Site icon Marathi Delight

Maharashtra Day Speech In Marathi: महाराष्ट्र दिनानिमित्त द्या हे कडक भाषण 

Maharashtra Day Speech In Marathi

Maharashtra Day Speech In Marathi

नमस्कार मंडळी,

Maharashtra Day Speech In Marathi- माझा महाराष्ट्र माझा..
वसला छत्रपती शिवाजी राजा..
या भगव्या ध्वजा..
गर्जतो महाराष्ट्र माझा.. 

या महाराष्ट्र दिनी, आपल्या राज्याच्या वाढीसाठी आणि समृद्धीसाठी योगदान देणाऱ्या असंख्य व्यक्तींना आपण आदरांजली अर्पण करूया. शेतकऱ्यांपासून कारागिरांपर्यंत, उद्योजकांपासून शिक्षकांपर्यंत, प्रत्येकजण महाराष्ट्राचे भाग्य घडवण्यात मोलाची भूमिका बजावत आहे. मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यांपासून ते पुण्याच्या निर्मळ टेकड्यांपर्यंत, महाराष्ट्र विविधतेत एकतेचे सार सामावलेला आहे. ही विविधताच आपले जीवन समृद्ध करते आणि आपल्या समाजाची जडणघडण मजबूत करते.

यंदाच्या वर्षीही तुम्ही महाराष्ट्र दिनानिमित्त भाषण द्यायची तयारी करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी आजच्या या Maharashtra Day Speech In Marathi लेखांमध्ये घेऊन आलो आहोत महाराष्ट्र दिनानिमित्त एकदम कडक आणि झक्कास भाषण.महाराष्ट्र दिनानिमित्त हे भाषण तुम्ही तुमच्या शाळेमध्ये किंवा कोणत्याही सामाजिक कार्यक्रमांमध्ये देऊ शकतात.

Maharashtra Day Speech In Marathi | महाराष्ट्र दिन भाषण मराठी 

सन्माननीय व्यासपीठ,व्यासपीठावर विराजमान असलेले प्रमुख पाहुणे,आदरणीय गुरुजन वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो..

मी आज या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्र दिनानिमित्त जय काही दोन शब्द तुमच्या समोर मांडणार आहे ते तुम्ही अगदी शांत चित्ताने बसून ऐकावे अशी माझी नम्र विनंती.

संत नामदेव, संत तुकारामांची जन्मभूमी म्हणजे महाराष्ट्र…
छत्रपती शिवरायांची कर्मभूमी म्हणजे महाराष्ट्र…
महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरची संघर्ष भूमी महाराष्ट्र…
आणि प्रत्येक मराठी माणसाची स्वर्ग भूमी म्हणजे महाराष्ट्र…

अशा या महाराष्ट्र मातीच्या कपाळी केशरी टिळा लावून आजच्या या महाराष्ट्र दिनानिमित्त उपस्थित असलेले सर्व आदरणीय पाहुणे आणि मान्यवरांना माझा नमस्कार…

महाराष्ट्र

महाराष्ट्र म्हणजे आहे तरी काय? सह्याद्रीच्या गडकोटावरून भडकणारा भगवा झेंडा म्हणजेच महाराष्ट्र,विदर्भाच्या जंगलातून गरजणारा पट्टेरी वाघ म्हणजे महाराष्ट्र, मराठवाड्याच्या मराठी बाणा म्हणजे महाराष्ट्र, मावळ यांच्या ताठ कणा म्हणजे महाराष्ट्र, कोकणाच्या  हापूसाचा आंब्याचा गोडवा म्हणजे महाराष्ट्र आणि खानदेशातील आई सप्तशृंगी चा जोगवा म्हणजे महाराष्ट्र..

जगभरामध्ये संपूर्ण ठिकाणी पसरलेला मराठी माणूस हा नेहमी आपल्या महाराष्ट्रासाठी धडधडत असतो.म्हणूनच या कवी वसंत बापट म्हणतात..

भव्य हिमालय तुमचा आमचा,
केवळ माझ्या सह्याद्रीचा कडा,
गौरीशंकर उभ्या जगाचा,
मनात पूजीन रायगडा..

महाराष्ट्रामध्ये पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर अशी भरपूर औद्योगिक वसाहतींची महानगरे असलेले हे महाराष्ट्र आणि त्याचबरोबर  तुळजापूर, कोल्हापूर, शिर्डी, वेरूळ, अजिंठा अशी अनेक सांस्कृतिक वारसा जपून ठेवलेली ही शहरे आहेत. 

महाराष्ट्र राज्य हे नेहमी अव्वल स्थानावर राहिले आहे.ते फक्त इथल्या कष्टकरी शेतकऱ्यांमुळे असो किंवा बुद्धिमान माणसांमुळे आणि पुरोगामी नेतृत्वामुळे अशा या महान महाराष्ट्राचा 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली होती यासाठी कठोर संघर्ष करावा लागला आणि त्या संघर्षाचे शिल्पकार होते, प्र के अत्रे, सेनापती बापट, एस.एम जोशी, प्रबोधनकार ठाकरे, मधु दंडवते, क्रांतिसिंह नाना पाटील, अहिल्याबाई, लालजी पेठ अशी कितीतरी मोठी माणसं यांसोबतच या राज्याच्या निर्मितीसाठी 106 माणसांनी हुतात्म पत्करलं म्हणून आजचा हा दिवस या माणसांचा स्मृति दिवस आहे.

अशा या महान राज्यासाठी महाराष्ट्र राज्यासाठी प्रत्येक मराठी माणसाच्या मनात एकच भावना आहे ती म्हणजेच..

बहु असत सुंदर संपन्न की महा
प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश हा.

एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो.

जय हिंद, जय महाराष्ट्र.

Short speech for maharashtra day in marathi

Maharashtra Day Speech In Marathi: महाराष्ट्र दिनानिमित्त द्या हे कडक भाषण 

सन्माननीय व्यासपीठ,व्यासपीठावर विराजमान असलेले प्रमुख पाहुणे,आदरणीय गुरुजन वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो..

मी आज या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्र दिनानिमित्त जय काही दोन शब्द तुमच्या समोर मांडणार आहे ते तुम्ही अगदी शांत चित्ताने बसून ऐकावे अशी माझी नम्र विनंती.

विद्यार्थी मित्रांनो आपला महाराष्ट्र हा “छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांच्या विचारांनी निर्माण झालेला महाराष्ट्र आहे.महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून ओळखले जाते. कित्येक महान  संतांचे चरण आपल्या महाराष्ट्राला लाभले आहेत. अशा माझ्या या महाराष्ट्राला स्वतंत्र्य राज्याचा दर्जा एक मे 1960 रोजी मिळाला.

महाराष्ट्रामध्ये अनेक मोठमोठाले खेळाडू, कलाकार, संगीतकार, कवी आणि लेखक यांनी जन्म घेतलाय. अनेक मोठ्या कवींनी आणि लेखकांनी आपल्या लेखांमध्ये महाराष्ट्र विषयी विशेष शब्द लिहिले आहेत राम गडकरी म्हणतात… 

महाराष्ट्राला मंगल देशा,पवित्र देशा या शब्दात त्यांनी महाराष्ट्राचे वर्णन केले आहे..

अशा या महाराष्ट्राला केशरी टिळा लावून मी कोटी कोटी प्रणाम करतो आणि माझे भाषण या ठिकाणी संपवतो.

जय हिंद, जय महाराष्ट्र.

speech for maharashtra day in marathi

सन्माननीय व्यासपीठ,व्यासपीठावर विराजमान असलेले प्रमुख पाहुणे,आदरणीय गुरुजन वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो..

मी आज या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्र दिनानिमित्त जय काही दोन शब्द तुमच्या समोर मांडणार आहे ते तुम्ही अगदी शांत चित्ताने बसून ऐकावे अशी माझी नम्र विनंती.

आज 1 मे …म्हणजेच महाराष्ट्र दिन, तर सर्वप्रथम सर्वांना माझ्याकडून महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा..

1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. म्हणूनच आजचा हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून मोठ्या  उत्साहात साजरा केला जातो तसेच हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो.

आजचा दिवस हा एक महत्त्वाचा प्रसंग आहे जेव्हा आपण महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी एकत्र येत आहोत, हा दिवस प्रत्येक महाराष्ट्रीयन व्यक्तीला खूप आवडतो. ही अशी वेळ आहे जेव्हा आपण आपल्या राज्याच्या इतिहास, संस्कृती आणि यशाच्या समृद्ध संस्कृतीचा सन्मान करण्यासाठी एकत्र येतो.

1960 मध्ये याच दिवशी आपल्या राज्याची स्थापना झाल्याची आठवण म्हणून महाराष्ट्र दिनाला आपल्या हृदयात एक विशेष स्थान आहे. हे त्या नेत्यांचे स्मरण आहे जे एकजुटीने उभे राहिले, आपल्या लोकांच्या आशा-आकांक्षांसाठी झटले आणि आपल्या देशाची पायाभरणी केली.महाराष्ट्राच्या पायाभरणीत अनेक थोर संत, राजे समाज सुधारक यांचे मोलाचे योगदान आहे.

माझा महाराष्ट्र आहे तरी काय?

अंगणातली पवित्र तुळस आणि मंदिराचा उंच कळस,
म्हणजे माझा महाराष्ट्र..
कपाशी, तूर, ज्वारी आणि पंढरीची वारी,
म्हणजे माझा महाराष्ट्र..
शिमगा,  होळी, पोळा आणि पुरणाची पोळी
म्हणजे माझा महाराष्ट्र..
पारावरचा  वर, देवीचा गड
म्हणजे माझा महाराष्ट्र..
मराठी बाणा आणि मावळ्यांचा ताठ कणा,
म्हणजे माझा महाराष्ट्र..

आणि म्हणूनच महाराष्ट्र हा केवळ एक जमिनीचा तुकडा नव्हे तर ही एक संत महात्म्यांनी जपलेली संस्कृती आहे. एक महान राष्ट्र आहे.

एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो.

जय हिंद, जय महाराष्ट्र.

Exit mobile version