शेतकरी वर निबंध | Farmer essay in Marathi

नमस्कार मंडळी,

आजच्या या लेखामध्ये आपण शेतकरी राजावर निबंध लिहिणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो या निबंधमार्फत आपण शेतकरी राजाचा जीवन सुद्धा जाणून घेणार आहोत. शेतकरी राजा विषयी अधिक माहिती व Farmer essay in Marathi साठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

शेतकरी वर निबंध | Farmer essay in Marathi (300 words)

समाजात व संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेत शेतकरी अतिशय महत्त्वपूर्ण अशी भूमिका बजावतात. शेतकरी हा प्रत्येक मानवी जीवनातील एक महत्त्वपूर्ण घटक बनला आहे. मित्रांनो आज मी या निबंध लेखनामार्फत शेतकरी  राजाचे महत्त्वपूर्ण विविध प्रकारचे पैलू व शेतकरी राजाला आपण विविध प्रकारच्या दृष्टिकोनातून कसे समजू शकतो हे सांगणार आहे.

Farmer essay in Marathi-मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की शेतकरी आपल्या दैनंदिन जीवनात किती महत्त्वाची भूमिका बजावतात? शेतकरी हा जगातील अन्नपुरवठ्याचा प्राथमिक उत्पादक असून मानवी जीवनासाठी आवश्यक असलेले सर्व प्रकारची पोषक तत्वे पोहोचविण्याचे काम शेतकरी करतात. शेतकरी राजाने आपल्या शेतीमध्ये पशुधन वाढवतात त्याच बरोबर विविध प्रकारच्या पिकांची लागवड शेतामध्ये करून चांगल्या प्रकारची उत्पादने घेऊन  मानवी जीवनाला सहाय्यक करतात.

तुम्ही कधी विचार केला आहे का की  जर आपल्याला जेवायलाच मिळाले नाही तर आपण कसे होऊ? सर्व जगात अन्नाची तीव्र टंचाई निर्माण होऊन सर्व बालके व मानवी जीवन अस्ताव्यवस्था होऊन शाकाहारी प्राणी त्याचबरोबर पृथ्वीतलावरील प्रत्येक जीव हा कुपोषित होऊन अन्नाची तीव्र  टंचाई निर्माण होईल.अर्थातच शेतकरी राजा शिवाय पृथ्वीतलावर अन्नाची तीव्र टंचाई निर्माण होईल.

या व्यतिरिक्त तुम्हाला तर माहितीच असेल की अनेक देशांची अर्थव्यवस्था ही उत्पादनावर  सुद्धा चालते. बहुतेक देशांच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचे महत्वपूर्ण योगदान आहे.आपल्याला नेहमीच असं वाटत होतं की शेतामध्ये जेव्हा उत्पन्न निघताय आणि त्याची व्यापाराकडे जाऊन जेवढी विक्री होत आहे फक्त आपल्याला तेवढाच फायदा होत असतो परंतु या व्यतिरिक्त सुद्धा शेतीचे विविध प्रकारचे फायदे आहेत.

कधीही डोळ्यांना दिसणारा शेतीचा हा उद्योग अन्नप्रक्रिया, वाहतूक अशा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या सर्वत्र संधी उपलब्ध करून देत आहेत. जर आपण शेतकऱ्यांची मदत करून त्यांना कृषी क्षेत्रामध्ये असलेल्या वाढत्या ज्ञानाची माहिती देऊन शेतीमध्ये जास्तीत जास्त मेहनत न घेता उत्पादन कसे काढायचे यासाठी जर आपण त्यांना मदत केली तर ग्रामीण भागातील शेतकरी सुद्धा  गरीबीतून बाहेर निघतील असे मला वाटते.छोट्या छोट्या गावांमध्ये अर्थातच संपूर्ण देशात ग्रामीण भागामध्ये शेती हा प्रत्येक घरोघरी चालणारा व्यवसाय असतो. म्हणजेच ग्रामीण भागांना शेतकरी हा कणा असतो.

शेतकरी वर निबंध | Farmer essay in Marathi (400 words)

Farmer essay in Marathi-भारत कृषी प्रधान देश आहे. भारतामध्ये ग्रामीण भागात शेती हा व्यवसाय बहुतेक प्रमाणात चालतो. ग्रामीण भागामध्ये रोजगाराच्या संधी कमी असून शेती हा रोजच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा घटक बनलेला आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी शेती ही एक जगायचं साधन बनलेला आहे. ग्रामीण भागातील शेती करण्यामुळे शेतकरी स्थानिक अर्थव्यवस्था, शाळा व विविध प्रकारच्या सुविधा पायाभूत टिकविण्याचा प्रयत्न करणे.शेतकरी राजाच समाजामध्ये खूप मोठे योगदान आहे.

जागतिक स्तरावर अन्न संकट टाळण्यासाठी शेतकरी राजा हा नेहमी रात्रंदिवस कष्ट करत असतो. त्याचबरोबर सामाजिक स्तरावर व जागतिक स्तरावर अन्न संकट अर्थातच अन्नटंचाई निर्माण होऊ नये म्हणून शेतकरी राजा ऊन,वारा,पाऊस अशा सर्व संकटांना सामोरे जाऊन अन्नपुरवठा शेतकरी राजा करत असतो. शेतकरी राजामुळे संपूर्ण जगाला अन्नपुरवठा होत असतो. शेतकरी राजा हा खूप मेहनती असून तो पूर्ण जगाला अन्नधान्याची टंचाई निर्माण होऊ देत नाही.

शेतकरी हा आपला वारसा सुद्धा पुढे चालवत असतो. ग्रामीण भागात करा बऱ्याच ठिकाणी   पिढी दर पिढी शेती हा व्यवसाय सुरू असतो. यामध्ये विविध प्रकारचे आजच्या तांत्रिक पद्धतीचे बदल घडवून रासायनिक खतांचा कमी वापर करून जमीन कशा पद्धतीने सुपीक बनविता येईल याची काळजी घेऊन चांगल्या प्रकारची उत्पादने घेऊन शेतीमध्ये अजून चांगले कसे बदल घडविता येतील याबद्दल शेतकरी नेहमी प्रयत्नशील असतो.

शेतकरी वर निबंध
Farmer essay in Marathi

शेतकरी राजा त्याच्या शेतीमध्ये पिकविलेले अन्न हे कसे लोकांसाठी सुरक्षित असेल याची काळजी घेतात. माणसाच्या मूलभूत तीन गरजा आहेत अन्न, वस्त्र, निवारा आता यामध्ये सर्वात अगोदर येतं ते म्हणजे अन्न. म्हणजेच माणूस हा अन्नाशिवाय जगू शकत नाही. आणि आज आपण आपल्या ताटामध्ये जे काही खात आहोत ते फक्त आपल्या शेतकरी राजाची  देन आहे. जरी आपण त्यांना दुकानामधून विकत आणून घरी बनवत असून तरीसुद्धा ते अन्न प्राथमिक हे शेतकरी राजाने  बनवलेला असतं. हे तर तुम्हा सर्वांना ठाऊकच आहे. म्हणजे आपल्याला अन्नासाठी शेतकरी राजा किती महत्वपूर्ण आहे हे यावरून समजत.

Farmer essay in Marathi-तुम्हाला माहित आहे का?शेतकऱ्यांच्या शेतीतील उत्पादनामुळे देशांना जागतिक बाजारपेठेत सहभागी होता येते आणि तेथून परकीय चलन कमावता येते. कृषी उत्पादनाचा व्यापार हा आंतरराष्ट्रीय स्तरावर केला जातो.आणि ह्यामुळे जागतिक स्तरावर व आर्थिक परस्परवलंबनात कृषी क्षेत्राची महत्त्वपूर्ण भूमिका ठरते. अगदी प्राचीन काळापासून चालत आलेली ही परंपरा अशीच सुरू राहणार. अगदी जुन्या काळापासून ते नव्या युगापर्यंत शेतकरी बांधवांनी सामाजिक अर्थव्यवस्थेला  मोठ्या योगदान दिलेले आहे.

माझा शेतकरी राजा रात्रंदिवस शेतीच्या कामासाठी उभे राहून जमिनीची चांगल्या प्रकारे मशागत करत त्याचबरोबर पशुपक्ष्यांची संवर्धन करत अन्नसुरक्षा, आर्थिक समृद्धी,सांस्कृतिक वारसा  व पर्यावरणाच्या समतोल या सर्व गोष्टींचे पालन पोषण माझा शेतकरी राजा हा जपतो आहे. आपल्या दैनंदिन जीवनात शेतकऱ्याचे खूप महत्त्व आहे हे तुम्हाला या निबंधावरून समजलेच असेल अशी मी अपेक्षा करतो. आणि विनवणी करतो की तुमच्याकडून जेवढे शक्य असेल तेव्हा तुम्ही शेतकऱ्याला मदत करावी आणि शेतकरी राजाला नेहमी मानसन्मान द्यावा.

Farmer essay in Marathi (600 words)
शेतकरी वर निबंध

शेतकरी वर निबंध | Farmer essay in Marathi (600 words)

Farmer essay in Marathi-मला खूप आनंद होत आहे की मला आज शेतकरी राजा वर निबंध लिहायला मिळाला.शेतकरी राजा हा पृथ्वीला दिलेला सर्वात मोठा वरदान आहे असं म्हटलं तरी चालेल. शेतकरी राजा हा पृथ्वीचा संरक्षक आहे.शेतकरी राजा हा फक्त पूर्ण समाजातच नाही पोषण करत तर हा अर्थव्यवस्थेचा सुद्धा पोषण करतो. शेतकरी राजा हा संपूर्ण समाजाचा, व जगाचा कणा आहे. शेती हा एक असा व्यवसाय आहे जो हजारो वर्षांपासून चालू आहे आणि पुढेही तो चालूच राहील. त्यामुळे सर्व मानवी समाज व्यवस्थितपणे टिकून आहे.शेतकरी राजा हा आपला सर्वांसाठी अन्न व अन्न संसाधने तयार करतो.

शेतकरी राजाची सुरुवात छान उगवत्या सूर्यापासून होते.सर्व शेतकरी हे अगदी कष्टाळू असतात. शेती चांगली करण्यासाठी त्यांच्या जीवनात विविध प्रकारची उद्दिष्ट असतात आणि ते उद्दिष्ट पार पाडण्यासाठी ते सकाळी लवकर उठून आपल्या दिवसाची सुरुवात करत असतात.शेतकरी राजाचे कामे हे विविध प्रकारचे असतात. प्रत्येक ऋतूनुसार शेतकऱ्याची कामे बदलत असतात जसे की वसंत ऋतु मध्ये मातीची मशागत करून बियाणे लावणे हे काम वसंत ऋतूत केले जाते.

उन्हाळ्यामध्ये पिकांचे चांगल्या प्रकारे संरक्षण करायची कामे शेतकरी करतो व शरद ऋतूमध्ये अखेर त्याचे मेहनतीचे फळ त्याला मिळते. शरद ऋतूमध्ये शेतीमध्ये उगवलेले जी काही फळे असतात त्याची कापणी केली जाते. हिवाळ्यामध्ये सुद्धा शेतीमध्ये लागवड केलेले पिकाचे संरक्षण करणे त्याचबरोबर पुढील हंगामासाठी पिकाचे नियोजन करून ठेवू नये, पशुपालन करणे हे सर्व केले जाते. शेती हा केवळ एक व्यवसाय नसून जमीन अशी जोडले गेलेलं एक नातं आहे. सर्व शेतकऱ्यांना पर्यावरणाचे वातावरण, हवामान, व मातीच्या आरोग्य कशाप्रकारे टिकून ठेवायचे या सर्व गोष्टींचे वेगळ्या प्रकारची समज असते.शेतकऱ्याचे हे ज्ञान त्याचे पिढ्यान पिढ्या चालवत असता आणि कृषी क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवीत असतात. शेतकरी राजाला शेती करताना विविध गोष्टींचा सामना करावा लागतो.

शेतकरी वर निबंध | Farmer essay in Marathi (600 words)

कधी कधी शेतीमध्ये चांगले पीकही घेऊन त्यावर कीड लागते, रोगराई पसरते, हवामान बदलानुसार पिकाच्या आरोग्य ढासाळते अशा अनेक गोष्टींचे चढ-उतार शेतकऱ्यांच्या जीवनात येत असतात. आणि यामुळे शेतीमध्ये बऱ्याच नुकसान सुद्धा होत असते. परंतु बदलात या नुकसानाच्या भरपाईत शेतकऱ्याला काहीच मिळत नाही. कधी कधी तर असे होते शेतकरी रात्रंदिवस कष्ट करूनही त्याच्या हाती कोणत्याही प्रकारचे फळ मिळत नाही. परंतु  तरीही शेतकरी हताश न होता आपले कष्ट चालूच ठेवतो आणि फळाची अपेक्षा करत असतो.

Farmer essay in Marathi-काही काही शेतकऱ्यांना तर अशा परिस्थितीचा सामना करायला लागतो की शेती करताना त्याचा वेळही जातो, कष्टही फारसे लागतात, पैसाही खूप खर्च होतो, नको त्या प्रकारची कर्ज त्याच्या डोक्यावर होतात, आणि हे सर्व काही फेडण्यासाठी त्याच्याकडे काही सोडत नाही आणि अशा कारणामुळे बरेच शेतकरी आत्महत्या करणे असे टोकाचे पाऊस सुद्धा उचलून घेतात.शेती या व्यवसायात कष्ट खूप आहेत. परंतु यासाठी शेतकरी राजाचे प्रयत्न नेहमी चांगलेच असतात आणि चांगले फळ देखील त्यांना मिळत असते.

Farmer essay in Marathi - 400 words
Farmer essay in Marathi (600 words)

आधुनिक काळातील तंत्रज्ञानामुळे शेतीमध्ये फारसे बदल झालेले आहेत. यासाठी शेतकऱ्यांना जास्ती कष्ट घ्यावे लागत नाही किंवा वेळही लागत नाही. आजच्या तंत्रज्ञानामुळे शेतीची काम पटपट होऊ लागले आहेत. शेती तंत्रज्ञानामध्ये पीक सुधारक, पीक उत्पादन क्षमता, अशा विविध यंत्रांचा समावेश असून शेतीची कामे तीव्र गतीने होऊ लागली आहेत. तंत्रज्ञानामुळे आणि नवनवीन साधनांमुळे शेतीवर चांगल्या प्रकारचा प्रभाव पडताना दिसत आहे. परंतु काही ठिकाणी पर्यावरणावर अवलंबून असलेली शेती यावर जास्त भर दिला जात आहे.

मातीचे आरोग्य, जलस्रोत, यावर काम करणारी तंत्रे शेतकरी वापरत आहेत. आणि हा बदल भविष्यातील पिढीसाठी तसेच जमिनीचे संरक्षण करण्यासाठी,पर्यावरणातील शेतीचे नकारात्मक परिणाम कमी करण्यासाठी अधिक फायदेशीर आहे.याचा शेतकरी राजाला मोठ्या प्रमाणात हातभार लागणार आहे. यामुळे शेतकरी राजाचे कष्ट कमी होतील आणि शेतकरीला त्याला कष्टाचे फळ मिळेल.

Farmer essay in Marathi-शेतकरी राजाच्या आपल्या जीवनात एक महत्त्वाचा स्थान असून शेतकरी राजा नेहमी चांगल्या फळाची अपेक्षा करत असते मला वाटते.शेतकरी राजाला आपल्याकडून जेवढे सहकार्य होत असतील तेवढे सहकार्य करावे त्यांचे जीवन सुरळीत बनवले असे मी देवाकडे मागणी मागते.आज कालच्या वाढत्या लोकसंख्येमुळे शेतकरी राजालाही तेवढेच कष्ट घेऊन सर्व जनतेस अन्न पुरवावे लागत आहे.मला असे वाटते की ह्या जगात अधिक परिश्रम कोणी करत असेल तर तो फक्त आणि फक्त शेतकरी राजा आहे.शेतकरी राजा हा सर्व जगाचा पालनपोषण  करता आहे. 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न | FAQ

शेतकरी वर निबंध लेखन

भारत हा एक कृषिप्रधान देश असून, भारताची सुख-समृद्धी ही कृषी उत्पादनावर अवलंबून आहे. आणि हे सर्व घडवून आणण्यासाठी शेतकऱ्याचे यामध्ये मोलाचे सहकार्य आहे. भारत असा देश आहे की ज्यामध्ये 70 टक्के लोक शेती हा व्यवसाय करत आहेत. ग्रामीण भागात शेती हा व्यवसाय अधिक प्रमाणात केला जात. भारतामध्ये शेतकरी रात्रंदिवस कष्ट करूनही सुखी जीवन जगत आहे. शेतकरी हा संपूर्ण समाजाचा व जागतिक स्तरावर अर्थव्यवस्थेचा आधार बनला आहे. भारतामध्ये असंख्य प्रमाणात छोटे-मोठे खेडे आहे आणि या खेड्या गावांमध्ये सर्वत्र चालणारा व्यवसाय म्हणजे शेती. पिढी दर पिढी शेती हा व्यवसाय चालूच आहे.

शेतकरी आत्महत्या

शेती हा व्यवसाय करताना  पर्यावरणानुसार शेतीमध्ये पिकांचा बदल होतो. काही वेळेस पिके योग्य प्रमाणात वाढत नाही तर काही वेळेस पिकांवर किटके, रोगराई पसरते अरे यामुळे शेती करणाऱ्या शेतकऱ्याला त्याच्या कष्टाचे फळ मिळत नाही.शेती करताना शेतकऱ्याला पीक लागवडीसाठी, बियाणे खरेदीसाठी, जमिनीच्या मशागतीसाठी  भरपूर प्रमाणात पैसा खर्च करावा लागतो आणि एका काळात असे होते की शेतकऱ्याच्या हाती काहीच लागत नाही, यामुळे काही शेतकरी हताश होऊन आत्महत्येचा पर्याय निवडतात. मित्रांनो जर आपण शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे सहकार्य केल., ज्या शेतकऱ्यांकडे शेती करण्यासाठी आवश्यक ते साधने नसतील ते साधने त्यांना आणून दिले तर समाजामध्ये एक नवीन बदल घडवून व शेतकरी आत्महत्या कुठेतरी थांबेल.

 

Leave a Comment