ashadha amavasya 2024 date: 5 जुलै आषाढ अमावस्येला करा हे उपाय..पितृ देवतांना प्रसन्न करण्यासाठी आषाढ अमावस्या ही… 

नमस्कार मंडळी,

ashadha amavasya 2024 date: हिंदू धर्मामध्ये आणि पौराणिकानुसार आषाढ अमावस्येचे खूप महत्त्व आहे. 2024 रोजी आषाढ अमावस्या ही 5 जुलै (ashadha amavasya) रोजी साजरी केली जाणार आहे. तर आषाढ अमावस्याला असे कोणकोणते उपाय करायचे आहेत ज्यामुळे आपल्या घरातून पितृदोष नाहीसा होईल आणि पितृदेवतांना आपण प्रसन्न करू.. चला तर मग 5 जुलै रोजी आषाढ अमावस्येला कोणकोणते उपाय करायचे आहेत हे आपण बघूया..

ashadha amavasya 2024 date | आषाढ अमावस्या 2024 तारीख 

आषाढ महिन्यामधील अमावस्येला धार्मिक आणि पौराणिक खूप महत्त्व आहे. यंदाच्या अमावस्येला स्नान, दान, पुण्य या विधींना खूप महत्त्व आहे. पौराणिक कथेनुसार अशी मान्यता आहे की आपले पूर्वज अमावस्येला आपल्याला भेटायला येतात. ज्याप्रमाणे आपण पितृ अमावस्या साजरा करतो त्याचप्रमाणे आषाढ अमावस्येला सुद्धा पौराणिक कथेनुसार पितृदेवतांना खुश करण्यासाठी चांगला योग मानला जातो.

हिंदू कॅलेंडरनुसार आषाढ अमावस्या “ashadha amavasya” वार शुक्रवार, दिनांक 5 जुलै रोजी पहाटे 4:58 ला सुरू होऊन रात्री 4:27 मिनिटांपर्यंत दिनांक 6 जुलै ला समाप्त होणार आहे.

amavasya 2024 date and time in marathi | आषाढ अमावस्या तारीख आणि वेळ

  • दिनांक: 5 जुलै 
  • अमावस्या प्रारंभ पहाटे: 4:58 वाजता 
  • प्रवेश रात्री: 11:40 वाजता 
  • अमावस्या समाप्ती:4:27 (पहाटे)  वाजता 
  • वाहन: हत्ती 
  • वर्ज्य दिवस 

आषाढ अमावस्या “ashadha amavasya 2024 date” दिनांक 5 जुलै वार शुक्रवार या दिवशी अमावस्या प्रारंभ पहाटे  4:58 वाजता, प्रवेश रात्री: 11:40 वाजता, अमावस्या समाप्ती:4:27 (पहाटे) वाजता आणि वाहन हत्ती असा असणार आहे.

amavasya 2024 date and time in marathi

amavasya 2024 date and time in marathi

Ashadha Amavasya 5 july 2024 marathi: आषाढ अमावस्या 5 जुलै 2024 मराठी माहिती 

आषाढ अमावस्या “ashadha amavasya 2024”आहे हिंदू पुरानानुसार विशेष मानली जाते. ज्याप्रमाणे पितृ अमावस्येला आपण पितृसेवा करतो त्याचप्रमाणे आषाढ अमावस्यालाही आपल्याला हा योग जुळून आला आहे. म्हणूनच या दिवशी आपल्याकडून आपल्या पितृ ची सेवा आषाढ अमावस्या करून घेणार आहे चला तर मग जाणून घेऊया या आषाढ अमावस्याला पितृसेवा कशा पद्धतीने करावी ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल.

Amavasya july 2024 in marathi | आषाढ अमावस्या 2024 हे उपाय करा..

5 जुलै 2024 रोजी आषाढ अमावस्या “ashadha amavasya 2024” साजरी होणार आहे या दिवशी तुम्ही  अमावस्या व्रत करू शकतात. दिनांक 5 जुलैला आषाढ अमावस्या ही पहाटे 4:58 वाजेला सुरू होणार आहे. सकाळी उठल्यावर प्रथम अंघोळीच्या पाण्यामध्ये काळी तीळ आणि पंचगव्य टाकून स्नान करावे. त्यानंतर स्वच्छ आणि शुभ्र वस्त्र अर्पण करावे. सुरुवातीला प्रथम देवपूजा आठवण घ्यावी हे झाल्यावर आता आपल्या घरातील पितृ चे जे काही फोटो आपण लावलेले असतील ते खाली उतरवून स्वच्छ करून घ्यावे.

पितृ चे फोटो स्वच्छ झाल्यावर ते एका पाटावर मांडावे. ज्या ठिकाणी तुम्ही पाट मांडणार आहात ती जागा गुलाब जल आणि गोमूत्र टाकून स्वच्छ पुसून घ्यावे.पाटावर मांडलेले फोटोसमोर निरांजन लावावी. हे लावून झाल्यावर फोटोवर गंध आणि फुलमाळ चढवावी. अगरबत्ती लावून फोटोवर ओवाळून घ्यावे.आणि पितृ ना प्रार्थना करावी की आई-बाबा, बहिण-भाऊ, माझ्याकडून तुम्हाला नीट वागविले गेले नसेल किंवा काही चुकी झाली असेल तर मला क्षमा करा, माझी चूक पदरात घ्या आणि मला  सुख, समृद्धी, शांतता, चांगला आरोग्य लाभू दया.

ashadha amavasya 2024 date

ashadha amavasya 2024 date

हे सर्व झाल्यावर आता आषाढ अमावसेला “ashadha amavasya 2024” दान करणे शुभ मानले गेले आहे. या दिवशी गरजू लोकांना अन्न, धान्य, वस्त्र या पद्धतीचे दान करावे. कुटुंबातील सर्व सदस्यांनी दान करावे त्याचबरोबर कावळ्यासाठी छतावर नैवेद्य ठेवावा. गाईला नैवेद्य अर्पण करावा यामुळे पितृदेवता आपल्याला चांगला आशीर्वाद देतील. अशी मान्यता आहे की पितृदेवतांच्या फोटोसमोर धूप आणि अगरबत्ती लावून जर आपण प्रार्थना केली तर ते आपल्या मुलांना आशीर्वाद देतात. यामुळे अमावस्येच्या दिवशी पितृदेवतांच्या फोटो समोर धूप अगरबत्ती दाखवून मनातील प्रार्थना बोलून पितृदेवतांकडून आपल्या मुलांसाठी आशीर्वाद घ्या.

पितृ देवतांना पांढरी फुले, काळी तीळ, धूप अगरबत्ती अर्पण करा आणि नमस्कार करा. त्यासोबतच अमावस्येच्या दिवशी मीठ, पीठ, मिरची, तेल, उडदाची काळी डाळ, ह्या गोष्टी दान करा. यामुळे घरातली इडा-पिडा नाहीशी होईल. 

5 जुलै 2024 रोजी आषाढ “ashadha amavasya 2024” अमावस्येला पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा.त्याचबरोबर घराच्या दक्षिण दिशेच्या कोपऱ्याला घरामध्ये मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा यामुळे घरातली इडा-पिडा नाहीशी होऊन घरामध्ये सुख समृद्धी नांदेल.

ashadha amavasya 2024 in marathi | अमावस्येच्या दिवशी हे करू नका

अमावस्येच्या दिवशी आपल्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या जेष्ठ नागरिकांची वादविवाद घालू नका. कुठेही लांबचा प्रवास करू नका.अमावस्येच्या तिथीला मध्य आणि मास सेवन करू नका.

Leave a Comment