मकर संक्रांतीच्या दिवशी करा हे पाच उपाय घरामध्ये येईल सुख,समृद्धी…| makar sankranti in 2024

नमस्कार मंडळी,

sankranti 2024 mahiti marathi  – नवीन वर्षाची सुरुवात झालीच आहे आणि या नवीन वर्षाच्या सुरुवातीला सर्वात अगोदर येणारा सण म्हणजे मकर संक्रांत.मकर संक्रांत हा सण जानेवारी महिन्यात 14 किंवा 15 जानेवारी या दिवशी असतो.हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांत हा सण फार विशेष असतो.भारतामध्ये साजरा केला जाणारा मकर संक्रांत हा सण विविध राज्यांमध्ये विविध नावाने ओळखला जातो आणि साजराही केला जातो.

sankranti 2024 mahiti marathi 

2024 या वर्षी मकर संक्रांत 15 जानेवारी 2024 या दिवशी सोमवारी साजरी होणार आहे.सूर्यदेवता बारा राशींना फेरी मारून आल्यानंतर मकर राशीत प्रवेश करण्यासाठी 15 जानेवारीला मकर संक्रांतीच्या दिवशी तयार असतात.जेव्हा सूर्य देवता मकर राशि मध्ये प्रवेश करतात त्या दिवशी मकर संक्रांति हा सण साजरा केला जातो.

मकर संक्रांति शुभ मुहूर्त | makar sankranti subh muhurt in 2024 in marathi

  • मकर संक्रांतीचा काळ – 7.15 सकाळी ते 5.46 रात्री 
  • वेळ – 10 तास 31 मिनिटे 
  • मकर संक्रांतीचा क्षण- २.५४ वाजेला ला सकाळी 

sankranti 2024 mahiti marathi  – मकर संक्रांती हा सण संपूर्ण भारतभर विविध परंपरांसह साजरा केला जाणारा सण आहे आणि मुहूर्ताच्या वेळा या उत्सवादरम्यान केल्या जाणार्‍या विधींसाठी विशिष्ट असू शकतात, जसे की नद्यांमध्ये पवित्र स्नान करणे, पूजा करणे किंवा इतर धार्मिक समारंभ.हे आपण आपल्या जवळच्या पुजारी ना विचारून करावे.

दिनांक 15 जानेवारी 2024 ला सूर्य धनु राशि सोडून मकर राशीत प्रवेश करणार आहे आणि ही वेळ खूपच लाभदायक आणि शुभकाळ आहे असे मानले जाते यावेळेस जर तुम्ही हे पाच उपाय केले तर तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल.

सूर्यदेवतेची पूजा करा | makar sankranti in 2024

मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य देवता मकर राशीत प्रवेश करतात ज्यावेळेस सूर्यदेवता उत्तरायण करतात त्या वेळेपासून शुभकाळ असे मानले जाते.मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवतेची पूजा करावी.सूर्यदेवतेची पूजा करताना फुल, कोरे वस्त्र,लाल रंगाचे फुल,सुपारी, गहू, अक्षदा,पाणी आणि पंचामृत हे सर्व सूर्य देवताला अर्पण करून सूर्यदेवतेची पूजा करावी.विशेष म्हणजे या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करण्यास अधिक महत्त्व आहे.असे केल्यास घरामध्ये सुख समृद्धी शांतता नांदते.

त्याचबरोबर सूर्यदेवाला तीळ अर्पण करावे जर आपल्याकडे काळी तीळ असेल तर सूर्यदेवाला काळी तीळ अर्पण करताना ओम घृणि सूर्याय नमः या मंत्राचा उच्चार करावा.असे केल्यास सूर्यदेवता प्रभावित होऊन तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल.

“सूर्य मंत्र” हा हिंदू सौर देवता, सूर्य यांना समर्पित मंत्रांचा संदर्भ देतो.या मंत्रांचा जप किंवा पठण भगवान सूर्याच्या आशीर्वादासाठी केले जाते आणि असे मानले जाते की ते सकारात्मक ऊर्जा, आरोग्य आणि चैतन्य आणतात. सर्वात प्रसिद्ध सूर्यमंत्रांपैकी एक म्हणजे भगवान सूर्याला समर्पित गायत्री मंत्र.भगवान सूर्यासाठी गायत्री मंत्र पुढील प्रमाणे:

सूर्य गायत्री मंत्र:

ॐ भास्कराय विद्महे

दिवाकराया धीमाही

तन्नो सूर्य प्रचोदयात्

अर्थ:

ओम, आपण सूर्याचे ध्यान करूया,
तेजस्वी, आमचे मन प्रबुद्ध.
सूर्य आम्हाला मार्गदर्शन करो.

सूर्य गायत्री मंत्राचा भक्ती आणि प्रामाणिकपणाने जप केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते, मानसिक स्पष्टता वाढते आणि सर्वांगीण कल्याण होते असे मानले जाते. याव्यतिरिक्त, भगवान सूर्याला समर्पित इतर मंत्र आणि स्तोत्रे आहेत ज्यांचे तुम्ही पठण करून भगवान सूर्यदेवाला प्रभावित करू शकतात.

पवित्र नद्यांमध्ये स्नान करा | makar sankranti in 2024

मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे याला विशेष महत्त्व आहे.बरेच लोक नद्यांमध्ये स्नान करून पाप नष्ट करतात.या दिवशी तुम्हीही आपल्या आजूबाजूच्या पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान नक्की करा यामुळे तुम्हाला चांगले आरोग्य लाभेल.

दान – पुण्य करणे | makar sankranti in 2024

मकर संक्रांतीच्या दिवशी बरेच लोक विशिष्ट ठिकाणी जाऊन दान करत असतात. आपल्या आजूबाजूच्या गरजू व्यक्तींना, गोरगरिबांना दान केल्यामुळे त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि यामुळे आपल्याला वर्षभरात यश आणि चांगले सुदृढ आरोग्य लाभते.गोरगरिबांना, मंदिरामध्ये किंवा ज्या ठिकाणी गरजू व्यक्ती असतील अशा ठिकाणी जाऊन अन्नधान्य तुमच्याकडून जे काही शक्य असेल ते दानपुण्य करावे. दानपुण्य करणे मकर संक्रांतीला याचे विशिष्ट महत्त्व आहे.

काळी तीळ पाण्यात टाकून आंघोळ करणे | makar sankranti in 2024

मकर संक्रांतीच्या दिवशी एक तांब्याचा तांब्या घ्या त्यामध्ये गंगाजल मिश्र करून पाणी घ्या आता त्यामध्ये काळी तीळ चमचाभर टाकून घ्या आणि त्या पाण्याने अंघोळ करा.असे केल्यास शनिदेव आणि सूर्यदेव या दोघा देवांची कृपा आपल्यावर होते यामुळे आपल्याला  सुदृढ आरोग्य लाभते.

खिचडी आणि तीळ दान करणे | makar sankranti in 2024

मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करा स्नान केल्यानंतर स्वच्छ आणि नवीन वस्त्र परिधान करा वस्त्र परिधान केल्यानंतर सूर्यदेवाची पूजा अर्चना करा.सूर्य देवाची पूजा करताना ओम सूर्याय नमः या मंत्राचा उच्चार करा. हे सर्व झाल्यानंतर गोरगरिबांमध्ये खिचडी आणि काळे तीळ किंवा पांढरी तीळ दान करा.

काळा तीळ पासून बनवलेल्या वस्तू व खिचडी दान करा. असे केल्यास शनिदेव व सूर्यदेव हे आपल्यावर प्रभावित होतील आणि त्याची कृपा व आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल. 

मकर संक्रांति महत्व | sankranti 2024 mahiti marathi 

मकर संक्रांतीला हिंदू संस्कृतीत खूप महत्त्व आहे आणि विविध कारणांसाठी साजरी केली जाते.मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याचे संक्रमण होते.मकर संक्रांती ला सूर्याचे मकर राशीत (मकर) संक्रमण दर्शवते. हे हिवाळ्यातील संक्रांती समाप्ती आणि सूर्य उत्तरेकडे सरकताना दीर्घ दिवसांची सुरुवात दर्शवते.

मकर संक्रांतीला कापणी सण म्हणून सुद्धा साजरा केला जातो.जो यशस्वी कापणी आणि भरपूर पिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. हिवाळ्यातील कापणीने आणलेली समृद्धी आणि शेतकऱ्यांचे कष्ट साजरी करण्याचा हा काळ असतो.हा सण भारतातील विविध राज्यांमध्ये विविध नावांनी आणि परंपरांनी साजरा केला जातो. प्रत्येक प्रदेशाची मकर संक्रांती पाळण्याची विशिष्ट पद्धत आहे, देशाची सांस्कृतिक विविधता दर्शविते.

मकर संक्रांतीच्या वेळी पतंग उडवणे ही एक लोकप्रिय परंपरा आहे, विशेषत: गुजरात आणि राजस्थान सारख्या राज्यांमध्ये. आकाशातील रंगीबेरंगी पतंग सणाच्या आनंदाचे आणि दीर्घ दिवसांच्या आगमनाचे प्रतीक आहेत.मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्रा नदीमध्ये जाऊन स्नान करण्यात येते असे केल्यास पाप मुक्त होते अशी मान्यता आहे.मकर संक्रांती हा निसर्ग, शेती आणि बदलत्या ऋतूंचा उत्सव आहे.

संक्रांत किती तारखेला आहे? makar sankranti 2024 date

2024 सालामध्ये 15 जानेवारी 2024 रोजी सूर्यदेव धनु राशि सोडून मकर राशि मध्ये प्रवेश करतील या दिवशी मकर संक्रांति हा सण साजरी करण्यात येईल. मकर संक्रांत 15 जानेवारी 2024 रोजी सोमवार या दिवशी आहे.

तीळ संक्रांत किती तारखेला आहे? makar sankranti 2024 date and time in marathi 

15 जानेवारी 2024 रोजी सोमवारी (मकर संक्रांत) दुपारी दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी (2.43)सूर्यदेव धनु राशि सोडून मकर राशीत प्रवेश करणार आहेत.15 जानेवारी सोमवार या दिवशी तीळ संक्रांत साजरी केली जाणार आहे. 

सोप्या शब्दात संक्रांति म्हणजे काय? sankranti 2024 mahiti marathi 

सोप्या शब्दांमध्ये सांगायचे झाले तर सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणे म्हणजे संक्रांति होयत्यामध्ये मकर संक्रांति या सणाला विशिष्ट महत्त्व आहे या दिवशी सूर्यदेवता धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतात म्हणजे मकर संक्रांति होय.

Leave a Comment