सोरायसिस  ची  कारणे, लक्षणे व उपचार, सोरायसिस म्हणजे काय? | psoriasis treatment in marathi

Table of Contents

Psoriasis treatment in marathi

नमस्कार मंडळी,

आजच्या लेखांमध्ये आपण सोरायसिस या आजाराची कारणे, लक्षणे व सोरायसिस आजारावरील उपचार याची माहिती घेणार आहोत. सोरायसिस हा आजार कसा होतो याबद्दलही आपण जाणून घेणार आहोत. अधिक माहितीसाठी psoriasis treatment in Marathi हा लेख पूर्ण वाचा.

सोरायसिस म्हणजे काय ? psoriasis in Marathi

psoriasis treatment in marathi- सोरायसिस हा त्वचा संबंधित आजार आहे. सोरायसिस मुळे त्वचेच्या पेशींची तीव्र गतीने  वाढ होत असते. त्वचेवर खवले,त्वचेला खाज  सुटणे, त्वचा लालसर होणे, त्वचा तीव्र प्रमाणात कोरडी होणे, त्वचेवर लाल  रंगाचे ठिपके पडणे व त्वचा सुजून त्यावर चट्टे उमटणे म्हणजेच सोरायसिस आजार असतो. सोरायसिस या आजारांमध्ये त्वचा लाल होऊन प्रचंड प्रमाणात त्वचेवर खाज सुटते, आणि त्वचा खाजवल्यानंतर त्यावर पांढऱ्या किंवा चंदेरी रंगाचे पापुद्रे निर्माण होत असतात. त्वचेवर पापुद्रे असणारा ठिकाणी आपण खाजवलेल्या त्याचा भुसा तयार होऊन  पापुद्रा निघून खाली पडतात.

Psoriasis symptom in Marathi
सोरायसिस आजाराची लक्षणे

सोरायसिस चे प्रकार | Types of Psoriasis in Marathi

सोरायसिस हा त्वचे संबंधित आजार असून त्याचे काही प्रकार पुढील प्रमाणे:

प्लेक सोरायसिस | Plaque Psoriasis in Marathi

प्लेक सोरायसिस हा सोरायसिस आजाराचा सर्वात सामान्य प्रकार आहे. प्लेक सोरायसिस आजाराचे मुख्य  वैशिष्ट्य हे त्वचेवर चंदेरी आणि पांढऱ्या रंगाचे आलेले पापुद्रे व लाल ठिपके हे असतात.हे  चट्टे शरीराच्या कोणत्याही भागावर दिसू शकतात. परंतु बहुतेक वेळा हे चट्टे, कोपर, गुडघे ,टाळू व पाठीच्या खालच्या भागांमध्ये दिसण्याची शक्यता असते. 

गट्टे सोरायसिस | Guttate Psoriasis in Marathi

गट्टे सोरायसिस हा रोग बहुतेक वेळा बालपणात किंवा तरुण वयात होत असतो. स्ट्रेप्टोकोकल घशातील संसर्गासारख्या  जिवाणूमुळे गट्टे सोरायसिस हा रोग होत असतो.गट्टे सोरायसिस हा हात, पाय  व टाळूवर होतो. गट्टे सरायसिस हा लहान लहान थेंबाच्या आकाराचा दिसतो. गट्टे सोरायसिस या आजारामध्ये खाज कमी असून गुलाबी रंगाचे पॅचेस पडत असतात.

इनव्हर्स सोरायसिस | Inverse Psoriasis in Marathi

इनव्हर्स सोरायसिस, ज्याला इंटरट्रिजिनस सोरायसिस असेही म्हटले जाते. इनव्हर्स सोरायसिस मांडीचा सांधा, स्तनांखाली, जनन इंद्रियांच्या खाली, काखेमध्ये किंवा शरीरामध्ये असणारी दुमडलेले त्वचा यामध्ये दिसून येतो. यामध्ये गुळगुळीत आकाराचे लाल लाल रंगाचे पॅचेस उमटतात.त्याचबरोबर त्वचा बहुतेक प्रमाणात सुचते व चमकदार बनते. बहुतेक  वेळा इनव्हर्स सोरायसिस  हा रोग घामामुळे किंवा त्वचेच्या घर्षणामुळे होण्याची शक्यता असते. 

पस्ट्युलर सोरायसिस | Pustular Psoriasis in Marathi

पस्ट्युलर सोरायसिस मध्ये लाल रंगाच्या त्वचाला वेडलेले पांढरे  पु भरलेले फोड दिसतात.पस्ट्युलर सोरायसिस हा प्रामुख्याने हाताच्या त्वचेवर व पायाच्या त्वचेवर होताना दिसतो. त्याचबरोबर पस्ट्युलर सोरायसिस  शरीराच्या कोणत्याही भागात होऊ शकतो. पस्ट्युलर सोरायसिस  चे  दोन प्रकार आहेत-

  • generalized pustular psoriasis
  • localized pustular psoriasis.

एरिथ्रोडर्मिक सोरायसिस | Erythrodermic Psoriasis in Marathi 

एरिथ्रोडर्मिक सोरायसिस हा रोग अतिशय गंभीर व दुर्मिळ प्रकाराचा आहे. एरिथ्रोडर्मिक सोरायसिस हा रोग शरीराच्या संपूर्ण भागावर त्याचे परिणाम करू शकतो. एरिथ्रोडर्मिक सोरायसिस यामुळे मोठ्या प्रमाणात त्वचा लालसर होणे, त्वचेला खाज सुटणे,  त्वचा सोलली जाते, व तीव्र  प्रकाराची त्वचेला जळजळ होते.एरिथ्रोडर्मिक सोरायसिस हा रोग असल्यास तात्काळ आपल्या जवळच्या डॉक्टरांची भेट घेऊन त्यावर इलाज करा. एरिथ्रोडर्मिक सोरायसिस हा प्रकार  तुमच्यासाठी जीवघेणा ठरू शकतो.या लेखांमध्ये psoriasis treatment in Marathi मी मला माहीत असलेले सोरायसिस चे प्रकार तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे.

सोरायटिक संधिवात | Psoriatic Arthritis in Marathi

सोरायटिक संधिवात हा रोग थेट त्वचेवर परिणाम करणारा नसला तरी संधिवात होण्याची शक्यता असते. यामुळे सांध्यांमध्ये जळजळ,तीव्र प्रकारच्या वेदना,  कडकपणा आणि सूज येते.बहुतेक प्रमाणात सोरायटीक संधिवात हा सोरायसिस असलेल्या लोकांमध्ये आढळून येतो. 

 नेल  सोरायसिस | Nail Psoriasis in Marathi

सोरायसिस हा आजार नखांमध्ये सुद्धा आढळून येतो. ज्यामुळे नखांना खड्डे पडणे, नखा चुरगळणे, जाड होणे यासारखे विविध प्रकारचे नखांमध्ये बदल होत असतात.नेल  सोरायसिस चा उपचार करणे सुद्धा खूप कठीण आहे यामुळे आपल्या नखांची नेहमी काळजी घ्यावी. 

स्काल्प सोरायसिस | Scalp Psoriasis in Marathi

स्काल्प सोरायसिस हा टाळूवर  प्रभाव करतो. ज्यामुळे टाळू लाल होते,व पांढऱ्या आणि चंदेरी रंगाचे चट्टे उमटतात.स्काल्प सोरायसिस हे केसांच्या बाजूला कपाळ, कान व मान  यासारख्या भागांमध्ये होते.

पाल्मर आणि प्लांटर सोरायसिस | Palmar and Plantar Psoriasis in Marathi

पाल्मर सोरायसिस हाताच्या तळव्यावर जास्त प्रमाणात परिणाम करते, ज्यामुळे लालसरपणा, स्केलिंग आणि क्रॅक होतात. प्लांटार सोरायसिस पायांच्या तळव्यावर परिणाम करते, ज्यामुळे लालसरपणा, स्केलिंग आणि क्रॅक होतात.दोन्हीही प्रकार अतिशय वेदनात्मक प्रकाराचे असून दैनंदिन जीवनामध्ये आपले जीवन अस्ताव्यस्था करू शकतात. 

याव्यतिरिक्त ही सोरायसिस आजाराचे विविध प्रकार असू शकतात या लेखांमध्ये psoriasis treatment in Marathi मी मला माहीत असलेले सोरायसिस चे प्रकार तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे.वर दिलेले सोरायसिस चे प्रकार काही व्यक्तींना  उद्भवू शकतात तर काही व्यक्तींना वेगळ्या प्रकारचे असू शकतात.आपल्याला सोरायसिस या आजाराची शंका असल्यास जवळच्या डॉक्टरांना जाऊन अवश्य भेट घेऊन त्या आजाराचे निदान करून घ्या.

सोरायसिस आजाराची लक्षणे | Psoriasis symptom in Marathi

psoriasis treatment in marathi-सोरायसिस हा त्वचा विकार असून या आजारामध्ये त्वचेच्या पेशी तीव्र गतीने  वाढत असतात. सोरायसिस आजाराची सामान्य लक्षणे पुढील प्रमाणे:

लाल रंगाचे ठिपके– सोरायसिस आजारामध्ये लाल रंगाचे ठिपके त्वचावर उमटणे हे सर्वात सामान्य लक्षण दिसून येते. आणि ह्या लाल रंगांच्या ठिपक्यांचे रूपांतर पांढऱ्या व चंदेरी रंगाच्या  पापुद्राने झाकले जाते.हे ठिपके अगोदर लहान स्वरूपात येतात आणि त्यानंतर मोठमोठाले होतात. 

 कोरडी व  तडे पडलेली त्वचा– त्वचेच्या भागावर सोरायसिस हा आजार झाला आहे तेथील भाग कोरडा होऊन त्या ठिकाणी भेगा पडू शकतात. आणि यामुळे जास्त प्रमाणात खाज सुटून जळजळ होऊ लागते. 

 नख जाड प्रमाणात येणे-सोरायसिस ह्या आजाराचा परिणाम नखांवर सुद्धा होतो आणि त्यामुळे नखे घट्ट स्वरूपात व नखांना खड्डे पडण्याची शक्यता असते. बऱ्याच वेळा नखांचा रंग सुद्धा बदलत असतो. बहुतेक वेळा असेही होते की आपले नखे बेल बेड पासून वेगळी होऊन जातात.

सांधेदुखी– सोरायसिस हा आजार असलेल्या बऱ्याच व्यक्तींना सांधेदुखी होत असते. त्याला सोरायटीक सांधेदुखी असे म्हणतात.सोरायटीक साधे दुखी मुळे सांधे जड होऊन त्यावर सूज येते,सांध्यांना जडपणा येतो व  सांधे खराब होऊ लागतात.

ज्या ज्या ठिकाणी आपली त्वचा चिपकलेली असते जसे की  स्तनांखाली, काखेमध्ये व  जनन इंद्रियांमध्ये  लाल रंगाचे ठिपके होऊ लागतात.

त्वचेवर खूप भरलेले फोड होऊन ते लाल रंगाच्या पापुद्राने वेढले जातात.

त्वचेवर तीव्र प्रमाणात लाल रंगाचे चट्टे आणि सूज येते.

तुम्हाला सोरायसिस आजाराची लक्षणे जाणवत असल्यास त्वरित आपल्या जवळच्या डॉक्टरांना जाऊन भेटा व त्यावर उपचार करा.

psoriasis cause in Marathi

सोरायसिस आजार होण्याची कारणे | Psoriasis causes in Marathi

psoriasis treatment in marathi-सोरायसिस हा आजार त्वचारोग असून याची काही सामान्य कारणे पुढील प्रमाणे:

अनुवंशिकता-सोरायसिस हा आजार कुटुंबांमधून अनुवंशिकतेमुळे सुद्धा होतो. जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणाला सोरायसिस हा आजार असेल तर तुम्हालाही तो आजार होण्याची शक्यता असते. 

रोगप्रतिकारक शक्ती कमी असते- सोरायसिस हा आजार स्वयं प्रतिकार रोग मानला जातो. ज्या व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते अशा ठिकाणी रोगप्रतिकारक शक्ती चुकून निरोगी  पेशींना लक्ष करून त्वचेच्या पेशी तीव्र गतीने वाढवते,ज्यामुळे सोरायसिस या आजाराला आमंत्रण मिळते.

दैनंदिन जीवन व आहार- लठ्ठपणा व चुकीचा आहार हा सोरायसिस  आजाराची जोखीम घेतो. याव्यतिरिक्त आपल्या रोजच्या आहारातील काही घटक जसे की दुग्धजन्य पदार्थ,    ग्लूटेन असलेल्या काही व्यक्तींमध्ये लक्ष साधून सोरायसिस आजाराची लक्षणे दिसू शकतात. 

हार्मोनल बदल- गर्भधारणा झाल्यानंतर होणाऱ्या हार्मोनल बदलल्यामुळे काही व्यक्तींमुळे सोरायसिस हा आजाराचे तीव्र प्रमाण दिसू शकते.

थंड किंवा कोरड्या प्रकाराचे हवामान तसेच व्यसन करणारे लोक अधिक प्रमाणात मद्यपान किंवा धूम्रपान सोरायसिस ची  लक्षणांची जोखीम  वाढवत असतात.सोरायसिस आजाराचे परिणाम मज्जासंस्थेवर वर सुद्धा दिसू लागतात.ज्या व्यक्तींना सोरायसिस हा आजार असतो त्या ठिकाणी मज्जासंस्थेवर अधिक प्रकारची चालना मिळते किंवा मज्जासंस्थेचे प्रमाण बिघडते असेही सोरायसिस या आजारामध्ये दिसून आले आहेत.

सोरायसिस मध्ये पांढऱ्या पेशींचे T cells हे त्वचेच्या पेशींवर लक्ष साधून त्वचेवरील स्तर तीव्र गतीने म्हणून त्वचेवर लाल चट्टे पडतात. त्वचेला सूज येते आणि त्वचेवर पापुद्रे बनतात. सामान्यतः याचे कर्तव्य शरीरामध्ये होणाऱ्या बॅक्टेरिया व इन्फेक्शन पासून रक्षण करायचे असते. परंतु जेव्हा चुकून टी सेल्स ह्या पेशी त्वचेवर लक्ष  साधतात, तेव्हा सोरायसिस  या आजाराची लागण होते. 

काही व्यक्तींना सोरायसिस या आजाराचे गंभीर परिणाम जाणू शकतात तर काही व्यक्तींना सामान्य परिणाम सुद्धा जाणवू शकतात. सोरायसिस या आजाराचे लक्षणे असल्यास तात्काळ आपल्या जवळच्या डॉक्टरांकडून निदान करून घेणे. 

सोरायसिस आजाराचे निदान कशाप्रकारे केले जाते? psoriasis treatment in Marathi

psoriasis treatment in marathi-सोरायसिस ची लक्षणे जाणवल्यास आपल्या जवळच्या  डॉक्टरांकडे निदानासाठी जा, शारीरिक तपासणी करून सोरायसिस आजाराचे डॉक्टर निदान करू शकतात. त्याचबरोबर आपल्या त्वचेचा नमुना लॅब मध्ये पाठवून त्यावर निदान केले जाते. 

psoriasis treatment in Marathi 1
सोरायसिस वर उपचार

सोरायसिस हा आजार संसर्गजन्य आजार आहे का?

सोरायसिस हा आजार संसर्गजन्य नाही. सोरायसिस हा आजार त्वचा विकार असून तो एकमेकांना संक्रमण करत नसल्यामुळे सोरायसिस हा आजार संसर्गजन्य नसल्याचे साधले जाते.सोरायसिस ह्या आजाराचे लागण आपल्या आजूबाजूच्या लोकांना होत नसते.

सोरायसिस चा त्रास कशामुळे वाढू लागतो?

सोरायसिस या आजाराचा त्रास  बहुतेक कारणांमुळे  वाढत असतो.बहुतेक वेळा असेही होते की हिवाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचा कोरडे होऊन त्यावर खाज  सुटते आणि मग सोरायसिस आजाराचे लक्षणे दिसू लागतात. सोरायसिस आजारामध्ये अतिप्रमाणात मद्यपान , धूम्रपान व अनेक प्रकारची व्यसने केल्यास सोरायसिसचा त्रास  वाढू लागतो.त्वचेवर अगोदरच्या जखम असणे आणि त्यावर हे लाल रंगाचे चट्टे उमटून त्वचेवरील पापुद्रे  निघणे त्याचबरोबर मानसिक ताण-तणावामुळे सुद्धा सोरायसिस चा आजार वाढवण्याची शक्यता असते. नियमितपणे वेगवेगळ्या प्रकारचे औषधे घेणे मेडिसिन घेणे या प्रकारामुळे ही सोरायसिस या आजाराचा त्रास वाढू लागतो. 

सोरायसिस वर उपचार psoriasis treatment in Marathi 

सोरायसिस हा आजार पूर्णपणे परत होत नसला तरी आपण त्याला नियंत्रणात ठेवू शकतो. सोरायसिस आजारामध्ये त्वचेवरील खाज, सूज, लालसरपणा, त्वचेवर येणारे पापुद्रे  यावर नियंत्रण करू शकतो.सोरायसिस ह्या आजारावर कोणत्याही प्रकारचा इलाज नसला तरी आपण सोरायसिस या आजाराला नियंत्रित ठेवू शकतो.सोरायसिस या आजारावर उपचार करण्यासाठी किंवा त्याला नियंत्रित ठेवण्यासाठी विविध प्रकारचे उपचार ह्या लेखांमध्ये psoriasis treatment in Marathi मांडले आहेत यासाठी हा लेख पूर्ण वाचा.सोरायसिस ह्या आजाराला नियंत्रित ठेवण्यासाठी किंवा त्यावर उपचार करण्यासाठी तयार रुग्णाला किती प्रमाणात सोरायसिस झाला आहे किंवा त्याचा आरोग्याचा इतिहास यावर ठरत असते. 

सोरायसिस या आजारासाठी येथे काही प्राथमिक उपचार दिले आहेत ते खालील प्रमाणे:

कॉर्टिकोस्टिरॉईड्स (Corticosteroids) हा क्रीम लावून आणि त्वचेवरील लालसरपणा,सूचना खाज  सुटणे, आणि त्वचेची जळजळपणा कमी करतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच हा क्रीम वापरावा.

टॉपिकल रेटिनॉइड्स (Topical Retinoids) विटामिन ए पासून तयार केलेले हे क्रीम सोरायसिस आजारामध्ये त्वचेच्या पेशींची वाढ कमी करण्यास मदत करते.डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच हा क्रीम वापरावा.

कॅल्सीन्युरिन इनहिबिटर्स (Calcineurin Inhibitors) या औषधामुळे जळजळ पणा कमी होण्यास मदत मिळते. अनेकदा गुप्तांगाच्या ठिकाणी सोरायसिसचे प्रमाण जास्त आढळते त्यासाठी हे वापरले जाते परंतु हे तुम्ही डॉक्टरांच्या सल्लानुसारच वापरावे.

कोल टार (Coal Tar) हे पेशींची वाढ व जळजळ कमी करण्यास उपयुक्त असते परंतु हे तुम्ही डॉक्टरांचे सल्लानुसार वापरावे असे नम्र विनंती.

फोटोथेरेपी

UVB फोटोथेरपी-ही वैद्यकीय देखरेखी खाली UVB प्रकाशाच्या नियमित संपर्कात आल्यामुळे व त्याच्या पेशींची वाढ कमी होण्यास मदत मिळते. यामुळे त्वचेवरील जळजळ सुद्धा कमी होते. 

PUVA (Psoralen plus UVA) थेरपी-यामध्ये psoralen नावाची औषधे घेणे समाविष्ट आहे, ज्यामुळे UVA प्रकाशासाठी त्वचेची संवेदनशीलता वाढते. psoralen आणि UVA प्रकाशाचे संयोजन पेशींच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते.वैद्यकीय  देखरेख  खाली आपण हे करू शकतात.

याव्यतिरिक्त तुम्ही सोरायसिस या आजारावर आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथिक सुद्धा उपचार करू शकतात. जर तुम्हाला सोरायसिस या आजाराचा अधिक प्रमाणात त्रास होत असेल तर त्वरित आपला जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यावर निदान करावे. डॉक्टर तुम्हाला सोरायसिस यावरील क्रीम मलम देऊ शकतात त्याचबरोबर  दुखणे कमी होण्यासाठी औषध गोळ्याही देऊ शकतात. वर सांगितल्याप्रमाणे लाईट थेरपीचा उपयोग करून सुद्धा डॉक्टर त्वचेच्या पेशींची संख्या कमी करून सोरायसिस या आजारावर उपचार करू शकतात. 

Psoriasis Treatment at home In Marathi

सोरायसिस या आजारासाठी काही घरगुती उपचार | psoriasis treatment in Marathi

psoriasis treatment in marathi-हिवाळ्यात तर आपले त्वचा नेहमी कोरडे होत असते. परंतु ज्या लोकांची त्वचा कोरडीच असेल किंवा त्वचा कोरडे होऊ नये म्हणून त्वचेला नेहमीच मॉइश्चरायझिंग केले पाहिजे. त्यामुळे त्वचा मुलायम होऊन त्वचेला खाज सुटण्याचे प्रमाण कमी होते. नियमित प्रमाणे त्वचा मॉइश्चरायझिंग केल्यामुळे त्वचेवरील कोरडेपणा ही कमी होऊ लागतो.

ज्यामुळे आपल्याला सोरायसिस हा आजार जास्त प्रमाणात होत आहे अशा प्रकारचे ट्रिगर ओळखून ते टाळण्याचा प्रयत्न करावा. जसे की चुकीच्या पद्धतीचा आहार, मद्यपान, अतिप्रमाणात धूम्रपान अशा प्रकारचे जे काही सोरायसिस ह्या आजाराला वाढविण्याचे ट्रिगर असतील त्यांना ओळखून ते टाळायचा प्रयत्न करावा.

आपल्या जेवणामध्ये नियमित प्रमाणे चांगल्या पद्धतीचा आहार घेणे ही तितकेच महत्त्वाचे आहे. जेवणामध्ये फळभाज्या, भाज्या, फळे, ओमेगा-3 असलेले पदार्थ अशा प्रकारचा संतुलित आहार घेऊन सोरायसिस आजाराची लक्षणे दिसल्यास आपण त्यांना नियंत्रणात आणू शकतो. 

सोरायसिस या आजारावर तात्काळ निदान करण्यासाठी तुम्ही जवळच्या तुमच्या त्वचारोग तज्ञाला दाखवून त्याचा सल्ला घेऊ शकतात. सोरायसिस या आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरित आपल्या जवळच्या डॉक्टरां जवळ जाऊन निदान करून घ्या.

सोरायसिस असलेल्या रुग्णाची काळजी कशाप्रकारे घ्यावी?

सोरायसिस असलेल्या व्यक्तीला मानसिक ताण तणाव देऊ नये.

सोरायसिस आजार असल्यास त्या आजारापासून विश्रांती घेण्यासाठी आपल्या आवडीचे छंद जोपासावे.

आपल्या त्वचेला कोणी त्यांची प्रकारची जखम होणार नाही याची काळजी घ्यावी. 

धूम्रपान व मद्यपान तात्काळ सोडावे.

आंघोळीसाठी डॉक्टरांनी दिलेल्या साधनाचा वापर करावा.

 सुती व  मऊ कपड्याची वस्त्रे घालावी.

टीप-डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही प्रकारची औषधे स्वइच्छेने घेऊ नये.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न | FAQ

अंगाला खाज सुटण्याचे कारण?

हिवाळ्यामध्ये त्वचा बऱ्याच प्रमाणात कोरडी होत असते. किंवा बहुतेक लोकांची त्वचा ही कोरडी असते. त्यामुळे सतत अंगाला खाज सुटू शकते. त्याचबरोबर शारीरिक स्वच्छता न ठेवल्याने ही अंगावर खाज येऊ शकते.

अंगावर लाल चट्टे येणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे?

त्वचेवर लाल रंगाचे चट्टे येणे हे एक सामान्य लक्षण असून ते कोणत्याही कारणाने येऊ शकतात परंतु हा  अंगावर लाल चट्टे येणे हे सोरायसिस आजाराचे सुद्धा लक्षात असू शकते. किंवा बहुतेक वेळा एखादा किडा किंवा  डास चावल्यामुळे ही अंगावर लाल चट्टे येतात. जर तुम्हालाही अंगावर सतत लाल चट्टे येत असतील तर तुम्ही जाऊन आपल्या जवळच्या डॉक्टरांची भेट घ्या आणि त्यावर उपचार करा.

Leave a Comment