Site icon Marathi Delight

महाराणा प्रताप यांचा इतिहास | Maharana Pratap history in marathi

Maharana Pratap history in marathi

Maharana Pratap history in marathi

नमस्कार मंडळी,

आजच्या लेखामध्ये आपण इतिहासाच्या कान्या कोपऱ्यात गुंजणारे नाव “महाराणा प्रताप” यांचा इतिहास Maharana Pratap history in marathi आजच्या लेखामध्ये बघणार आहोत. महाराणा प्रताप यांच्या विषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न या लेखांमध्ये आपण करणार आहोत. महाराणा प्रताप यांचे  युद्ध, चेतक घोडा, आणि अजून बरच काही, महाराणा प्रताप यांच्या विषयी हा लेखांमध्ये आपण बघणार आहोत. 

महाराणा प्रताप माहिती मराठी | Maharana Pratap information in marathi 

महाराणा प्रताप माहिती मराठी- भारताच्या कान्या कोपऱ्यात गुंजणारे नाव “महाराणा प्रताप” हे शौर्य आणि वचनबद्धतेचे प्रतीक होते. महाराणा प्रताप यांची गाथा अपरंपार आहे. महाराणा प्रताप मेवाड च्या लोकांचे राजा होते. मेवाड हे स्थान राजस्थान या राज्यामध्ये येते. महाराणा प्रताप हे एक शूर राजपूत घराण्यातील होते. महाराणा प्रताप यांनी सदैव आपल्या प्रजेचे निस्वार्थपणे रक्षण केले. त्याचबरोबर महाराणा प्रताप हे फक्त लढाऊ नसून एक चांगले धार्मिक व्यक्ती सुद्धा होते.महाराणा प्रताप यांच्या आई जयवंतबाई ह्या त्यांच्या पहिल्या शिक्षिका होत्या. महाराणा प्रताप हा असा योद्धा होता ज्याला अकबराने सुद्धा सलाम केलेला आहे. महाराणा प्रताप यांच्या यशाच्या अनेक गाथा आहेत.

महाराणा प्रताप यांचा इतिहास | Maharana Pratap history in marathi

Maharana Pratap history in marathi

जीवन परिचय प्रताप चरित्र
जन्म9 मे इ.स 1540
पूर्ण नावमहाराणा प्रताप सिंह सिसोदिया
वडीलराणा उदयसिंह
आईमहाराणी जयवंता बाई 
पत्नीमहाराणी अजब देह बाई
घोडाचेतक
पुत्रअमरसिंग
राज्याभिषेक1 मार्च इ.स 1572
राजधानीउदयपूर 
राजघराणेहिंदू सनातनी क्षत्रिय  सिसोदिया
मृत्यू11 जानेवारी इस 1597
Maharana Pratap history in marathi

महाराणा प्रताप Maharana Pratap history in marathi – महाराणा प्रताप हे क्षत्रिय सिसोदिया कुळातील क्षत्रिय राजपूत होते. महाराणा प्रताप हे मेवाडचे असून त्यावर बाप्पा रावळ, राणा कुंभा आणि राणा संगा अशा अनेक राज्यकर्त्यांनी राज्य चालविली. महाराणा प्रताप यांचा जन्म 9 मे इ.स 1540  झाला.असं म्हटले जाते की महाराणा प्रताप यांचा जन्म कुंभलगड किल्ल्यावर झाला आहे परंतु बऱ्याच लोकांचे असेही म्हणणे आहे की महाराणा प्रताप यांचा जन्म मारवड मधील पालीच्या वाड्यामध्ये झाला आहे. उदयसिंह आणि जयवंत बाई यांचे लग्न कुंभलगड किल्ल्यावर झाले होते म्हणून बरेच जण असे म्हणतात की महाराजांचा जन्म ही तिथेच झाला आहे.

Maharana Pratap information in marathi

महाराणा प्रताप यांच्या आईचे नाव राणी जयवंतबाई असे होते आणि त्या सोनगरा येथील अखेराजसिंह यांच्या सुपुत्रि होत्या. परंतु “विजय निहार” यांनी लिहिलेले पुस्तक “हिंदूसूर्य महाराणा प्रताप” ह्या पुस्तकांमध्ये असे संबोधित केले आहे की, जेव्हा महाराणांचा जन्म झाला त्यावेळेस मेवाड राज्य असुरक्षितेने  घेरलेले होते आणि राज्यात युद्ध चालू असताना कुंभलगड हा बिलकुल सुरक्षित रित्या नव्हता म्हणूनच राणी जयवंता बाईंना पाली आणि मारवाड हे दोनच ठिकाण सुरक्षित असल्यामुळे तिकडे हलविण्यात आले. म्हणूनच म्हटले जाते की महाराणा प्रताप यांचा जन्म पाली मारवड 9 मे इ.स 1540 शुक्ल तृतीया शके रोजी झाला.

उदयसिंह यांचे युद्ध चालू असतानाच महाराणा प्रताप यांच्या जन्माची बातमी सैन्यांकडून उदयसिंह यांना मिळाली, आणि युद्धामध्ये उदयसिंह यांनी विजय मिळविला. आणि चित्तोडच्या गादीवर ताबा घेण्यात यश मिळविले. त्याचबरोबर देवेंद्र सिंग शक्तिवत यांच्या मते त्यांनी लिहिलेल्या पुस्तकात महाराजांचा जन्म जुना कचरी ह्या किल्ल्यात झालेले आहे असे ते म्हणतात याचे कारण असे की मुलीचे पहिले बाळतपण तिच्या माहेरी होते म्हणून राणी जणवंताबाई यांनी सोनगर येथे महाराणा यांना जन्म दिला. 

महाराणा प्रताप यांचे बालपण खूप चांगले गेले. महाराणांना लहानपणापासूनच प्रजेबरोबर अधिक वेळ घालवायला खूप आवडत. त्या ठिकाणी भिल समाज हा अधिक प्रमाणात होता. भिल समाज अधिक असल्यामुळे महाराणा बरोबर भिल समाजातील मित्र सुद्धा तेवढेच होते. महाराणा लहानपणापासूनच सशस्त्र युद्धाचे धडे शिकत होते आणि सोबतच आपल्या भिल समाजातील मित्रांना सुद्धा युद्धाबद्दल सशस्त्र धडे शिकवत होते. सामान्य जनतेबरोबर मिळून मिसळून राहणं, हा महाराणांचा स्वभाव होता आणि यामुळे भिल समाजातील ज्येष्ठ नागरिक आणि सामान्य जनता ही महाराणांचा नेहमी आदर करत.

महाराणा प्रताप Maharana Pratap history in marathi – यांना तीन लहान बंधू व दोन सावत्र बहिण होत्या. शक्ती सिंह, विक्रम सिंह आणि जगमल सिंह हे महाराणा प्रताप यांच्या लहान बंधूंची नावे आहेत. चांद कवर आणि मान कवर ही नावे महाराणा प्रताप यांच्या सावत्र बहिणींचे आहेत. महाराणा प्रताप यांच्या 11 राण्या होत्या. महाराणा प्रताप यांचा विवाह बिजोलियाच्या राजकुमारी महाराणी अजब देह बाई यांच्याशी 1557 साली पार पडला. या व्यतिरिक्त महाराजांचा दहा राजकुमारींशी राजकीय संबंध चांगले ठेवण्यासाठी विवाह करण्यात आला. राणी अजब देहबाई यांच्याकडून अमरसिंह आणि बाकी राण्यांकडून सतरा मुले महाराणांना झाली.

महाराणा प्रताप यांचा राज्याभिषेक

चित्तोडगडावर मुघल सम्राट अकबर यांनी सुमारे 35000 सैन्यासोबत चित्तोड गडाला  वेढा घातला. हा वेडा सुमारे चार महिने एवढा प्रदीर्घ काळ चालणारा होता आणि ह्या चार महिन्यांमध्ये चित्तोडगडामधील असलेला अन्नाचा साठा संपत आलेला होता. अशा परिस्थितीत किल्ल्यावर सुमारे 30000 सामान्य जनता आणि 8000 राजपूत सैनिक उपस्थित होते. अशा परिस्थितीत राजघराणे सुरक्षित रहावे म्हणून सल्लागारांचा सल्ला ऐकून उदयसिंह त्या ठिकाणाहून निसटले. शत्रूला किल्ल्याचा ताबा मिळवण्या अगोदर राजघराणे तेथून निघून गेले. मेवाडचे राजघराणे तर सुरक्षित झाले परंतु तेथे असलेली सामान्य जनता, आठ हजार राजपूत यांनी वीरमरण पत्करून आपल्या प्राणची आहुती दिली. मेवाडच्या सैनिकांनी सुद्धा अकबराच्या 25000 सैन्याचे बळी घेतले आणि स्वतःही वीरमरण पत्करले. परंतु अकबरने याचा बदला 30000 सामान्य जनतेचा बळी घेऊन केला. 

महाराणा प्रताप Maharana Pratap history in marathi – उदयसिंह यांनी 1559 मध्ये “उदयपूर” या शहराची स्थापना केली आणि त्यानंतर प्रिय राणी भटियानी आणि महाराजांचा मुलगा जगमल सिंह याने आता राज्यकारभार सांभाळावा अशी उदयसिंह महाराजांची इच्छा होती. परंतु घडले असे की महाराजा उदयसिंह यांच्या मृत्यूनंतर वरिष्ठ सर्व मुख्यमंत्र्यांची इच्छा अशी होती की महाराजांचे ज्येष्ठ पुत्र प्रताप यांनी राज्यकारभार सांभाळावा. परंतु बऱ्याच लोकांचा प्रताप यांचा राज्याभिषेक व्हावा यासाठी नकारे होता.

म्हणूनच त्या अगोदर मुख्यमंत्री चंदावर आणि तोमर राम शाह यांनी जगमलला राजवाडा बाहेर हाकलून लावले आणि त्यानंतर महाराणा प्रताप यांना मेवाडचा राजा म्हणून घोषित करण्यात आले. महाराणा प्रताप यांची वडिलांच्या विरोधात जाण्याची बिलकुल ही इच्छा नव्हती त्यांना राजा होण्यात कोणत्याही प्रकारचा रस नव्हता परंतु सर्व वरिष्ठ मंडळी आणि मंत्र्यांचा सल्ला ऐकून प्रताप यांनी हा निर्णय घेतला. सर्वसामान्य जनता,मंत्री आणि वरिष्ठ मंडळी यांनी महाराणा प्रताप यांना पटवून दिले की तुम्ही संपूर्ण राज्य चालवण्यास समर्थ आहात आणि तुम्ही लोकप्रिय राजाही बनु शकतात. त्यामुळे महाराणा प्रताप यांनी हा निर्णय घेतला.

राज गादीवर बसल्यानंतर महाराणा प्रताप यांनी राज्यकारभार चांगल्या पद्धतीने आणि कुशग्र  बुद्धीने सांभाळला. एक कुशल योद्धा म्हणून आपली ओळख राज्यात निर्माण केली. महाराणा प्रताप Maharana Pratap history in marathi ह्या लेखामध्ये आपण महाराणा प्रताप यांचे हळदी घाटी युद्ध विषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.

महाराणा प्रताप यांच्या हळदी घाटी युद्ध

इतिहासाच्या पानातील सर्वात मोठे युद्ध म्हणजेच महाराणा प्रताप यांचे हळदी घाटी युद्ध. याबद्दल आपण अधिक माहिती घेणार आहोत. जे मुघल सम्राट अकबर आणि महाराणा प्रताप यांच्यामध्ये झाले होते. या युद्धामध्ये बऱ्याच राजपुताना महाराणा प्रताप यांना सोडून अकबराच्या अधिपत्य सुद्धा स्वीकारले होते. चित्तोडगडाच्या झालेल्या लढाईमुळे मेवाडचा सर्व सुपीक जमिनीचा वाटा मुघल सम्राट अकबर यांच्या हाती लागला होता. 

haldi ghati yuddh maharana pratap

हळदी घाटी ची लढाई ही 1 जून १५७६ रोजी आमिरचा मानसिंग (अकबरचा सेनापती) याच्या नेतृत्वाखाली “महाराणा प्रताप” आणि मुघल सम्राट “अकबर” यांच्यामध्ये झाली. ही लढाई राजस्थान मधील राजसंमद गोगोंडाजवळील एक डोंगराळ भागात हळदी घाटी जवळ झाली.  हळदी घाटी युद्धामध्ये महाराणा प्रताप यांनी सुमारे 3000 घोडदळ आणि 400 भिल तिरंदाजींची योजना तयार केली.

मुघल सम्राट अकबर याने  हळदी घाटी युद्धात सुमारे 85000 पायदळ, घोडदळ, तोफा अशी योजना तयार केली. मुघलांचे नेतृत्व मानसिंग करत होता. महाराणा प्रताप यांनी अकबराच्या दोन सेनापतींना जागीच ठार केलं. सेनापती बहलोल खान शरीराने धिप्पाड असलेला अकबराच्या सेनापतीला महाराणा प्रताप यांनी त्याच्या घोड्यासह त्याचा वध केला. महाराणा प्रताप यांनी कमी सैन्य असताना सुद्धा अकबराच्या सैन्याला पळवून सोडले. मेवाडच्या छोट्याशा सैन्यापुढे अकबराचे भले मोठे सैन्य कमी पडायला लागलं होतं. अकबराची लाखोच्या संख्यात असलेल्या सैन्य आता युद्धामधून पळ काढू लागलं आणि हार सुद्धा मानू लागलं होतं. 

विशेषता म्हणजे हळदी घाटी युद्धामध्ये “महाराणा प्रताप” हे आपला प्रिय घोडा “चेतक” याच्यावर बसून आणि हातामध्ये 80 किलोचा भाला घेऊन तर मानसिंग हा हत्तीवर बसून युद्ध करीत होता. चेतक ने मानसिंगला बघितल्याबरोबर हत्तीच्या डोक्यावर दोन पाय ठेवून वर चढला असता महाराणा प्रताप यांनी भाला फेकायला सुरुवात केली परंतु तेवढ्यातच हत्तीला लागलेला तलवारीमुळे चेतकचा त्यावरून पाय सरकला, व त्यामध्ये कापला गेला.

महाराणा प्रताप आणि चेतकचे हे रौद्र रूप बघून मानसिंग आता भिऊ लागला आणि मानसिंग ने सैन्यामागे लपता लपता तेथून पळ काढायला सुरुवात केली. सैन्याचा नेतृत्व करत असलेला मानसिंग आता पळ काढत असल्यामुळे हळूहळू सैन्यही पळायला सुरुवात झाली होती. परंतु काही लपलेले मुघल सैन्य तेथे होते आणि त्यांनी महाराणा प्रतापांचा पायावर दोन बंदुकीच्या गोळ्या मारल्या.

तोच एका  एका जणांनी महाराणांच्या पाठीवर बाण मारून फेकला. महाराजांच्या पायाला दोन गोळ्या आणि पाठीवर बान लागल्यामुळे आणि चेतक चा पाय कापला गेल्यामुळे दोघेही प्रचंड प्रमाणात घायाळ झालेले होते. अशा परिस्थितीत महाराणा युद्ध करण्याच्या परिस्थितीत नव्हते. अशा वेळेस सर्व सैन्याने महाराणा प्रताप यांना विनवणी केली सम्राट तुम्ही जिवंत राहिला तर मुघल आपल्या जमिनीवर पाय ठेवू शकणार नाही म्हणूनच तुम्ही काही कालावधीसाठी युद्धामधून बाहेर जावे अशी मागणी सर्व सैन्यांनी महाराजांना घातली.

सैन्य महाराणांना म्हणाले हा लढा केवळ मेवाड राज्यासाठीच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्तानासाठी आहे हे बघता तुम्ही स्वतःची काळजी घ्यावी आणि तोपर्यंत आम्ही हे युद्ध सांभाळतो. अशा परिस्थितीमध्ये महाराणांचं मुकुट एका मानसिंग नावाच्या सरदाराने परिधान केलं आणि महाराजांना तेथून जावयास लावले.

मुघलांच्या सर्व सैन्याने मानसिंग सरदाराला महाराणा समजून पराभूत केले आणि अशा परिस्थितीत जेव्हा चेतक महाराजांना घेऊन जात होता त्यावेळेस त्याला 28 फूट खोल दरी दृश्यास झाली परंतु तरीही तो मागे गेला नाही, 28 फूट खोलदरीच्या उंचावरून चेतक ने लांब उडी मारून महाराणांना त्या बाजूस सुरक्षित रित्या पोहोचविले. परंतु एवढी लांब उडी मारताना चेतकच्या शरीराला ताण झाल्यामुळे चेतकचाही मृत्यू या ठिकाणी झाला.

चेतक च्या मृत्यूने महाराणा प्रताप यांना अतिशय दुःख झाले ते कधीच कुठल्याही परिस्थितीत रडले नव्हते परंतु चेतकच्या मृत्यूने पहिल्यांदा महाराणा प्रताप यांना रडू आल. तिकडे अकबर चा सेनापती मानसिंग हा एक महिनाभर लपून बसला होता. मानसिंगला हे लक्षात आलं होतं की, आता जर आपण दिल्लीच्या दरबारात गेलो तर आपले मरण निश्चित आहे म्हणून मानसिंग हा दिल्लीला आणि अकबराच्या दरबारात परत गेलाच नाही.

जेव्हा अकबरला हे समजले की मानसिंग हा हळदी घाटी युद्धातून पळून आला आणि महाराणा प्रताप यांनाही तो पकडू शकला नाही, या कारणाने माणसांचा दरबारात प्रवेश निषेध करण्यात आला आणि बऱ्याच जहागीरदारांच्या नोकऱ्याही गेल्या. मुघलांनी किल्ला ताबात घेतला परंतु महाराणा प्रताप हे त्यांना सापडले नाही. महाराणा प्रताप यांना मुठीत घ्यायचे अकबराचे स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकले नाही. 

हळदी घाटी युद्धानंतर महाराणा प्रताप यांनी जंगलामध्ये राहून एक नवीन शहर वसवले त्याचे नाव चावंड असे होते.

महाराणा प्रताप मेवाड विजय | Maharana Pratap Mewad vijay 

हळदी घाटी युद्धानंतर मिर्झा हकीम याने 1589 मध्ये मेवाड येथे बंडखोरी करण्यास सुरुवात केली आणि यामुळेच मुघलांचा दबाव थोडा कमी होऊ लागला. याचा फायदा घेत 1582 मध्ये महाराणा प्रताप यांनी दिवेर या ठिकाणी एका मुघलचौकीवर हल्ला केला आणि त्यावर ताबा मिळवण्यात ते यशस्वी झाले. याच प्रमाणे हळूहळू मेवाड येथील 34 मुघलांच्या चौक्या महाराणा प्रताप यांनी ताब्यात घेतल्या. या झालेल्या प्रकारामुळे अकबराने मेवाड येथील युद्ध मोहीम थांबविले आणि तेथून लाहोरला निघून गेला.

दिव्याचा विजय हा महाराणा प्रताप यांच्यासाठी अधिक फायदेशीर ठरला. त्यांच्यासाठी ही एक अभिमानास्पद बाब होती आणि यानंतर मुघलांनी त्या बारा वर्षांमध्ये कोणत्याही प्रकारचे मुघल सैन्य मेवाड शहरांमध्ये पाठविले नाही आणि हे बघता बघता महाराणा प्रताप यांनी  कुंभलगड, उदयपूर, पश्चिम मेवाड, गोगुंडा हे सर्व आपल्या ताब्यात करून घेतले. झालेल्या सर्व कालावधीत महाराणा प्रताप यांनी चावंड नावाची राजधानी देखील बांधली. 

महाराणा प्रताप आणि चेतक

“चेतक” हा महाराजांचं अतिशय प्रिय घोडा होता. संवेदनशीलता, निष्ठा, शौर्य अशी होती चेतक ची ओळख. महाराणा प्रताप यांचा घोडा चेतक हा निळ्या रंगाचा असून अफगाणी घोडा होता. महाराणा प्रताप यांच्या अनेक युद्धामध्ये चेतकचा समावेश आहे. चेतकच्या चपळाईमुळे आणि शौर्यामुळे महाराणा प्रताप यांनी बहुतेक युद्ध जिंकले आहेत. महाराणा प्रताप यांचा चेतक वर अगदी स्वतःच्या मुला एवढं प्रेम होतं.

महाराणा प्रताप आणि चेतक

हळदी घाटीच्या युद्धामध्ये चेतक हा जखमी असताना सुद्धा महाराणा प्रताप यांच्या सुरक्षिततेसाठी 21 फूट एवढ्या लांब दरी वरून उडी मारताना पडलेल्या ताना मुळे चेतक चा मृत्यू झाला.

महाराणा प्रताप यांच्याअनेक मोठमोठ्याला लढायांमध्ये चेतक याचे महत्त्वाचे स्थान आहे. 

महाराणा प्रताप यांच्या पत्नीचे नाव 

महाराणा प्रताप यांच्या अकरा पत्नी होत्या. महाराणा प्रताप यांना सर्वात प्रिय राणी अजब देह बाई या होत्या.

  1. राणी सोलंकीनी पूबाई
  2. फुल कवर राठोड
  3. चंपा कवर झाला
  4. राणी जसो बाई चव्हाण
  5. राणी फुलबाई राठोड
  6. राणी शहामती बाई हाडा
  7. राणी khiचर  अशबाई 
  8. राणी आलमदेह बाई चव्हाण
  9. राणी अमरबाई राठोड 
  10. राणी लखाबाई राठोड

महाराणा प्रताप यांचा इतिहास Mharana Pratap history in marathi या लेखांमध्ये महाराणा प्रताप यांचा 11 पत्नींची नावे बघितली. 

महाराणा प्रताप यांचा मृत्यू 

महाराणा प्रताप यांचा मृत्यू 14 जानेवारी 1597 रोजी झाला. ज्यावेळेस महाराणा प्रताप यांचा मृत्यू झाला त्यावेळेस त्यांचे वय फक्त 57 वर्ष एवढे होते. आज सुद्धा महाराणा प्रताप यांना राजस्थान येथे लोक श्रद्धांजली अर्पण करतात. 

महाराणा प्रताप जयंती | Maharana Pratap Jayanti in Marathi

महाराणा प्रताप यांची जयंती 9 मे इ.स 1540 इंग्रजी कॅलेंडरनुसार परंतु हिंदू धर्मानुसार महाराणा प्रताप यांची जयंती 22 मे या दिवशी साजरी केली जाते. महाराणा प्रताप हे एक शूरवीर होते आणि यांच्या शौर्याच्या गाथा इतिहासाच्या कानाकोपऱ्यात दुमदुमल्या जातात. 

महाराणा प्रताप पुण्यतिथी | Maharana Pratap Punyatithi in marathi 

महाराणा प्रताप यांची पुण्यतिथी 19 जानेवारी या दिवशी साजरी केली जाते. महाराणा प्रताप हे पूर्ण भारतात आपल्या युद्धासाठी आणि कुशाग्र बुद्धीसाठी एक महान राजा होते. 

आणखी महिती वाचण्यासाठी तुम्ही विकिपीडिया या पेजला सुद्धा भेट देऊ शकता.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न | FAQ

मेवाडचा सर्वात मोठा शासक कोण होता?

मेवाड राज्याचा सर्वात मोठा शासक राणा संगा हा होता. राणा संगा याचा वध सम्राट बाबर यांनी केला आहे. 

महाराणा प्रताप यांच्या वडिलांचे नाव काय होते?

महाराणा प्रताप यांच्या वडिलांचे नाव राणा उदयसिंह असे होते.

महाराणा प्रताप का प्रसिद्ध होते?

महाराणा प्रताप भारताच्या इतिहासातील एक शूरवीर म्हणून प्रसिद्ध होते तसेच राजपुतांचा अभिमान आणि शौर्याचे प्रतीक म्हणून महाराणा प्रताप यांना संबोधले जाते. महाराणा प्रताप यांना त्यांच्या देशभक्तीसाठी आणि शौर्यासाठी प्रसिद्धी मिळते.

महाराणा प्रताप यांच्या तलवार कोठे आहेत?

राजस्थान मधील महाराणा प्रताप संग्रहालयात दोन तलवार प्रत्येकी वजन पंचवीस किलो महाराणा प्रताप यांच्या तलवारी ठेवण्यात आलेल्या आहेत.

महाराणा प्रताप यांच्या तलवार चे वजन किती आहे?

 महाराणा प्रताप यांच्या तलवारच्या वजन सुमारे 25 किलो एवढे आहे.

हे ही वाचा,

Exit mobile version