Site icon Marathi Delight

majha avadta pakshi nibandh in marathi | माझा आवडता  पक्षी निबंध मराठी

majha avadta pakshi nibandh in marathi

majha avadta pakshi nibandh in marathi

majha avadta pakshi nibandh in marathi –

नमस्कार मंडळी,

पक्षी किती सुंदर असतात ना, मला तर सुंदर दिसणारे पक्षी खूप जास्त प्रमाणात आवडतात. सुंदर दिसणाऱ्या पक्षांमध्ये मोर हा पक्षी किती सुंदर. चला तर मग आज आपण माझा आवडता पक्षी निबंध म्हणजे माझा आवडता पक्षी मोर याविषयी आपण मराठीमध्ये निबंध लिहून घेणार आहोत.

मोर हा प्राणी इतका सुंदर आहे की त्याने एकदा पिसारा फुलवला की असं वाटतं की सारखा त्याला बघतच राहावं. म्हणूनच मला मोर हा पक्षी खूप आवडतो. तुम्हाला माहिती आहे का मोर हा पक्षी आपला राष्ट्रीय पक्षी सुद्धा आहे बर का…

जेव्हा जेव्हा मी मोर बघतो तेव्हा मला खूप आनंद होतो, आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे मला मोर बघितल्यानंतर जणू काही लहानपणाची आठवण येते म्हणजे ते लहानपणीचे गाणे नाही का “नाच रे मोरा” जणू काही आता सुद्धा मोर बघितल्यानंतर मनातल्या मनात मीच नाचत असतो इतका मला मोर बघितल्यानंतर आनंद होतो. मोर हा पक्षी इतका सुंदर आहे की त्याला बघितल्यानंतर कोणीही त्याच्या मोहात पडणारच.

मोराचे वर्णन काय सांगू तुम्हाला मोराचे सुंदर असे हिरवे निळे पंख आणि डोक्यावर असलेला मोराचा तुरा आणि मोराचे ते थुई थुई  नाचणे म्हणजे एकदम मोर हा पक्षी आपल्या डोळ्यावर भुरळच टाकतो.

majha avadta pakshi nibandh

माझा आवडता  पक्षी निबंध मराठी | majha avadta pakshi nibandh in marathi

अगदी प्राचीन काळापासून मोराला एक विशिष्ट प्रकारचे स्थान मिळते.सरस्वतीचे वाहन मोराची लोक मनापासून पूजा सुद्धा करतात. बहुतेक प्रमाणात चित्रकारांना मोराची चित्रकारी करताना अतिशय आनंद आणि उत्साह असतो मोराचे चित्र कार्य करण्यामध्ये बहुतेक चित्रकार विशिष्ट प्रकारचे प्राधान्य देतात. 

तुम्हाला माहिती आहे का? मोर हा शेतकऱ्यांचा सुद्धा मित्र आहे.आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मोर हा प्राणी शेतकऱ्यांचा मित्र कसा? तर बरेचसे प्राणी शेतामध्ये नासधूस करतात जसे की उंदीर, साप, बेडूक  ह्या प्राण्यांना मोर खातो आणि शेतीची रक्षा करतो, म्हणूनच मोराला शेतकऱ्यांचा मित्र सुद्धा म्हटले जाते. ज्या ठिकाणी शेतामध्ये, बागेमध्ये, राणामध्ये मोर असतो,आणि मोराच्या असल्याने त्या  जागेची शोभा किती वाढून जाते। अर्थातच मोराचं मुख्य आकर्षण म्हणजे पाऊस पडतो तेव्हा मोर आपला पिसारा फुलवून थुई थुई नाचत असतो.

माझा आवडता प्राणी कुत्रा निबंध 

मोराचा हे थुई, थुई नाचणं लोकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करते. मला सुद्धा मोर हा पिसारा फुलवून नाचताना प्रचंड प्रमाणात आवडतो. भारतामध्ये बऱ्याच लोकांचा मोर हा आवडीचा पक्षी आहे. बऱ्याच ठिकाणी, दुकानांमध्ये मोराचे पिसारे सुद्धा विकायला ठेवलेले असतात. बरेच जण तर मोराचे पिस विकून सुद्धा व्यवसाय करत आहेत.मोराच्या पिसांपासून विविध प्रकारचे दागिने सुद्धा बनविले जातात.काही लोक मोराचे पिसारे हे आपल्या घरात भिंतीवर प्रेम मध्ये लागतात. मी सुद्धा माझा आवडता पक्षी मोर याचे मोठ्या प्रमाणात पिसारे सांभाळून ठेवले आहेत. मी तर मोराचे काही काही पिसारे माझ्या वह्यांमध्ये सुद्धा ठेवले आहेत.

तुम्हाला माहिती आहे का? मोर हा एक पार्थिव पक्षी आहे. मोर हा पक्षी जमिनीवरच आढळून येतो. भारतामध्ये बहुतेक लोकांचे असे मानणे आहे की मोराला बघितल्यानंतर आपली घरातील परिस्थिती सुधारते व मनाला शांतता मिळते. मोराला आपल्या जेवणामध्ये  मऊ  झाडाची देठ, सरडे, किटके, बिया,झाडाची पाने,लहान साप असे मोराचे खाद्य आहे. मोराला जास्त प्रमाणात लहान साप खायला आवडतात.

तुम्हाला हे  माहित आहे का? भारतीय मोरांची लांबी सुमारे शंभर ते दोनशे सेंटीमीटर एवढी असते मोराच्या पंखांची लांबी सुमारे तीन ते चार फूट एवढी असते. मोराचा वेग सुमारे  ताशी 16 किलोमीटर एवढा आहे.मोराच्या वजन सुमारे सहा ते दहा किलो एवढे असते. आणि मोराचे आयुष्य सरासरी वीस वर्षे एवढे असते.

majha avadta pakshi

माझा आवडता  पक्षी निबंध मराठी | majha avadta pakshi nibandh in marathi

मला मोर हा प्राणी प्रचंड प्रमाणात आवडतो. पूर्वीच्या काळी मोठमोठ्या राजांना सुद्धा मोर हा पक्षी अतिशय आवडायचा. चंद्रगुप्त  मौर्य यांनी काढलेल्या नाण्यावर मोराची मूर्ती काढलेली आहे.व मुगल सम्राट शहाजानने आपल्या शाही दरबारात मोराची आकाराची फळी सुद्धा बांधलेली आहे.मोठमोठाले राजे मोर पक्षीला एवढे पसंत करतात तर विचार करा मोर हा पक्षी मला किती आवडत असेल.मोराला पक्ष्यांचा राजा मानला जातो.

माझ्या मनाचा पक्षी मोर राजाच आहे.मी सुद्धा आपल्या घरामध्ये मोराची माझ्या ताईकडून विविध प्रकारचे चित्र रेखाटून घेतली आहेत आणि ती भिंतीवर लावली आहेत. याव्यतिरिक्त वर्तमानपत्रांमधून किंवा इतर कुठलाही पुस्तकांमधून मोराचे चित्रण काढून साठविले आहेत. मला मोर हा पक्षी खूप खूप आवडतो मोर हा माझा अतिशय आवडीचा पक्षी आहे.

आणखी माहिती हवी असल्यास तुम्ही इथे क्लिक करू शकता.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न | FAQ

पक्षी मोर मराठी

मोर हा पक्षी आपल्या सौंदर्याने मोहक करण्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे. भारतीय संस्कृतीमध्ये मोराचे नाव मयूर असे आहे.

भारताचा राष्ट्रीय पक्षी कोण आहे?

मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे.

मोर हा किती वर्ष जगू शकतो?

मोर हा प्राणी सुमारे 20 ते 25 वर्ष जगू शकतो.

आपला राष्ट्रीय पक्षी कसा झाला?

मोर हा पक्षी कृपा आणि सौंदर्याचे प्रतीक असून 1963 मध्ये मोराला भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित करण्यात आले.

भारतामध्ये मोर कशाचे प्रतीक आहे?

संपूर्ण भारतामध्ये मोर हे कृपा, शांतता व अभिमानाचे प्रतीक आहे

Exit mobile version