nag panchami katha in marathi: नागपंचमी कथा मराठी 

नमस्कार मंडळी,

nag panchami katha in marathi: आजच्या लेखामध्ये आपण नागपंचमीची कथा जाणून घेणार आहोत.हिंदू संस्कृतीत मध्ये प्रत्येक सणाला विशिष्ट प्रकारचे महत्त्व दिले गेले आहे. या सणांना शास्त्रीय आणि वैज्ञानिक दोन्ही कारणे असतात आणि या सणामागील बहुतेक कथा आपल्याला ऐकायला मिळतात.चला तर मग आज आपण नागपंचमीच्या सणाची कथा काय ते जाणून घेऊया. अधिक माहितीसाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचत रहा. 

नागपंचमी माहिती मराठी 

nag panchami katha in marathi | नागपंचमी कथा मराठी 

nag panchami kahani in marathi

ऐका नागोबा तुमची कहाणी,एक नगर होतं. तिथं एक ब्राह्मण राहत होता.त्या ब्राह्मणाला सात सुना होत्या.चातुर्मासामध्ये श्रावण महिना आला.नागपंचमीचा दिवस होता कोणी आपल्या आजोळी, कोणी आपल्या पंजोळी तर कोणी माहेरी अशा सर्व सुना आपापल्या घरी गेल्या होत्या, ब्राह्मणाची सर्वात धाकटीसून होती तिला कोणीच नव्हतं. मग तुला मला तो वाईट वाटू लागले. नागपंचमीचा दिवस होता. मनामध्ये ती म्हणू लागली, “नागोबा देव मला माहेराला घेऊन जाईल” असं ती मनामध्ये सतत म्हणत होती.

शेषनागास तिच्यावर करुणा आले आणि शेषनागाने ब्राह्मणाचे रूप धारण केले व तिला त्या ठिकाणी घ्यायला आले.मग त्यावेळेस ब्राह्मणाला विचार आला की हा इतके दिवस होता तरी कुठे आणि आताच कसं काय बर आला,मग त्यापुढे ब्राह्मणाने सुनेला विचारलं मग सून त्यावर म्हणाली, हो हा माझा मामा च आहे.ब्राह्मणाने त्या वेषधारी शेषनागासोबत तिची रवानगी केली.त्या वेषधारी मामाने तिला वारूळा मध्ये नेले.

शेषनागाने वारूळा मध्ये गेल्यावर तुला सर्व हकीकत सांगितली. तिला आपल्या फनी वर बसवले आणि आपल्या बायका मुलांना सांगितले की इला कोणीच चावायचे नाही.एके दिवशी नागाची नागीण बाळंत होऊ लागली. तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितला. पुढं ती व्याली. तिची पिलं वळवळ करी लागली. ही मुलगी भिऊन गेली. हातातला दिवा खाली पडला. पोरांची शेपटं भाजली. नागीण रागावली. सर्व हकीकत नवर्‍याला सांगितली. तो म्हणाला, तिला लौकरच सासरी पोचवू. पुढं ती पूर्ववत् आनंदानं वागू लागली. ऐके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली. आपण मनुष्यदेह धारण करून, तिला सासरी पावती केली. नागाची पोरं मोठी झाली. आपल्या आईपाशी चौकशी केली, आमची शेपटं कशान तुटली? तिनं मुलीची गोष्ट सांगितली. 

त्यांना फार राग आला. हिचा सूड घ्यावा म्हणून पाटावर व भिंतीवर नागाची चि‍त्रं काढली, त्यांची पूजा केली, जवळ नागाणे, लाह्या, दूध वगैरे ठेवलं. उकडीचा नैवेद्य दाखवला. हा सर्व प्रकार नागांची पिलं पहात आहेत. सरतेशेवटी तिनं देवाची प्रार्थना केली, जय नागोबा देवा, जिथं माझे भाऊ लांडोबा, पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत, असं म्हणून नमस्कार केला. इकडे सर्व प्रकार ह्यांनी पाहून मनातील सर्व राग घालविला. 

मनात हिच्याविषयी दया आली. पुढं त्या दिवशी तिथं वस्ती केली, दूध, पाणी ठेवतात त्यात पहाटेस एक नवरत्नांचा हार ठेवून निघून गेले. दुसर्‍या दिवशी हार उचलून गळ्यात घातला. तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हां आम्हां होवो. ही साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

नागपंचमीला न चिरता हे 8 पदार्थ करून बघा..

nag panchami katha in marathi

nag panchami katha in marathi

nag panchami story marathi | नागपंचमी कथा मराठी 

nag panchami in marathi

आटपाट नगर होतं. तिथे एक शेतकरी होता.त्याच्या शेतात एक नागाचं वारूळ होतं. श्रावणमास आला. नागपंचमीचा दिवस.शेतकरी आपला नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला. नांगरता नांगरता काय झालं ? वारूळात जी नागांची नागकुळं होती त्यांना नांगराचा फाळ लागला व ती लवकरच मेली. काही वेळाने नागीण तिथं आली.आपलं वारूळ पाहू लागली.तो तिथं वारूळ नाही आणि पिल्लेही नाहीत. इकडे तिकडे पाहू लागली तर तिला रक्ताने भिजलेला नांगराचा फाळ दिसला.तसं तिच्या मनात आलं ह्या शेतकऱ्याच्या नांगरानं माझी पिल्लं मेली.ह्या शेतकऱ्याचा निर्वंश करावा असे तिच्या मनाने घेतले. फणफणतच ती शेतकऱ्याच्या घरी गेली. मुला-बाळांना, लेकीसुनांना आणि शेतकऱ्याला दंश केला. त्याचबरोबर सर्वजण मरून पडले. पुढं तिला समजलं की त्याची एक परगावी आहे, तिला जाऊन दंश करावा म्हणून ती निघाली. ज्या गावी मुलगी दिली होती तिथे ती आली.

तिच्या घरी येऊन पाहिले तर काय त्या बाईने पाटावर नागीण व त्यांची नऊ नागकुळं काढली आहेत.त्यांची पूजा केली आहे, दुधाचा नैवेद्य दाखविला आहे. नागाला लाह्या, दूर्वा वगैरे वाहिल्या आहेत. दुधाचा नैवेद्य दाखविला आहे. नागाला लाह्या, दूर्वा वगैरे वाहिल्या आहेत. पूजा पाहून नागीण संतुष्ट झाली. दूध पिऊन समाधान पावली. चंदनात आनंदानं लोळली.

मुलीला म्हणाली, बाई, बाई तू कोण आहेस ? तुझे आई-बाप कोठे आहेत ? इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले व प्रत्यक्ष नागीण समोर पाहून ती घाबरली. नागीण म्हणाली, बाई भिऊ नकोस. विचारल्या प्रश्नाचे उत्तर दे. तिने सारी हकीकत सांगितली.ती ऐकून नागिणीला फार वाईट वाटले.

ती मनात म्हणाली, ही आपल्याला इतक्या भक्तीने पूजित आहे, आपलं व्रत पाळत आहे आणि हिच्या बापाचा आपण निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे हे काही चांगलं नाही.तिने मुलीला सारी हकिकत सांगितली. तिला फार वाईट वाटलं. मग तिने आई-वडिल जिवंत होण्याचा उपाय विचारला. नागिणीने तिला अमृत आणून दिले.ते घेऊन ती त्याच पावली आपल्या माहेरी आली.तिने सर्वांच्या तोंडात अमृत घातलं. सर्व मंडळी जिवंत झाली.सगळयांना आनंद झाला.

तिने वडिलांना घडलेली हकीकत सांगितली.तेंव्हा त्यांनी विचारले, हे व्रत कसं करावं ? मुलीने व्रताचा सारा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की, इतकं काही केलं नाही तरी नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नयेत, तव्यावर शिजवू नये, तळलेले खाऊ नये, नागोबाला नमस्कार करावा.तेव्हापासून शेतकरी नागपंचमी पाळू लागला.

जशी नागीण त्यांना प्रसन्न झाली, तशी तुम्हा आम्हा होवो. ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

nag panchami aarti marathi

nag panchami aarti marathi

nag panchami aarti marathi | नागपंचमी आरती मराठी

श्रीनागदेव आरती पंचमी की कीजै ।
तन मन धन सब अर्पण कीजै ।
नेत्र लाल भिरकुटी विशाला ।
चले बिन पैर सुने बिन काना ।
उनको अपना सर्वस्व दीजे।।
पाताल लोक में तेरा वासा ।
शंकर विघन विनायक नासा ।
भगतों का सर्व कष्ट हर लिजै।।
शीश मणि मुख विषम ज्वाला ।
दुष्ट जनों का करे निवाला ।
भगत तेरो अमृत रस पिजे।।
वेद पुराण सब महिमा गावें ।
नारद शारद शीश निवावें ।
सावल सा से वर तुम दीजे।।
नोंवी के दिन ज्योत जगावे ।
खीर चूरमे का भोग लगावे ।
रामनिवास तन मन धन सब अर्पण कीजै ।
आरती श्री नागदेव जी कीजै ।।

Leave a Comment

Discover more from Marathi Delight

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading