बैल पोळा सणाविषयी माहिती | Bail pola chi mahiti in marathi 

नमस्कार मंडळी,

आजच्या लेखामध्ये आपण बैलपोळ्याची माहिती मराठीमध्ये बघणार आहोत. सर्व शेताच्या कामांमध्ये बैलाचे किती महत्त्व आहे, बैलपोळा सण का साजरा केला जातो, बैलपोळा सण कुठे साजरा केला जातो. आजच्या Bail pola chi mahiti in marathi  या लेखांमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. अधिक माहितीसाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

बैलपोळा हा सण का साजरा केला जातो? Bail pola chi mahiti in marathi 

एकेकाळी कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि माता-पार्वती हे दोघेही सारी पाटी चा खेळ खेळत होते आणि खेळ खेळत असताना माता-पार्वती या खेळांमध्ये जिंकल्या परंतु भगवान शंकर त्यांना म्हणाले की, “ह्या खेळामध्ये मी जिंकलो आहे”, तेव्हा त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नंदीला माता-पार्वती यांनी विचारले की खेळांमध्ये कोण जिंकले?

तेव्हा नंदीने हळूच मान हलविली आणि म्हणाला की, या खेळामध्ये भगवान शंकर जिंकले. त्यावर माता पार्वती क्रोधित झाल्या आणि नंदीला श्राप देऊ  लागल्या, तुला सदैव पृथ्वीवर कष्ट करून जगावे लागेल आणि सदैव तुझ्या पाठीवर नांगर राहील हे सर्व ऐकून नंदी अतिशय घाबरून गेला आणि नंदिने आपली चूक मान्य केली. त्यावर माता पार्वती यांनी नंदीला सांगितले की वर्षातून एकदा सर्व शेतकरी एक दिवस तुझी देव मानून देवासारखी पूजा करतील. ईथूनच बैलपोळा या सणाची सुरुवात झाली.

महाराष्ट्रात बैल पोळा हा सण कसा साजरा करतात?

महाराष्ट्रामध्ये बैलपोळा हा सण अतिशय उत्साहाने साजरा करून बैलाला त्यादिवशी फुगे, विविध प्रकारचे रंग, व फुले या साहित्याने सजवून बैलपोळा हा सण साजरा केला जातो.

  • प्रथम बैलाला हळद व तेल लावून मसाज केली जाते.
  • यानंतर बैलाला चांगल्या प्रकारे अंघोळ घातली जाते.
  • बैलाला छान विविध प्रकारचे रंग  देऊन, विविध प्रकारचे शिंगांना फुगे लावून सजविले जाते.
  • बैलाच्या पाठीवर शाल  चढविली जाते.
  • गावातली सर्व लोक एका ठिकाणी जमवून आपापली बैलं आणतात.
  • यानंतर मंदिराच्या संपूर्ण भागाला गोल फिरवून पाच फेऱ्या मारल्या जातात
  • बैलाला सोबत घेऊन ढोल ताशा लावून गावामध्ये मिरवणूक काढली जाते.
  • गावातल्या बायका बैलाची पूजा करून पुरणाचा नैवेद्य खाऊ घालतात.

Bail-Pola-Chi-Mahiti-In-Marathi-2
Bail-Pola-Chi-Mahiti-In-Marathi-2

बैल पोळा सणाविषयी माहिती | Bail pola chi mahiti in marathi

भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि शेतीमध्ये राबणाऱ्या दिवस रात्र बैलाचे यामध्ये महत्त्वाचे योगदान आहे. कृषीप्रधान देशातल्या संस्कृतीमधील एक महत्त्वाचा सण म्हणजेच बैलपोळा. बैलपोळा हा सण एका मुक्या  प्राण्यासंबंधीत प्रेम व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो.

बैलपोळा हा सण महाराष्ट्रसह विविध राज्यांमध्ये साजरा केला जातो. जरी बैलपोळा हा सण विविध राज्यांमध्ये साजरा केला जात असेल तर त्याची प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे नाव असून वेगवेगळ्या दिवशी हा सण साजरा केला जातो. या दिवशी शेतकरी बांधव आणि गावातील अन्य मंडळी बैलाची पूजा करतात. बैलपोळा हा सण विशेषता बैलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो. बैलपोळा या सणाला कर्नाटक राज्यामध्ये “बेंदूर” या नावाने ओळखले जाते.

त्याचबरोबर हा सण महाराष्ट्रामध्ये अत्यंत धूमधडाक्यात साजरा केला जातो. 

बैलपोळा हा सण श्रावण महिन्यात पिठोरी अमावस्येच्या दिवशी साजरा केला जातो. या सणाचे हे शेतकरी बांधवांमध्ये खूप महत्त्व आहे. बैलांना अतिशय चांगल्या पद्धतीने सजवून, रंगवून त्यांची पूजा केली जाते. गावातील मंडळी पहिल्या दिवशी आपल्या बैलास नदीवर किंवा नाल्यावर नेता तिथे त्यांची अंघोळ घालतात. त्यानंतर त्यांच्या पाठीवर शाल टाकतात. गळ्यामध्ये फुलांचा हार घालून, शेंगांना बाशिंग लावून, पायामध्ये चांदीचे किंवा करदोड्याचे तोडे घालून त्यांना पूर्ण गावात फिरवले जाते. त्याचबरोबर त्यांना पुरणपोळीचा किंवा ज्वारीचा खिचडा करून नैवेद्य दाखविला जातो. काही काही गावांमध्ये तर अतिशय थाटमाठात ढोल ताशे लावून गावभर मिरवणूक काढली जाते. 

बैलपोळा विषयी माहिती | Bail pola chi mahiti in marathi 

बैल पोळा हा सण श्रावण महिना किंवा भाद्रपद महिना यादरम्यान येतो. पिठोरी अमावस्या या दिवशी बैलपोळा हा सण साजरा केला जातो. बैलांप्रती कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी बैलपोळा हा सण साजरा करण्यात येतो. विशेषतः बैलपोळा हा सण महाराष्ट्र आणि विदर्भात थाटामाटात अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. त्याचबरोबर बैलपोळा हा सण तेलंगणा व मध्य प्रदेश राज्यात सुद्धा मोठ्या जोमाने बैलपोळा हा सण साजरा केला जातो.

बैलपोळा या सणाचे नाव कसे पडले?

“भगवान कृष्णा” सर्वांना माहितीच असेल की भगवान कृष्ण यांचे मामा कंस हा नेहमीच भगवान कृष्णाचा शत्रू राहिला आहे. लहानपणी जेव्हा कृष्णा यशोदा आणि वासुदेवा सोबत राहत होते त्यावेळेस कंस मामाने कृष्णा चा  वध करण्यासाठी असुर पाठविले. त्यानंतर एकदा “पोलासूर” नावाच्या राक्षसाला कंस मामाने कृष्णाला मारण्यासाठी पाठविले, परंतु कृष्णाने पोलासूर राक्षसाचा वध केला. तो दिवस होता श्रावण महिन्यातील अमावस्येचा, म्हणूनच त्या दिवसापासून ह्या अमावस्येला पोळा असे नाव पडले आणि ह्या दिवशी लहान मुलांवर अधिक प्रेम केले जाते. महाराष्ट्रामध्ये याला तान्हा पोळा असे सुद्धा म्हटले जाते. 

2023 मध्ये बैलपोळा हा सण कधी आहे?

पोळा हा सण श्रावण महिन्याच्या अमावस्येला साजरा केला जातो. आणि ज्या दिवशी हा साजरा केला जातो त्या दिवशी पिठोरी अमावस्या असते. बैलपोळा हा सण जवळपास ऑगस्ट ते सप्टेंबर यादरम्यान असतो. वर्ष 2023 मध्ये बैलपोळा हा सण 14 सप्टेंबर रोजी असून या दिवशी पिठोरी अमावस्या आहे. महाराष्ट्र आणि विदर्भात बैलपोळा हा सण अति उत्साह व थाटामाटात साजरा केला जातो. 

बैलपोळा स्टेटस | Bailpola status in Marathi

वाडा शिवार सारं । वाडवडीलांची पुण्याई ।।
किती वर्णू तुझे गुण । मन मोहरून जाई ।।
तुझ्या अपार कष्टानं । बहरते सारी भुई ।।
एका दिवसाच्या पुजेनं । होऊ कसा उतराई ।।
सर्व शेतकरी बांधवानां पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा ।।

शेतामध्ये वर्षभर राबून,
जो करतो धरणी मातीची सेवा,
असे अपार कष्ट करतो आपला सर्जा राजा 
शेतकऱ्यांच्या जिवाभावाच्या मित्राला बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

बैलपोळा हा सण, सर्जा राजाचा हा दिन,
बळीराजा संगे जो राबतो रात दिन
सांगा आम्हा कसे फेडावे तुझे हे ऋण
बैलपोळा सणाच्या शेतकरी राजाला हार्दिक शुभेच्छा

आला रे आला बैल पोळा, सारं गाव झालं गोळा,
सर्जा राजाला घेऊनी सारे जाऊया राउळा
बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा

कष्टाशिवाय मातीला आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही

म्हणूनच बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा 

महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना बैलपोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा 

हे ही वाचा,

महाराणा प्रताप यांचा इतिहास | Maharana Pratap History In Marathi

अधिक माहितीसाठी विकिपीडिया पेजला भेट देऊ शकता.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न FAQ

महाराष्ट्रामध्ये 2023  मध्ये बैलपोळा हा सण कधी साजरा होत आहे?

श्रावण महिन्यातील सप्टेंबर महिन्यात 14 सप्टेंबर 2023 मध्ये पिठोरी अमावस्या ह्या दिवशी बैलपोळा हा सण साजरा होत आहे.

बैलपोळा हा सण का साजरा केला जातो?

बैलपोळा हा सण शेतकरी बांधव बैलाविषयी प्रेम व कृतज्ञता दाखविण्यासाठी बैलपोळा हा सण साजरा करतात. 

Leave a Comment