शिक्षक दिन भाषण मराठी | 5 september teachers day speech in marathi

नमस्कार मंडळी,

पाच सप्टेंबर म्हणजे असा दिवस ज्यांच्या विषयी आपल्या मनात विशेष प्रकारचे स्थान, व आपले भविष्य घडविण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न  या सर्वांचा सन्मान करण्यासाठी आपण आज या ठिकाणी जमलेलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो आजचा दिवस म्हणजेच 5 सप्टेंबर शिक्षक दिन साजरा करण्यासाठी आज या ठिकाणी आपण सर्वजण जमलेलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो आजच्या ह्या लेखामध्ये 5 september teachers day speech in marathi भाषेमध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारचे  शिक्षक दिनानिमित्त भाषण तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे.

आजच्या लेखामध्ये शिक्षक दिनानिमित्त लिहिलेले भाषण हे तुम्ही तुमच्या शाळेत होते सुद्धा देऊ शकतात.

विद्यार्थ्यांना आकार देण्यात शिक्षकांची मोठी भूमिका असते.आई फक्त जन्म देते शिक्षक माणसाला जीवन देतो. “नरेंद्र मोदी”

5 september teachers day speech in marathi
Teachers Day speech in marathi

5 september teachers day speech in marathi शिक्षक दिन भाषण मराठी

5 September teachers day speech in marathi-पाच सप्टेंबर शिक्षक दिन हा दिवस जणू  काही शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस…

आपल्या सर्वांसाठी केलेले शिक्षकांनी महत्त्वपूर्ण योगदान याची जाणीव करून शिक्षकांना मानसन्मानित करायचा आजचा हा दिवस.. 

मित्रांनो तुम्हाला माहिती आहे 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून का साजरा केला जातो? 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन साजरा करावयाचे कारण भारताचे दुसरे राष्ट्रपती माजी “डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण” यांचा जन्मदिवस 5 सप्टेंबर १९६२ रोजी झाला आणि म्हणूनच पूर्ण देशात पाच सप्टेंबर या दिवशी “शिक्षण दिन” साजरा केला जाऊ लागला. बहुतेक शाळांमध्ये, मोठमोठ्या संस्थांमध्ये शिक्षक दिनानिमित्त विविध प्रकारची व्याख्यान आयोजित केले जातात. आणि हे महत्त्वाचे सुद्धा आहे. मित्रांनो जर तुमच्या शाळेत सुद्धा पाच सप्टेंबर या दिवशी शिक्षकांविषयी भाषण देण्याचे आयोजित केले असेल तर यामध्ये तुम्ही नक्की भाग घ्या आणि शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करा. 

चला तर मग आपण भाषण करायला सुरुवात करूया….

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक कार्यक्रमाचे प्रमुख पाहूने उपस्थित असलेले सर्व माझे आदरणीय शिक्षक वर्ग व विद्यार्थी मित्रांनो …आज पाच सप्टेंबर शिक्षक दिन. आजच्या शिक्षक दिन कार्यक्रमानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत.शिक्षक दिनानिमित्त मी जे काही दोन शब्द तुमच्यासमोर मांडणार आहे ते तुम्ही अगदी शांतचित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती.

“गुरु शिवाय ज्ञान नाही”
आणि 
“ज्ञानशिवाय जगात सन्मान नाही”

5 september teachers day

5 september teachers day speech in marathi

5 सप्टेंबर. भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस “शिक्षक दिन” म्हणून साजरा केला जातो.डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण हे मोठे शिक्षण तज्ञ व भारतीय संस्कृती जपणारे होते.डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांनी शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचे व मोठ्या प्रमाणात योगदान दिलेले आहेत. म्हणूनच 5 सप्टेंबर हा दिवस त्यांच्या सन्मानार्थ शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

आजचा हा दिवस सर्व शिक्षक व गुरूंसाठी अधिक महत्त्वपूर्ण आहे.आज ह्या ठिकाणी मी सर्व माझ्या प्रिय शिक्षकांना सांगू इच्छितो की सर्व शिक्षकांसाठी आम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या मनात तुमचे अधिक महत्त्वपूर्ण असे स्थान आहे. आणि आजच्या विशेष दिवशी मी सर्व शिक्षकांचे सर्व विद्यार्थ्यांचे वतीने आभार व्यक्त करू इच्छितो.

आई-वडिलांनंतर प्रथम गुरु हे आपले शिक्षक असतात.यावर मी दोन ओळी बोलू इच्छितो…

तुम्ही फक्त आमचे शिक्षक च नाही,
  तर,
एक चांगले मित्र, मार्गदर्शक व तत्वज्ञानी,
असे सर्व रूपाने साकारलेले ….
एकच व्यक्ती आहात….
आपण नेहमी दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल मी नेहमी तुमचा आभारी असेल..

विद्यार्थी मित्रांनो, जसा कुंभार मातीच्या मडक्याला आकार देऊन त्याला घडवत असतो त्याच पद्धतीने शिक्षक हा सुद्धा आकार देऊन आपल्या विद्यार्थ्यांना घडवीत असतो.अगदी लहानपणापासूनच पाटीवर पेन्सिलने अक्षरात गिरवायला सुरुवात सुद्धा शिक्षकच शिकवितात. पावला पावलावर आपल्याला पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करतात. आपल्या हिताचा विचार करून योग्य मार्ग दाखवतात.

ते म्हणतात ना शाळा हे मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये देवाच्या रूपामध्ये शिक्षक आहेत.आपण सर्वजण घरातून बाहेर पडल्यावर शाळेमध्ये सर्वात जास्त वेळ घालवतो व शिक्षकांच्या सानिध्यात राहून चांगला व्यक्ती घडतो. शिक्षक हे आपल्याला यशस्वी होण्याचा मार्ग दाखवतात. अगदी छोट्या त्या मोठ्या गोष्टींपासून यशस्वी होण्याचे मार्ग हे आपल्याला  शिक्षकांकडून शिकायला मिळालेले असतात. आपण काही कारणास्तव अपयशी होतो तेव्हा सुद्धा शिक्षक हे आपल्याला मार्गदर्शन करून यशस्वी बनण्याचे मार्ग दाखवत असतात.एक शिक्षक नेहमी त्याच्या विद्यार्थ्याला सकारात्मक गोष्टींनी प्रेरित करून चांगला व्यक्ती घडवत असतो. 

5 September teachers day speech in marathi – डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण असे म्हणतात की-

teachers day speech in marathi dr

शिक्षणाशिवाय कोणतीही ध्येय तुम्ही गाठू शकत नाही.

वैयक्तिक आयुष्यात शिक्षणाचे एक महत्त्वपूर्ण स्थान आहे.

 

आधुनिक काळापासून चालत आलेली परंपरा म्हणजे गुरु शिष्य यांच्यातील नातं हे अलौकिक आहे. गुरु म्हणजेच शिक्षक हा विद्यार्थ्यांना सर्व संकटांना सामोरे कसे जावे याचे शिक्षण देतो. म्हणूनच शिक्षकांना भविष्याचा निर्माता सुद्धा म्हटलं जातं. वर्गामध्ये तासिकेच्या वेळेस शिक्षक वर्गात अगदी तासान तास उभे राहून घसा कोरडा होईपर्यंत आपले ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत प्रदान करत असतात.

शिक्षकांनी आपल्याला प्रदान केलेल्या ज्ञानामुळे विशिष्ट स्थानी पोहोचण्याचा मार्ग सहज मोकळा होतो. त्यामुळे समाजामध्ये उच्च ठिकाणी जायची संधी आपल्याला प्राप्त होते आणि याचे सर्व श्रेय शिक्षकांना जाते.नोकरी असो किवा सामाजिक क्षेत्र अश्या विविध उच्च ठिकाणी जाण्याचा मार्ग मोकळा होतो  तो केवळ शिक्षकांमुळेच… शिक्षक हा विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने वळण  लावतो.

जे आपल्याला या समाजात एक चांगला व्यक्ती घडवतात,

पावलं पावली चांगल्या वाईट ची संकल्पना देतात, अशा देशातील या सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या दिवशी माझा कोटी कोटी प्रणाम… 

5 September teachers day speech in Marathi

शिक्षक हा असा व्यक्ती आहे जो असत्याकडून सत्याकडे…अंधाराकडून प्रकाशाकडे…नेणारा भला  मोठा दीपस्तंभ आहे.विद्यार्थी मित्रांनो आजच्या या दिवसाचा अवचित्त साधून शिक्षकांनी आपल्यासाठी केलेले कठोर परिश्रम आपले भविष्य घडविण्यासाठी केलेले समर्पण याच्या विषयी सर्व विद्यार्थी मित्रांकडून मी शिक्षकांचे आभार मानतो.शिक्षक हा जणू काही ज्ञानाचा दिवा आहे.आज आपण ज्या वातावरणामध्ये घडत आहोत, ज्या ठिकाणी आपण उभे आहोत त्या सभोवतालची संपूर्ण माहिती ही आपल्याला शिक्षकांमुळेच प्राप्त झालेली असते.

शिक्षक जणू काही ज्ञानाचा भांडारच आहे.इथे असलेल्या सर्व उपस्थित शिक्षक वर्ग यांनी मला घडवून आणले आहे, त्यांनी दिलेल्या ज्ञानाचा मी नेहमी ऋणी राहील. प्रत्येक शिक्षकाने माझ्यावर अतिशय चांगले असे संस्कार घडवून नेहमी मला पाठिंबा दिला आहे.आणि त्यांनी दिलेल्या पाठिंबामुळे माझ्या आयुष्यात अतिशय चांगल्या बदल झालेले आहेत.आजच्या शिक्षक दिनी शिक्षकांचे फक्त आभार मानून किंवा धन्यवाद म्हणून त्यांचे उपकार फेडले जाणार नाहीत, परंतु तरीही माझ्या सर्व प्रिय शिक्षकांना माझा शत शत प्रणाम… व धन्यवाद.

मी सर्व शिक्षकांना सांगू इच्छितो की ही फक्त एक नोकरी नसून एक यशस्वी व्यक्ती घडविणे हे काम तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने बजावत आहे.आजच्या या शिक्षक दिनी मी शिक्षकांना फक्त धन्यवाद नाही तर सर्व शिक्षण समाजाला सांगू इच्छितो शिक्षण हे अतिशय शक्तिशाली असे साधन आहे आणि म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने शिक्षकाला आवश्यक असलेली साधने मानसन्मान पार पाडणे ही आपली जबाबदारी आहे. अशा वातावरणाने शिक्षक सुद्धा नेहमीच आनंदित राहतील, अशी माझी अपेक्षा आहे. 

5 September teachers day speech in marathi

आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने या व्यासपीठावर आमंत्रित करून मला जे काही दोन शब्द बोलायला मिळाले त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानाचे मी चांगला उपयोग करून एक सफल व्यक्ती  बनवून शिक्षकांचे नाव उज्वल करेल. येथे उपस्थित असलेल्या सर्व गुरुजनांना माझा नमस्कार…सर्व शिक्षकांना माझी एवढीच विनंती आहे की आज पर्यंत माझ्याकडून जर तुम्हाला काही त्रास झाला असेल तर मला क्षमा करा आणि तुमच्या ज्ञानाने माझा जीवन प्रकाशमय करा…

जाता जाता एवढंच म्हणेन की येथे  उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि शिक्षक वर्ग यांचे  मी सर्व विद्यार्थ्यांकडून आभार मानू इच्छितो. ज्या शिक्षकांनी मला घडविले माझ्यावर चांगले संस्कार केले,मी बघितलेला स्वप्नांना पाठिंबा दिला अशा सर्व शिक्षक वर्गाला माझा कोटी कोटी प्रणाम…. 

दिला आम्हा सर्वांना ज्ञानाचा भांडार…

केलं तुम्ही सर्वांना भविष्यासाठी तयार…

आभारी आहो आम्ही त्या शिक्षकांचे…

त्यांनी घडविले आम्हाला आज.. 

सर्व शिक्षकांना माझ्याकडून शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा… 

Teachers day speech in marathi

हे ही वाचा,

माझा आवडता खेळाडू निबंध

शिक्षक दिवस

वारंवार विचारले जाणारे प्रश्न FAQ

5 सप्टेंबरला आपण शिक्षक दिन का साजरा करतो?

मित्रांनो भारताचे दुसरे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जयंतीनिमित्त 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो.

शिक्षण दिन केव्हा असतो?

 शिक्षण दिन 5 सप्टेंबरला असतो.

शिक्षक चा अर्थ काय आहे?

शिक्षक म्हणजेच शिकविण्याचे काम करणाऱ्या व्यक्ती शिक्षक हे शिकणे आणि शिकविणे ह्या दोन्ही प्रक्रियांना चांगल्या पद्धतीने पार पाडतात.

शिक्षक दिनाचे जनक कोण आहेत?

 शिक्षक दिनाचे जनक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण हे आहेत.

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण हे शिक्षकांबद्दल काय म्हणाले?

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण हे शिक्षकांबद्दल म्हणतात की, शिक्षक हा देशातील सर्वोत्तम विचार असणारा पाहिजे.

शिक्षक दिवस का महत्व मराठी?

भारताचे  दुसरे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस म्हणजेच 5 सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी शिक्षणाविषयी समाजामध्ये वेगळी ओळख निर्माण केली होती.. शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. या दिवशी सर्व विद्यार्थी विविध प्रकारचे आपल्या शिक्षकांसाठी गुरुसाठी मनोगत व्यक्त करतात व शिक्षकांचे आभार मानतात.

शिक्षक दिन किती तारखेला येतो?

 शिक्षक दिन ५ सप्टेंबरला येतो.

5 सप्टेंबरला विशेष काय?

 5 सप्टेंबरला विशेष शिक्षक दिन असतो.

Leave a Comment