नमस्कार मंडळी,
Maha shivratri puja vidhi- आजच्या लेखामध्ये आपण येत्या महाशिवरात्रीला पूजा विधी कसा करायचा हे बघूया.ज्यांच्या घराजवळ शिवमंदिर असेल किंवा शिवमंदिरात जाऊन महाशिवरात्रीच्या दिवशी कशा पद्धतीने पूजा केली पाहिजे या संबंधित अधिक माहितीसाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
mahashivratri special- शिव पूजन कशा पद्धतीने करायचे व महाशिवरात्रीला करावयाचे उपाय
अनुक्रमाणिका
- 1 mahashivratri special- शिव पूजन कशा पद्धतीने करायचे व महाशिवरात्रीला करावयाचे उपाय
- 2 महाशिवरात्रि 2024 | Mahashivratri 2024 date and time
- 3 महाशिवरात्री 2024 पूजा मुहूर्त | Mahashivratri 2024 Puja muhurat
- 4 महाशिवरात्री सर्वार्थ सिद्धी योग 2024 | Mahashivratri 2024 Shubh Yog
- 5 Maha shivratri puja vidhi | महाशिवरात्रि पूजा विधि 2024
Maha shivratri puja vidhi- हिंदू पंचांगानुसार 2024 या वर्षी महाशिवरात्री 8 मार्च या दिवशी साजरी होणार आहे.सर्व ग्रहांमध्ये शुभ असणाऱ्या महाशिवरात्रीच्या दिवशी सर्वयोग व सर्वार्थसिद्ध योग असणार आहे.या दिवशी आपण भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी भगवान शंकराची पूजा अर्चना मनोभावे केली पाहिजे.असं केल्यास मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात भोलेनाथ आपली इच्छा पूर्ण करतात अशी मान्यता आहे.
भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्या लग्नाच्या उत्सवामध्ये महाशिवरात्री हा सण साजरा केला जातो.हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या माघ चतुर्दशीला महाशिवरात्री हा सण मोठ्या थाटामाटात चोही बाजूला साजरा केला जातो.या शुभकाळामध्ये महादेवाची घरी बसून आपल्याला कशी पूजा करता येईल किंवा जवळच्या महादेवाच्या मंदिरात जाऊन कशा पद्धतीने आपल्याला महादेवाची कशा पद्धतीने पूजा करायची हे आपण बघूया..
महाशिवरात्रि 2024 | Mahashivratri 2024 date and time
2024 या वर्षी फाल्गुन कृष्ण चतुर्थीची सुरुवात 8 मार्च या दिवशी 9 वाजून 57 मिनिटांनी सुरू होत आहे,आणि 9 मार्च संध्याकाळी सहा वाजून 17 मिनिटांपर्यंत हा योग असणार आहे.
महाशिवरात्री 2024 पूजा मुहूर्त | Mahashivratri 2024 Puja muhurat
ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार आणि हिंदू पंचांगानुसार 2024 या वर्षी महाशिवरात्री 8 मार्च 2024 या दिवशी साजरी करण्यात येणार आहे.हिंदू दिनदर्शिकेनुसार ८ मार्च 2024 महाशिवरात्रीच्या दिवशी सर्वार्थसिद्धी योग तयार होत असल्याने सकाळी 6:45 ते 10:41 पर्यंत सर्वार्थसिद्धी योग राहणार आहे.त्याचबरोबर 9 मार्च 2024 रोजी पहाटे 4:45 ते 12:41 या वेळेमध्ये शिवयोग राहणार आहे.
2024 या वर्षाची महाशिवरात्र खास होणार आहे. पंचांगानुसार महाशिवरात्रीचा हा योग आणि ग्रहस्थिती 300 वर्षांमध्ये केवळ एक किंवा दोन वेळा येत असते.ग्रहांची शुभ स्थिती आणि सर्वार्थसिद्धी योग या काळामध्ये महाशिवरात्र हा उत्सव साजरा केला जाणार आहे.यंदाच्या महाशिवरात्रीला आपण भगवान शंकरासाठी जी पूजा अर्चना करणार आहेत त्याला प्रसन्न होऊन भगवान शिव आपल्याला लवकरात लवकर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतील.
महाशिवरात्री सर्वार्थ सिद्धी योग 2024 | Mahashivratri 2024 Shubh Yog
Maha shivratri puja vidhi 2024- या वर्षी महाशिवरात्रीला सर्वार्थसिद्धी योग बनत आहे.तीनशे वर्षांमधून एक किंवा दोन वेळा येणारा हा सर्वात सिद्धी योग अतिशय शुभ मानला जातो.सर्वार्थ सिद्धी योगामध्ये पूजा केल्याने पूजेचे विशेष फळ आपल्याला मिळते अशी मान्यता आहे.सर्वात सिद्धी योग हा धनलाभासाठी आणि कोणतेही कार्य पूर्ण करण्यासाठी विशेष मानला जातो.सर्वार्थ योगामध्ये सुरू केला जाणारा कोणताही व्यवसाय किंवा अपूर्ण राहिलेली काम पूर्ण होतात अशी मान्यता आहे.
Maha shivratri puja vidhi | महाशिवरात्रि पूजा विधि 2024
mahashivratri puja- महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची पूजा करताना ही सामग्री तुमच्या जवळ असणे आवश्यक आहे:
भगवान शिवाची मूर्ती किंवा प्रतिमा, अगरबत्ती, कापूर, फुले, फळे, दूध, दही, मध,धोतऱ्याचे फुल,सुपारी अथवा गणपतीची मूर्ती, पाणी आणि बेलची पाने यांचा समावेश आहे.
Maha shivratri puja vidhi | महाशिवरात्रि पूजा विधि 2024
Maha shivratri puja vidhi- महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर मधाने महादेवाचे स्नान करावे.शिवलिंगाचे स्नान मधाने करणे शुभ मानले जाते यामुळे आयुष्यातील बऱ्याचशा समस्या नाहीशा होतात.जीवनातील कामे मार्गी लागतात.शुभ रात्रीच्या दिवशी भगवान शंकराचा रुद्र अभिषेक केल्यामुळे धनलाभ होतो आणि आर्थिक क्षेत्र सुधारण्यास मदत मिळते.
उसाच्या रसाने महादेवाचे स्नान केल्यामुळे भगवान लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते अशी मान्यता आहे.महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरावर 108 बेलपत्रे ठेवून भगवान शंकराची 108 नावे घ्यावी यामुळे महादेव नेहमी आपल्यावर प्रसन्न असतात आपल्या जीवनात कोणत्याही प्रकारचे अडथळे निर्माण होत नाही घरात सुख समृद्धी शांतता नांदते.
Maha shivratri puja vidhi | महाशिवरात्रि पूजा विधि 2024
puja on mahashivratri-
- सर्वप्रथम शिवलिंगाजवळ एक दिवा लावून घ्या.
- शिवलिंगा जवळ किंवा ज्या ठिकाणी तुम्ही पूजा करत आहात त्या ठिकाणी सर्वप्रथम गणपती बाप्पाचे स्मरण करा.
- गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीच्या रूपात गणपती बाप्पाची पूजा करू शकतात.
- हळदी-कुंकू,अष्टगंध लावून गणपती बाप्पाला आवाहन करा.
- महाशिवरात्रीच्या दिवशी सर्वप्रथम शिवलिंगावर पाणी अर्पण करावे भगवान शिवाचे पाण्याने स्नान करा.
- पाण्याने स्थान केल्यानंतर पंचामृताने शिवलिंगाचे स्नान करा.
- आता मधाने शिवलिंगाचे स्नान करा.
- तुमच्याकडे केसर उपलब्ध असेल तर पाण्यामध्ये केसर टाकून आठ वेळा शिवलिंगावर त्याचे स्नान करावे.केसर मिश्रित पाण्याने शिवलिंगावर स्नान केल्याने मनातील मनोकामना पूर्ण होतात.
- आता पुन्हा एकदा शिवलिंगावर पाणी टाकून शिवलिंग पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या.
- शिवलिंगावर चंदनाचा गंध लावा.
- शिवलिंगावर फुल अर्पण करा.
- धतुऱ्याचे फुल आणि धतुराचे फळ अर्पण करा.
- उसाचा रस, तुळशी, जायफळ,दक्षिणा शिवलिंगावर अर्पण करा.
- 108 बेलपत्र घेऊन108 वेळा भगवान शंकराचे वेगवेगळे नाव घेऊन ते शिवलिंगावर एक-एक करून अर्पण करा.
- पूजा संपन्न झाल्यानंतर भगवान शंकराची आरती म्हणून घ्या.
- आरती झाल्यावर देवाला भोग लावा.तुम्ही घरामध्ये यासाठी शिरा किंवा खीर बनवून घेऊ शकतात.
- पूजा संपन्न झाल्यानंतर प्रसाद वाटून खा.
महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान विष्णू गंगाजल मध्ये आश्रय घेतात असे मानले जाते यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी “ओम नमो भगवते वासुदेवाय नमः” या मंत्राचा जप केला पाहिजे.