brain eating amoeba kerala boy: केरळमध्ये मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे 14 वर्षाच्या मुलाचा मृत्यू 

नमस्कार मंडळी,

brain eating amoeba kerala boy: केरळमध्ये मे 2024 पासून ही सलग संसर्गाची तिसरी गोष्ट आहे. संसर्ग झालेला सर्व रुग्णांना ताप, उलट्या, डोकेदुखी आणि चक्कर येणे असा त्रास झाला.केरळ मध्ये झालेल्या 14 वर्षाच्या मुलाचा मृत्यूचा कारण नेमकं काय? कसा असतो हा मेंदू खाणारा अमिबा? अमिबा शरीरामध्ये शिरकाव कसा होतो? काय आहे Brain Eating Amoeba? याबाबत आज आपण आजच्या लेखांमध्ये माहिती जाणून घेणार आहोत अधिक माहितीसाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की (brain eating amoeba kerala boy) वाचत राहा.

brain eating amoeba kerala boy | ब्रेन इटिंग अमिबा

केरळच्या आरोग्य विभागाने गुरुवारी सांगितले की, बुधवारी रात्री 11.20 वाजता मृदुलचा मृत्यू झाला. brain eating amoeba kerala boy त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.’प्राइमरी अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटिस’ म्हणजेच पीएएम संसर्ग गलिच्छ पाण्यात आढळणाऱ्या प्री-लिव्हिंग अमिबामुळे होतो. तो नाकाच्या पातळ त्वचेतून शरीरात प्रवेश करतो.

“Brain Eating Amoeba”हा अमिबा मेंदूला संक्रमित करतो, त्यानंतर 24 जून रोजी मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान गुरुवारी त्याचा मृत्यू झाला. ब्रेन इटिंग अमिबा संसर्गामुळे गेल्या दोन महिन्यांत एकूण तीन मृत्यू झाले आहेत. त्यामुळे या घातक मेंदूच्या संसर्गाबाबत माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. ब्रेन इटिंग अमिबा म्हणजे काय आणि आपण ते कसे टाळू शकतो ते जाणून घेऊया.

नेग्लेरिया फॉवलेरी नावाचा एक पेशी अमिबा हा कुठे आढळतो? Brain Eating Amoeba

नेग्लेरिया फॉवलेरी हा एक पेशी अमिबा गोड्या पाण्यामध्ये, अस्वच्छ पाण्यामध्ये,नद्या, तलाव, गरम पाण्याचे झरे अशा ठिकाणी आढळतो. हा विषाणू पाण्यात असतो. मानवी शरीरात हा विषाणू नाकाद्वारे प्रवेश करतो आणि मेंदूमध्ये जातो.नंतर हळूहळू मेंदू खायला सुरुवात करतो.जसं जसं हा अमिबा मेंदू खायला सुरुवात करतो त्याप्रमाणे मेंदूला हळूहळू सुज यायला लागते. 

याला सामान्यतः ‘ब्रेन इटिंग अमिबा’ असे म्हणतात कारण जेव्हा अमिबा असलेले पाणी नाकात जाते तेव्हा ते मेंदूला संक्रमित करते. ‘प्राइमरी अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटिस’ हा मेंदूच्या संसर्गाचा एक दुर्मिळ प्रकार आहे.म्हणजेच पीएएम संसर्ग गलिच्छ पाण्यात आढळणाऱ्या प्री-लिव्हिंग अमिबामुळे होतो. तो नाकाच्या पातळ त्वचेतून शरीरात प्रवेश करतो.

नेग्लेरिया फॉवलेरी लक्षणे कोणती? काय आहे Brain Eating Amoeba

नेग्लेरिया फॉवलेरी हा सामान्य अमिबा नाही यामुळे,डोकेदुखी, मळमळ, उलट्या, ताप येणे ही लक्षणे आढळतात. हा सामान्य अमिबा नाही, ज्याचा संसर्ग प्रतिजैविकांनी बरा होऊ शकतो. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोलच्या मते, पीएएम हा मेंदूचा संसर्ग आहे जो अमीबा किंवा नेग्लेरिया फॉवलेरी नावाच्या एकल-पेशी जीवांमुळे होतो. हा इतका जीवघेणा आहे की जर संसर्ग वेळीच थांबला नाही तर 5 ते 15 दिवसात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.

केरळमध्ये नेग्लेरिया फॉवलेरी नावाच्या एकल-पेशी अमिबामुळे 2 महिन्यात 3 मृत्यू | Brain Eating Amoeba

केरळमध्ये 2016 मध्ये पहिली केस आली होती. यानंतर 2019, 2020 आणि 2022 मध्ये प्रत्येकी एक केस आढळून आली. या सर्व रुग्णांचा मृत्यू झाला होता. ताप, डोकेदुखी, उलट्या आणि चक्कर येणे ही या आजाराची लक्षणे आहेत.

केरळ मधील मलपुरम येथील पाच वर्षीय मुलीचा कोझिकोड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात नेग्लेरिया फॉवलेरी म्हणजेच मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे मृत्यू झाला आहे.या मुलीवर 13 मे पासून रुग्णालयात उपचार चालू असताना अपयश आलं. या मुलीला एका आठवड्या पेक्षा जास्त वेळ व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आलं परंतु ही खूप प्रयत्न नंतरही या मुलीचा जीव वाचवू शकले नाही. दुसरे म्हणजे 25 जून रोजी कन्नूर येथील 13 वर्षीय मुलीचा मृत्यू. यापूर्वी 2023 आणि 2017 मध्ये राज्याच्या किनारपट्टीवरील अलाप्पुझा जिल्ह्यात हा आजार आढळून आला होता.

केरळमधील कोझिकोडमध्ये मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे होणाऱ्या संसर्गामुळे (अमीबिक मेनिंगोएन्सेफलायटीस) एका 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. रिपोर्ट्सनुसार, मृदुल नावाचा हा मुलगा एका छोट्या तलावात आंघोळीसाठी गेला होता, त्यामुळे त्याला हा संसर्ग झाला.

हे पण वाचा..👇

Leave a Comment