्ये तुम्ही प्रवेश घेत आहात त्या विद्यापीठाचे नियम इतर विद्यापीठापेक्षा वेगळी असू शकतात. म्हणजेच एम एस डब्ल्यू च्या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यापीठांचे नियम वेगळे असू शकतात.
एम एस डब्ल्यू चा कोर्स मध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचा कोर्स करायचा आहे, याबद्दल अगोदर सविस्तर माहिती जाणून घ्या.
एम एस डब्ल्यू चा कोर्स मधील विविध चरणांचा समावेश असतो याची माहिती तपासून बघा.
एम एस डब्ल्यू चा कोर्स मधील स्पेसिलायझेशन असलेले किंवा तुम्ही फोकस केलेल्या क्षेत्र निवडा.
एम एस डब्ल्यू चा कोर्स मध्ये तुम्ही क्लीनिकल सोशल वर्क, हेल्थकेअर सोशल वर्क,बाल सोशल वर्क, कौटुंबिक सोशल वर्क अशा प्रकारचे कोर्स निवडू शकतात.
एम एस डब्ल्यू चा कोर्स साठी लागणारे तुमची पात्रता योग्य असावी. एम एस डब्ल्यू चा कोर्समध्ये कोणत्या पात्रतेची आवश्यकता आहे हे तुमच्या विद्यापीठानुसार आवश्यक तपासून बघा.
ज्या विद्यापीठांमध्ये तुम्ही प्रवेश घेत आहात त्या विद्यापीठामध्ये नियम बघून प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारी पात्रता तपासून बघा.
एम एस डब्ल्यू च्या कोर्स साठी विद्यापीठामध्ये अर्ज करावा लागतो. आणि अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे गोळा करायला सुरुवात करा.
ज्या विद्यापीठामध्ये तुम्ही प्रवेश घेणार आहात त्या विद्यापीठांमध्ये अर्ज करण्यासाठी कोण कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते हे अगोदर माहिती करून घ्या आणि त्यानुसार ते कागदपत्रे गोळा करून घ्या.
सामान्यता एम एस डब्ल्यू चा कोर्स साठी ही कागदपत्रे आवश्यक असतात.
- पदवी पूर्व संस्था कडील प्रतिलेख
- शिफारस पत्र
- उद्देशाचे विधान किंवा वैयक्तिक विधान
- प्रमाणित चाचणी गुण ( आवश्यक असल्यास)
- अर्ज फी ( लागू असल्यास)
- एम एस डब्ल्यू चा कोर्स साठी आवश्यक असणारे कागदपत्रे व फॉर्म.
ज्या विद्यापीठामध्ये तुम्ही प्रवेश घेणार आहात त्या विद्यापीठाच्या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायची सुद्धा सुविधा असते. त्या ठिकाणी ऑनलाइन तुम्ही फॉर्म भरू शकतात त्याचबरोबर फॉर्म भरायची मुदत किती तारखेपर्यंत आहे याची काळजी घ्यावी. जा विद्यापीठामध्ये तुम्ही प्रवेश प्रक्रिया करणार आहात त्या ठिकाणची अर्ज प्रक्रियेची मुदत किती तारखेपर्यंत आहे याची काळजी घेऊन त्या तारखेपर्यंत फॉर्म सबमिट करून आपली प्रवेश प्रक्रिया निश्चित करून घ्यावी.
बहुतेक विद्यापीठांमध्ये शिफारस पत्राची आवश्यकता असते. जर तुम्ही प्रवेश घेत असलेल्या विद्यापीठांमध्ये सुद्धा शिफारस पत्राची आवश्यकता असेल तर तुम्ही दोन किंवा तीन व्यक्तींकडून शिफारस पत्र अगोदर तयार करून ठेवा.
Msw course information in marathi -एम एस डब्ल्यू चा कोर्स मध्ये लागणारे तुमचे विधान यामध्ये एम एस डब्ल्यू कोर्स करण्यासाठी असलेली तुमची आवड आणि करिअरमध्ये तुम्ही काय करणार आहात हे तुमच्या वैयक्तिक मतानुसार लिहून घ्या. या विधानामध्ये एम एस डब्ल्यू कोर्स करण्याबाबत तुमच्या मधले असलेले स्वारस्य व स्पष्टीकरण वैयक्तिकरित्या चांगल्या पद्धतीने मांडून घ्या.
काही विद्यापीठांमध्ये प्रवेश प्रक्रियेसाठी मुलाखत सुद्धा घेतली जाते. जर तुमच्याही विद्यापीठांमध्ये प्रवेश प्रक्रियेसाठी मुलाखत घेत असतील तर त्या मुलाखतीसाठी उपलब्ध राहील ती मुलाखत व्यवस्थित रित्या पार पाडून आपला प्रवेश निश्चित करा.
जर तुम्ही प्रवेश घेत असलेला विद्यापीठांमध्ये प्रवेश अर्जासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारत असतील तर ते शुल्क जमा करून त्याची खात्री करून घ्या.
ज्या विद्यापीठामध्ये तुम्ही प्रवेश करणे साठी अर्ज केला आहे त्या विद्यापीठांमध्ये नेहमी जाऊन तपासत राहा की आपला प्रवेश निश्चित झाला आहे का.? त्याचबरोबर जर तुम्ही ऑनलाईन पोर्टल या माध्यमातून जर तुम्ही प्रवेश घेतला असेल तर त्या पोर्टलवर जाऊन नेहमी हे तपासात रहा की आपला प्रवेश निश्चित झाला आहे का.अर्थातच एप्लीकेशन पोर्टलचे नियमित प्रमाणे प्रवेश निश्चित होईपर्यंत तपासात रहा.
जर तुमचा प्रवेश निश्चित झाला असेल तर तुम्हाला स्वीकृतीचा एक प्रमाणपत्र देण्यात येईल आणि त्या प्रमाणपत्रांमध्ये तुमचं नाव बरोबर आहे का याची खात्री आवश्यक करून घ्या.
एम एस डब्ल्यू कोर्स साठी लागणारा कालावधी | MSW course duration in marathi
Msw course information in marathi -काही देशांमध्ये एम एस डब्ल्यू चा कोर्स साठी लागणारा कालावधी हा दोन वर्षासाठी असतो. या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये विद्यार्थी पूर्ण काळ उपस्थित राहिल्याने एम एस डब्ल्यू कोर्सचा कालावधी पूर्ण होत असतो.
एम एस डब्ल्यू कोर्स साठी लागणारा कालापती हा बीएसडब्ल्यू कोर्स केल्यानंतर चा साधारण दोन वर्षे एवढा असतो.
काही देशांमध्ये किंवा विद्यापीठांमध्ये एम एस डब्ल्यू कोर्सचा कालावधी साधारण तीन ते चार वर्षे एवढा असतो. यामध्ये विद्यार्थ्यांच्या अर्धवेळामध्ये एम एस डब्ल्यू चा कोर्स व उर्वरित वेळ त्यांच्या कामाला सुद्धा मिळत असतो.
काही विद्यापीठांमध्ये किंवा विद्यार्थ्यांनी केलेल्या बीएसडब्ल्यू या कोर्सच्या आधारावर एम एस डब्ल्यू हा कोर्स दोन वर्षाचा असतो आणि दोन वर्षाचा हा कोर्स असून त्यामध्ये फक्त अर्धवेळ असतो. जर तुम्हाला एमएसडब्ल्यू हा कोर्स कमी कालावधीत करायचा असेल तर त्यासाठी तुमचा बीएसडब्ल्यू हा कोर्स झालेला असावा. बीएसडब्ल्यू चा कोर्स कालावधीनंतर एम एस डब्ल्यू हा कोर्स काही ठिकाणी पूर्ण वेळ असून तो फक्त एक वर्षाचा सुद्धा असतो.
अचूक कालावधी माहिती करून घेण्यासाठी ज्या विद्यापीठांमध्ये तुम्ही प्रवेश घेणार आहात त्या विद्यापीठांमध्ये जाऊन याची तपासणी करून बघा. विविध विद्यापीठांमध्ये आणि विविध देशांमध्ये कालावधीमध्ये बदल असू शकतो याचे काळजी घ्या. विद्यापीठाचा पोर्टलवर सुद्धा त्याचा कालावधी दिलेला असतो ते तपासून बघा. लक्षात ठेवा की ज्या विद्यापीठांमध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे त्या विद्यापीठातील एम एस डब्ल्यू ह्या कोर्सचा कालावधी किती आहे हे तपासून बघा.
एम एस डब्ल्यू कोर्सची फी | msw course fees in marathi
Msw course information in marathi -मास्टर ऑफ सोशल वर्क msw कोर्स साठी लागणारी फी ही विद्यापीठा नुसार असते. ज्याठिकाणी विद्यापीठ आहे ते देश आणि प्रदेश, तुम्ही निवडलेले विशिष्ट विद्यापीठ किंवा संस्था, तुम्ही राज्यांतर्गत आहात किंवा बाहेर- ऑफ-स्टेट विद्यार्थी (यू.एस. युनिव्हर्सिटीसाठी), तुम्ही कोणत्याही शिष्यवृत्तीसाठी किंवा आर्थिक मदतीसाठी पात्र असाल किंवा तुम्ही पूर्ण-वेळ किंवा अर्ध-वेळ एमएसडब्ल्यू च्या कोर्स साठी केलेली नोंदणी केली असेल तर त्या ठिकाणच्या फी आकारनीबद्दल माहिती काढून घ्या.
माझ्या माहितीप्रमाणे एम एस डब्ल्यू हा कोर्स बीएसडब्ल्यू केलेल्या विद्यार्थ्यांसाठी दोन वर्षाचा असून त्यामध्ये एकूण चार सेमिस्टर असतात. साधारण 70 हजार ते दीड लाखापर्यंत या कोर्सची फी असू शकते. एम एस डब्ल्यू कोर्सची फी विद्यापीठांनुसार वेगवेगळी सुद्धा असू शकते.जर तुम्ही गव्हरर्मेंट कॉलेज निवडत असाल तर त्या ठिकाणाची फी कमी असू शकते.
तुम्ही निवडलेले स्थान व रँकिंग
तुम्ही निवडलेले एम एस डब्ल्यू च्या कोर्स साठी स्थान किंवा रँकिंग करणारे विद्यापीठ या ठिकाणी कोर्स साठी फी जास्त सुद्धा असू शकते. म्हणूनच प्रवेश प्रक्रिया करण्या अगोदर फी चे तपासणी करून घ्या.
पूर्णवेळ व अर्धवेळ
सामान्यता एम एस डब्ल्यू चा कोर्स मध्ये ज्या ठिकाणी तुम्ही पूर्ण वेळ निवडलेल्या शाखेमध्ये प्रवेश घेतला आहे त्या ठिकाणच्या अर्धवेळ कालावधीच्या एम एस डब्ल्यू कोर्स पेक्षा जास्त फी आकारणे असू शकते. अर्धवेळ ठिकाणच्या एम एस डब्ल्यू कोर्समध्ये तुमची फी आकारणी कमी असून कोसचा कालावधी वाढण्याची शक्यता असते.
आर्थिक मदत व शिष्यवृत्ती
बहुतेक विद्यापीठांमध्ये ट्यूशनच्या खर्चाची भरपाई करण्यासाठी आर्थिक मदत, शिष्यवृत्ती, फेलोशिप आणि पदवीधर असिस्टंटशिप ऑफर करतात.जर तुम्हाला हा खर्च कमी करण्यासाठी अशा काही गोष्टी आवश्यक असतील तर त्यासाठी तुम्हाला एक चांगले विद्यापीठ शोधणे अधिक गरजेचे आहे.
अतिरिक्त खर्च
ज्या विद्यापीठामध्ये तुम्ही आपला एम एस डब्ल्यू चा कोर्स निश्चित केला आहे त्या ठिकाणी कोर्स साठी लागणारी फी या व्यतिरिक्त कोणते कोणत्या प्रकारचा खर्चा आहे हे तपासून बघा. त्या ठिकाणी तुमचा राहण्याचा खाण्याचा किंवा इतर काही एम एस डब्ल्यू कोर्स साठी लागणाऱ्या सामग्रीचा खर्च कसा आहे याबद्दल अधिक माहिती काढून घ्या. एम एस डब्ल्यू कोर्स करताना तुम्हाला कोण कोणत्या सामग्रीची आवश्यकता असेल आणि त्या सामग्रीसाठी तुम्हाला किती फी आकारावी लागेल याची तपासणी करून घ्यावी.
माझ्या मते जर तुम्ही एम एस डब्ल्यू पोस्टमध्ये प्रवेश निश्चित करत असाल तर तुम्ही त्या विद्यापीठांमध्ये जाऊन अधिक माहिती काढून त्या विद्यापीठांमध्ये एम एस डब्ल्यू च्या कोर्स साठी किती फी आहे याची अधिक माहिती काढून घ्यावी. त्याचबरोबर विद्यापीठाच्या पोर्टलवर विद्यापीठाने दिलेली फी ही बरोबर आहे का याबद्दल माहिती असावी. जर तुम्हाला एम एस डब्ल्यू कोर्स मध्ये आपला प्रवेश निश्चित करायचा असेल तर माझ्या मते त्या विद्यापीठाच्या वेबसाईटला भेट देऊन त्या ठिकाणाची फी किती आहे ही सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करावा.
विविध विद्यापीठानुसार किंवा देशानुसार एम एस डब्ल्यू कोर्सची फी ही वेगवेगळ्या प्रकारची असू शकते.
एम एस डब्ल्यू फोर्स केल्यानंतर नोकरीच्या संधी | msw course job opperchunity
मास्टर ऑफ सोशल वर्क एम एस डब्ल्यू कोर्स केल्यानंतर साधारण सामाजिक कार्यामध्ये किंवा सामाजिक कार्यासंबंधीत तुम्हाला विविध प्रकारच्या नोकरीच्या संधी उपलब्ध असतात.
MSW पदवीधरांना खोलवर सामाजिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी तसेच व्यक्ती, कुटुंबे आणि समुदायांना समर्थन, समुपदेशन आणि वकिली प्रदान करण्यासाठी प्रशिक्षित केले जाते. MSW पदवी घेऊन तुम्ही जी विशिष्ट नोकरी करू शकता ती तुमच्या स्पेशलायझेशन आणि आवडींवर अवलंबून असू शकते. MSW असलेल्या व्यक्तींसाठी येथे काही सामान्य नोकरी पर्याय आहेत:
क्लीनिकल सोशल वर्कर
क्लीनिकल सोशल वर्कर मध्ये भावनिक व मानसिक आरोग्यासामोरे जाणाऱ्या व्यक्तींना कुटुंबाला समुपदेशन व थेरपी आणि मानसिक आरोग्याचे सहाय्यक बनवितात. क्लीनिकल सोशल वर्कर मध्ये दवाखाना, रुग्णालय, खाजगी शाळा, आणि खाजगी काही असलेले क्लीनिकल सोशल वर्कर प्रोजेक्ट यामध्ये नोकरीच्या संधी मिळतात.
वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता
वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते हे हेल्थकेअर या ठिकाणी कार्यरत असतात.जसं की रुग्णालय, दवाखाने, हॉस्पिटलची एजन्सी या ठिकाणी ते कार्यरत असतात.
शालेय सामाजिक कार्यकर्ता
Msw course information in marathi -शालेय सामाजिक कार्यकर्ते हे शालेय विद्यार्थ्यांसाठी सामाजिक, भावनिक व सांगली वर्तणूक घडवून आणण्यासाठी शैक्षणिक घटकांमध्ये काम करत असतात. शालेय सामाजिक कार्यकर्ते हे गुंडागिरी कौटुंबिक वातावरण यामध्ये समस्यांचे निवारण करून चांगला बदल घडवून आणू शकतात.
बाल व कौटुंबिक सामाजिक कार्यकर्ता
बाल आणि कौटुंबिक सामाजिक कार्यकर्ते बाल शोषण, दुर्लक्ष, दत्तक, पालनपोषण आणि कौटुंबिक संकट यासारख्या समस्यांना तोंड देत असलेल्या मुलांना आणि कुटुंबांना मदत करून त्यांना त्या समस्यांमधील बाहेर काढण्याचे काम करतात.ते सरकारी संस्था, ना-नफा संस्था किंवा खाजगी ठिकाणी सुद्धा काम करू शकतात.
जेरियाट्रिक सोशल वर्कर
जेरियाट्रिक सोशल वर्कर्स वृद्ध लोकसंख्येसोबत काम करण्यात, वृद्धत्व, दीर्घकालीन काळजी, स्मृतिभ्रंश आणि आयुष्याच्या शेवटच्या नियोजनाशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यात माहिर असतात. ते सहसा नर्सिंग होम, वरिष्ठ केंद्रे किंवा आरोग्य सुविधांमध्ये काम करतात.
समुदाय संघटक किंवा विकास कार्यकर्ता
हे व्यावसायिक सामाजिक समस्या ओळखण्यासाठी, कार्यक्रम विकसित करण्यासाठी आणि सकारात्मक बदलासाठी समर्थन देण्यासाठी समुदायांसोबत काम चांगल्या प्रकारे करू शकतात ते गरिबी, गृहनिर्माण, शिक्षण किंवा सार्वजनिक आरोग्य यासारख्या समस्यांवर लक्ष केंद्रित करू शकतात. आणि या ठिकाणी सुद्धा चांगल्या नोकरीचे पर्याय असतात.
पदार्थ दुरुपयोग समुपदेशन
मादक द्रव्यांचे सेवन समुपदेशक व्यसनाधीनतेशी लढा देत असलेल्या व्यक्तींना आणि कुटुंबांना उपचारासाठी, सामना करण्याच्या रणनीती विकसित करण्यासाठी आणि पुनर्प्राप्तीसाठी कार्य करण्यास मदत करतात. ते व्यसनमुक्ती केंद्र, रुग्णालये किंवा खाजगी प्रॅक्टिसमध्ये काम करू शकतात.
मानसिक आरोग्य समुपदेशक
वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्यांप्रमाणेच, मानसिक आरोग्य समुपदेशक प्रामुख्याने मानसिक आरोग्य समस्यांशी निगडित व्यक्तींसाठी समुपदेशन आणि उपचार प्रदान करण्यावर माहीर असतात.ते खाजगी प्रॅक्टिस आणि मानसिक आरोग्य क्लिनिकसह अशा विविध कार्यरत असतात.
धोरण विश्लेषक किंवा संशोधक
काही MSW पदवीधर संशोधन किंवा धोरण विश्लेषण भूमिकांमध्ये काम करतात, जेथे ते सामाजिक धोरणांचे मूल्यांकन करतात, संशोधन करतात आणि असुरक्षित लोकसंख्येवर परिणाम करणाऱ्या धोरणांमधील बदलांसाठी समर्थन करतात.
फॉरेन्सिक सोशल वर्कर
फॉरेन्सिक सोशल वर्कर्स फौजदारी न्याय प्रणालीमध्ये गुंतलेल्या व्यक्तींसोबत काम करतात, ज्यात कैदी, प्रोबेशनर आणि पॅरोली यांचा समावेश आहे. तुरुंगामध्ये असणारे कैदी यांबरोबर कशी वर्तणूक केली पाहिजे किंवा कैदींनी कोणत्या प्रकारे वर्तणूक करून आपली गुन्हे कशाप्रकारे कमी होईल हे शिकविले जाते. ते गुन्हेगारी वर्तनाशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी समुपदेशन, केस व्यवस्थापन आणि समर्थन प्रदान करतात.
नानफा कार्यक्रम व्यवस्थापक
ना-नफा संस्था अनेकदा सामाजिक सेवा कार्यक्रमांवर देखरेख आणि प्रशासन करण्यासाठी MSW पदवीधरांना प्रोग्राम व्यवस्थापक म्हणून नियुक्त करतात.ना नफा कार्यक्रम व्यवस्थापक मध्ये सामाजिक कार्यक्रमासाठी देखरेख करणे सुद्धा अतिशय सोपे चांगले कामगिरी आहे. या भूमिकेमध्ये प्रोग्राम डेव्हलपमेंट, बजेटिंग आणि क्लायंट आणि कर्मचार्यांसह काम करणे समाविष्ट आहे.
खाजगी प्रॅक्टिस थेरपिस्ट
काही MSW पदवीधर व्यक्ती, जोडपे आणि कुटुंबांना समुपदेशन आणि थेरपी सेवा ऑफर करून त्यांच्या खाजगी थेरपी पद्धती उघडणे निवडतात. यासाठी सामान्यत: परवाना मिळवणे आणि क्लायंट बेस तयार करणे आवश्यक आहे.तुम्ही सुद्धा हे चांगल्या पद्धतीने करू शकतात जर तुम्हाला यामध्ये आवड असेल तर तुम्ही खाजगी प्रॅक्टिस थेरपीसट नक्की बनवू शकतात.
एम एस डब्ल्यू कोर्स केल्यानंतर यामध्ये तुम्ही स्पेशलिस्ट होऊ शकतात.
- Clinical Social Worker
- Medical Social Worker
- School Social Worker
- Child and Family Social Worker
- Geriatric Social Worker
- Community Organizer or Development Worker
- Substance Abuse Counselor
- Mental Health Counselor
- Policy Analyst or Researcher
- Forensic Social Worker
- Nonprofit Program Manager
- Private Practice Therapist
एम एस डब्ल्यू कोर्स केल्यानंतर रोजगार मिळणारी क्षेत्र
Msw course information in marathi -मास्टर ऑफ सोशल वर्क एम एस डब्ल्यू केल्यानंतर विविध प्रकारच्या क्षेत्रांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध आहे. एम एस डब्ल्यू पदवीधर लोकं सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी त्याचबरोबर सामाजिक समस्यांचे निवारण करण्यासाठी व समुपदेशन करण्यासाठी, समाजाला समर्थन व न्याय प्रदान करण्यासाठी ज्ञान व कौशल यांनी सुसज्ज असतात.
मानसिक आरोग्य आणि समुपदेशन
खाजगी सराव- ज्या विद्यार्थ्यांनी एम एस डब्ल्यू ही पदवी प्रदान केले आहे ते स्वतःचा व्यवसाय खाजगी समुपदेशन व थेरपी समुपदेशात याबाबत सुरू करू शकतात.
मेंटल हेल्थ क्लिनिक-एम एस डब्ल्यू पदवीधर थेरेपी, मानसिक समुपदेशन क्लीनिकल सोशल वर्कर म्हणून सुद्धा काम करू शकतात.
मादक द्रव्यांचा गैरवापर उपचार केंद्र- या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते जे असतात ते इतर सर्वांना व्यसनमुक्त होण्यास मदत करत असतात.
शाळा आणि कौटुंबिक
शालेय सामाजिक कार्यकर्ते- सामाजिक कार्यकर्ते विद्यार्थ्यांच्या सामाजिक,भावनिक व कौटुंबिक समस्या जाणून त्यांच्यामध्येच कारण भावना वाढवण्याचे काम करतात.
महाविद्यालय व विद्यापीठ समुपदेशन केंद्र- MSW व्यावसायिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना समुपदेशन आणि समर्थन प्रदान करतात.
बाल आणि कौटुंबिक सेवा
बालकल्याण एजन्सी- बाल संरक्षण सेवेमध्ये सामाजिक कार्यकर्ते बाल शोषण व बालका कडे दुर्लक्ष केल्यास त्यांचे अंमलबजावणी करून समाजामध्ये सकारात्मक भावना पसरवितात.
दत्तक एजन्सी- सामाजिक कार्यकर्ते ज्या पालकांना मूल दत्तक हवे असते त्यांना बालके दत्तक घेण्यास मदत करता. व ज्या पालकांना मूलदत्त द्यायचे असते त्यांना देखील ते मदत करायचे कार्य करत असतात. दत्तक पालकांना व दत्तकांना आधार देण्याचे काम सामाजिक कार्यकर्ते करत असतात.
कौटुंबिक सेवा एजन्सी- एम एस डब्ल्यू व्यवसायिक कुटुंबांना पालकत्व व ते काही संकटात असतील तर त्यांना मदत करत असतात.
जेरंटोलॉजी व वृद्ध सेवा
नर्सिंग होम व सहाय्यक राहण्याच्या सुविधा- एम एस डब्ल्यू करणारे सामाजिक कार्यकर्ते वृद्ध लोकांना सामाजिक व आर्थिक मदत करत असतात त्याचबरोबर त्यांना भावनिक व सामाजिक मदत देखील करत असतात.
वरिष्ठ केंद्रे- एम एस डब्ल्यू झालेले व्यवसायिक वरिष्ठ लोकांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करत असतात.
एजिंग एडवोकेट ऑर्गनायझेशन- एम एस डब्ल्यू झालेले वृद्ध लोकांना समर्थन देण्यासाठी विविध प्रकारची धोरणे व कार्यक्रम समाजामध्ये राबवत असतात.
समुदाय व ना नफा संस्था
गरिबी, बेघरपणा, भूक आणि सामाजिक न्याय यांसारख्या समस्यांचे निराकरण करणार्या संस्थांमध्ये सामाजिक कार्यकर्ते कार्यक्रम व्यवस्थापक, समुदाय आयोजक आणि केस मॅनेजरसह विविध भूमिकांमध्ये काम करू शकतात.
आंतरराष्ट्रीय व मानवतावादी संघटना
MSW व्यावसायिक आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थांसोबत काम करू शकतात, जगाच्या विविध भागांतील असुरक्षित लोकसंख्येला समर्थन आणि सेवा प्रदान करतात.
कर्मचारी सहाय्य कार्यक्रम (EAP)
संस्थांमधील EAPs वैयक्तिक आणि कामाच्या ठिकाणी समस्या हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना गोपनीय समुपदेशन आणि समर्थन प्रदान करतात.
पदार्थ दुरुपयोग उपचार सुविधा
MSW व्यावसायिक व्यसनमुक्ती उपचार केंद्रांमध्ये काम करू शकतात, पुनर्प्राप्तीसाठी इच्छुक व्यक्तींना थेरपी आणि समर्थन प्रदान करू शकतात.
गृहनिर्माण आणि बेघर सेवा
या क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते व्यक्ती आणि कुटुंबांना घरे सुरक्षित करण्यात आणि सहाय्यक सेवांमध्ये प्रवेश करण्यास मदत करतात.
वर दिलेली ही एम एस डब्ल्यू कार्यकर्त्यांकरता काही सामाजिक रोजगारक्षेत्र आहे. ज्या ठिकाणी त्यांच्या व्यवसायाचा अधिक प्रभाव पडू शकेल. सामाजिक क्षेत्र हे विविध गोष्टींनी सामावलेले आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणते रोजगाराच्या क्षेत्र निवडतात हे तुमच्यावर अवलंबून आहे. एम एस डब्ल्यू ही पदवी प्रदान केल्यानंतर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही केलेल्या एम एस डब्ल्यू च्या स्पेशलायझेशन नुसार तुमच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
Here are some common employment areas for MSW professionals in marathi:
Healthcare Settings
- Hospitals
- Hospice and Palliative Care
- Rehabilitation Centre’s
Mental Health and Counselling
- Private Practice
- Mental Health Clinics
- Substance Abuse Treatment Centre’s
Schools and Educational Settings
- School Social Workers
- College and University Counseling Centre’s
Child and Family Services
- Child Welfare Agencies
- Family Services Agencies
Gerontology and Aging Services
- Nursing Homes and Assisted Living Facilities
- Senior Centers
- Aging Advocacy Organizations
Policy and Research
- Government Agencies
- Research Institutions
Community and Nonprofit Organizations
International and Humanitarian Organizations
Employee Assistance Programs (EAP)
Substance Abuse Treatment Facilities
Housing and Homelessness Services
वारंवार विचारले जाणारे प्रश्न | FAQ
एम एस डब्ल्यू चा फुल फॉर्म काय आहे?
एम एस डब्ल्यू चा फुल फॉर्म मास्टर ऑफ सोशल वर्क असा आहे.