नमस्कार मंडळी,
Vat Purnima 2024 In Marathi-वटसावित्रीची पूजा महिला मोठ्या थाटामाटात करतात परंतु ही पूजा करत असताना कोणकोणते मंत्र उच्चारायचे असतात ज्यामुळे आपले सौभाग्य अखंड राहते हे आपल्याला माहीत नसते आणि म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी आजच्या या (Vat Purnima 2024 In Marathi) लेखांमध्ये वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करताना कोणत्या मंत्रांचा उच्चार करावा हे सांगणार आहोत.
वटसावित्रीची पूजा करताना बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहित नसतात. कशा पद्धतीने पूजा करायची आहे, पूजेला कोण कोणती सामग्री हवी आहे, पूजा करत असताना कोणत्या मंत्रांचा उच्चार करायला पाहिजे, वडाच्या झाडाची पूजा करताना कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत.
अशा अनेक बाबतीत आपल्याला माहिती नसते म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी आजच्या या (Vat Purnima 2024 In Marathi) लेखात वडाच्या झाडाची पूजा कशी करावी आणि पूजा करताना कोणत्या मंत्रांचा उच्चार करावा त्यामुळे तुमची सौभाग्य अखंड राहील हे सांगणार आहोत. अधिक माहितीसाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचत राहा.
Vat Purnima 2024 In Marathi
अनुक्रमाणिका
Vat Purnima 2024 In Marathi- येत्या 21 जून 2024 रोजी वटसावित्री पौर्णिमा आहे. ज्येष्ठ महिन्यातील पोर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. स्त्रिया छान नटून थटून 16 शृंगार करून वटसावित्री पौर्णिमा साजरा करतात. वटसावित्री पूजा करण्यामागे महिलांच्या मनातील एकच भाव असतो आणि तो म्हणजे सात जन्मापर्यंत मला हाच नवरा मिळावा आणि माझ्या नवऱ्याला दीर्घायुष्य मिळावे आणि माझं सौभाग्य अखंड राहावं अशी एकच प्रार्थना करून ती देवी वटसावित्री पौर्णिमेची पूजा करते.
Vat Purnima 2024 Muhurat Time In Marathi | वडाची पूजा किती वाजता करायची ?
Vat Purnima 2024 In Marathi
21 जून 2024 रोजी वटपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. (Vat Purnima 2024 In Marathi) वटपौर्णिमेचा वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त पहाटे 5 वाजून 24 मिनिटांनी सुरू होऊन 10 वाजून 30 मिनिटांनी संपणार आहे. दुपारचा मुहूर्त सुरू होणार आहे 12 वाजून 23 मिनिटांनी तर दुपारी 2 वाजून 7 मिनिटांपर्यंत दुपारचा हा मुहूर्त असणार आहे. वर दिला गेलेला पहाटेच्या आणि दुपारच्या या वेळेमध्ये सुहासिनी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची या वेळामध्ये पूजा करू शकतात. दिल्या गेलेल्या शुभमुहूर्तामध्ये पूजा केल्याने पूजेचा लाभ मिळतो.
Vat Purnima Puja Samagri List In Marathi | वटपौर्णिमेच्या पूजेची सामग्री
Vat Purnima 2024 In Marathi- वटपौर्णिमेच्या दिवशी लागणारी पूजेचे सामग्री पुढीलप्रमाणे:
- हळदी
- कुंकू
- तांदूळ
- शेंदूर
- अत्तर
- अगरबत्ती
- तुपाचा दिवा
- पंचामृत
- सुपारी
- खोबऱ्याची वाटी
- खारीक
- हळकुंड
- बदाम
- गळसरी
- कोरे वस्र
- पाच हिरव्या बांगड्या
- एक आंबा
- गहू
- गुळ खोबऱ्याचा नैवेद्य
- विड्याची पाने
- पांढऱ्या दोऱ्याचे सुत
- पाण्याने भरलेला पाण्याचा तांब्या
- कापसाचे वस्त्र
- फुले
- विवाहित स्त्रियांचे सौभाग्याचे लेणे
इत्यादी साहित्य वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा करत असताना तुमच्याकडे असायला हवे.. (Vat Purnima 2024 In Marathi) जर पूजा करताना काही साहित्य तुम्ही घरी विसरला असाल तर त्याऐवजी तुम्ही तांदूळ वापरून घेऊ शकतात.
Vat Purnima Puja In Marathi | वटपौर्णिमा पूजा मराठी | वटपौर्णिमा पूजा कशी करावी
Vat Purnima 2024 In Marathi
Vat Purnima 2024 In Marathi- वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी व्रत करावे. सकाळी पहाटे लवकर उठून शुद्ध स्नान करून शुद्ध वस्त्रे किंवा कोरे वस्त्रे अर्पण करावे.कोरे वस्त्र अर्पण केल्यानंतर 16 शृंगार धारण करावे मग वटपौर्णिमेच्या व्रताचे संकल्प धरावा. (Vat Purnima 2024 In Marathi) वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी वडाचे झाड लांब असल्यास पूजेला जाण्यासाठी पूजेचे ताट तयार करून घ्यावे. वर दिलेली सर्व सामग्री ही पूजेच्या ताटात ठेवून घ्यावी.
पूजा करताना सर्वप्रथम वडाच्या झाडाजवळ निरांजन लावून घ्यायचे आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करताना प्रथम विड्याचे पान ठेवून त्यावर गणपतीची स्थापना करावी. गणपतीची स्थापना झाल्यावर गणपती बाप्पाची हळदी कुंकू अक्षदा वाहून पंचोपचार पूजा करावे. गणपतीची मूर्ती नसल्यास सुपारी ठेवून पूजा करू शकतात. यानंतर सती मातेची पंचोपचार पूजा करावी. वडाच्या मूळाजवळ पुरुष सुक्तासह षोडशोपचार अभिषेक करून चोपचार पूजन व् आरती करावी.आंब्याला पांढरे सूत गुंडाळून आंबा वडाच्या झाडाला अर्पण करून द्यायचा आहे.
ज्या ठिकाणी गणपती स्थापन केलेला आहे त्या ठिकाणी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून द्यायचा आहे. त्याचबरोबर पाच हिरव्या बांगड्या, विवाहित स्त्रियांचे लेणे, गळसरी,कापसाचे वस्त्र या सर्व गोष्टी हळद कुंकू लावणे वडाच्या झाडा पुढे ठेवून नमस्कार करून घ्यावा.आता झाडाचे औक्षण करून घ्यायचे.वटपौर्णिमेची कहाणी वाचून आरती करून घ्यायची आहे.हे सर्व पूजा झाल्यानंतर पतीच्या दीर्घायुष्य साठी प्रार्थना करून आशीर्वाद घ्यायचा आहे.
यानंतर ज्या ठिकाणी आपण पूजा करायला आलेलो आहोत त्या ठिकाणी आपल्याला काही महिलाही पूजा करायला आलेला दिसतील. (Vat Purnima 2024 In Marathi) या महिलांची पाच जणांची गहू त्यामध्ये एक रुपया आणि आंब्याला पांढरे गुंडाळलेले सूत हे देऊन ओटी भरून घ्यायचे आहे. 5 सुवासिनींची आंबे व गव्हाने ओटी भरून हळदी कुंकू ही द्यावे.
Vat Purnima 2024 In Marathi
सर्वात महत्त्वाचं म्हणजे पूजा करत असताना आपल्याला काही मंत्रांचा उच्चार करायचा आहे या मंत्राचा उच्चार केल्यामुळे आपले सौभाग्य अखंड राहते आपल्या सौभाग्याला दीर्घायुष्य लाभते.
वडाच्या झाडाला सुत गुंडाळत असताना या मंत्राचा उच्चार करावा.
आता जो तांब्या आपण शुद्ध पाण्याने भरून आणलेला आहे तो थांबला ज्याप्रमाणे आपण सात वेळेस वडाच्या झाडाला सूत गुंडाळले आहे त्याप्रमाणे सात वेळा गोल फिरवून हे पाणी वडाच्या झाडाला अर्पण करायचे आहे आणि त्याबरोबर हा मंत्र देखील उच्चारायचा आहे.
संपूर्ण पूजा विधी पार पडल्यानंतर मनातील मागणी मागून शेवटी हा मंत्र उच्चारून वडाच्या झाडाला नमस्कार करायचा आहे.
Vat Purnima 2024 In Marathi- संपूर्ण पूजा विधी पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी दहा वाजेनंतर उपवास सोडून घ्यावा.किंवा तुमच्या भागात कशी प्रथा आहे त्याप्रमाणे तुम्ही उपवास सोडू शकतात.
Conclusion | निष्कर्ष
Vat Purnima 2024 In Marathi- एकूणच, वट सावित्री पौर्णिमा हा केवळ एक सण नसून वैवाहिक सौहार्दाचा, प्रेमाचा आणि स्त्रियांच्या सामर्थ्याचा उत्सव आहे. पती-पत्नीच्या नातेसंबंधांचे महत्त्व या सणाच्या माध्यमातून दिसते.