नमस्कार मंडळी,
आजच्या लेखामध्ये आपण वाचाल तर वाचा हा निबंध मराठीमध्ये निबंधलेखन बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो आपल्या या ब्लॉगवर विविध प्रकारचे निबंध लेखन केले गेले आहे. निबंध लेखन या कॅटेगिरी मध्ये तुम्हाला हवे असल्यास त्या ठिकाणाहून तुम्ही गृहपाठासाठी तेथील निबंध वापरू शकतात. त्याचबरोबर अजून एखादा कोणत्याही विषयी तुम्हाला निबंध लिहून हवा असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आम्ही तो निबंध लिहून तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेवू.
चला तर मग आता आपण सुरुवात करूया वाचाल तर वाचाल निबंध (vachal tar vachal essay in marathi) लिहायला.
वाचाल तर वाचाल निबंध मराठी | vachal tar vachal essay in marathi
vachal tar vachal essay in marathi ( 600 words)
खूप छान वाक्य आहे “वाचाल तर वाचाल” आणि हो बरं का ते खरं सुद्धा आहे. “वाचाल तर वाचाल” ही सर्व शब्दांची मोह माया परंतु हे वाक्य सुद्धा तेवढेच सुंदर आणि खरं.
वाचन करणे हा सुद्धा एक चांगला प्रवास आहे. वाचन करण्याने एका नवीन प्रवासाची सुरुवात होते आणि या प्रवासामध्ये वाचन केल्यामुळे विचारांचा संग्रह वाढतो. संग्रह वाढल्यामुळे आपलं मन सुद्धा निर्मळ होत जातं. वाचन करताना जेव्हा शब्द साठा वाढत जातो वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना सुद्धा मनात येत असतात.
वाचन करणे हा एक अद्भुत अनुभव आहे. एक शब्द, एक वाक्य, एक अंश, आपलं मन वाचताना विचारांचं संग्रह करतं. वाचन करत असताना अर्थातच वाचताना, विचारताना, हसताना, रडताना, नाचताना, थांबताना… अशा अनेक भावनांचं संग्रह होईल. आपले मनातील विचार आणि भावना या दोघांचा एकत्र संबंध वाचनादरम्यान होतो.
म्हणूनच नेहमी वाचन करायला हवे.वाचन करताना मनातील भावना वाचले जातात, पुस्तकातील शब्द वाचले जातात आणि यामुळे ज्ञानाचा संग्रह वाढत जातो.आपल्या आयुष्यातील आपल्याला खरा मित्र जर ओळखायचं असेल तर वाचन हे अधिक उपयुक्त ठरतं.
वाचनामुळे विविध प्रकारचे अनुभव आपल्याला वाचनाद्वारे मिळत असतात. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील परिभाषा जागतिक ज्ञान भौगोलिक ज्ञान या वाचनाद्वारे आपल्याला मिळत असते.
वाचन केल्यामुळे आयुष्यामध्ये विविध प्रकारचे चांगले बदल घडू लागतात. जर आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारचे बदल घडवून आणण्याचे असतील तर नियमितपणे वाचन करा म्हणूनच तर म्हणतात ना वाचाल तर वाचाल.
वाचन केल्यामुळे डोळ्यासमोर असलेल्या उद्दिष्टांचे ज्ञान वाचनाद्वारे आपल्याला प्राप्त होत असते.जीवनामध्ये बदल घडवून आणायचा असेल तर वाचन हे खूप महत्त्वाचे आहे.नियमितपणे वाचन केल्यावर कल्पनाशक्ती वाढत जाते आणि या कल्पनाशक्तीच्या आधारावर आपल्या आयुष्यामध्ये विविध प्रकारचे बदल होऊन जीवनातील उद्दिष्टे आपण पूर्ण करत असतो.
तुम्हाला जर तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये बदल घडवून आणायचे असतील तर वाचन करणे खूप आवश्यक आहे. वाचनाद्वारे कल्पना शक्ती वाढवून आयुष्यातील मार्ग निघायला लागतात. वाचन केल्याने ज्ञान प्राप्त होते.वाचन करणे हा सुद्धा एक दागिना आहे आणि हा दागिना आपण प्रत्येकाने आपल्याजवळ जोपासलाच पाहिजे.
हा दागिना विकत घेण्यासाठी आपल्याला पैसेही लागत नाही लागतो तर फक्त वेळ आणि आपण जर रोज एक तास ही वाचनाला दिला तर या एक तासाने आपल्या आयुष्यात खूप मोठ मोठाले बदल घडू शकतात.वाचन करून मनाला समृद्धता प्राप्त होते.
आपण नियमित शाळांमध्ये किंवा इतर कोणत्याही ठिकाणी “वाचाल तर वाचाल” अशा विविध प्रकारची घोषवाक्य ऐकत असतो.वाचाल तर वाचाल या घोषवाक्याचा अर्थ खूप खोलवर आहे आणि तेवढाच सोपा सुद्धा आहे.
वाचाल तर वाचाल या घोषवाक्य वरून तुम्हाला लक्षात येईल की जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे ज्ञान प्राप्त करायचे असेल तर वाचन हा छंद असणे खूप महत्त्वाचे आहे.
मोठमोठाले थोर महात्मे संत सांगून गेले आहेत.
vachal tar vachal essay in marathi ( 600 words)- प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या प्रकारचा छंद हा अंगी असतो त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा आणि उपयोगी छंद कोणता असेल तर तो फक्त वाचन असतो.पूर्वीच्या काळी संत महात्मे विविध प्रकारचे ग्रंथ लेखन आणि ग्रंथ वाचन करत असायचे आणि या ग्रंथ वाचनामार्फत ते विद्या, कला आणि कौशल्य प्राप्त करायचे.
वाचन हा छंद जोपासण्यासाठी कोणत्याही प्रकारचा खर्च येत नाही. जर तुम्ही इतर कोणत्याही प्रकारचे छंद जोपासायला निघाले तर त्यासाठी तुम्हाला थोडेफार का असेना पण पैसे खर्च करावे लागतात. वाचनच असा एक छंद आहे की ज्यासाठी तुम्हाला पैसे खर्च न करता हवे ते ज्ञान प्राप्त करता येते आणि या ज्ञानाच्या जोरावर तुम्हाला आयुष्यात हव्या असलेल्या गोष्टी साध्य करता येतात.
वाचनाचा छंद जोपासल्यावर आजूबाजूच्या सर्व माहिती मिळत असतात आणि या माहिती मिळण्यामुळे जीवन अजून सोपे होऊन जाते. ज्याच्या अंगी वाचनाचा छंद असतो त्याला जगण्यामध्ये किंवा इतर कोणत्याही गोष्टी प्राप्त करण्यासाठी कंटाळा येत नाही.जर तुम्हाला कोणाला मित्र बनवायचे असेल तर वाचनाला बनवा पुस्तकाला बनवा.
वाचन केल्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही तर तुम्हाला एक नवीन मित्र मिळतो आणि त्याबरोबर त्याचा उपभोग ही तुम्हाला काहीही खर्च न करता मिळत असतो.
शेवटी जाता जाता एवढेच म्हणाले की वाचन हा छंद प्रत्येक व्यक्तीने जोपासयला हवा.जर तुमच्याकडे वेळ असेल किंवा नसेलही तरीसुद्धा रोज वाचनासाठी एक तास तरी काढा. नियमितपणे वाचन करा वाचन केल्यामुळे तुमची कल्पनाशक्ती सुधारेल आणि आयुष्यातील उद्दिष्टे प्राप्त करण्यास मदत मिळेल.