Site icon Marathi Delight

अशाप्रकारे करा घरी बसून व्यवसाय | online Coaching business information in marathi

online Coaching business information in marathi 

online Coaching business information in marathi

नमस्कार मंडळी,

आजच्या या लेखांमध्ये अगदी साधा आणि सोपा घरी बसून कोणता व्यवसाय करता येईल याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. बहुतेक लोकांना घरी बसून विविध प्रकारचे व्यवसाय सुरू करायचे असतात, परंतु त्यांना योग्य असा मार्ग सापडत नाही आणि म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी हा part time business ideas in marathi लेख घेऊन आलोय. अधिक माहितीसाठी हा लेख संपूर्ण वाचा. 

अशाप्रकारे करा घरी बसून व्यवसाय | online Coaching business information in marathi

बहुतेक लोकांना नोकरी करता करता त्यांच्या कलेसंबंधीत अजून काही घरी बसून व्यवसाय करायचा असतो. परंतु त्यांना वेळ देता येत नाही किंवा वेळ जरी देता येत असला तरी त्या वेळेनुसार कोणते काम करायचे हे ठरविता येत नाही, म्हणूनच आम्ही आजच्या लेखात तुमच्यासाठी अगदी सोपी अशी पार्ट टाइम बिझनेस आयडिया घेऊन आलो आहोत.

 आज-काल बहुतेक विद्यार्थी असे आहेत की जे अध्यापनाचे शिक्षण घेऊन घरीच बसले आहेत. परंतु त्यांना कोणताही प्रकारची नोकरी लागत नाही आणि असेच त्यांचे दिवस निघून जातात. किंवा जे काही इतर शिक्षक आहे ते सुद्धा आपल्या नोकरी व्यतिरिक्त दुसरेही काम करू इच्छितात.

परंतु त्यांना त्या गोष्टीची तेवढे आयडिया असते की त्या व्यवसायाची सुरुवात कुठून करावी कशी करावी आणि तो व्यवसाय पुढे कसा न्यावा याबद्दल कोणत्याही प्रकारची त्यांना माहिती नसते. आजच्या या लेखांमध्ये तुम्हाला यासंबंधीतच पार्ट टाइम बिझनेस आयडिया बघायला मिळणार आहे. अधिक माहितीसाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

Tuition classes in marathi

 

शिकवणी वर्ग | Tuition classes

आता शिकवणी म्हणजे काय ? तर अगदी तुमच्याकडे असलेल्या वेळेमध्ये तुम्ही तुमच्याकडे असलेले ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवू शकतात त्याला शिकवणे असे म्हटले जाते. बरेच विविध प्रकारच्या शिक्षक आपल्या समाजामध्ये आहेत ते नोकरी करता करता घरी बसून संध्याकाळच्या वेळेला शिकवणी सुद्धा घेत असतात. त्याचबरोबर शिकवणी फक्त शिक्षकांसाठी नव्हे तर विविध व्यवसायांमध्ये विविध वेगळ्या वेगळ्या प्रकारांमध्ये तुम्ही शिकवणी घेऊ शकतात.

शिकवणी मध्ये तुम्ही कुठल्या प्रकारचे केक डिझाईन असेल किंवा मग कपडे शिवायची काम असतील त्यानंतर कुठल्याही प्रकारचे आर्ट असेल, चित्रकला असेल किंवा व तुमच्याकडे जे काही वेगळ्या प्रकारचे कौशल्य असतील ते इतरांना शिकवून शिकवणी घरी बसून सुरू करू शकतात. शिकवणीमध्ये तुम्ही दरमहा विद्यार्थ्यांकडून आकारणी घेऊन चांगले पैसे सुद्धा कमवू शकतात. 

आजच्या काळात बहुतेक लोक  शिकवणी घेऊन समाधान मध्ये आपले नाव प्रसिद्ध करत आहेत. शिकवणीला “खाजगी धडे” असे सुद्धा म्हटले जाते. शिकवणी म्हणजे नेहमी तुम्हाला जे शिकायला मिळते त्यापेक्षा अजून जास्तीचं शिकवणी मार्फत तुम्हाला शिकायला मिळत असते म्हणूनच त्याला खाजगी धडे असे सुद्धा संबोधित केले जाते.

शिकवणी म्हणजेच विद्यार्थ्यांना विशिष्ट प्रकारचे व चांगल्या माध्यमातून समजून घेण्यास व उत्कृष्ट बनविण्यास मदत करत असतात. शिकवणी साठी सुद्धा काही महत्त्वाचे टप्पे आहेत ते आपण बघूया:

शिकवणी  घ्यायचा महत्त्वाचा उद्देश काय असतो | Purpose of Tuition Classes in marathi

विद्यार्थी शाळेमध्ये जे शिकतात ते ज्ञान अजून बळकट होण्यासाठी मुख्यता शिकवणी घेण्याचा उद्देश असतो. शाळेमध्ये जे ज्ञान मिळते त्या ज्ञानाला अजून बळकटपणा येण्यासाठी किंवा शिकण्यामध्ये ज्या कठीण संकल्पना विद्यार्थ्यांना वाटत असतील त्या संकल्पना सोप्या करून घेण्यासाठी आले शाळेमध्ये चांगले ग्रेड मिळविण्यासाठी शिकवणी लावली जाते. शिकवणी लावून चांगल्या परीक्षेची तयारी सुद्धा केली जाते.

परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी सुद्धा शिकवणी लावली जाते | Exam Preparation

विद्यार्थ्यांच्या चाचणी परीक्षा जवळ येतात किंवा परीक्षा जवळ आल्यावर बहुतेक विद्यार्थी हे शिकवणी लावून घेत असतात. याचा उपयोग करून त्या कालावधीमध्ये आपण  शिकवणी सुरू करून एका छोट्या व्यवसायाची सुरुवात करू शकतो. या शिकवणी मध्ये तुम्ही विद्यार्थ्यांची सराव परीक्षा घेऊन चांगल्या प्रकारे छोटा व्यवसाय सुरू करू शकतात.

part time business ideas in marathi Tuition classes

कोण कोणत्या प्रकारचे  शिकवणी घेता येते | Skill Enhancement 

शिकवणी ही विविध प्रकारच्या शिक्षणामध्ये तुम्ही घेऊ शकतात. त्यामध्ये, कला, संगीत, नृत्य,क्रीडा, शिवणकाम, पदार्थ शिकविणे आणि विविध प्रकारचे शिक्षण याव्यतिरिक्त शिकवणे अजून विविध गोष्टींची घेतली जाऊ शकते. या ठिकाणी मला माहित असलेले प्रकार तुमच्या  समोर मांडले आहेत.

शिकवणीचे काही प्रकार खालील प्रमाणे: part time business ideas in marathi 

विषय विशिष्ट शिकवणी – हे वर्ग गणित, विज्ञान, इंग्रजी किंवा इतिहास यासारख्या विशिष्ट विषयावर लक्ष केंद्रित करण्यासाठी बनवलेले असतात.

चाचणी तयारी शिकवणी –  हे वर्ग विद्यार्थ्यांना विशिष्ट परीक्षांसाठी तयार करतात, जसे की SAT, ACT, GRE, GMAT, IELTS किंवा TOEFL.अजून बरेच काही…

भाषा वर्ग –  भाषा शिकवणी विद्यार्थ्यांना नवीन भाषा शिकण्यास किंवा परदेशी भाषेतील त्यांची प्रवीणता सुधारण्यास मदत करते.जर तुम्हाला विविध प्रकारच्या नवनवीन भाषा येत असतील तर तुम्ही भाषा वर्ग घरबसल्या सुरू करू शकतात.

कौशल्य विकास –  शिकवणी वर्गांमध्ये संगीत धडे, कला वर्ग, कोडिंग आणि बरेच काही यासह विविध कौशल्यांचा समावेश होतो.तुमच्यामध्ये असलेली कला मग ते कुठल्याही प्रकारची असू दे, त्या कलेच्या मार्फत तुम्ही तुमची कौशल्य दुसऱ्या समोर मांडून शिकवणी सुरू करू शकतात. 

शिकवणी वर्ग सुरू करताना ह्या गोष्टींची काळजी घ्या 

शिकवणी वर्ग सुरू  करताना अगोदर तुमचा विषय कोणत्या प्रकारचा असणार आहे याची निवड करून घ्या.

 शिकवणी  वर्गाच्या विषयाची निवड केल्यानंतर  कितपत विद्यार्थ्यांची तुम्ही बॅच घेऊ शकता हे ठरवून घ्या.

जेवढ्या विद्यार्थ्यांची तुम्ही बॅच घेणार आहात त्या विद्यार्थ्यांना बसायला जागा पुरेशी असेल का याचा अंदाज घ्या.

 विद्यार्थ्यांची योग्य पद्धतीने सोय करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे.

शिकवणी वर्ग सुरू करताना तुमच्याकडे जो विषय तुम्ही निवडलेला आहे त्या विषया संबंधित जर काही सामग्री लागत असेल तर ती सामग्री अगोदरच आणून ठेवा.

शिकवणी वर्ग सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांपासून तुम्हाला कोणत्या वर्गासाठी किती शुल्क आकारायचे आहे हे ठरवून घ्या.

 तुम्ही आकारलेले शुल्क हे बाजारात स्पर्धात्मक आहे का याची  पडताळणी करून बघा.

तुम्ही सुरू करत असलेल्या शिकवणीसाठी जे शुल्क तुम्ही आकारात आहात त्याची किंमत योग्य पद्धतीने ठरवून त्याच्या बजेट फिक्स करून घ्या. 

निवडलेल्या विषयाचे शिकवणी सुरू केल्यानंतर तो वर्ग किती कालावधीपर्यंत तुम्हाला सुरू ठेवायचा आहे  हेही त्यासोबत ठरवून घ्या.

पार्ट टाइम बिझनेस साठी ही शिकवणी अगदी साधी आणि सोपी आयडिया आहे. जर तुमच्याकडे कला आणि कौशल्य असतील तर तुम्ही हा बिजनेस अगदी झटपट सुरू करू शकतात. यासाठी तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा जास्त वेळ किंवा पैसा अडकविण्याची गरज पडणार नाही. तुमच्याकडे असलेले ज्ञान हे तुम्ही इतरांपर्यंत शेअर करून चांगला पैसा या बिझनेस मार्फत कमवू शकतात.

आजच्या काळात विविध प्रकारच्या शिकवणी ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने घेतल्या जातात. तुम्हाला ज्या प्रकारे शिकवणे घेता येईल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. 

हे नेहमी लक्षात ठेवा-

योग्य प्रकारचा शिकवणी वर्ग निवडून तुम्ही चांगल्या प्रकारचा पार्ट टाइम बिजनेस सुरू करू शकतात. यासाठी तुम्हाला बाजारामध्ये असलेली स्पर्धा यावर चांगला विषय निवडून या बिजनेस ची सुरुवात करा.

Exit mobile version