नमस्कार मंडळी,
आजच्या या part time business ideas in marathi लेखांमध्ये आपण घरी बसून इंटरनेटच्या माध्यमातून पार्ट टाइम बिजनेस ची आयडिया घेणार आहोत. आजच्या आधुनिक काळामध्ये प्रत्येक व्यक्तीकडे इंटरनेटची सुविधा असते आणि त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीकडे मोबाईल किंवा लॅपटॉप या दोन्ही गोष्टी असतातच. विद्यार्थी मित्रांनो या दोन्ही उपकरणांच्या आणि त्याला जोड असलेल्या इंटरनेटच्या माध्यमातून आज मी तुमच्यासाठी लाखो रुपये कमवून देणारी पार्ट टाइम बिझनेस आयडिया घेऊन आलेलो आहोत. अधिक माहितीसाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
इंटरनेट वापरून करा घरी बसून व्यवसाय | blog information in marathi
अनुक्रमाणिका
- 1 इंटरनेट वापरून करा घरी बसून व्यवसाय | blog information in marathi
- 2 ब्लॉग म्हणजे नक्की काय ? What is blogging in marathi
- 3 ब्लॉगिंग चा उद्देश काय आहे ? Purpose of Blogging in marathi
- 4 ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म | Blogging Platforms in marathi
- 5 ब्लॉगिंग प्रक्रिया | Blogging Process in marathi
- 6 ब्लॉग मधून कमाई | Blog Monetization in marathi
- 7 ब्लॉग साठी प्रेक्षक वर्ग तयार करा | Building an Audience for blogging in marathi
- 8 ब्लॉगिंग करताना ह्या गोष्टींचे विशेष काळजी घ्या
बहुतेक लोकांकडे भरपूर प्रमाणात इंटरनेट असते परंतु त्या इंटरनेटचा वापर करून आपण मोबाईलच्या किंवा लॅपटॉपच्या माध्यमातून विविध प्रकारचे व्यवसाय सुद्धा करू शकतो हे लोकांना माहितीच नसते.परंतु आजच्या या लेखांमध्ये मी तुमच्यासमोर असाच एक छोटा पण खूप पैसे कमवून देणारा व्यवसाय मांडणार आहे.
यासाठी तुम्हाला तुमच्याकडे ज्या प्रकारची कला कौशल्य किंवा ज्या प्रकारची ज्ञान असेल ते सुद्धा चालेल, त्याचबरोबर हा व्यवसाय तुम्ही मोबाईलच्या किंवा लॅपटॉप च्या माध्यमातून झटपट सुरू करू शकतात. चला तर मग आपण बघूया असा कोणता आहे हा व्यवसाय..
मंडळी इंटरनेटच्या माध्यमातून त्याला जोड असलेल्या मोबाईल ठेवा लॅपटॉपच्या सहाय्याने तुम्ही तुमच्याकडे जे कला असेल त्या संबंधित तुम्ही एक आर्टिकल तयार करून तुमची स्वतःची वेबसाईट किंवा ब्लॉग पोस्ट बनवू शकतात.
ब्लॉग म्हणजे नक्की काय ? What is blogging in marathi
how to create blog in marathi –
ब्लॉगिंग म्हणजे वेबसाइट किंवा ब्लॉग प्लॅटफॉर्मवर नियमितपणे आर्टिकल लिहिणे आणि प्रकाशित करणे. “ब्लॉगर्स” आता ब्लॉगर्स म्हणजे नक्की काय? ब्लॉगर्स म्हणजे त्यांच्याकडे विशिष्ट प्रकारचे सामग्री असते आणि ते त्या सामग्रीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवीत असतात त्यांना ब्लॉगर्स असे म्हटले जाते.
ब्लॉगर से विविध प्रकारचा विषयांवर माहिती,कथा, मते आणि त्यांच्यामध्ये असलेली कला किंवा कौशल्य समाविष्ट करत असतात. व्यक्ती आणि व्यवसाय व्यक्ती आणि व्यवसाय व्यक्तींच्या व्यापक ऑनलाइन श्रोत्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि गुंतवून ठेवण्यासाठी व्यक्तीगत जर्नलिंग प्लॅटफॉर्मवरून एका सशक्त माध्यमापर्यंत ब्लॉगिंगचा विकास झाला आहे.
ब्लॉगिंग चा उद्देश काय आहे ? Purpose of Blogging in marathi
माहिती देणे (Information Sharing) – ब्लॉगर त्यांना ज्या विषयांची आवड आहे किंवा ज्यात त्यांचे कौशल्य आहे अशा विषयांवर माहिती आणि ज्ञान सामायिक करून दुसऱ्यांपर्यंत माहिती देण्याचा काम ते करत असतात.
कथा सांगणे (Storytelling) – ब्लॉग वैयक्तिक कथाकथनासाठी एक व्यासपीठ म्हणून सुद्धा काम करते, जिथे बहुतांशी व्यक्ती त्यांचे अनुभव, विचार आणि किस्से शेअर करतात.
मार्केटिंग आणि व्यवसाय (Marketing and Business) – अनेक व्यवसाय उत्पादने किंवा सेवांचा प्रचार करण्यासाठी, त्यांच्या उद्योगात अधिकार प्रस्थापित करण्यासाठी ब्लॉग पोस्ट चा उपयोग केला जातो.ब्लॉगच्या माध्यमातून तुम्ही विविध प्रकारच्या व्यवसायाचे मार्केटिंग सुद्धा करू शकतात.
ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म | Blogging Platforms in marathi
सेल्फ-होस्टेड ब्लॉग्स (Self-Hosted Blogs) –
ब्लॉगर्स WordPress.org सारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करून त्यांच्या स्वतःच्या वेबसाइट्स तयार करू शकतात, जे डिझाइन,विविध प्रकारची सामग्री आणि पैसे कमवण्यासाठी एक चांगला पर्याय निवडून देते.
होस्ट केलेले ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म (Hosted Blogging Platforms) –
WordPress.com, ब्लॉगर आणि मध्यम सारख्या सेवा सेटअप परंतु मर्यादित कस्टमायझेशनसह विनामूल्य किंवा परवडणारे होस्टिंग पर्याय देतात.यापैकी तुम्हाला हवे असलेले पर्याय तुम्ही निवडू शकतात.
ब्लॉगिंग प्रक्रिया | Blogging Process in marathi
Content Creation – ज्या गोष्टींमध्ये तुम्हाला आवड आहे त्या विषयावर लेख लिहायला सुरुवात करा.यालाच ब्लॉग पोस्ट म्हणून संबोधित केले जाते. ज्या विषयावर तुम्ही लेख लिहीत आहे त्या विषयावर तुम्ही प्रतिमा, व्हिडिओ आणि अजून काही प्रकारचे मल्टीमीडिया असतील ते त्यासोबत तुम्ही समाविष्ट करू शकतात.
Publishing – लेख तयार झाल्यानंतर ब्लॉगर्सचे ब्लॉग पोस्ट प्रकाशित करतात.जेव्हा तुम्ही ब्लॉग पोस्ट करतात तेव्हा जर तुम्हाला एखाद्या विशिष्ट तारखेला किंवा विशिष्ट वेळेला प्रकाशित करायचं असेल तर त्या ठिकाणी सेटिंग मध्ये जाऊन तुम्ही हा पर्याय सुद्धा निवडू शकतात. म्हणजे तुम्ही लिहिलेले आर्टिकल हे त्या वेळेला त्या तारखेला प्रकाशित होईल.
Promotion – ब्लॉगर्स सोशल मीडिया, ईमेल मार्केटिंग, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO) आणि इतर मार्केटिंग च्या माध्यमातून प्रेक्षक वर्गापर्यंत कसे पोहोचता येईल याचा प्रयत्न करीत असतात. जर तुम्हाला प्रेक्षकांपर्यंत तुम्ही लिहिलेले आर्टिकल पोहोचवायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन याचा चांगल्या प्रकारे उपयोग करून सानिध्यात आणावे लागेल.
ब्लॉग मधून कमाई | Blog Monetization in marathi
जेव्हा तुम्ही ब्लॉग तयार करता, त्यानंतर तुम्हाला त्याचे मॉनिटायझेशन ऑन करावे लागते. याच्याने होते असे की गूगल अॅड सेन्स लागल्यानंतर लोकांना तुमच्या ब्लॉग पोस्ट च्या माध्यमातून ज्या जाहिराती दिसणार त्याचे पैसे तुम्हाला मिळतील. गुगल अॅडसेन्सच्या नेटवर्कच्या माध्यमातून तुम्ही लाखो रुपये तुमच्या ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून कमवू शकतात.
तुम्ही तयार केलेल्या लेखांमध्ये जर तुम्ही कुठल्या प्रकारच्या वस्तू विषयी वर्णन करत असाल तर तुम्ही त्यालाच लागून संबंधित विषयाला “अॅफलेट मार्केटिंग” सुद्धा करू शकतात. अफिलेट मार्केटिंग मधून सुद्धा लोक लाखो पैसे कमवत आहेत.तुम्हाला जे प्रॉडक्ट विकायचे आहे त्या प्रॉडक्ट ची लिंक तुम्ही तुमच्या लेखांमध्ये जर दिले असेल आणि त्या लिंक वरून ते प्रॉडक्ट कोणी विकत घेत असेल तर त्याचे कमिशन तुम्हाला मिळेल आणि ह्या एका बिजनेस मधून नवीन बिजनेस ची सुद्धा सुरुवात होते आणि लोक याच्यातून लाखो रुपये कमवत आहेत.
तुम्ही तयार केलेली ब्लॉग पोस्ट याच्यासोबत जर तुम्हाला कोणाची पार्टनरशिप अर्थातच एखाद्या ब्रँडची पार्टनरशिप मिळत असेल तर ते तुम्हाला पैसे देऊन पार्टनरशिप करून सुद्धा चांगले पैसे कमवता येतात.
ब्लॉक पोस्टच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाइन अभ्यासक्रम किंवा ई पुस्तके या गोष्टींचे सुद्धा विक्री करून मोठ्या प्रमाणात पैसे कमवू शकतात.
ब्लॉग साठी प्रेक्षक वर्ग तयार करा | Building an Audience for blogging in marathi
तुम्ही तुमच्या ब्लॉग पोस्ट वरची माहिती टाकत आहात त्याच्या तुम्ही चांगल्या प्रकारच्या प्रतिमा बनवून घ्या.
बनविलेल्या प्रतिमा आता सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करा.
असे केल्याने ज्या प्रतिमा लोकांना दिसतील त्या प्रतिमाच्या माध्यमातून लोक तुमच्या ब्लॉगपर्यंत पोहोचतील.
यामुळे तुमच्या ब्लॉगवर गर्दी होईल आणि मोठ्या प्रमाणात पैसे कमवता येतील.
तुम्ही तुमच्या ब्लॉग पोस्टवर जे काही लिहीत आहात ते अगदी उच्च दर्जाचा व वेगळ्या पद्धतीने मांडलेला असावा .
उत्तम प्रकारच्या सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन चा उपयोग करून प्रेक्षकांना हवी असलेली माहिती देणे आणि त्या लोकांची ट्राफिक आपल्या ब्लॉग पोस्टवर घेणं अतिशय उत्तम पद्धत आहे.
ब्लॉगिंग करताना ह्या गोष्टींचे विशेष काळजी घ्या
ब्लॉगिंग करताना तुम्ही कशा पद्धतीने ब्लॉक पोस्ट प्रकाशित करत आहात नियमित तेवढ्याच कालावधी किंवा अंतराने ब्लॉग पोस्ट प्रकाशित करत रहा.
जर तुम्हाला ब्लॉगिंगच्या मार्फत जास्तीत जास्त पैसा कमवायचा असेल तर तुम्हाला यासाठी जास्तीत जास्त वेळ देऊन चांगल्या प्रकारची मेहनत घेऊन काम करावे लागेल. यामुळे यश तुमच्या नक्कीच हातात येईल.
जर तुम्ही सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनचा उपयोग करून ब्लॉक पोस्ट लिहीत असणार तर हा एक उत्तम पर्याय असून ब्लॉगिंग मध्ये पटकन यशस्वी होण्याचा मार्ग सापडतो.
हे नेहमी लक्षात ठेवा-
ब्लॉगिंग मध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर सध्या मार्केटमध्ये असलेल्या नवीन ट्रेंड याविषयी माहिती घ्यावी लागेल.व त्यावर ब्लॉग पोस्ट कराव्या लागतील.सातत्याने तुमचे कर्तव्य बजावत रहा.तुम्ही ब्लोगिंग मध्ये नक्की यशस्वी होणार.