Site icon Marathi Delight

शिक्षणाचे महत्व मराठी निबंध | Importance of education essay in Marathi

Importance of education essay in Marathi

Importance of education essay in Marathi

नमस्कार मंडळी,

आजच्या लेखामध्ये आपण शिक्षणाचे महत्व मराठी निबंध बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो हा निबंध अतिशय महत्त्वाच्या विषयावर आहे असे मला वाटते चला तर मग बघूया Importance of education essay in Marathi मध्ये. अधिक माहितीसाठी हा लेख पूर्ण वाचा.

शिक्षणाचे महत्व मराठी निबंध | Importance of education essay in Marathi ( 200 words)

Importance of education essay in Marathi-प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात शिक्षणाचे महत्त्व मानवी जीवनात मोलाचा दागिना आहे. परंतु  शिक्षणाचे महत्त्व हे कोण कोणत्या प्रकारे मांडले जाऊ शकते याचे असंख्य प्रकार आहेत.

शिक्षणाचे महत्त्व सांगायचे झाले तर पृथ्वीतलावरच्या प्रत्येक व्यक्तीला ज्ञान प्राप्त होण्याची मार्गदर्शन करण्याची प्रक्रिया म्हणजे शिक्षण होय.शिक्षण ही अशी प्रक्रिया आहे की ज्या मार्फत व्यक्ती,ज्ञान, कौशल्य, मूल्य व दृष्टिकोन शिकतात.

शिक्षणाचे महत्व मराठी निबंध

शिक्षण ही अशी गोष्ट आहे जी एका मार्गदर्शकाप्रमाणे काम करते. शिक्षणामुळे, वैयक्तिक, सामाजिक व आर्थिक ज्ञान प्राप्त होते. प्रत्येक व्यक्तीला समाजात विकसित होण्यासाठी,भविष्यासाठी प्रगती होण्यासाठी,  आपल्या आजूबाजूच्या परिसरात होणाऱ्या बदलासाठी शिक्षण अगदी महत्वपूर्ण भूमिका बजावत असतो.

आपल्या सर्वांना तर माहितीच आहे की आधुनिक जगात  सर्व गोष्टी किती पटापट घडत आहे. यामुळे या बदलणाऱ्या घडामोडींमुळे आपणही स्वतःमध्ये बदल  घडवू शकतो तो केवळ शिक्षणामुळे.सामाजिक व आधुनिक  जगाच्या बदलामुळे स्वतःमध्ये बदल घडविण्यासाठी शिक्षण अगदी महत्त्वाचे आहे. 

आपल्या विकासाला गती देण्यासाठी आणि वैयक्तिक बदलासाठी शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे असे मला वाटते. 

Importance of education essay in Marathi-वैयक्तिक विकासासाठी  शिक्षण हे प्राथमिक साधन आहे हे समाजाला पटवून देणे तितकेच महत्त्वाचे आहे. शिक्षणामुळे आपल्या आयुष्यात खूप फायदे होत असतात. शिक्षणामुळे आपल्या आजूबाजूच्या परिसराची माहिती मिळते,विविध गोष्टींचा दृष्टिकोन समजतो.आपल्या बुद्धीमध्ये सुद्धा प्रगती होते त्याचबरोबर आपली वैचारिक क्षमता सुद्धा वाढत असते. 

शिक्षण ही अशी बाब आहे की ज्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीला माहिती पूर्ण निर्णय घेण्यासाठी,आयुष्यातल्या समस्या सोडविण्यासाठी किंवा आजूबाजूच्या समस्या सोडविण्यासाठी, आणि आज कालच्या बदलत्या परिस्थितीला आपल्या  समवेत जोडण्यासाठी महत्वपूर्ण बनवते.

शिक्षणाचे महत्व मराठी निबंध | Importance of education essay in Marathi ( 400 words)

Importance of education essay in Marathi-आजच्या आधुनिक काळात शिक्षणाचे एवढे महत्त्व आहे की, सामाजिक प्रगतीचा शिक्षण चालक आहे असे जरी म्हटले तरी चालेल.

Importance of education essay

शिक्षण हा आयुष्यातील असा भाग आहे की ज्याच्यामुळे पृथ्वीतलावर अधिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी तसेच वैयक्तिक जीवन सुधारण्यासाठी शिक्षण प्रत्येकाला संधी प्राप्त करून देत आहे. आणि या संधीचा फायदा करून प्रत्येक व्यक्तीने चांगले शिक्षण घेऊन चांगला व्यक्ती बनण्याचा प्रयत्न नक्की करावा. शिक्षण ही अशी  देणगी आहे की ज्यामध्ये आपल्या बुद्धीला चालना मिळून आपली बुद्धी कुशाग्र होत जाते.आजच्या आधुनिक काळात शिक्षण केल्यामुळे समाजामध्ये समानता सुद्धा मिळत आहे.

शिक्षणामुळे सामाजिक विषमता सुद्धा कमी होत चालली आहे. शिक्षणामुळे समाजाचा सर्वांगीण विकास होतो. त्याचबरोबर सामाजिक वातावरणामध्ये स्थिरता असते.

Importance of education essay in Marathi-विद्यार्थी मित्रांनो शिक्षणाचा आर्थिक विकासासाठी सुद्धा घट्ट संबंध आहे. आपल्या सभोवतालच्या परिसरातील शिक्षित कर्मचारी यांच्याकडे नवनवीन कल्पना, उद्दिष्टे व आर्थिक वाढीसाठी विविध प्रकारच्या उपाययोजना असतात. आणि हे सर्व शक्य होतं ते म्हणजे केवळ शिक्षणामुळेच. अनेक ठिकाणी विविध प्रकारच्या कामगिरी करत असणारे कर्मचारी त्यांच्यामध्ये असलेली कौशल्य दुसऱ्याला देऊन सुद्धा रोजगाराची क्षमता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. विद्यार्थी मित्रांनो शिक्षण हे पहिले फक्त आपल्याला शाळेमध्ये जाऊन मिळायचे. परंतु आजकालच्या आधुनिक जगामध्ये प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. आजकाल शिक्षण घेणे एवढे सोपे झाले आहे की प्रत्येक जण घरबसल्या त्याच्या आवडीचे शिक्षण घेऊ शकतो.

Importance of education essay in Marathi-काही लोक त्यांच्या परंपरेनुसार विविध प्रकारचे व्यवसाय करत असतात. परंतु शिक्षणामुळे त्यांनी घेतलेले ज्ञान हे त्यांच्या वैयक्तिक जीवनात अर्थव्यवस्थेकडे आणि भविष्यातील एक चांगला व्यक्ती बनण्यासाठी मदतगार होते. भविष्यात चांगल्या नोकरी मिळण्यासाठी, आणि चांगला पैसा मिळण्यासाठी शिक्षण महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो असे मला वाटते. शिक्षणामुळे नागरिकत्व आणि सामाजिक जबाबदारी सुद्धा जपता येते. विद्यार्थी मित्रांनो सर्व सामाजिक क्षेत्रामध्ये सुजान व सुशिक्षित नागरिक हे सहभागी होत असतात, या कर्तव्यामध्ये गुंतले सुद्धा अधिक सोपे आहे. जर आपणही चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन चांगल्या मार्गाला लागू तर सामाजिक स्तरावरही आपल्याला तेवढा मान सन्मान दिला जाईल.

सर्व सुशिक्षित आणि सुजाण लोकांना लोकशाही, तसेच विविध गोष्टींचा आदर कसा करायचा, आणि समाजामध्ये विविध प्रकारचे बदल कसे घडवून आणायचे याचे ज्ञान असते. अर्थातच शिक्षण हा नैतिक जबाबदारीची अंमलबजावणी करतो. शिक्षण ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येक व्यक्तीला त्याच्या सामाजिक जबाबदारी तसेच स्थानिक व जागतिक स्तरावर सकारात्मक योगदान देण्यासाठी प्रोत्साहित करत असते. याव्यतिरिक्त  शिक्षण हे वैयक्तिकरित्या सक्षम व साक्षर बनण्यासाठी अधिक उपयुक्त आहे. शिक्षण हे आत्मविश्वास आणि आत्मसन्मान निर्माण करते. 

Importance of education

प्रत्येक शिक्षित व्यक्ती हा त्याला आलेल्या संकटांना कसे सामोरे जावे हे त्याच्या  ज्ञानावरून तो ठरवत असतो. आयुष्यामध्ये येणाऱ्या संकटांना कशाप्रकारे मात द्यावी हे त्याच्या शिक्षणामार्फत त्याला समजत असते. शिक्षण ही अशी गोष्ट आहे जी वैयक्तिक आलेल्या सर्व संकटांना सामोरे जाण्याचा पाठिंबा देते. शिक्षणामुळे बहुतेक लोकांना दारिद्र्य, आणि भेदभाव या दोन्ही गोष्टींमधून मुक्त होण्यासाठी सक्षम बनवते. त्यांना परिपूर्ण आणि सन्माननीय जीवन जगण्याची संदेश शिक्षणाबाबत प्रदान होत असते.

शिक्षणाचे महत्व मराठी निबंध | Importance of education essay in Marathi ( 600 words)

Importance of education essay in Marathi-या निबंधललेखनामार्फत मी सर्वांना सांगू इच्छितो की, आज कालच्या युगात शिक्षण हे इतके गंभीर झाले आहे की,वाढत्या तंत्रज्ञानामुळे एकमेकांविषयी माहिती त्वरित प्राप्त होते. आजकालच्या वाढत्या जगात ज्या ठिकाणी माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने झटपट उपलब्ध होते त्या ठिकाणी शिक्षण हे आधीच्या काळापेक्षा अधिक गंभीर बनले आहे. अगदी झटपट बदलणार आहे जग यानुसार लागणारे ज्ञान व परिस्थितीनुसार बदलणाऱ्या वातावरणामध्ये व्यक्तीमध्ये होणारे झटपट बदल यासाठी शिक्षण अधिक महत्त्वपूर्ण बनले आहे. आज कालच्या आधुनिक जगात शिकविण्याची, शिकण्याची मूलभूत गरज बनलेली आहे. त्याचबरोबर शिक्षण हा वैयक्तिक व सामाजिक आयुष्यातील प्राथमिक पाया पक्का  करतो. 

सामाजिक बदल,वैयक्तिक वाढ व राष्ट्रीय विकासामध्ये शिक्षण हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.शिक्षण हे आपल्या मनाला व जगण्याला एक विशिष्ट प्रकारचा आकार देते. शिक्षण हे  आपली बौद्धिक क्षमता  वाढवते त्याचबरोबर भविष्यातील पुढील वाटचालीसाठी आपला मार्ग सुसज्ज बनवते.

Importance of education essay in Marathi-आजच्या आधुनिक युगामध्ये शिक्षणाची सार्वजनिक गरज ओळखून बहुतेक लोक दर्जेदार शिक्षणामध्ये गुंतवणूक करायला लागले आहेत. आणि शिक्षणामध्ये केलेली ही गुंतवणूक आवश्यक सुद्धा आहे. कारण यामुळे मानवी कल्याणासाठी, आणि वैयक्तिक प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. शिक्षणामुळे आपल्या वैयक्तिक आयुष्यात किंवा सामाजिक बदलानुसार योग्य दिशा दर्शविली जाते. शिक्षणाच्या माध्यमातूनच आपण वैयक्तिक,आर्थिक, सामाजिक व जागतिक ज्ञान घेऊन यश मिळू शकतो. आपल्या जीवनामध्ये होणाऱ्या घडामोडी साठी आणि नवनवीन माहितीसाठी शिक्षण हा एक महत्वपूर्ण स्रोत आहे.

आजच्या काळात घडणारे हे विद्यार्थी शिक्षणाच्या माध्यमातूनच सामाजिक व आर्थिक ज्ञान प्रदान करत आहेत. आजच्या आधुनिक काळात तर शिक्षण हे इतके गतिशील झाले आहे की. घरबसल्या आपण इंटरनेटच्या माध्यमातून शिक्षण घेऊ शकत. आणि महत्त्वाचे म्हणजे ज्या शिक्षणामध्ये  आपल्याला आवड आहे ते शिक्षण आपण निवडून शिक्षित होऊ शकतो. शिक्षणामुळे आर्थिक योग्यतेचा विकास होऊ लागला आहे. 

शिक्षणाचे महत्त्वपूर्ण प्रक्रिया म्हणजे मानसिक विकास आणि वैयक्तिक विकास होय. शिक्षणामुळे मानसिक विकास होऊन विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता वाढते आणि बुद्धिमत्ता वाढल्यामुळे भविष्यामध्ये प्रगती करायची संधी त्यांना प्राप्त होते. त्याचबरोबर वैचारिक क्षमता सुद्धा म्हणून वैचारिक स्वातंत्र्य त्यांना मिळत असते.शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून विद्यार्थी कोणत्याही परिस्थितीवर मात करण्यास तयार होतात. शिक्षणामुळे वैयक्तिक आयुष्यात होणारे संघर्ष किंवा सामाजिक स्तरावर होणारे संघर्ष यासाठी विद्यार्थी सक्षम बनत आहेत. 

शिक्षणामुळे विविध प्रकार ज्ञान, कला, कौशल्य प्राप्त व्हायला लागलेत. आणि यामुळे समाजामध्ये व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हायला लागला आहे. एक सुशिक्षित  व्यक्ती समाजामध्ये सकारात्मक भावना जागृत करून समाज सुधारण्यास मदतगार होतो. शिक्षण हा समाजाचा एक मोठा आधारस्तंभ आहे.शिक्षित समाज हा सुव्यवस्थित पणे समाजात वावरत आहे.शिक्षणाच्या माध्यमातूनच सामाजिक विकास सही घडू लागला आहे.शिक्षणाच्या माध्यमातून जागतिक आणि सामाजिक संघर्षाला चांगल्या पद्धतीने तोंड देऊ लागले आहे.जर सर्वांनी शिक्षण घेऊन सर्व समाज सुशिक्षित बनला तर समाजामध्ये समानतेचे वातावरण बनायला सुरुवात होईल आणि असमानतेची कमी होईल. शिक्षणामुळे व्यक्तिमत्वात आणि राष्ट्रीयस्तरावर सुद्धा चांगले बदल घडत आहेत.

वैयक्तिक जीवनामध्ये प्रत्येकाला यश मिळण्यासाठी शिक्षक हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. शिक्षणामुळे वैयक्तिक जीवनात यश तर मिळतेच पण समाजामध्ये ही समानता प्राप्त होते. प्रत्येक व्यक्तीने आयुष्यामध्ये बदल घडविण्यासाठी आणि यश मिळविण्यासाठी शिक्षण हे प्राप्त केले पाहिजे. शिक्षण हे असे साधन आहे की जे आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढवून एक चांगले व्यक्तिमत्त्व घडविण्यात सक्षम बनवते.

Importance of education essay in Marathi-शिक्षणाच्या तीन पायऱ्या आहेत सर्वात प्रथम प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण  आणि उच्च माध्यमिक शिक्षण असे शिक्षणाचे तीन मुख्य प्रकार पडतात. ग्रामीण भागात आजच्या काळात सुद्धा माध्यमिक शिक्षणापर्यंत शिकविले जाते. परंतु आजच्या बदलत्या काळानुसार सर्वांनी उच्च माध्यमिक शिक्षण घेऊन स्वतःमध्ये बदल घडवून समाजामध्ये ही बदल घडवण्यास तयार व्हावे असे मला  वाटते. जर तुम्हाला भविष्यामध्ये यश मिळवायचे असेल आणि पुढे जायचे असेल तर शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचे आहे. शिक्षण हे आयुष्याला नवीन दिशा नवा आकार देत असते. बदलत्या काळानुसार आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात शिक्षण हे अधिक महत्त्वपूर्ण बनले असून आजच्या काळात शिक्षण सुद्धा बदलून गेले आहे. शिक्षण हे प्रत्येकासाठी भविष्यातील एक उपयुक्त असे साधन बनले आहे.

शिक्षण हे अशी संपत्ती आहे की जी आपल्यापासून कोणीही करू शकत नाही. आणि ती वाया ही जात नाही.

शिक्षण हे काळाच्या गरजेनुसार बदलत चालले आहे. आणि शिक्षण ही अशी गोष्ट आहे की जी वयानुसार वाढत जाते आणि अधिक ज्ञान प्राप्त होत  असते.शिक्षणामुळे समाजात एक वेगळा मानसन्मान मिळतो. समाजात मानसन्मान प्राप्त करण्यासाठी आणि सर्वांनी आपला आदर करायला पाहिजे यासाठी शिक्षण हे अधिक महत्त्वपूर्ण ठरते. शिक्षण हे उज्वल भविष्य घडविण्यासाठी महत्त्वाचे आहे. विद्यार्थी मित्रांनो चांगले शिक्षण घेऊन  चांगले भविष्य घडवून आई-वडिलांची नाव मोठे करा.।

एक चांगले शिक्षण हे आपल्या आयुष्यातील सर्व स्वप्न पूर्ण करू शकते.

 वारंवार विचारले जाणारे प्रश्न | FAQ

शिक्षणाचे महत्त्व घोषवाक्य.

शिक्षण हे आयुष्याची गुरुकिल्ली आहे.
शिक्षण ही काळाची गरज आहे. 
शिक्षण हे माणसाला स्वाभिमानी बनवते.
शिक्षणामुळे मानसन्मान वाढतो.
शिक्षण हे दारिद्र्य व भेदभाव पासून मुक्त  करतो.

शिक्षणाचे महत्त्व काय आहे?

शिक्षण हे असे साधन आहे की जे आपल्या मध्ये आत्मविश्वास घडवून एक चांगला व्यक्ती बनण्यास मदतगार ठरतो. शिक्षण हा समाजाचा मोठा आधारस्तंभ आहे.शिक्षणामुळे विविध प्रकारचे  ज्ञान, कला, कौशल्य प्राप्त व्हायला लागलेत. आणि यामुळे समाजामध्ये व्यक्तिमत्त्वाचा विकास व्हायला लागला आहे. एक सुशिक्षित  व्यक्ती समाजामध्ये सकारात्मक भावना जागृत करून समाज सुधारण्यास प्रभावित करत असतो.

शिक्षणाचे फायदे?

शिक्षण केल्यामुळे वैयक्तिक जीवनात हवे असलेले यश मिळवता येते.
शिक्षणामुळे उज्वल भविष्य घडते.
शिक्षणामुळे समाजामध्ये मानसन्मान व कौटुंबिक आदर वाढवते.
शिक्षणामुळे आपल्या सभोवतालच्या माहिती आपल्याला मिळतात.
शिक्षण केल्यामुळे आपल्याला हवे असलेले ज्ञान प्राप्त करून आपण एक चांगले भविष्य घडवू शकतो आणि समाजामध्ये आपले वर्चस्व तयार करू शकतो. 

Exit mobile version