BBA course information in marathi | बी.बी.ए कोर्सची संपूर्ण माहिती

नमस्कार मंडळी आजच्या लेखामध्ये आपण बीबीए कोर्स ची संपूर्ण माहिती bba course information in marathi जाणून घेणार आहोत. बी.बी.ए कोर्स हा एक पदवीधर कोर्स आहे. हा कोर्स कसा करायचा, ऍडमिशन कसं घ्यायचं ,बी.बी.ए केल्यानंतर त्यामध्ये करिअर कसं बनवायचं आणि अजून बरच काही. या लेखामध्ये आपण बीबीए कोर्स बद्दल संपूर्ण माहिती मराठीमध्ये जाणून घेणार आहोत, बीबीए बद्दल अधिक माहितीसाठी हा लेख पूर्ण वाचा.

Table of Contents

बी.बी.ए कोर्सची संपूर्ण माहिती | BBA course information in marathi 

कोर्सचे नाव बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन | Bachelor of Business Administration
कोर्सचा कालावधी3 वर्ष
कोर्स साठी लागणारी पात्रता12वी  (50% गुणांसहित)
कोर्सचा प्रकारअंडर ग्रॅज्युएट पदवी
कोर्स साठी लागणारी फी50000-100000
BBA course information in marathi detail
BBA course information in marathi 

बीबीए म्हणजे नक्की काय? | what exactly is a BBA?

तर, बीबीए म्हणजे नक्की काय? बरं, हा तीन ते चार वर्षांचा अंडरग्रेजुएट प्रोग्राम आहे जो तुम्हाला व्यवसायाच्या विविध पैलूंमध्ये, वित्त आणि विपणनापासून मानवी संसाधने आणि उद्योजकतेपर्यंत मजबूत पायासह सुसज्ज करतो. व्यवसायाशी संबंधित सर्व गोष्टींमधला तुमचा क्रॅश कोर्स म्हणून विचार करा, तुम्हाला कॉर्पोरेट जगतील करिअरसाठी तयार करण्यासाठी किंवा तुमचा स्वतःचा उद्योजकीय प्रवास सुरू करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.

बी.बी.ए फुल फॉर्म | BBA full form in marathi

बीबीए फुल फॉर्म BBA full form in marathi: BBA म्हणजे (बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन)  Bachelor of Business Administration (BBA). हा एक पदवीपूर्व कोर्स असून यात विद्यार्थ्यांना व्यवसाय आणि व्यवस्थापनाविषयी अधिक ज्ञान प्रदान केले जाते.

बी.बी.ए कोर्स चा अर्थ काय आहे | What is the BBA in marathi

बीबीए चा अर्थ म्हणजेच व्यवसाय व्यवस्थापन अभ्यास, या अभ्यासक्रमामध्ये व्यवसायाचे व्यवस्थापन कशाप्रकारे  होते, या विषयावर अधिक भर दिला जातो. 

बी.बी.ए कोर्सची संपूर्ण माहिती | BBA course information in marathi

बी.बी.ए कोर्सची संपूर्ण माहिती bba course information in marathi : बीबीए कोर्स म्हणजेच  बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन , Bachelor of Business Administration असा याचा फुल फॉर्म असून यामध्ये अनेक पायऱ्यांचा समावेश आहे. या कोर्समध्ये तुम्हाला व्यवसायाचे व्यवस्थापन कशा प्रकारे करावे, याबद्दल प्रशिक्षण दिले जाते. याव्यतिरिक्त व्यवसायासंबंधीत जे काही प्रकार आहेत जसे की, कार्पोरेट जगात यशस्वी आणि उद्योजकीय जगात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्य याचे उत्तमरीत्या प्रशिक्षण दिले जाते. त्याचबरोबर बीबीएच्या अभ्यासक्रमामध्ये, विपणन, वित्त ,उद्योजकता, विविध व्यवसायाबद्दल खोलवर माहिती याचे प्रशिक्षण दिले जाते.

आधुनिक काळामध्ये प्रत्येक क्षेत्राविषयी संबंधित शिक्षण मिळताना दिसत आहे. त्यामध्ये व्यवस्थापन आणि व्यवसाय हे दोन प्रकार आहे. व्यवसायामध्ये हॉटेल मॅनेजमेंट, हॉस्पिटल, किरकोळ व्यवसाय अशा अनेक गोष्टींचा पाया भक्कम केला जातो. तसेच व्यवस्थापनामध्ये वित्त आणि विपणन यासारख्या बऱ्याच गोष्टींचा अभ्यासक्रम शिकविला जातो. व्यवस्थापन आणि व्यवसाय हे आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतात, यांची गरज इन्शुरन्स कंपनी,अकाउंटंट क्षेत्रात तसेच बहुतेक ठिकाणी बघायला मिळते .

Career opportunities  after BBA in Marathi
Career opportunities after BBA in Marathi

व्यवसायासंबंधीत सर्व काही गोष्टी तुम्हाला बीबीए कोर्समध्ये शिकायला मिळतात. बीबीए हा कोर्स व्यवसायासंबंधीत मार्गदर्शनासाठी अति उत्तम अभ्यासक्रम बीबीए कोर्समध्ये दिला गेला आहे. बीबीए कोर्स केल्यानंतर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुद्धा करू शकतात, अथवा चांगल्या नोकरीची संधी मिळू शकते. बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजेच बीबीए हा कोर्स तीन वर्षाचा असून यामध्ये सहा सेमिस्टर आहे.जर तुम्हाला कार्पोरेट जगामध्ये एक यशस्वी करिअर बनवायचं असेल किंवा एक उद्योजकता बनायचं असेल त्यासाठी बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजेच बीबीए उच्च पदवीची निवड तुम्ही करू शकतात.

बीबीए कोर्स व्यवसाय क्षेत्रातील अनेक मार्गाच्या दरवाजा उघडतो. एक यशस्वी उद्योजक, कार्पोरेट लीडर आणि व्यवस्थापक बनण्याची तुमची इच्छा असेल तर ह्या पदवीद्वारे तुम्ही स्वतःचा पाया भक्कम करून नक्की यशस्वी व्हाल.  BBA course information in marathi मध्ये पुढे बघूया BBA ला प्रवेश कसा घ्यावा ते.

बीबीए कोर्स साठी प्रवेश कसा घ्यायचा | BBA course Admission in Marathi

बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन बीबीए – मध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला अगदी काळजीपूर्वक नियोजन करावे लागेल. बीबीए कोर्स साठी प्रवेश कसा घ्यायचा तर यासाठी महत्त्वाचे म्हणजे सर्वात अगोदर तुम्हाला व्यवसाय आणि व्यवसाय संबंधित व्यवस्थापन या विषयी आवड असेल तर बीबीए साठी प्रवेश तुम्ही नक्की घेऊ शकतात. बीबीए मध्ये प्रवेश घेण्यासाठी खाली क्रम दिला आहे तो नक्की निश्चित करा.

बीबीए पदवी विषय संशोधन

बहुतेक वेळा जेव्हा पदवीयुक्त प्रोग्रामची प्रवेश प्रक्रिया सुरू होत असते तेव्हा बऱ्याच शाखा म्हणजेच महाविद्यालय आणि विद्यापीठ हे वेगवेगळ्या प्रकारची ऑफर देत असतात, यामध्ये तुम्ही आपल्या आजूबाजूचे  महाविद्यालय किंवा विद्यापीठ यांच्या विषयी अधिक माहिती तपासून बघा, त्या संस्थांची फी किती आहे, कालावधी कसा आहे याबद्दल अधिक माहिती घ्या आणि मग आपला प्रवेश घ्या.

पात्रता निकष

तुमचा आवड असलेला कोर्स म्हणजे बीबीए  ह्या कोर्ससाठी तुम्ही पात्र आहेत का? हे समजून घ्या आणि त्यानंतर प्रवेश प्रक्रिया करण्यास सुरुवात करा.

बीबीए कोर्स साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे तयार करा

तुमची आवड असलेला कोर्स  बीबीए याच्या प्रवेश प्रक्रिया साठी लागणारे आवश्यक ते कागदपत्रे गोळा करण्यास सुरुवात करा. यामध्ये, तुमचे आयडेंटी कार्ड, दहावीचे मार्कशीट, बारावीचे मार्कशीट आणि अजून काही लागणारी आवश्यक कागदपत्रे जमा करायला सुरुवात करा. या प्रकारे BBA course information in marathi या लेखा मध्ये दिल्याप्रमाणे बीबीए कोर्स साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे तयार करा.

प्रवेश परीक्षेची तयारी करा

काही महाविद्यालयांमध्ये बीबीए कोर्स साठी प्रवेश घेण्याअगोदर काही प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. यात BBA साठी SAT किंवा ACT सारख्या प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. तुम्ही निवडलेल्या शाखेमध्येही SAT किंवा ACT  अशा प्रकारच्या प्रवेश परीक्षा घेण्यात येत असतील तर त्याची नोंदणी करा आणि परीक्षेसाठी चांगला अभ्यास करून आपला प्रवेश निश्चित करा.

अर्ज करणे

बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन बीबीए ला प्रवेश घ्यायचा असल्यास तुम्ही निवड केलेल्या महाविद्यालयांमध्ये जाऊन अर्ज नोंदणी करावी लागेल, अर्ज भरल्यानंतर अर्ज मध्ये दिलेली माहिती अचूक आहे का हे तपासून बघा.

अर्ज भरण्याची अंतिम मुदत

महाविद्यालय किंवा विद्यापीठे यांनी अर्ज भरण्यासाठी एक शेवटची तारीख ठरवलेली असते, त्याप्रमाणे बीबीए प्रवेश घेण्यासाठी ह्या तारखेपर्यंत तुमचा अर्ज केला गेला पाहिजे याची काळजी घ्या. प्रवेश प्रक्रियेसाठी तुमचा अर्ज अंतिम मुदतीपर्यंत भरला गेला आहे का हे तपासून बघा.

मुलाखतीसाठी तयार व्हा

काही महाविद्यालये किंवा विद्यापीठे यामध्ये प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अगोदर मुलाखत घेतली जाते. या मुलाखतीमध्ये काही सामान्य प्रश्न विचारले जातात यासाठी सामान्य प्रश्नांचा अभ्यास करून आपला प्रवेश निश्चित करा. 

प्रवेशासाठी अर्ज केलेल्या शाखेचा निर्णय

ज्या महाविद्यालयामध्ये आपण बीबीए कोर्स प्रवेशासाठी अर्ज दाखल केला आहे, त्यांनी आपला प्रवेश निश्चित केला आहे का हे तपासा. त्यांनी दिलेल्या अंतिम मुदतीपर्यंत याची वाट बघा.

प्रवेश निश्चित करा.

ज्या महाविद्यालयात तुम्ही बीबीए कोर्स साठी प्रवेश घेतला आहे, तेथील अटी आणि शर्तींचे पुनरावलोकन करा. तुम्हाला ते स्वीकार असल्यास आजच त्या कॉलेजमध्ये तुमचा प्रवेश निश्चित करा.

बीबीए मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी bba course information in marathi महत्त्वाचे एवढेच आहे की तुम्ही जे महाविद्यालय निवडत आहात  त्याची चांगल्या प्रकारे जात पडताळणी करा. त्याचबरोबर प्रवेश प्रक्रियेसाठी आणि अर्ज भरण्यासाठी तयारी करा. याच प्रमाणे बीबीए कोर्सच्या माध्यमातून व्यवसायाच्या जगात आपला प्रवेश नक्की घ्या. 

बीबीए कोर्स साठी लागणारे पात्रता  | BBA course eligibility in Marathi 

बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन बीबीए कोर्ससाठी लागणारी  पात्रता ही त्या त्या महाविद्यालय किंवा विद्यापीठाच्या आधारानुसार असते.

काही सामान्य प्रकारच्या पात्रता सर्व महाविद्यालयांना लागू असतात त्या पुढील प्रमाणे

बीबीए  एंट्रन्स  एक्झाम

बीबीए कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना ही प्रवेश परीक्षा देणे  अनिवार्य आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या शाखा त्यांच्या स्तरावर योग्य असलेल्या प्रवेश परीक्षा आयोजित करतात काही नामांकित शाखामध्ये पुढील प्रमाणे प्रवेश परीक्षा घेतल्या जातात.

सेट -SET (Symbiosis Entrance test)

सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ही संस्था बीबीए कोर्सच्या प्रवेशासाठी सेट ही प्रवेशपरीक्षा घेण्यात येते.

आय.पी.यु  सी.इ.टी  (IPU CET)

इंद्रप्रस्थ यूनिवर्सिटी ही बीबीए कोर्स प्रवेश परीक्षेसाठी आय.पी.यु  सी.इ.टी  (IPU CET) ह्या प्रकाराची प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात येते.

या प्रवेश परीक्षा व्यतिरिक्त अजूनही काही प्रकारच्या प्रवेश परीक्षा देऊन आपण बीबीए कोर्स BBA course information in marathi साठी पात्रता बद्ध होऊ शकतो त्या पुढील प्रमाणे,

NPAT
UPSEE
IPU CET
BHU CET
BBA course information in marathi

अशा प्रकारच्या काही प्रवेश परीक्षा देऊनही आपण बीबीए कोर्स  मध्ये प्रवेश निश्चित करू शकतात.

शैक्षणिक पात्रता

जर तुम्ही  बीबीए कोर्ससाठी प्रवेश घेत असणार तर तुमची शैक्षणिक पात्रता ही हायस्कूल मधून उत्तीर्ण झालेले असावी म्हणजे किमान बारावी पास असायला हवे. बारावी मध्ये उत्तीर्ण झाल्यावरच तुम्ही बीबीए कोर्स साठी पात्रता बद्ध असू शकतात. या व्यतिरिक्त तुम्ही वाणिज्य, कला, आणि विज्ञान हे शैक्षणिक धोरण पूर्ण केलेले असावे. BBA course information in marathi या लेखामधील शैक्षणिक पात्रतेनंतर टक्केवारी किती असावी ते बघूया.

टक्केवारी

बारावी मध्ये साधारण तुम्हाला 50% च्या वर टक्केवारी असायला हवी, याव्यतिरिक्त काही महाविद्यालय किंवा विद्यापीठांमध्ये 45% इतकी टक्केवारी असली तरी तुम्ही बीबीए कोर्स साठी पात्रताबद्ध असतात.

इंग्रजी भाषा

बीबीए कोर्स हा साधारण इंग्रजी भाषेमध्ये असतो, यामुळे तुम्हाला इंग्रजी भाषेतील आवश्यक ते ज्ञान असायला हवे. काही शाखांमध्ये बीबीए कोर्सच्या पात्रतेसाठी TOEFL किंवा IELTS अशा प्रकारची परीक्षा देऊन इंग्रजी भाषा येत असल्याचा पुरावा देखील द्यावा लागतो. 

वयोमर्यादा

बीबीए कोर्स साठी कुठलाही प्रकारची वयोमर्यादा नसते. परंतु काही शाखांमध्ये बीबीए कोर्स साठी वयोमर्यादा लागू केली जाते. 

प्रवेश परीक्षा

बहुतेक महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये बीबीए कोर्सच्या प्रवेश प्रक्रियेसाठी प्रवेश प्रक्रिया घेतली जाते. या परीक्षेमध्ये आपल्या मधील असलेली कौशल्य आणि थोडक्यात म्हणजे बी बी ए  ह्या कोर्स विषयी आपल्याला  असलेले ज्ञान बघितले जाते. बीबीए कोर्सच्या प्रवेशासाठी योग्य पात्र या प्रवेश परीक्षे मार्फत निवडला जातो. 

थोडक्यात एवढंच की बीबीए प्रवेश परीक्षा पात्रतेसाठी उमेदवाराने त्याचं उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केलेला असावा म्हणजेच किमान बारावी उत्तीर्ण झालेला असावा आणि बारावी मध्ये 50% च्या वर त्याला गुण असावेत. आणि ज्या काही  महाविद्यालयामध्ये प्रवेश प्रक्रिया प्रवेश परीक्षा मार्फत असेल त्यामध्ये योग्य पात्र ठरणे अत्यावश्यक आहे, वर दिलेल्या पात्रता निकष पूर्ण असल्यास विद्यार्थी व्यवसाय प्रशिक्षण आणि व्यवस्थापन या क्षेत्रात आपला शैक्षणिक प्रवास सुरू करू शकतात. 

बीबीए कोर्स चा कालावधी | BBA course duration in Marathi

बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन बीबीए कोर्सचा कालावधी सुमारे तीन वर्षाचा असून यात सहा सेमिस्टर असतात.आणि याचबरोबर बीबीए या कोर्सच्या पदवीमध्ये आपण तीन वर्षात व्यवसाय आणि व्यवस्थापनाबद्दल सर्वोत्तम शिक्षण प्राप्त करता येते.

वर सांगितल्याप्रमाणे बीबीए  कोर्स चा कालावधी तीन वर्ष आणि सहा सेमिस्टर अशाप्रकारे विभागला गेला आहे. प्रत्येक सेमिस्टर साठी सहा महिन्यांचा कालावधी असतो.

दुसऱ्या देशात किंवा वेगळ्या संस्थांमध्ये हा कोर्स अधिक कालावधीचाही असू शकतो म्हणजे हा कोर्स तीन ते चार वर्षाचाही असू शकतो. 

बी बी ए हा कोर्स विद्यार्थ्यांना व्यवसाय संबंधित प्रशिक्षण देण्यासाठी करण्यात आलेला आहे. यामध्ये वित्त विपणन, मानव संसाधन, उद्योजकता यासारख्या संबंधित संबंधित क्षेत्रांमध्ये उत्तम शिक्षण देण्यासाठी बीबीए हा कोर्स तयार करण्यात आला आहे.

BBA-course-information-in-marathi-2
BBA-course-information-in-marathi-2

याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना त्याच्या आवडीनुसार किंवा करिअर संबंधितअसलेल्या इच्छा या आधारित निवडक स्पेशलायझेशन मधून विविध प्रकारच्या निवड करता येते.

बीबीए कोर्स मध्ये अनेक प्रकारच्या विविध कालावधीमध्ये  इंटर्नशिप, प्रकल्प आणि उन्हाळी प्रशिक्षण यासारखे वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांचा समावेश असतो. 

मी BBA मध्ये कोणती स्पेशलायझेशन करू शकतो? | Specializations in BBA Course in marathi 

बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन बीबीए वेगवेगळ्या प्रकारचे स्पेशलायझेशन प्रदान करते आणि या स्पेशलायझेशन चा फायदा विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार करिअर साठी शिक्षण प्राप्त करणे मध्ये होते. या स्पेशलायझेशन्स व्यवसाय आणि व्यवस्थापनाच्या विशिष्ट अधिक प्रमाणात अभ्यास करून विद्यार्थ्यांना कौशल्य प्राप्त करतात.

बीबीए कोर्स मध्ये केले गेलेले स्पेशलायझेशन याचे उपलब्ध असलेले काही लोकप्रिय स्पेसिलायझेशन पुढील प्रमाणे, 

वित्त | Finance

बी बी ए स्पेशलिझेशन फायनान्स मधील गुंतवणूक, आर्थिक व्यवस्थापन, कार्पोरेट  वित्त, विश्लेषण आणि आर्थिक नियोजन यावर अधिक प्रमाणात भर दिला जातो. वित्त म्हणजे फायनान्स मध्ये विद्यार्थी योग्य धोरणात्मक असे आर्थिक निर्णय घेणे आणि आर्थिक डेटाचे विश्लेषण करणे याचे प्रशिक्षण बीबीए स्पेशलिजेशन फायनान्स मध्ये दिले जाते. त्याचबरोबर  आर्थिक संसाधने व्यवस्थापित करण्याचे मार्गदर्शन केले जाते.

विपणन | Marketing

बीबीए स्पेशलायझेशन मध्ये मार्केटिंग, ग्राहकांबद्दल वर्तन, बाजार संशोधन, ब्रॅण्डिंग, विक्री धोरणे आणि जाहिरात यावर अधिक प्रमाणात जोर दिला जातो. या मार्केटिंग मध्ये विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना विकसित करण्यासाठी महत्त्वपूर्ण असे प्रशिक्षण दिले जाते.

मानव संसाधन व्यवस्थापन | Human Resource Management (HRM)

बीबीए स्पेशलायझेशन मध्ये HRM संस्थेमध्ये मानवी संसाधने स्थापन करण्यासाठी किंवा व्यवस्थापित करण्यासाठी अधिक प्रशिक्षण दिले जाते. त्याचबरोबर प्रतिभा व्यवस्थापन, विद्यार्थी भरती, कामगार फायदे, कर्मचारी प्रशिक्षण आणि संस्थात्मक वर्तन यावर अधिक प्रमाणात भर दिला जातो. एच आर  मध्ये प्रशिक्षित केले जाते. 

आंतरराष्ट्रीय व्यापार | International Business

बीबीए स्पेशलायझेशन मध्ये आंतरराष्ट्रीय व्यवसाय म्हणजेच आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आंतरराष्ट्रीय विपणन, क्रॉस सांस्कृतिक व्यवस्थापन, जागतिक व्यापार आणि त्याचबरोबर जागतिक बाजारपेठेत कार्य करण्यासाठी कोणत्या प्रकारचे धोरणे राबविली जातात या प्रकारचे प्रशिक्षण आंतरराष्ट्रीय व्यापार स्पेशलायझेशन मध्ये शिकविले जाते. 

ऑपरेशन मॅनेजमेंट | Operations Management

बीबीए स्पेशलायझेशन मध्ये ऑपरेशन मॅनेजमेंट कार्यक्षमतेत असणाऱ्या उत्पादन आणि वस्तू किंवा वितरणावर  अधिक प्रमाणात लक्ष केंद्रित करते. विद्यार्थी  यामध्ये गुणवत्ता व्यवस्थापन, प्रक्रिया ऑप्टिमायझेशन, यादी नियंत्रण यासारख्या गोष्टींनी ऑपरेशन मॅनेजमेंट मध्ये प्रशिक्षित होतात.

उद्योजकता | Entrepreneurship

बीबीए स्पेशलायझेशन मध्ये उद्योजकता हा एक महत्त्वाचा भाग आहे. यामध्ये उद्योग जगाची मानसिकता कशाप्रकारे घडवायची यावर अधिक प्रमाणे भर दिला जातो. त्याप्रमाणे, विद्यार्थ्यांना त्याविषयी वेगवेगळे उपक्रम घडवून आणण्यासाठी आणि व्यवस्थापित करण्यासाठी चांगल्या प्रकारची कौशल्य देऊन प्रशिक्षित केले जाते. बीबीए स्पेशलायझेशन मध्ये उद्योजकता या प्रकारांमध्ये विद्यार्थी व्यवसायास संबंधित नवकल्पना, व्यवसाय नियोजन आणि व्यवसायाबद्दल  जोखीम मूल्यांकन या विषयांवर प्रशिक्षित होतात.

पुरवठा साखळी व्यवस्थापन | Information Technology (IT) Management in Marathi

बीबीए स्पेशलायझेशन मध्ये पुरवठा साखळी व्यवस्थापन यामध्ये पुरवठादारांकडून ग्राहकापर्यंत वस्तू कशी पोहोचवायची यावर अधिक भर देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त खरेदी, वितरण, लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी याबद्दल प्रशिक्षित करण्यात येते.

व्यवसाय विश्लेषण | Supply Chain Management

बीबीए स्पेशलायझेशन मध्ये व्यवसाय विश्लेषण यामध्ये व्यवसायासंबंधी निर्णय घेण्यासाठी डेटा विश्लेषण आणि सांख्यिकी या पद्धतीचा महत्त्वपूर्ण असा समावेश केला गेला आहे, त्याचबरोबर विद्यार्थी व्यवसाय विश्लेषण मध्ये डेटा विश्लेषण करायला शिकतात आणि चांगल्या प्रकारे प्रशिक्षित होऊन बाहेर पडतात.

हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट | Hospitality management

बीबीए स्पेशलायझेशन मध्ये हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट यामध्ये हॉस्पिटॅलिटी, आणि टुरिझम इंडस्ट्रीमध्ये आवड असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. त्याचबरोबर या विषयांमध्ये हॉटेल व्यवस्थापन, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट आणि कार्यक्रम नियोजन या विषयांवर प्रशिक्षित केले जाते. ज्या विद्यार्थ्यांना यामध्ये आवड असेल त्यांनी नक्कीच मॅनेजमेंट मध्ये प्रवेश घ्या.

किरकोळ व्यवस्थापन | Retail Management

बीबीए स्पेशलायझेशन मध्ये  किरकोळ व्यवस्थापन यामध्ये ऑपरेशन्स, व्हिज्युअल मर्चेंडाइझिंग,किरकोळ काही धोरणे आणि या गोष्टींनी प्रशिक्षित केले जाते.

रियल इस्टेट व्यवस्थापन | Real Estate Management

बीबीए स्पेशलायझेशन मध्ये रियल इस्टेट व्यवस्थापन यामध्ये रियल इस्टेट मार्केटिंग, प्रॉपर्टी व्हॅल्युएशन, प्रॉपर्टी डेव्हलपमेंट आणि मुख्य म्हणजे रिअल इस्टेट गुंतवणूक या विषयांवर प्रभावीपणे मार्गदर्शित केले जाते जर तुम्हाला रियल इस्टेट व्यवस्थापन मध्ये आवड असेल तर बीबीए स्पेशलायझेशन मध्ये रियल इस्टेट व्यवस्थापनामध्ये नक्की प्रवेश घ्या.

आजच्या लेखात बी.बी.ए कोर्सची संपूर्ण माहिती मध्ये बीबीए bba course information in marathi अभ्यासक्रमामधील स्पेशलायझेशन हे विद्यार्थ्यांना विशिष्ट प्रकारचे कौशल्य मिळवण्यासाठी संधी देतात आणि हा एक उत्तम पर्याय सुद्धा आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये विविध भूमिका साकारण्याची प्रगती सुद्धा होत आहे आणि इतकेच नव्हे तर हेच विद्यार्थी उद्योगासाठी सुद्धा तयार होताना दिसत आहे.  बीबीए कोर्सच्या माध्यमातून केलेल्या स्पेशलिझेशन मुळे विद्यार्थी मार्केटिंग, एक्झिक्यूटिव्ह, फायनान्स मध्ये प्रोफेशनल, एच आर मॅनेजर, आणि उद्योजक बनण्याची संधी त्यांना यातून मिळत आहे. बीबीए अभ्यासक्रमामधील केलेले हेच स्पेशलायझेशन विद्यार्थ्यांची ध्येयाची पूर्तता करण्यासाठी अति उत्कृष्ट आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी याचा काळजीपूर्वक विचार करून नक्की लाभ घ्या आणि एक चांगले स्वतःचे करिअर बनवा. 

बीबीए केल्यानंतर नोकरीच्या संधी आहेत का? | Career after BBA in Marathi

हो नक्कीच….

बीबीए करिअरच्या संधी सुद्धा अति उत्कृष्ट आहेत जर तुम्ही बीबीए करत असाल, तर तुम्ही याच्यात नक्की चांगले करिअर घडवून शकाल.  bba course information in marathi मध्ये करिअर संबंधित कोण कोणत्या गोष्टींचे मार्ग उघडू शकतात हे आपण बघूया,

Career after BBA in Marathi
Career after BBA in Marathi

बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन बीबीए यामध्ये सर्व प्रकारचे शिक्षण सामावून घेतले आहे. बीबीए पदवीधारकांना कार्पोरेट जगात आणि एक चांगला उद्योजकता किंवा त्यापुढील भूमिकांसाठी प्रशिक्षित केले जाते आणि बीबीएच्या ह्या प्रशिक्षणामुळे तुम्ही एक चांगले करिअर नक्कीच घडवू शकतात. यासाठी तुमच्यामध्ये बीबीए ची आवश्यक असलेली कौशल्य नक्कीच असायला हवी. यामुळे,तुमच्या करिअरच्या संधीचे मार्ग अजून जास्ती प्रमाणात उघडतात. चला तर मग आपण बघूया बीबीए पदवीधारकांना कोण कोणत्या क्षेत्रांमध्ये चांगल्या प्रकारचे म्हणजेच अतिउत्तम प्रकाराचे करिअर घडवता येऊ शकते.

बीबीए झालेल्या विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या करिअर करण्यासाठी अति उत्कृष्ट प्रमाणात अशा संधी उपलब्ध आहेत, आणि या संधीचा सोनं कसं करायचं हे आपल्या हातात आहे. तुमच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये उच्च स्तरावर करियर निर्माण करण्यासाठी बीबीए हा कोर्स निवडून एक विकसित नियोजन तुम्ही अगोदरच केलेला आहे आणि बीबीए कोर्स पार पडल्यानंतर एक चांगलं करिअर घडवून तुम्ही या क्षेत्रामध्ये अधिक मजबूत  होणार.

व्यवसाय विश्लेषक | Business Analyst

व्यवसाय विश्लेषक म्हणजेच व्यवसायिक गरजा ओळखण्यात आणि संबंधित डेटा पुरविण्यासाठी जे विश्लेषण केले जाते किंवा ज्या प्रकारची कार्यक्षमता आणि परिणामकरता सुधारण्यासाठी उपायांचे भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण बजावली जाते. व्यवसाय विश्लेषकामध्ये एक मजबूत असे समस्या सोडविण्याचे कौशल्य असते आणि ह्या कौशल्याचा वापर करून तुम्ही एक चांगले  व्यवसायिक नक्कीच बनू शकतात.

विपणन कार्यकारी किंवा व्यवस्थापन | Marketing Executive/Manager

बीबीए पदवी तुमची पार पडली आहे आणि तुमचं नुकताच शिक्षण पूर्ण झालं असेल तर मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह किंवा मॅनेजर म्हणून कोणत्याही कंपनीत चांगल्या पगारावर चांगलं करिअर नक्कीच बनवू शकतात. यामध्ये विपणन धोरणे विकसित करण्यासाठी आणि बाजार संशोधन आयोजित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिरातींचा प्रचार याच्यामध्ये केला जातो.

आर्थिक विश्लेषक | Financial Analyst 

बीबीए पदवी तुमची नुकतीच पार पडली आहे आणि वित्त संबंधित  जर तुम्हाला आवड असेल तर एक आर्थिक विश्लेषक म्हणून  डेटाचे विश्लेषण करून वित्त साठी एक चांगला प्रकारचा अहवाल तयार करू शकतात, तुम्हाला चांगल्या प्रकारचा अहवाल बनवता आला तर गुंतवणूक म्हणजेच गुंतवणूक साठी निर्णय आणि आर्थिक नियोजन यामध्ये चांगलाच शिफारशी मिळतील.

एच.आर विशेषज्ञ किंवा व्यवस्थापक | Human Resources (HR) Specialist/Manager

बीबीए पदवीधर व्यवस्थापन करणे किंवा एच आर विशेषज्ञ म्हणून चांगला कामगिरी बजावू शकतो. एच आर बनल्यानंतर कर्मचारी संबंधित किंवा कर्मचारी भरती संबंधित आणि कार्यप्रदर्शन या संबंधित परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळता येऊ शकते.

उद्योजक स्टार्टअप / संस्थापक | Entrepreneur/Startup Founder

जर तुमची बीबीए पदवी नुकतीच पार पडले असेल तर तुम्ही एक चांगला उद्योजक देखील बनवू शकतात. स्वतःचा एक चांगला व्यवसाय आणि किंवा मग एक चांगला स्टार्टअप हे तुम्ही नक्की करू शकतात. उद्योजकतेच्या आव्हानांना नेविगेट करण्यासाठी तुम्हाला बीबीए कोर्स मधून आवश्यक असलेली कौशल्य मिळालेली असतात आणि ह्या कौशल्याच्या माध्यमातून तुम्ही व्यवसाय योजना विकसित करण्यासाठी आणि वित्त व्यवस्थापित करण्यासाठी या कौशल्यांचा उपयोग करून नक्कीच सक्षम बनवू शकतात. एक चांगला उद्योजक समाजामध्ये बनू शकतात. 

किरकोळ व्यवस्थापक | Retail Manager

आता बीबीए पदवी केल्यानंतर किरकोळ व्यवस्थापक म्हणजे काय तर रिटेल व्यवस्थापक किंवा रिटेल स्टोअर्स यांची आउटलेट व्यवस्थापित करण्यासाठी किंवा देखरेख करण्यासाठी आणि सकारात्मक ग्राहकाचा अनुभव घेण्यासाठी सुनिश्चित एक किरकोळ असा व्यवस्थापक तयार होतो. 

आर्थिक नियोजन | Financial Planner/Advisor 

बीबीए मध्ये स्पेशलायझेशन असलेले आर्थिक नियोजन संबंधीत पदवीधारकांना आर्थिक सल्लागार किंवा आर्थिक नियोजन अति उत्कृष्ट प्रमाणात करता येते म्हणूनच एक चांगला आर्थिक सल्लागार किंवा आर्थिक नियोजन यामध्ये सुद्धा एक चांगलं करिअर तुम्ही बी बी ए मार्फत नक्की घडवू शकतात. त्याचप्रमाणे व्यक्ती आणि वित्त मध्ये गुंतवणूक कशा प्रकारे करावे याबद्दल मार्गदर्शन करूनही चांगले करिअर घडवू शकतात.

बीबीए  पदवीमार्फत अष्टपैलू ते कौशल्य आपल्यामध्ये संपन्न होतात आणि ह्या कौशल्यांचा वापर करून, गतिशील असलेल्या या जगामध्ये आपण आपलं करिअर कसे घडवतो यावर अवलंबून आहे. विपणन ते  वित्त, व्यवसाय विश्लेषण, उद्योजकता, आणि अजून बरंच काही चांगल्या प्रकारे नक्की घडवू शकता. बीबीए कोर्स BBA course information in marathi  मार्फत तुम्हाला बहुतेक प्रमाणात करिअरच्या चांगला संधी उपलब्ध होत आहेत.

स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यापासून ते कार्पोरेट जगामध्ये पाय ठेवण्यासाठी आणि त्याचबरोबर एमबीए सारखे प्रगत शिक्षण घेण्यासाठी बीबीए या कोर्सच्या माध्यमातून जागतिक व्यवसायाचे एक महत्त्वपूर्ण प्रभावशाली अशी क्षमता आहे. बीबीए ह्या कोर्समध्ये तुम्हाला मार्केटिंग, वित्त व्यवस्थापन ,व्यवसायिक अनुभव अशा प्रकारच्या प्रभावशाली जगामध्ये तुम्ही स्वतःचं एक चांगलं करिअर नक्कीच घडवू  शकतात.

Career opportunities after BBA in Marathi
BBA information in Marathi

बीबीए कोर्स करण्याचे फायदे | Benefits of BBA course in Marathi

बीबीए कोर्सचे  फायदे : म्हणजेच बीबीए कोर्स हा विद्यार्थ्यांच्या व्यवसायाच्या गतिशील जगात आणि स्पर्धात्मक  जगात आवश्यक असलेले ज्ञान व कौशल्य प्रदान करतो व्यवसायिकांसाठी ही एक मौल्यवान पदवी समजली जाते.

 बीबीए कोर्सचे फायदे पुढील प्रमाणे,

बीबीए कोर्स करणारा विद्यार्थ्यांना विविध प्रकारची माहिती प्राप्त होते यामध्ये वित्त, व्यवस्थापन,विपणन ,अर्थशास्त्र आणि उद्योजकता याबद्दल महत्वपूर्ण अशी माहिती बीबीए कोर्सच्या माध्यमातून आपल्याला मिळते.

बीबीए कोर्सच्या माध्यमातून मिळालेले ज्ञान हे व्यावसायिक जगामध्ये आपला पाया भक्कम करण्यासाठी अधिक फायदेशीर ठरते.

बीबीए पदवीधारकांना विविध प्रकारच्या करिअर संधी सुद्धा प्राप्त होतात.

विविध प्रकारचे उद्योग आणि उद्योग क्षेत्रामध्ये अनेक प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत.

बीबीए पदवीधर विपणन, विक्री, वित्त, मानवी संसाधने, मध्ये  चांगल्या प्रकारे करिअर करू शकतात.

बीबीए पदवी पार पाडत  असताना इंटरशिप किंवा व्यवसायिक प्रोजेक्ट हे विद्यार्थ्यांना वास्तविक जगातल्या व्यवसायामध्ये किंवा नोकरीसाठी प्रत्यक्षरीता अनुभव याच्यातून मिळतो.

बीबीए पदवी पार पडल्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यवसायाबद्दलही अधिक फायदेशीर ठरते.

आजच्या आधुनिक काळात व्यवसाय क्षेत्र चांगलंच वाढताना दिसत आहे आणि यामध्ये कुशल व्यवसायिकांची चांगल्या प्रमाणात मागणी सुद्धा होत आहे,अशा विकसित होत असलेला क्षेत्रामध्ये बीबीए  कोर्स अधिक फायदेशीर आहे. 

बीबीए  पदवी धारकांना चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या सुद्धा मिळू शकतात. 

बीबीए कोर्स च्या माध्यमातून तुम्ही कार्पोरेट जगाबद्दल बऱ्याच गोष्टी  तुम्हाला शिकायला मिळतात

बीबीए पदवी पार पडल्यानंतर सरकारी नोकरी सुद्धा तुम्हाला लागू शकते

बीबीए धारकांना आयटी कंपन्यांमध्ये सुद्धा चांगला पगार आहे. 

सर्वात महत्त्वाचं म्हणजे बीबीए करत असताना तुम्ही शिकलेल्या व्यवसायिक ज्ञान आणि कौशल्याबद्दल चांगलाच मोठा साठा जमा झालेला आहे आणि याचा उपयोग करून स्वतःचा एक चांगलाच व्यवसाय निर्माण तुम्ही करू शकतात आणि चांगले करिअर घडूवून बीबीएच्या पदवीचा फायदा करून घेऊ शकतात.

बीबीए कोर्स चे विषय | Subjects in BBA course in Marathi

बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन बीबीए  ह्या कोर्समध्ये  व्यवसाय आणि व्यवस्थापनाविषयी संबंधित विषयांचे प्रशिक्षण दिले जाते. काही संस्थांमध्ये बीबीए कोर्स साठी वेगळे विषय सुद्धा असू शकतात परंतु खाली दिलेले हे विषय सामान्यतः सर्व संस्थांमध्ये उपलब्ध असतात. 

बीबीए कोर्स चे विषय पुढीलप्रमाणे,

  1. व्यवस्थापनाची तत्वे Principles of Management
  2. विपणन व्यवस्थापन Marketing Management
  3. फायनान्शिअल अकाउंटिंग Financial Accounting
  4. व्यवसाय सांख्यिकी  Business Statistics
  5. मायक्रो इकॉनॉमिक्स  Microeconomics
  6. व्यवसाय संप्रेषण Business Communication
  7. संस्थात्मक वर्तन Organisational Behaviour
  8. व्यवसाय कायदा  Business Law
  9. मानव संसाधन व्यवस्थापन Human Resource Management
  10. ऑपरेशन मॅनेजमेंट Human Resource Management
  11. आर्थिक व्यवस्थापन  Financial Management
  12. उद्योजकता Entrepreneurship
  13. व्यवसाय नैतिकता Business Ethics
  14. आंतरराष्ट्रीय व्यवसाय Business Ethics
  15.  धोरणात्मक व्यवस्थापन  Strategic Management
  16. माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापन Information Technology Management
  17. बिझनेस अनायलीसेस डेटा Business Analytics 
  18. प्रकल्प व्यवस्थापन Project Management

या BBA course information in marathi लेखांमध्ये दिलेले विषय हे सामान्य विषय आहे ते तुम्हाला बीबीए कोर्स  करतांना मिळतील. यामध्ये दिलेल्या विषयांपैकी तुमच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी योग्य विषयाची निवड करून बीबीए कोर्स मार्फत चांगले करिअर करा.

बीबीए साठी कोणता कोर्स निवडावा | 3 Types of BBA specialization in Marathi

बीबीए स्पेशलायझेशन मध्ये तीन मुख्य प्रकारचे कोर्स आहेत, 

  • फायनान्स बीबीए | BBA in Financial Management
  • मार्केटिंग बीबीए | BBA in Marketing Management
  • मानव संसाधन व्यवस्थापन बीबीए | BBA in Human Resource Management

बीबीए पदवीधारकांसाठी मुख्य पाच प्रकारचे करिअर | BBA career

बीबीए पदवीधरांसाठी मुख्य पाच प्रकारचे असे क्षेत्र ज्यामध्ये ते चांगल्या प्रकारचे करिअर घडवू शकतात,

  1. बँक
  2. एच आर
  3. विपणन
  4. उद्योजकता
  5. आर्थिक संस्था

बीबीए झाल्यानंतर कोणता कोर्स करू शकतात

बीबीए कोर्स केल्यानंतर तुम्ही एमबीए मास्टर डिग्री पूर्ण करू शकतात. याव्यतिरिक्त तुम्हाला दुसऱ्या क्षेत्रातही दुसरी डिग्री पूर्ण करता येऊ शकते.

एमबीए फुल फॉर्म | MBA Full Form in Marathi

एमबीए चा फुल फॉर्म मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन Master of Business Administration असा आहे.

बीबीए कोर्सचा अभ्यासक्रम

बीबीए पुणे विद्यापीठ अभ्यासक्रम | BBA Syllabus in Pune University

Top government BBA colleges in pune compress
Top government BBA colleges in pune

Credit: Pune University

बीबीए उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अभ्यासक्रम | BBA Syllabus in North Maharashtra University

Credit : NMU

भारतातले टॉप 5 बी. बी. ए कॉलेज | Top 5 BBA colleges in India

Sr Top 5 BBA Colleges in India in Marathi
1IIM इंदोर – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ,इंदूर
2SSCBS- शहीद सुखदेव कॉलेज ऑफ बिझनेस स्टडीज,दिल्ली विद्यापीठ
3CHRIST UNIVERSITY-ख्रिस्ट युनिव्हर्सिटी, बेंगळुरू
4NMIMS-नरसी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज,मुंबई
5SCMS-सिम्बायोसिस सेंटर फॉर मॅनेजमेंट स्टडीज,पुणे
Top 5 BBA Colleges in India in Marathi

महाराष्ट्रातले टॉप 5 बी बी ए कॉलेज | Top 5 BBA colleges in Maharashtra

SrTop 5 BBA colleges in Maharashtra
1NM-नरसी मोंजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, मुंबई
2SCMS-सिम्बायोसिस सेंटर फॉर मॅनेजमेंट स्टडीज,पुणे
3CHRIST UNIVERSITY-ख्रिस्ट कॉलेज, पुणे
4MIT ACSC-एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे
5NMIMS-अनिल सुरेंद्र मोदी स्कूल ऑफ कॉमर्स,मुंबई

टॉप गव्हर्नमेंट बीबीए कॉलेज इन पुणे | Top government BBA colleges in Pune

SrTop government BBA colleges in pune
1Tilak Maharashtra Vidyapeeth, Pune टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे
2MMCC Pune – Marathwada Mitra Mandal’s College of Commerce, Pune |
MMCC पुणे – मराठवाडा मित्र मंडळाचे कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे
3PUMBA Pune: Admission, Courses, Fees, Placements | पुंबा पुणे: प्रवेश, अभ्यासक्रम, फी, प्लेसमेंट

बीबीए केलेल्या पदवीधारकांना सुरुवातीला किती पगार असतो

बीबीए कोर्स केल्यानंतर तुम्ही जर एक चांगले उद्योजक व्हाल तर तुम्हाला वार्षिक उत्पन्न किती काढता येतं हे तुमच्या हातात आहे म्हणजेच बीबीए मध्ये शिकलेल्या कौशल्यांचा वापर करून तुम्ही वार्षिक पाच ते दहा लाख एवढे उत्पन्न काढू शकता त्याचबरोबर जर तुम्ही एखाद्या कंपनीत एच आर म्हणून किंवा अकाउंटंट म्हणून नोकरी करत असाल तर सुरुवातीला तुम्हाला पहिल्या वर्षी तीन ते पाच लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न मिळू शकते आणि जर तुम्हाला एमएनसी कंपनीत नोकरी लागली तर तुम्हाला पाच ते आठ लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न सुरुवातीला मिळू शकते त्याचबरोबर बीबीए पदवी झाल्यानंतर जसजसा तुमचा वार्षिक अनुभव वाढत जाईल तस तसा पगारही वाढत जाईल.या व्यतिरिक्त तुम्ही एक चांगले व्यवसायिक सल्लागार सुद्धा बनवू शकतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा चांगला पैसा कमवू शकतात. 

निष्कर्ष

बीबीए ही एक पदवी आहे. व्यवसायाचे व्यवस्थापन कसे करावे आणि उद्योजक बनण्यासाठी काय करावे बीबीए मार्फत याचे प्रशिक्षण आपल्याला मिळते. ज्या विद्यार्थ्यांना कार्पोरेट जगामध्ये आवड असेल त्या विद्यार्थ्यांसाठी हा बीबीए कोर्स अति उत्तम आहे. वर दिलेली माहिती ही नक्कीच तुम्हाला आवडेल अशी आम्ही आशा बाळगतो. 

हे ही वाचा,

वारंवार विचारले जाणारे प्रश्न FAQ

मराठीत बी बी ए म्हणजे काय? BBA full form in marathi

विद्यार्थी मित्रांनो मराठीत बी बी ए म्हणजेच व्यवसाय प्रशासन पदवी होय.तसेच इंग्रजीमध्ये बीबीए ला बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन असे म्हणतात.

बी बी ए मध्ये किती विषय आहेत?

विद्यार्थी मित्रांनो बी बी ए ह्या कोर्समध्ये एकूण सहा सेमिस्टर आहेत.व्यवसाय, विपणन, वित्त, उद्योजकता, आणि व्यवसाय गणित हे बीबीए मधील मुख्य विषय आहेत.

बी बी ए चे काम काय आहे?

बी बी ए पदवी पार पाडल्यानंतर तुम्हाला टुरिझम मॅनेजमेंट, अकाउंटंट मॅनेजमेंट, एच आरमॅनेजमेंट, फायनान्स मॅनेजमेंट, आणि उद्योजकता ह्या प्रकाराचे काम बीबीए मध्ये आहे.

बी बी ए नंतर काय करावे?

विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या शिक्षण पूर्ण करायचे असेल तर तुम्ही बीबीए नंतर एमबीए पदवी पार पाडू शकता. त्याचबरोबर बी बी ए नंतर चांगल्या कंपनीत नोकरीला लागून वार्षिक उत्पन्न चांगले काढू शकतात किंवा मग एक चांगला उद्योजकता नक्कीच बनू शकतात.

बी बी ए अभ्यासक्रमाचे पूर्ण स्वरूप काय आहे?

बीबीए चे पूर्ण स्वरूप बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन असे आहे आणि ही पदवी तीन वर्षासाठी आहे.

बी बी ए कोर्स कालावधी किती वर्षाचा आहे? 

 बीबीए ह्या कोर्सचा कालावधी तीन वर्षाचा आहे.

बी बी ए कोर्समध्ये ॲनिमल पॅटर्न आहे की सेमिस्टर पॅटर्न?

बीबीए कोर्समध्ये सेमिस्टर पॅटर्न आहे.

बी बी ए कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती असावी?

बीबीए कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता ही  बारावी उत्तीर्ण असून बारावी मध्ये 50% ह्या  टक्केवारीने उत्तीर्ण असावे

बीबीए म्हणजे काय? What is a bba in marathi

बी बी ए म्हणजे बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. बीबीए ही तीन वर्षासाठी ची पदवी असून या तीन वर्षांमध्ये व्यवसायाबद्दल अगदी सविस्तर शिकवले जाते. . आशा करतो बीबीए म्हणजे काय तुम्हाला थोडक्यात कळलं असेल. 

Leave a Comment