Site icon Marathi Delight

jio-aIRTEL चे रिचार्ग महागणार, 5G internet वापरणाऱ्यांनाही झटका बसणार

Jio Airtel new update 2024

Jio Airtel new update 2024

जसे की आपल्याला माहीत आहे, jio आणि aIRTEL या दोनही कंपन्यांमद्धे plans आणि networks च्या बाबतीत नेहमीच स्पर्धा दिसून येते. दोघी एकमेकस वरचढ असे plans घेऊन येत असतात. परंतु आता मात्र 5G युझर्सना झटका बसु शकतो. कारण असे की 2024 या वर्षात काही महिन्यानंतर जिओ आणि एअरटेल अनलिमिटेड 5G data plan कंपनीमार्फत बंद करण्यात येणार आहेत. याचबरोबर मोठा झटका म्हणजे फक्त सध्याचा अनलिमिटेड प्लान बंदच नव्हे तर किंमतीमध्येही 5 ते 10 टक्क्यांनी वाढ करण्यात येणार असल्याची बातमी पसरली आहे.

Jio Airtel new update 2024

जेव्हापासून 5G संकल्पना आली तेव्हापासून jio आणि aIRTEL ची लढत आपण बघत आलो आहोत. बाकी कंपन्यांनी 4G वरच आपली वाटचाल सुरू ठेवली. 5G आल्यापासून jio आणि aIRTEL ने अनलिमिटेड 5G चा अनुभव युझर्सना अगदी माफक दरात किंवा विनामूल्य 4G च्या च प्लान मध्ये देऊ केला. म्हणजे वापरकर्त्यांना 4G network च्या दरात 5G network देण्यात आलेल आहे. जे आता लवकरच बंद होणार!

हे नियम लागू झाल्यानंतर 5G वापरकर्त्यांना त्यांच्यासाठी 1 वेगळा रिचार्ग करावा लागणार तसेच 4G युझर्स त्यांचा नियमित रिचार्ग करू शकता. jio आणि aIRTEL या दोनही कंपन्यां 5G अनलिमिटेड प्लान संपविण्याचा विचार करत आहेत. आपल्याला माहीतच आहे jio आणि aIRTEL या दोनही कंपन्यां आपल्या युझर्सना चांगली सुविधा आणि जलद इंटरनेट देण्यासाठी 5G प्लान वर सातत्याने काम करत आहेत. दोनही कंपन्यांची वापरकर्त्यांची संख्या 125 million च्या वर जाऊन पोहोचली आहे. ही संख्या 2024 च्या अखेरीस 200 Millions च्या वर जाऊ शकते असे संकेत दिसत आहेत.

नुकतेच ET ने प्रसारमध्यमांना दिलेल्या महितनुसार jio आणि aIRTEL दोनही कंपन्या आपल्या 5G प्लॅन्स मध्ये 5-10% पर्यन्त वाढ करणार आहेत. एकदा की ही वाढ झाली मग वापरकर्त्यांना जलद इंटरनेट आणि इतर सुविधांसाठी चांगलेच पैसे मोजावे लागू शकतात. ही झळ सामान्य नागरिकांना तोंडावर पाडणार आहे. कारण कंपण्यांनी 5G ची सवय free मध्ये लावली तर आहे परंतु आता पैसे मोजावे लागणार.

याआधी 2 वर्षांपूर्वी वाढविण्यात आली होती किंमत

माहितीनुसार 2024 च्या सप्टेंबर महिन्यात सगळ्याच प्लॅन्स मध्ये वाढ कली जाऊ शकते. याआधी 2021 च्या नोवेंबर महिन्यात वाढ ही बघायला मिळाली होती. ही वाढ 15-20 % एवढी होती.

Exit mobile version