मकर संक्रांतीला हळदी कुंकवासाठी द्या हे वाण | makar sankranti vaan ideas in marathi

नमस्कार मंडळी,

आजच्या “Makar Sankranti vaan ideas in Marathi” लेखामध्ये आपण मकर संक्रांतीला हळदी कुंकवासाठी साठी कोणत्या प्रकारचे वाण देता येतील ते पण अगदी कमी किमतीमध्ये आणि सर्वांना आवडणारे.. अशी कोणकोणत्या वाण आहेत हे या लेखांमध्ये आपण बघणार आहोत. मकर संक्रांत आली म्हणजे सर्व महिलांना पडणारा प्रश्न म्हणजे आता या संक्रांतीला हळदी कुंकवासाठी वाण काय द्यावे? तर महिलांनो आजच्या या लेखांमध्ये आपला हा प्रश्न सुटणार आहे चला तर मग याकरिता हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

Makar Sankranti vaan ideas in Marathi

मकर संक्रांतीला वाण का देतात? Makar sankranti vaan in marathi meaning

“हळदी कुंकू”, ज्याला “हळदी कुमकुम” किंवा “तिळगुळ” असेही म्हणतात, हा एक पारंपारिक भारतीय कार्यक्रम खास करून महिलांसाठी आहे. ज्या ठिकाणी विवाहित स्त्रिया मिठाईसह हळद आणि सिंदूर यांची देवाणघेवाण करतात. हा मकर संक्रांती सणांचा महिलांसाठी मुख्य भाग असतो.

Makar sankranti vaan in marathi meaning

मकर संक्रांतीला वाण काय द्यावे? | makar sankranti vaan ideas

लाडू, चिक्की, मिठाई | makar sankranti vaan ideas

जर तुम्हाला संक्रांतीला हळदी कुंकवाला वाण द्यायचे असेल आणि तुमच्याकडे घरातच काही सुकामेवा किंवा गुळ शेंगदाणे असं काही असेल तर तुम्ही घर बसल्या शेंगदाण्याची चिक्की,घरी बनवलेली मिठाई आणि संक्रांत म्हटले म्हणजे आपल्या घरी लाडू तर असणारच..

makar sankranti vaan ideas

तर मग छोटे छोटे बॉक्स मागून घ्या आणि त्या बॉक्समध्ये तुमच्याकडे असलेल्या पदार्थ बॉक्समध्ये पॅकिंग करून तुम्ही हळदी कुंकवाच्या वाढीसाठी देवाण-घेवाण करू शकतात.यामध्ये होईल काय तुम्हाला खर्चही कमी होईल आणि तुमच्या पदार्थाची सर्वीकडे चर्चाही होईल.त्याचबरोबर बॉक्सच्या पॅकेजिंग मुळे कार्यक्रमाला आकर्षकता सुद्धा येईल.लाडू, चिक्की आणि ड्रायफ्रुट्स सारख्या पारंपारिक मिठाई असलेले गिफ्ट बॉक्स हळदी कुंकूसाठी उत्कृष्ट पर्याय आहेत.

makar sankranti vaan ideas in marathi

हळदी-कुंकू, सिंदूर | makar sankranti vaan ideas

बऱ्याच महिला हळदी कुंकवाच्या दिवशी हळदीकुंकू ची देवाण-घेवाण करतात.मकर संक्रांतीच्या दिवसांमध्ये हळदी कुंकू भरलेल्या अतिशय छान छान गोष्टी बाजारात उपलब्ध असतात.या सणाला हळदी कुंकवाचे फार महत्त्व असते म्हणून बऱ्याचश्या महिला हळदीकुंकवाला हळदीकुंकूच्या वेगवेगळ्या रूपात सजवलेल्या हळदीकुंकूचे सामानाची देवाण-घेवाण करतात.त्याचबरोबर काही महिला सिंदूर सुद्धा देतात.

makar sankranti vaan ideas 1

बाजारामध्ये नवनवीन प्रकाराचे सिंधू उपलब्ध आहेत.त्यामध्ये दोन मुख्य प्रकार असतात एक ओला सिंधू आणि एक कोरडा सिंदूर. त्यापैकी जो सिंदूर आपल्याला योग्य वाटत असेल किंवा आवडत असेल तो सिंदूर आपण हळदी कुंकवाचा कार्यक्रमासाठी देवाण-घेवाण करू शकतो.

साडी किंवा दुपट्टा | makar sankranti vaan ideas

हळदी कुंकवाचा कार्यक्रमांमध्ये वाण देण्यासाठी वेगवेगळ्या रंगाचे आणि आकर्षक म्हणजे त्यात बांधणीचे दुपट्टे बाजारामध्ये मिळत असतात.जर तुम्हाला आपल्या मैत्रिणींना वाण द्यायचे असेल तर हा पण एक छान पर्याय आहे,आणि जर तुमचे पैशांचा बजेट जर थोडा जास्त असेल तर तुम्ही आपल्या मैत्रिणी करता साडी हे खरेदी करू शकतात.

makar sankranti vaan ideas 2

सजावट केलेली पूजेची थाळी | makar sankranti vaan ideas

हळदी कुंकवाच्या कार्यक्रमांमध्ये वाण देण्यासाठी पूजेची थाळी ही हा सुद्धा एक आकर्षक दिसणारा आणि योग्य असा पर्याय आहे. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमांमध्ये महत्व हळदीकुंकवाला असतो तर या थाळीमध्ये तुम्ही हळदी कुंकू भरून त्याचबरोबर मिठाई भरून  महिलांना वाटप करू शकतात.

makar sankranti vaan ideas 3

हाताने तयार केलेले दागिने | makar sankranti vaan ideas

सर्व महिलांना प्रचंड प्रमाणात आवडत असलेली गोष्ट म्हणजे दागिने.हळदी कुंकू हा अगदी एक छान कार्यक्रम असून यामध्ये देवाण-घेवाण करण्यात येते तर महिलांना आवडत असतील ही गोष्ट ही दागिना असते प्रत्येक महिन्याला आकर्षक दागिना घालावा असे वाटत असते.

makar sankranti vaan ideas 4

यामध्ये जर तुम्ही कानातले बांगड्या किंवा मग गळ्यातील नेकलेस अशा विविध प्रकारच्या गोष्टी हाताने सजवून जर तयार केल्या आणि त्या आपल्या मैत्रिणींना दिल्या तर कार्यक्रमात असून भर येईल. विशेष म्हणजे तुमच्या नावाची चर्चा ही होईल.

सुगंधी अत्तर | makar sankranti vaan ideas

बाजारामध्ये विविध प्रकारच्या सुगंधाचे अत्तर आपण बघत असतो.हा सुद्धा एक छान पर्याय आहे आपल्या मैत्रिणींना हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमांमध्ये सुगंधी अत्तर वाणाच्या स्वरूपात देऊन प्रभावित करण्याचा.

makar sankranti vaan ideas 5

केसांमध्ये लावण्यासाठी गजरा | makar sankranti vaan ideas

प्रत्येक महिलेला वाटतं की आपण केसांमध्ये गजरा माळावा.पण पटकन कुठेतरी कार्यक्रमाला जायचं असतं मी अशा वेळेस बाजारात जाऊन गजरा आणणे कठीण बनते यामुळे बऱ्याच महिलांची इच्छा अपूर्ण राहते.चला तर मग या आपल्या मैत्रिणींचा अपूर्ण असलेल्या इच्छेला आपण पूर्ण करूया तो कसा आता आपण बाजारातून तर गजरा आणणार नाही पण आपल्यालागजरा हा बाजारातूनच आणून द्यायचा आहे तो कसा?

makar sankranti vaan ideas 6

बाजारामध्ये आपल्याला ज्या फुलांच्या हवे त्या फुलांचे विशिष्ट प्रकारचे आणि वेगवेगळ्या स्वरूपात विणलेले नकली फुलांचे गजरे आता मिळायला लागले आहेत.तर नक्कीच मकर संक्रांतीच्या सणासाठी वाण द्यायला हा सुद्धा एक अतिउत्कृष्ट पर्याय आहे.तुम्ही आपल्या मैत्रिणींना मकर संक्रांतीसाठी वाण द्यायला बाजारातून आकर्षक नकली गजरे आणून देऊ शकतात.तुम्ही दिलेले हे गजरे तुमच्या मैत्रिणींकडे कामस्वरूपी राहतील आणि एक तुमची आठवणही राहील. 

Leave a Comment