महाशिवरात्री पूजा- चार प्रहर,चार पद्धतीची पूजा जाणून घ्या संपूर्ण माहिती | shivratri 4 prahar puja vidhi

नमस्कार मंडळी,

shivratri 4 prahar puja vidhi – संपूर्ण देशभरात महाशिवरात्री हा सण मोठा उत्साहात साजरा केला जातो.हिंदू सणांपैकी महाशिवरात्री हा सुद्धा एक मोठा सण असतो.महाशिवरात्रीच्या दिवशी भक्त भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेक पद्धतीच्या पूजा या दिवशी केल्या जातात.कोणी रुद्राभिषेक करतं तर कोणी चार प्रहर ची पूजा करत.भक्त मनोभावाने महादेवाची पूजा महाशिवरात्रीच्या दिवशी करत असतात.

आजच्या या लेखामध्ये आपण महाशिवरात्रीच्या दिवशी केली जाणारी चार प्रहार मध्ये पद्धतीची पूजा कशी असते, ही पूजा का करायची असते, चार प्रहरची पूजा  कशा प्रकारे मांडणी केली जाते याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. अधिक माहितीसाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचत राहा.

महाशिवरात्री पूजा- चार प्रहर,चार पद्धतीची पूजा जाणून घ्या संपूर्ण माहिती |  shivratri 4 prahar puja vidhi

भगवान शिवाची रात्र म्हणजेच “महाशिवरात्र”महाशिवरात्रि हा सण भक्त मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा करतात.फाल्गुन कृष्ण पक्षा चतुर्दशीला महाशिवरात्रीहा सण येत असतो. संपूर्ण देशामध्ये आज महाशिवरात्री मोठ्यात धुमधडाक्यात साजरी होत आहे.

महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव शंकर आणि माता पार्वती यांचे लग्न झाले होते अशी मान्यता आहे यामुळे महाशिवरात्री हा सण साजरा केला जातो.महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरांची मोठ्या भक्ती भावाने पूजा केली जाते.महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास केले जातात.

प्रहर या शब्दाचा अर्थ काय तर “प्रहर” हा शब्द रात्रीच्या एका विशिष्ट कालावधीला  (वेळेला) सुचित करतो.प्रत्येक प्रहर हा प्रत्येकी तीन तासाचा असतो.महाशिवरात्रीची रात्रही चार प्रहर मध्ये विभागली जाते.भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी आणि महादेवाची मनोभावे पूजा करण्यासाठी भक्त चार प्रहरांमध्ये पूजा करणे विशेष समजतात.महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा आणि व्रत केल्याने चांगले फळ मिळते अशी मान्यता आहे.

चार प्रहर पूजेचा शुभ मुहूर्त 2024 | mahashivratri char prahar puja time 2024

भगवान शंकराची पूजा ही प्रदोष काळामध्ये होत असते. यासाठी चार प्रहरची ची पूजा असते याला उदय तिथी बघण्याची गरज नसते.आणि म्हणूनच 2024 (Mhashivrathi Prahar Puja) यावर्षी महाशिवरात्रीची चार प्रहर पूजा ही आठ मार्च या दिवशी होणार आहे. हिंदू पंचांगानुसार 8 मार्च संध्याकाळी नऊ वाजून 57 मिनिटांनी महाशिवरात्री सुरू होईल आणि याची सांगता दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सहा वाजून सतरा मिनिटांनी समाप्ती होईल.

चार प्रहर पूजेचा शुभ मुहूर्त 2024 | mahashivratri char prahar puja time 2024 | mahashivratri 2024 muhurt 

पहिला प्रहर मुहूर्त :
संध्याकाळी 6 वाजून 25 मिनिटे पासून संध्याकाळी 9 वाजून 28 मिनिटांपर्यंत असेल.
दुसरा प्रहर मुहूर्त : 
रात्री 9 वाजून 28 मिनिटांपासून तर 12 वाजून 31 मिनिटांपर्यंत असेल.
तिसरा प्रहर मुहूर्त :
12 वाजून 31 मिनिटांपासून तर रात्री 3 वाजून 34 मिनिटांपर्यंत असेल. 
चौथा प्रहर मुहूर्त :
रात्री 3 वाजून 34 मिनिटांपासून सकाळी 6 वाजून 37 मिनिटांपर्यंत असेल.

mahashivratri char prahar puja time 2024

महाशिवरात्री पूजा-चार प्रहर पूजा विधि अशा पद्धतीने करा | shivratri 4 prahar puja vidhi

पहिली प्रहर पूजा संध्याकाळी | mahashivratri char prahar puja

 • पूजा करण्यासाठी अनेक गोष्टीची तयारी करावी लागते.यासाठी सर्वप्रथम पूजेची तयारी करा.
 • ज्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडणार आहेत ती जागा गोमूत्र आणि गुलाब जल टाकून पुसून घ्या.
 • त्या जागेवर रांगोळी टाका अथवा फुलांनी सजवा.
 • पाटावर तुम्ही शिवप्रतिमा ठेवणार असाल किंवा मग मूर्ती असेल तर ते पाटावर मांडून घ्या.
 • पूजेची सामग्री जवळ घेऊन बसा.
 • अगरबत्ती, कापूर, फुले, फळे, दूध, दही, मध, पाणी आणि बेलची पाने हे सर्व सामग्री जवळ घेऊन बसा.

महाशिवरात्रि पूजा | Mahashivratri Puja Vidhi 

 • चार प्रहर ची पूजा सुरू करण्याअगोदर पाटावर शिवप्रतिमे सोबत अगोदर गणेशजीचे आवाहन करा.
 • गणेश जी ची स्थापना केल्यानंतर अगोदर गणेश तिची पूजा करून घ्या.
 • गणेश जी पूजा केल्यानंतर गणेशजि ला आवाहन करून संपूर्ण पूजा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रार्थना करा.
 • आता भगवान शिवाजी उपासना करा.
 • शिव मंत्राचा जप करा.
 • शिव मंत्राचा जप करताना शिवलिंगाला पाणी, दूध, मधाने स्नान करून फुले अर्पण करा.
 • भगवान शिवाचे पंचामृताने, पाण्याने, मधाने स्नान करून घ्या.
 • भगवान शिवाचे स्नान झाल्यानंतर अष्टगंध लावा. 
 • भगवान शिवाला बेलपत्रे आणि बेलफळ अर्पण करा.
 • भगवान शिवा जवळ अगरबत्ती लावून घ्या. 
 • आता थोड्या वेळ भगवान शिवाचे स्तोत्र, मंत्र आणि ध्यान करा.
 • भगवान शिवाजवळ आरती लावून उपासना करा. कापूर आरती म्हणा कापूर आरती व शंकराची आरती  करा.
 • भगवान शंकराला फळे, मिठाई आणि इतर प्रसाद अर्पण करा.
 • याव्यतिरिक्त तुम्ही घरामध्ये काही प्रसाद बनवला असेल जसे की शिरा तेही तुम्ही प्रसाद म्हणून अर्पण करू शकतात. 

दुसरी प्रहार पूजा (रात्री 9:28 ते 12:31) |shivratri 4 prahar puja vidhi

ज्याप्रमाणे आपण पहिली प्रहर पूजा केली त्याप्रमाणेच दुसरी प्रहर पूजा ही करायची आहे.

तिसरी प्रहर पूजा (12:31 ते 3:34)|shivratri 4 prahar puja vidhi

ज्याप्रमाणे आपली अगोदरची पूजा सुरू आहे अगदी तशीच सुरू ठेवा.

चौथी प्रहर पूजा (3:34 ते 6:37)|shivratri 4 prahar puja vidhi

चौथ्या प्रहर पूजा मध्ये जी पूजा तुम्ही भक्तिभावाने सुरू ठेवले आहे त्या पूजेची उपासनेची सांगता आता करायची.संपूर्ण रात्रभर चालत असलेला ओम नमः शिवाय मंत्राचा जप,शिवस्तुती,कथा,शिव चालीसा,स्तोत्रे हे सर्व करून पूजेची सांगता करा.शंकराला भोलेनाथ म्हटलं जातं कारण भोलेनाथ आपल्यावर लवकर कृपा करतात,प्रसन्न होतात, मार्ग दाखवतात.आपण केलेली चार प्रहर ची पूजा नक्कीच याचे फळ आपल्याला मिळेल.पूजा करताना अंतकरणाने आणि शुद्ध भक्ती भावाने पूजा करा.

Leave a Comment