यंदा च्या वर्षी द्या अशा पद्धतीने गणेश चतुर्थी च्या शुभेच्छा | happy ganesh chaturthi 2023 in marathi

नमस्कार मंडळी,

आजच्या या happy ganesh chaturthi 2023 in marathi लेखामध्ये आपण गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा कोणकोणत्या प्रकारे आपल्याला सोशल मीडियाद्वारे देता येतील हे बघणार आहोत. चला तर मग मित्रांनो गणेश चतुर्थीच्या आगळ्यावेगळ्या शुभेच्छा देण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

ganpati basvinyacha Muhurta 2023 in marathi | 2023 साली गणपती बसविण्याचा मुहूर्त 

 2023 साली गणपती बसविण्याचा शुभ मुहूर्त  19 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजून 7 मिनिटांनी तर दुपारी 1 वाजून 34 मिनिटापर्यंत हा मुहूर्त असणार आहे. लक्षात ठेवा की राहू काळामध्ये गणपतीची पूजा करू नये आणि गणपती घरामध्ये आणू नये. 

ganpati basvinyacha Muhurta 2023 in marathi
2023 साली गणपती बसविण्याचा मुहूर्त 

Ganesh chaturthi puuja vidhi 2023 in marathi | गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती घरात आणल्यानंतर पूजा कशाप्रकारे करावी? 

ज्या दिवशी गणेश चतुर्थी आहे म्हणजे तो दिवसच 19 सप्टेंबर 2023 रोजी सर्वप्रथम सकाळी उठून स्नान करावे.

अंघोळ झाल्यानंतर आपली  ज्या ठिकाणी आपण दिवे लावतो जसे की अंगणामध्ये तुळशीजवळ त्या ठिकाणी दिवे लावून घ्यावे.

अंगणामध्ये सुशोभित अशी रांगोळी टाकावी. त्यानंतर तुमच्या घराला जर पायऱ्या असतील तर त्यावर तुम्ही स्वस्तिक लक्ष्मीची पावलं अशा प्रकारची रांगोळी टाकू शकतात.

देवघरा मधील देवपूजा आवरून झाल्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला गणपती बसवायचा आहे  ते ठिकाण अगोदर बहुत आणि पुसून घ्यावे व त्यानंतर गुलाबजल टाकून पुसून घ्यावे.

ज्या ठिकाणी आपल्याला गणपती बसवायचा आहेत ते ठिकाण सुशोभित मस्तपैकी तोरण लावून, वेगवेगळ्या  प्रकारच्या फुलांच्या माळा लावून सजवून घ्यावी. 

तुम्ही जर टेबलावर गणपती बसवित असणार तर त्यावर एक चौरंग ठेवून, लाल रंगाचे वस्त्र टाकावे.

तांदळांनी स्वस्तिक काढावे. त्यावर हळदीकुंकू टाका. 

आणि त्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती त्या ठिकाणी स्थापन करा.

 मूर्ती स्थापन केल्यानंतर गणपती बाप्पाचा गंगाजलने अभिषेक करा.

गणपती बाप्पा समोर छान एखादी रांगोळी काढा.

गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन केल्यानंतर त्या बाजूला नारळाचा एक कळस सुद्धा मांडला जातो. जर तुमच्याकडे ही प्रथा असेल तर तुम्ही नागवेलच्या पाना लावून हा काळच मांडू शकतात.

बहुतेक लोक गणेश चतुर्थीच्या दिवशी उपवासही करतात.

2023 साली गणेश चतुर्थीच्या दिवशी मंगळी गणेश चतुर्थी येत असल्याने बरेच लोक उपवासही करत आहेत. शक्य असल्यास तुम्हीही उपवास करा.

 happy ganesh chaturthi 2023 in marathi 1
happy ganesh chaturthi 2023 in marathi

गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन केल्यानंतर अशा प्रकारे पूजा करा. 

गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन करण्या अगोदरच त्या ठिकाणी दिवा लावून घ्या. जेव्हा आपण कोणत्याही प्रकारची पूजा करत असतो तेव्हा दिवा हा साक्षीदार असतो असे म्हटले जाते. म्हणून सर्वप्रथम दिवा लावून घ्या.

गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन केल्यानंतर त्यावर एक नागवेलचे पान घेऊन त्यावर गणपती किंवा गणपतीच्या रूपात सुपारी ची स्थापना करा.

गणपतीच्या रूपात स्थापन केलेल्या सुपारी समोर पंचखाद्य नैवेद्य ठेवा.

पंचखाद्य नैवेद्यामध्ये  खोबरे, गुळ, खारीक, हळकुंड, बदाम असा नैवेद्य ठेवावा. 

गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन झाल्यानंतर गणपती बाप्पाचा गंगाजल् ने अभिषेक करा.

गणपती बाप्पाला शेंदूर लावा.

त्यानंतर गणपती बाप्पाला तुमच्याकडे असलेली फुले किंवा जास्वंदीचे फुल अर्पण करा.

आता गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करा. गणपती बाप्पाला तुमच्याकडे जेवढ्या असतील तेवढ्या जसे की 21, 101, 51 अशा दुर्वा अर्पण केल्या तरी चालतील.

आता गणपती बाप्पाला पाच फळे ठेवा.

जसे की पाच वेगवेगळ्या झाडांची पाने ज्याला आपण पत्री म्हणतो ती अर्पण करा. 

गणपती बाप्पाला भोग लावा.

गणपती बाप्पाच्या भोगामध्ये तुम्ही मोदक सुद्धा ठेवू शकता.

गणपती बाप्पाची विशेष प्रकारचे पूजा विधी झाल्यानंतर गणपतीची आरती करून घ्यावी.

happy ganesh chaturthi 2023 in marathi

अखेर एकोणवीस सप्टेंबर रोजी सर्वांच्या घरी गणपती बाप्पाच्या आगमन होणार. लहानांचा तसेच मोठ्यांचा सुद्धा आवडता गणपती बाप्पाला आपण सर्वांनी मिळून मोठ्या जल्लोषात स्वागत करतो. तसेच गणेश चतुर्थीच्या दिवशी शुभेच्छांचाही वर्षाव दमदार होतो. म्हणूनच आजच्या happy ganesh chaturthi 2023 in marathi या लेखांमध्ये गणपती बाप्पा वर शुभेच्छांचा वर्षाव करण्यासाठी घेऊन आलोय विविध प्रकारच्या शुभेच्छा. गणपती बाप्पा घरी आल्यानंतर जो तो आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या गणपती शुभेच्छा देत असतो. आणि गणपती बाप्पा आपल्या घरी आगमन केल्यानंतर शुभेच्छा आपण आपल्या मराठमोळ्या भाषेतून द्यायलाच पाहिजे. 

गणपती बाप्पा घरी येणार म्हणून विविध प्रकारच्या शुभेच्छा आपण एकमेकांना देत असतो. कारण गणपती बाप्पा आपल्या घरी येण्याचा उत्साह हा जणू काही एक वेगळा आनंदा आपल्या घरात घेऊन आलेला असतो. गणपती बाप्पा आपल्या घरात आल्यानंतर आपण गणपती बाप्पा मोरया बोलून गणपतीचा शुभेच्छांनी वर्षाव करत असतात तर मित्रांनो गणपतीचा शुभेच्छांनी वर्षाव करून झाल्यानंतर आपण आपल्या आजूबाजूच्या मित्रमंडळी, नातेवाईक आणि इतर काही आपल्याला जवळचे लोक यांना नको का शुभेच्छा द्यायला? द्यायलाच हव्यात….

 happy ganesh chaturthi 2023 in marathi 2
happy ganesh chaturthi 2023 in marathi 2

आताच्या काळात तर आपण मोबाईल मध्ये शुभेच्छा देत असतो, आणि ह्या शुभेच्छा जोरदार व जल्लोषात देण्यासाठी आम्ही आपल्यासाठी विविध प्रकारच्या गणपती उत्सवामध्ये गणेश चतुर्थी शुभेच्छा घेऊन आलो आहोत. 

 अशा प्रकारे द्या गणेश चतुर्थी च्या दिवशी शुभेच्छा

happy ganesh chaturthi 2023 in marathi-

गणपती बाप्पाचे आपल्या घरी जल्लोषांमध्ये आगमन झाल्यानंतर अशा प्रकारे गणपतीच्या शुभेच्छा द्या….


जास्वंदीच्या फुलांचा हार चढवला,

21 मोदकांचा नैवेद्य दाखविला, 

गणपती बाप्पा वर गुलाल उधळला,

घरोघरी गणपती बाप्पा आला…. 

गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा….


देवा सर्वांच्या मनातील इच्छा पूर्ण होऊ देत,

सर्वांना निरोगी आणि खुश राहू देत,

अशी मनोकामना करून गणपतीच्या चरणी..

आजच्या या मंगलदिनी गणेश चतुर्थीच्या दिवशी…

करतो गणपती रायाच्या चरणी ही मागणी… 


आले आले गणपती बाप्पा,

इच्छा होतील आता सर्व पूर्ण..

इच्छापूर्तीला करूया विनवणी,

होऊ दे ह्या वर्षी माझी मागणी पक्की..


येणारे सर्व दुःख  बापाचा उंदरा एवढी असो,

बाप्पाच्या सोंडे एवढा आयुष्य तुमचं दीर्घायुष्य असो..

मोदकाप्रमाणे प्रत्येक क्षण गोड असो..

हीच गणपतीच्या चरणी प्रार्थना करून ,

तुम्हाला गणेश चतुर्थीच्या दिवशी अनंत शुभेच्छा…


आयुष्यामध्ये किती जरी अडचणी..

असल्या तरी फक्त अडचणी..

दूर करण्याचे सामर्थ्य फक्त बाप्पा मुळेच मिळते.. 

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा….. 


बाप्पाचा आगमन झालं घरी,

सुख समृद्धी नांदो आपल्या दारी,

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…


एक, दोन, तीन, चार गणपतीचा जयजयकार….


गणपती बाप्पा मोरया…


गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..


येत्या गणेश चतुर्थीला सर्वांच्या मनोकामना पूर्ण होवो

हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना… 


सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…

Leave a Comment