मकर संक्रांतीला काळे कपडे का घालतात? | Makar Sankranti 2024 colour Marathi 

नमस्कार मंडळी,

Makar Sankranti 2024 colour Marathi – आजच्या लेखामध्ये आपण मकर संक्रांतीला काळे कपडे का  घालतात हे जाणून घेणार आहोत. आता हळूहळू थंडी कमी व्हायला लागणार आणि मकर संक्रांतीचा सण सुरू होणार.. तर मकर संक्रांतीच्या दिवशी बहुतेक लोक हे काळे कपडे परिधान करत असतात, तर काय कारण आहे की ज्यामुळे मकर संक्रांतीला काळे कपडे घातले जातात. चला तर मग आपण जाणून घेऊया मकर संक्रांतीला काळे कपडे का घालतात?

मकर संक्रांतीला काळे कपडे का घालतात? | Makar Sankranti 2024 colour Marathi | Makar Sankranti 2024 

why to wear black clothes on makar sankranti in marathi

Makar Sankranti 2024 colour Marathi – खरं तर हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला  किंवा इतर कुठल्याही सणामध्ये काळे कपडे परिधान केले जात नाही, परंतु आधुनिक काळात झालेल्या बदलानुसार आहे ज्योतिषींनी सांगितल्याप्रमाणे मकर संक्रांतीला बहुतेक लोक काळे कपडे परिधान करतात.तर काय विशेष आहे या काळे कपडे परिधान करण्यामागे…

मकर संक्रांतीची सणाची उत्सुकता आणि भावनिकता वाढविण्यासाठी बहुतेक लोक हे  काळे कपडे परिधान करायला प्राधान्य देतात.बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडत असतो मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्या मागचे कारण नेमकं आहे तरी काय?कारण हिंदू धर्मामध्ये कोणत्याही सणाला काळे कपडे परिधान केले जात नाही.काळा रंगाला अशुभ मानले जाते आणि मग मकर संक्रांतीला जो वर्षातील पहिला सण असतो मग त्या सणालाच का काळे कपडे परिधान केले जातात.

Makar Sankranti 2024- संपूर्ण वर्षभरात ही एकदाच मोठी रात्र येते आणि ती मोठी रात्र मकर संक्रांतीच्या दिवशी असते मकर संक्रांतीच्या दिवसापासून दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते.मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठी असते या काळोख्या रात्रीला निरोप देण्यासाठी मकर संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे घातले जातात.याच कारणामुळे बहुतांश लोक हे मकर संक्रांतीला काळे कपडे घालतात.विशेषता म्हणजे महिला, मुली आवर्जून काळा रंगाचे कपडे घालणे पसंत करतात.

Makar Sankranti 2024 colour Marathi – मकर संक्रांतीच्या दिवशी खास करून महिला, आपल्याला लहान मुलांना काळे कपडे घालून त्यांचे बोरनहान करतात. बोरनहान करताना त्यांना काळे रंगाचे कपडे घालून हलव्याचे दागिने घालून सजविले जाते. हिंदू संस्कृतीत, मकर संक्रांति सणाच्या प्रसंगी काळा रंगाच्या कपड्यांना प्राधान्य दिले जाते कारण ते आनंद, उत्सव आणि सकारात्मक उर्जेचे प्रतीक आहे.

त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या उत्सवाची भावना प्रतिबिंबित करण्यासाठी लोक सामान्यतः लाल, पिवळा, हिरवा आणि केशरी यांसारखे चमकदार कपडे सुद्धा परिधान करतात.खरं तर, मकर संक्रांतीचा संबंध सामान्यतः काळा रंगाशी असतो.

मकर संक्रांतीला काळे कपडे का घालतात? | Makar Sankranti 2024 colour Marathi | Makar Sankranti 2024

Makar Sankranti 2024 colour Marathi – त्याचबरोबर मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्यामागे अजून एक शास्त्रीय कारण आहे, मकर संक्रांत हा सण हिवाळ्यामध्ये येतो हिवाळ्यामध्ये आपल्याला उबदार कपड्यांची गरज असते.तुम्हाला माहितीच असेल की आपण उन्हाळ्यामध्ये पांढऱ्या रंगाचे कपडे वापरतो पांढरा रंग हा उष्णता शोषण घेत नाही तर पांढरा रंग उष्णता  बाहेर टाकत असतो यामुळेच उन्हाळ्यामध्ये पांढरा रंगाचे कपडे घातले जातात.

ज्याप्रमाणे पांढरा रंग उष्णता शोषून घेत नाही त्याप्रमाणे आपण उन्हाळ्यामध्ये काळा रंगाचे कपडे सुद्धा घालत नाहीत याचे कारण असे की काळा रंग हा उष्णता शोषण्याचा काम करतो म्हणजेच आपल्याला ऊन जास्त लागू शकतो म्हणूनच आपण उन्हाळ्यामध्ये काळा रंगाच्या कपडे घालत नाही.

हिवाळ्यामध्ये आपल्याला उबदार कपड्यांची म्हणजेच आपला अंग उबदार राहील असे कपडे आपल्याला हवे असतात,आणि सगळ्या रंगांमध्ये काळा रंग हा उष्णता शोषून घ्यायचं काम जास्ती प्रमाणात करतो.थंडीच्या दिवसांमध्ये अर्थातच हिवाळ्यामध्ये शरीर उबदार रहावे म्हणून काळा रंगाचे कपडे परिधान केले जातात.

तथापि, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की मकर संक्रांतीशी संबंधित काळा परिधान ही एक व्यापक किंवा प्रमाणित प्रथा नाही.जर तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी कोणता रंगाचे कपडे परिधान करतात किंवा कोणत्या रंगाचे कपडे परिधान करावे याविषयी मार्गदर्शन हवे असेल तर तुम्ही तुमच्या घरात असलेल्या मोठ्यांना, वडिलांना किंवा ज्योतिषांना विचारून याबद्दल मार्गदर्शन घेणे उपयुक्त ठरेल.

मकर संक्रांतीचे महत्त्व काय ? importance of makar sankranti in marathi

मकर संक्रांती या सणाला सांस्कृतिक, धार्मिक आणि कृषी महत्त्व आहे.मकर संक्रांती सूर्याचे मकर राशीत (मकर) संक्रमण दर्शवते. हे हिवाळ्यातील संक्रांती समाप्ती आणि सूर्य उत्तरेकडे सरकत असताना दीर्घ दिवसांची सुरुवात दर्शवते.हा सण भारतातील विविध राज्यांमध्ये विविध नावांनी आणि परंपरांनी साजरा केला जातो. 

प्रत्येक प्रदेशाची मकर संक्रांती पाळण्याची विशिष्ट पद्धत आहे.मकर संक्रांतीच्या वेळी पतंग उडवणे ही एक लोकप्रिय परंपरा आहे, विशेषत: गुजरात आणि राजस्थान सारख्या राज्यांमध्ये. आकाशातील रंगीबेरंगी पतंग सणाच्या आनंदाचे आणि दीर्घ दिवसांच्या आगमनाचे प्रतीक आहेत.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न | FAQ 

मराठी लोक मकर संक्रांत कशी साजरी करतात? | makar sankranti in maharashtra | Makar Sankranti 2024

मकर संक्रांती या सणाच्या दिवशी मराठी लोकं एकमेकांच्या घरी जाऊन तिळगुळाच्या लाडूचे देवाण-घेवाण करतात त्यासोबतच ते म्हणतात “तिळगुळ घ्या गोड गोड बोला”,”आमचा तिळगुळ सांडू नका”, “आमच्याशी भांडू नका”.अशाप्रकारे मराठी लोक मकर संक्रांत साजरी करतात.

मकर संक्रांतीला महाराष्ट्रात काय म्हणतात?

मकर संक्रांतीला महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांति आणि हळदीकुंकू या दोन्ही नावांनी संबोधले जाते. 

मकर संक्रांति कोणत्या राज्यात साजरी केली जाते?

मकर संक्रांति महाराष्ट्र,राजस्थान,गुजरात,मध्य प्रदेश याव्यतिरिक्त अन्य राज्यांमध्ये ही मकर संक्रांति हा सण साजरा केला जातो.

Leave a Comment