Mazi ladki bahin yojana 2024: माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना मिळणार दरमहा 1500 रुपये… 

नमस्कार मंडळी,

Mazi ladki bahin yojana 2024: लाडकी बहिण योजना ही महाराष्ट्रामधील एक सरकारी योजना आहे याचा उद्देश लिंग समानता आणि मुली व महिलांचे सक्षमीकरण करणे आहे. ही योजना मुलींच्या शिक्षणासाठी आरोग्यासाठी आणि आर्थिक सहाय्य वाढविण्यासाठी आहे.

मोदी सरकारने ठरवल्याप्रमाणे सर्वांना आत्मनिर्भर करण्यासाठी माझी लाडकी बहीण ही नवीन योजना काढली आहे या योजनेसंदर्भात आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.बऱ्याच लोकांना अजूनही माझी लाडकी बहीण या योजनेची माहिती मिळालेली नाही, तर मग “माझी लाडकी बहीण योजना” या योजनेसाठी महिलांना पंधराशे रुपये मिळणार आहेत आणि हे पंधराशे रुपये दर महा मिळविण्यासाठी याची पूर्तता कशी करायची हे आपण आजच्या या लेखांमध्ये जाणून घेऊया..

माझी लाडकी बहिण योजना यासाठी महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत जसे की बऱ्याच लोकांना या योजनेसाठी फॉर्म भरायचा आहे पण त्यांना वेबसाईट माहिती नाही (Mazi ladki bahin yojana official website) Mazi ladki bahin yojana 2024 या योजनेसाठी कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत (Majhi ladki bahin yojana documents in marathi) अप्लाय कशा पद्धतीने करायचे आहे (Mazi ladki bahin yojana maharashtra online apply) ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक (mazi ladki bahin yojana maharashtra online apply link)अशा अनेक बाबतीत माहिती आज आपण Mazi ladki bahin yojana 2024 या लेखांमध्ये मिळवणार आहोत अधिक माहितीसाठी हा लेख शेवटपर्यंत वाचत रहा. 

What is a ladki bahin yojana in Maharashtra? महाराष्ट्रामध्ये राबवली जाणारी लाडकी बहीण योजना आहे तरी काय?

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” (mukhyamantri mazi ladki bahin yojana) या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील सर्व  महिला व मुलींना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री/अर्थमंत्री अजित पवार यांनी, अर्थसंकल्प सभागृहात मांडला आणि यावेळेस त्यांनी अर्थसंकल्प मांडताना  “माझी लाडकी बहीण योजना” (Mazi ladki bahin yojana 2024) या योजनेची अंमलबजावणी केली. या योजनेअंतर्गत महिला व मुलींना दरमहा सरकारकडून पंधराशे रुपये मिळणार आहे. विशेष म्हणजे हे योजना तत्काळ लागू झालेली आहे आणि यामुळे महिला व मुलींना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत.

mukhyamantri mazi ladki bahin yojana

mukhyamantri mazi ladki bahin yojana

Mazi ladki bahin yojana 2024

ज्याप्रमाणे या योजनेमध्ये वयाची अट आहे तसेच यासाठी विशेष म्हणजे अजूनही एक अट आहे ती म्हणजे लाभार्थींची वर्षाला आवक 2,50,500 पेक्षा कमी असल्यावरच ही योजना लागू होईल.अर्थातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मांडलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात जाहीर केलेली ही “Mazi ladki bahin yojana 2024” योजना 21-60 वयोगटातील विवाहित, घटस्फोटित आणि निराधार महिलांसाठी आहे, ज्यांना 1,500 रुपये मासिक मदत मिळेल.

Ladki bahini yojana maharashtra: माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र ठरतील…

 • ज्या महिलांचं वय 21 ते 65 या वयोगटांमध्ये बसत या वयोगटातील महिला या योजनेसाठी पात्र ठरणार आहे.
 • ज्या लाभार्थींचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा कमी आहे अशा महिला या लाडकी बहीण योजना यासाठी पात्र ठरणार आहे.
 • योजनेसाठी लाभ घेणाऱ्या महिला या महाराष्ट्रातील रहिवासी असायला हवेत.
 • बँकेत खाते असणे आवश्यक आहे.

Ladki bahini yojana maharashtra: माझी लाडकी बहीण योजना यासाठी या महिला अपात्र असतील…

 • ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त आहे अशा महिला माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत.
 • जर तुम्ही इन्कम टॅक्स म्हणजे आयकर दाता असणार तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र आहेत.
 • कुटुंबातील व्यक्ती ह्या सरकारी नोकरी किंवा निवृती वेतन घेत असेल तर या माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही. 
 • पाच एकर पेक्षा अधिक जमीन असल्यास या योजनेसाठी अपात्र ठरविले जाईल.
 • कुटुंबातील सदस्याकडे चार चाकी वाहन (ट्रॅक्टर सोडून) असेल तर ह्या योजनेसाठी तुम्ही अपात्र आहात.
 • सरकारी योजनांमधून ज्या महिला त्या योजनांचा लाभ घेत आहेत अशा महिलांनाही लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
Ladki bahini yojana maharashtra

Ladki bahini yojana maharashtra

Majhi ladki bahin yojana documents in marathi | Documents Required for Ladaki Bahin Yojana | लाडकी बहीण योजना यासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे

 • आधार कार्ड
 • रेशन कार्ड 
 • जात प्रमाणपत्र 
 • बँकेचे पासबुक
 • पासपोर्ट फोटो
 • उत्पन्नाचा दाखला
 • मूळनिवासी प्रमाणपत्र 
 • माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज फॉर्म 
 • मोबाईल नंबर 
 • वयाचा पुरावा 
Majhi ladki bahin yojana documents in marathi

Majhi ladki bahin yojana documents in marathi

mazi ladki bahin yojana maharashtra online apply link

माझी लाडकी बहीण योजना याच्या अधिक माहितीसाठी आणि अर्जाची  पूर्तता करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा.

Mazi ladki bahin yojana maharashtra online apply

“माझी लाडकी बहीण योजना”  “Mazi ladki bahin yojana 2024” या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करता येणार आहे यासाठी सरकारकडून एक एप्लीकेशन जारी केले गेले आहे.या एप्लीकेशन मार्फत तुम्ही  घर बसल्या या योजनेचा फॉर्म भरू शकतात आणि लाभ घेऊ शकता.हा फॉर्म तुम्ही घरी बसून मोबाईल मध्ये हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करून भरू शकतात. यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहे हे तुम्हाला वरती या (Mazi ladki bahin yojana 2024) लेखांमध्ये सांगितले गेले आहे.त्याचबरोबर या योजनेसाठी पात्रता काय आहे हे सुद्धा जाणून घ्या.

 • सर्वात अगोदर प्ले स्टोअर मध्ये जाऊन नारीशक्ती दूत “Nari Shakti Doot” हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करून घ्या.
 • जर हे ॲप्लिकेशन अगोदर पासूनच तुमच्या मोबाईल मध्ये असेल तर ते अपडेट करून घ्यावे.
 • एप्लीकेशन डाउनलोड झाल्यावर ते ओपन करा ओपन केल्यावर त्या ठिकाणी तुम्हाला काहीही माहिती मिळेल हे सर्व काही ओके म्हणत पुढे चला.
 • आता तुम्हाला या एप्लीकेशन मध्ये लॉगिन करण्यासाठी मोबाईल नंबर टाकून लॉगिन करायचा आहे.
 • लॉगिन केल्यानंतर पुढे जे काही त्याला Allow करा.
 • हे सर्व झाल्यावर आता तुम्हाला समोरचे काही प्रश्न येतील ते पूर्ण भरून घ्यायचे आहेत म्हणजे तुम्हाला तुमची पूर्ण प्रोफाइल कम्प्लीट करायचे आहे.प्रोफाइल करण्यासाठी तुम्हाला नाव, ई-मेल, मोबाईल नंबर,तालुका याबाबतीत माहिती भरावायची आहे.
 • माहिती भरल्यानंतर डन करून पुढे जायचं. योजनेचे नाव सिलेक्ट करून पुढे तुम्हाला हमीपत्र येईल. हे तुम्ही डाउनलोड ही करू शकतात.
 • आता मुख्य पेजवर या या पेजवर तुम्हाला “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” यासाठी अर्ज करायचा आहे.
 • संपूर्ण माहिती भरून झाल्यावर पुन्हा एकदा चेक करून अर्ज सबमिट करा.

हे पण वाचा👇

Leave a Comment