सर्वात सोपी पार्ट टाइम बिजनेस आयडिया | youtube information in marathi

नमस्कार मंडळी,

आजच्या या part time business ideas in marathi  लेखांमध्ये आपण  सर्वात सोप्या प्रकारे पार्ट टाइम कशाप्रकारे आपल्याला बिजनेस करता येईल याची माहिती जाणून घेणार आहोत. ज्या लोकांना नोकरी करताना किंवा पूर्णवेळ काम केल्यानंतर उरलेल्या  वेळामध्ये काम करून पैसे कमविण्याची इच्छा असते त्या लोकांसाठी हा लेख अतिशय महत्त्वाचा असणार आहे. चला तर मग मंडळी आजच्या या लेखांमध्ये सर्वात सोपी पार्ट टाइम बिजनेस आयडिया कोणती आहे याची माहिती जाणून घेऊया. अधिक माहितीसाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. 

Table of Contents

पार्ट टाइम बिझनेस आयडिया | youtube information in marathi

आजच्या आधुनिक काळात बहुतेक लोकांना आपला छंद जोपासण्यासाठी किंवा पैसा कमावण्यासाठी अजून वेगळा व्यवसाय करण्याची इच्छा असते. जर तुमच्यामध्ये ही एखाद्या चांगल्या गोष्टीची आवड असेल ज्याच्याने तुमचा नवीन व्यवसाय उभा राहू शकतो तर तुम्ही त्या व्यवसायाला कमी वेळ देऊन त्यामध्ये आपला छंद जोपासून नक्की चांगल्या प्रकारे पैसा कमवू शकतात.

1पूर्ण वेळ काम केल्यानंतर अर्धवेळाची पुन्हा काम करण्याची इच्छा असणे हे अतिशय छान कल्पना आहे. आणि या कल्पनेचा उपयोग करून तुम्ही भविष्यामध्ये अधिक संपत्ती व अधिक यशस्वी नक्की होऊ शकतात. बहुतेक लोक पूर्णवेळ काम केल्यानंतर अर्धवेळ व्यवसाय सुद्धा करतात आणि त्या व्यवसायामध्ये हळूहळू ते यशस्वी व्हायला लागतात. 

part time business ideas in marathi – त्यांचा छंद जोपासून अर्धवेळ होते जो व्यवसाय ते करत असतात त्याच्यामध्ये हळूहळू ते यशस्वी झाल्यानंतर पूर्ण वेळ त्याला देऊन त्यामध्ये अधिक यशस्वी व संपत्ती समाविष्ट करून घेतात. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचा छंद असेल आवड असेल तर तुम्ही नक्कीच त्या मार्फत तुमचा नवीन छोटासा व्यवसाय सुरू करू शकतात. सुरुवातीला कमी वेळेत त्याला प्राधान्य देत हळूहळू आपली कामगिरी बजावत कधी तुम्ही त्याच्यामध्ये यशस्वी होऊन जाईल हे तुम्हाला सुद्धा समजणार नाही. तुम्ही उतरलेलं हे एक पाऊल भविष्यात तुमच्या अतिशय महत्त्वपूर्ण ठरू शकते.

पार्ट टाइम एखादा व्यवसाय सुरू करणे हा तुमच्या स्वप्नांना पाठिंबा देऊ शकतो.तुम्ही एक नवीन उद्योजक घडू शकतात त्याचबरोबर कौटुंबिक जबाबदाऱ्या अजून चांगल्या प्रकारे पार पाडू शकतात. 

आजच्या या लेखांमध्ये मी तुम्हाला असा एक मार्ग सांगणार आहे की ज्यामध्ये तुम्हाला पैसाही लागणार नाही आणि तो व्यवसाय तुम्ही अगदी घरबसल्या सुद्धा करू शकतात.

घरी बसून करा युट्युब च्या मार्फत पार्ट टाइम बिझनेस | part time business ideas in marathi 

आजच्या आधुनिक काळात आपल्याला जे काही हवे असेल ते सर्व गुगलच्या मार्फत पटकन मिळायला लागले आहे. अगदी ते कुठल्या प्रकारची माहिती असू दे किंवा मग कुठल्या प्रकारचा व्हिडिओ असू दे, अथवा कोणत्याही प्रकारचे उपकरण किंवा आपल्याला जे काही लागत असेल ते सर्व काही आजकाल आपल्याला गुगलच्या मार्फत कोणत्या ना कोणत्या माध्यमातून मिळायला लागले आहे.

 त्यापैकी गुगलचे भले मोठे असे  प्लॅटफॉर्म “युट्युब”  व्हिडिओ बघण्यासाठी किंवा व्हिडिओ शेअरिंग साठी जगातील सर्वात मोठे प्लॅटफॉर्म आहे. युट्युब हे असे प्लॅटफॉर्म आहे की बरेच लोक त्या ठिकाणी आपल्या व्यवसाय सुरू करून लाखो रुपये कमवत  आहेत.

युट्युब मध्ये आपण व्हिडिओ बघू शकतो आणि आपण व्हिडिओ अपलोड ही करू शकतो. जर आपल्याला कुठल्या प्रकारची माहिती हवी असेल तर आपण व्हिडिओ बघून ती माहिती आपणास मिळत असते, आणि जर तुम्हाला कुठल्या प्रकारचा बिजनेस किंवा पैसे कमवायचे असतील तर युट्युब जगातील सर्वात मोठा प्लॅटफॉर्म असून पैसे कमविण्याचा योग्य मार्ग आहे. 

जर तुमच्याकडे कोणताही प्रकारची कला असेल किंवा विविध प्रकारचे कौशल्य तुमच्या मध्ये सामावले असतील आणि तुमच्याकडे तो व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे नसतील, तर तुमच्यासाठी युट्युब हा योग्य पर्याय आहे. कारण youtube च्या मार्फत तुम्ही तुमच्या मध्ये असलेली कला जगापर्यंत पोहोचविण्याची क्षमता तुम्ही ठेवू शकतात.

तुमच्यामध्ये असलेली कला सादर  करून चांगला पैसा तुम्ही youtube च्या मार्फत कमवू शकतात त्याचबरोबर तुम्ही त्या कलेच्याद्वारे सुप्रसिद्ध सुद्धा होऊ शकतात. बहुतेक लोकांमध्ये विविध प्रकारच्या कला असतात आणि त्यांना ती कला दाखवण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसतो किंवा काही लोकांकडे पैसा नसतो आणि त्यामुळे ती कला ना त्यांना कोणाला दाखवता येत ना त्या कलेमार्फत त्यांना त्यांच्या भविष्य घडवता येत, परंतु तुम्ही घरी बसून पार्ट टाइम youtube च्या मार्फत अशा विविध कला कौशल्यांद्वारे व्यवसाय करू शकतात. 

युट्युब मध्ये तुम्हाला व्यवसाय सुरू करताना जर तुमच्याकडे आवश्यक कला कौशल्य असतील तर तुम्हाला पैशाची गरज पडणार नाही. फक्त तुम्हाला  सादरीकरण करून यूट्यूब च्या प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ अपलोड करायचे आहेत. youtube च्या प्लॅटफॉर्मवर आपली ग्रोथ कशाला प्रकारे होईल व आपले व्हिडिओ कशा प्रकारे जास्ती लोकांना दिसतील आणि आपण कशाप्रकारे जास्ती पैसा कमवून याची माहिती तुम्हाला त्याच्यासाठी घ्यावी लागेल. 

युट्युब इतिहास | YouTube History in marathi

युट्युब ची स्थापना 2005 साली झाली.युट्युब ची स्थापना तीन व्यक्तींनी मिळून केले आहे. त्यामध्ये सामील असलेले PayPal कर्मचारी-चाड हर्ले, स्टीव्ह चेन आणि जावेद करीम या तिघा व्यक्तींनी मिळून फेब्रुवारी 2005 साली सुरुवात केली.

जावेद करीम यांनी 23 एप्रिल 2005 रोजी पहिला व्हिडिओ यूट्यूब च्या प्लॅटफॉर्म वर “Me at the zoo” नावाचा पहिला व्हिडिओ अपलोड केला होता. 

यूट्यूब च्या मार्फत व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्या व्यवसायासाठी तुमचे जे प्रेक्षक असतील त्यासाठी व्हिडिओ तयार करून यूट्यूब च्या चैनल वर कशाप्रकारे प्रसारित करायचे.याबद्दल सर्व माहिती या लेखामध्ये दिली गेली आहे ती खालील प्रमाणे: 

यूट्यूब च्या प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ अपलोड करण्यासाठी तुमचा विषय निवडा | Select a niche or topic for your YouTube channel in marathi

युट्युब सुरू करायच्या अगोदर तुम्हाला ज्या विषयांमध्ये आवड असेल त्या विषयासंबंधीत तुम्ही एखादा विषय निवडून घ्या. त्या विषयावर तुमच्यामध्ये असलेले कला, कौशल्य बाहेर पडून प्रसारित होतील. ज्या विषयांमध्ये तुम्हाला आवड आहे किंवा ज्या विषयासंबंधित तुमच्यामध्ये कला व कौशल्य सामावलेले आहेत अशा विषयाची अगोदर निवड करून घ्या.तुमच्यामध्ये असलेले ही कला सातत्यपूर्ण असायला हवी. 

युट्युब मध्ये तुमचे प्रेक्षक कोणत्या प्रकारचे असायला हवे | Research Your Audience on youtube in marathi

तुमच्या आवडीनुसार तुम्ही ज्या प्रेक्षकांना केंद्रित केले आहे,त्या प्रेक्षकांची गरज ओळखून त्यांना प्राधान्य द्यायचे स्वारस्य तुमच्यामध्ये निर्माण करा.यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही ज्या विषयाची निवड केली आहे त्या विषयांमध्ये तुमच्या प्रेक्षकांना देण्यासाठी तुमच्याकडे ती सामग्री आहे का हे तपासून बघा. 

आता एक YouTube चॅनल तयार करा | Create a YouTube Channel in marathi

यूट्यूब चैनल तयार करण्यासाठी तुमच्या गुगल खात्यात साइन इन करून यूट्यूब चैनल तयार करा.युट्युब च्या प्लॅटफॉर्मवर तुमचे चैनल तयार झाल्यानंतर नाव निवडा. त्यामार्फत तुमची ओळख निर्माण होईल. तुम्ही तयार केलेले यूट्यूब चैनल वर तुमचा ब्रँड लोगो तयार करा.चांगल्या प्रकारचे चैनल वर प्रोफाइल चित्र अपलोड करा. यामुळे तुमच्या यूट्यूब चैनल चे प्रतिनिधित्व चांगल्या प्रकारे होईल.चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्या चैनल कशासाठी बनविलेले आहे व चैनल बद्दल थोडक्यात मार्गदर्शन करण्यासाठी चैनल चे आकर्षक प्रकारे वर्णन तयार करा.

Create a YouTube Channel in marathi
घरी बसून करा युट्युब च्या मार्फत पार्ट टाइम बिझनेस.

युट्युब साठी लागणारा सामग्रीची तयारी करा | Plan Your Content for youtube in marathi

युट्युब  वर व्हिडिओ अपलोड करण्यासाठी तुमच्याकडे जे व्हिडिओ बनवायचे आहेत त्या संबंधित जर कुठल्या प्रकारचे सामग्री हवी असेल तर ती सामग्री गोळा करायची सुरुवात करा. जर तुम्हाला कुठल्या सामग्रीची आवश्यकताही नसेल तर एक कॅलेंडर तयार करून एक योजना आखून घ्या.

तुम्हाला व्हिडिओ कोणत्या प्रकारचे बनवून कोणत्या दिवशी कशा प्रकारे अपलोड करायचे आहे याची सर्व नोंद एका कॅलेंडरवर आखून घ्या. तुमचे व्हिडिओ लोकांना कोणत्या माध्यमातून आवडतील त्याचे व्यवस्थापन करायला सुरुवात करा. त्याचबरोबर व्हिडिओ चांगल्या प्रकारे करून चांगल्या पद्धतीने कशा प्रकारे मांडता येतील याची आखणी करून घ्या. जर तुम्हाला व्हिडिओची वेगवेगळ्या प्रकारची सिरीज म्हणजेच मालिका बनवायची असेल तर त्याचे नियोजन अगोदर आखून घ्या.

चांगल्या प्रकारे व्हिडिओ बनवण्यासाठी या उपकरणांची आवश्यकता असते | Acquire Equipment for youtube in marathi

जर तुम्हाला उत्तम दर्जाचे किंवा अधिक चांगल्या प्रकारचे व्हिडिओ बनवायचे असतील तर तुम्हाला काही उपकरणांची आवश्यकता भासू शकते.चांगल्या प्रकारचे व्हिडिओ बनविण्यासाठी कॅमेरा, प्रकाश योजना आणि मायक्रोफोन या तीनही  उपकरणांच्या माध्यमातून तुम्ही युट्युब साठी चांगल्या प्रकारचे व्हिडिओ बनवू शकतात. 

युट्युब वर अपलोड करण्यासाठी व्हिडिओ तयार करा | Create and Edit Videos for youtube in marathi 

तुमच्याकडे चांगल्या प्रकारे चा कॅमेरा नसेल तर तुम्ही मोबाईलच्या कॅमेराने सुद्धा व्हिडिओ तयार करू शकतात.तुम्हाला ज्या प्रकारचा व्हिडिओ बनवायचा आहे तशा प्रकारच्या व्हिडिओ बनवून तयार करा .आपल्या व्हिडिओ एकदा नवीन तपासून बघा. तयार केलेल्या व्हिडिओमध्ये तुमचा आवाज किंवा तुम्ही जे दर्शविता आहे त्याचा आकार आणि अजून जे काही असेल ते व्यवस्थित रित्या तुम्हाला दर्शविता आला आहे का याची तपासणी करून घ्या.

तयार केलेल्या व्हिडिओला दिलेला आवाज हा व्यवस्थित ऐकायला येत आहे का याची काळजी घ्या.युट्युब वर अपलोड करण्यासाठी तुम्ही तयार केलेला व्हिडिओ  आकर्षक व माहितीपूर्ण  आहे का याची खात्री करून घ्या.

युट्युब वर व्हिडिओ अपलोड करताना व्हिडिओ शीर्षक, वर्णन आणि टॅग ऑप्टिमाइझ करा | Optimize Video Titles, Descriptions, and Tags for youtube in marathi

तुमच्या व्हिडिओ वर काम करण्यासाठी युट्युब चे अल्गोरिदम शोध घेत असते. यासाठी तुम्हाला तुम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओवर योग्य असे शीर्षक,वर्णन, टॅग व रिसर्च करून केलेला कीवर्ड वापरा.

प्रतिमा आणि SEO | Thumbnails and SEO for youtube in marathi

व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुमच्या व्हिडिओ वर जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेनुसार प्रेक्षक तुमचा व्हिडिओ वर क्लिक करतात. यासाठी तुम्हाला तुमच्या व्हिडिओची प्रतिमाही आकर्षक आणि चांगल्या प्रकारे डिझाईन केलेली असावी.  चांगल्या प्रकारच्या डिझाईन केलेल्या प्रतिमेमुळे प्रेक्षक तुमच्या त्या प्रतिमेच्या माध्यमातून व्हिडिओ वर क्लिक करण्यासाठीच आकर्षित होतात.

तुमच्या चैनल ची जाहिरात करा | Promote Your youtube  Channel in marathi

सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर तुमच्या चैनल ची जाहिरात करा.तुमच्या चैनल ची जाहिरात केल्यानंतर चैनल वर विविध प्रकारचे लोक व गर्दी जमा व्हायला सुरुवात होईल. यामुळे तुमच्या सबस्क्राईब वर वाढतील. यूट्यूब च्या माध्यमातून तुम्ही क्रॉस प्रमोशन सुद्धा करू शकतात. यामुळे तुमच्या यूट्यूब चैनल वर चांगल्या प्रकारचा प्रभाव पडू शकतो.

प्रेक्षकांसोबत गुंतून राहा |  Engage with Your Audience for youtube in marathi

तुमचे जे दर्शक किंवा प्रेक्षक आहेत त्यांच्यासोबत तुम्ही व्यस्त राहण्याचा प्रयत्न करा. तुमच्या व्हिडिओवर जर काही प्रतिक्रिया येत असतील तर त्यांना तुम्ही प्रतिसाद द्यायचा प्रयत्न करा. दिलेल्या प्रतिसादामुळे प्रेक्षक वर्ग हा आनंदित व गुंतून राहतो. प्रेक्षकांसोबत संवाद साधण्यासाठी प्रश्न उत्तरे चे व्हिडिओ सुद्धा बनवत राहा.यामुळे प्रेक्षक वर्ग जास्ती प्रमाणात आकर्षित व गुंतवणूक होत असते. 

यूट्यूब चैनल वर कमाई करा | Monetize Your Channel for youtube in marathi 

यूट्यूब चैनल वर कमाई करण्यासाठी  तुमची ही पात्रता आवश्यक असणार आहे. गेल्या 12 महिन्यांत 1,000 सदस्य आणि 4,000 पाहण्याचे तास हे पूर्ण झाल्यावर तुमचे चैनल मॉनेटाईज होऊन तुमच्या चैनल वर जाहिराती दिसू लागतात. युट्युब ने दिलेली ही पात्रता पूर्ण केल्यानंतर तुमच्या चैनल वर जाहिराती दिसू लागतात. आणि ह्या जाहिरातींचे तुम्हाला पैसे मिळत असतात. एकदा जर तुम्ही वरील सर्व टप्पे पार केले तर तुम्ही तुमचा प्रयत्न यशस्वी होऊन चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकतात. 

एक यशस्वी युट्युब व्यवसाय तयार करण्यासाठी तुमचा वेळ आवश्यक असतो. त्याचबरोबर हळूहळू तुमच्या चैनल जसे वाढत जाईल तसे तोही त्या चैनल वर सातत्याने नेहमी व्हिडिओ अपलोड करत राहा. 

part time business ideas for YouTube in marathi
part time business ideas for YouTube in marathi.

हे नेहमी लक्षात ठेवा– 

यशस्वी युट्युब व्यवसाय घडवून आणण्यासाठी तुम्हाला नेहमी सातत्यपूर्ण व धीर धरून व्हिडिओ अपलोड करत रहावे लागतील. असे केल्यास तुम्ही नक्की यशस्वी युट्युब व्यवसाय करू शकतात. त्याचबरोबर एक समृद्ध व यशस्वी व्यवसाय तयार करण्यासाठी सतत विविध गोष्टी शिकत राहणे व अनुकूलन करत राहणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. या संपूर्ण युट्युब प्रवासात नेहमी सत्यता ठेवणे हेही सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत. 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न | FAQ

ग्रामीण भागातील व्यवसाय?

ग्रामीण भागामध्ये व्यवसाय करण्यासाठी किराणा दुकान, खतांचे दुकान, शेतीमधील अवजारे लागतात याची दुकान, छोटे मोठे कपड्यांचे दुकान अशा प्रकारचे छोटे-मोठे व्यवसाय तुम्ही ग्रामीण भागात सुरू करू शकतात.

घरबसल्या व्यवसाय 

घरबसल्या तुम्ही युट्युब,  ब्लॉगिंग, शेअर मार्केट अशा विविध प्रकारचे व्यवसाय करत सुरू करू शकतात.

Leave a Comment