नमस्कार मंडळी,
आजच्या लेखामद्धे आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय एक छोटीशी बोथकथा…ज्याचं नाव आहे ससा आणि कासवाची गोष्ट (sasa ani kasav story in marathi writte ) बालक आणि पालक आजच्या ह्या लेखामद्धे दिली गेलेली ही कथा 1 ली ते 5 वी च्या मुलांपर्यंत उत्कृष्ट पणे बोध देणारी त्याचबरोबर गमतीशीर छोटीशी गोष्ट आहे.
शाळेत तुम्हाला परिपाठाच्या वेळेस सांगण्यासाठी सुद्धा ही कथा अतिशय उत्तम आहे.अगदी छोटीशी आणि बोध पूर्ण असलेली ही कथा ऐकून तुमच्या मुलांना चांगल्या प्रकारचे संस्कार होतील.चला तर मग आता आपण ससा आणि कासवाच्या गोष्टीला सुरुवात करूया…
ससा आणि कासवाची गोष्ट | sasa ani kasav story in marathi writte
अनुक्रमाणिका
एकेकाळी एका मोठ्या हिरव्यागार जंगलामध्ये गतिवाण ससा आणि संतगती असलेला कासव हे दोघी प्राणी राहत होते.ससा अधिक गतिमान असल्यामुळे संपूर्ण जंगलामध्ये ससा आपल्या वेगवान असल्याचा नेहमी दावा करत असत.ससा नेहमी आपल्या आजूबाजूच्या इतर प्राण्यांना चिडवत असत.ससा नेहमी म्हणत असायचा की ह्या जंगलामध्ये माझ्यापेक्षा अति वेगवान कोणताच प्राणी नाही.
ससा त्याच्या वेगवान गतीमध्ये बढाई मारण्यासाठी अतिशय प्रसिद्ध होता. सशाचे म्हणणे होते की मी माझ्यासोबत कोणी शर्यत लावली तरी मी त्याला हारवेल एवढी माझी गती वेगवान आहे. आणि हे जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही माझ्यासोबत कोणीही शर्यत लावू शकतात.
आणि दुसरीकडे, कासव नम्र आणि शहाणा होता. सशाच्या सततच्या फुशारक्याने कंटाळलेल्या कासवाने हे प्रकरण कायमचे सोडवण्यासाठी मैत्रीपूर्ण शर्यतीचा प्रस्ताव ससाला दिला. ससा, त्याच्या क्षमतेवर आत्मविश्वासाने, दुसरा कोणत्याही प्रकारचा विचार न करता सहमत झाला आणि शर्यत सुरू करायला हो म्हणाला.
ससा आणि कासवामध्ये शर्यतीचे नियोजन केले गेले आणि तो दिवस उजाडला ज्या दिवशी ससा व कासवाची शर्यत आखली गेली होती. आणि त्यादिवशी आता सर्व जंगलातले प्राणी एके ठिकाणी जमा झाले. शर्यतीच्या दिवशी, हा तमाशा पाहण्यासाठी गर्दी जमली होती.
ससा आणि कासवाच्या शर्यतीसाठी एक मार्ग आखला गेला होता.मार्ग निश्चित झाल्यानंतर सिग्नल दिला गेला.कासवाला मागे टाकून ससा विजेच्या लखलखत्या झोकासारखा उडाला.
ससा अधिक कमी वेळात पटापट पुढे निघून गेला.आता ससाला वाटले की अजून तर कासव तिथेच आहे आणि तोपर्यंत रस्त्यामध्ये आपली एक झोप होऊन जाईल.ससा,अतिआत्मविश्वासाने एका झाडाखाली डुलकी घेण्याचा निर्णय घेतो आणि विचार केला की शर्यत जिंकण्यासाठीअजून खूप वेळ आहे.
ससा एका झाडाखाली अगदी गाढ झोपून गेला. यादरम्यान कासव मात्र संत गतीने हळूहळू पुढे चालले होते. ससाला वाटले की आपण थोडा वेळ झोपून नंतर परत भरधाव वेगाने पुढे जाऊ शकतो.म्हणून ससाने आपल्या ध्येयाकडे दुर्लक्ष करून थोड्या वेळासाठी विश्राम करण्याचा निर्णय घेतला.
त्याच ठिकाणी कासवाने संथ गतीने का होईना पण आपल्या ध्येयाकडे जराही दुर्लक्ष होऊ दिले नाही.आणि अगदी हळूहळू कासव आपल्या ध्येयापर्यंत पोहोचत होता.
ससा एका झाडाखाली झोपून मस्तपैकी खराटे मारत होता आणि त्याच वेळेला कासव त्याच्या बाजूने निघून गेले.आणि हळूहळू कासव शेवटी अंतिमरेषेजवळ येऊन उभे राहिले.सरतेशेवटी, कासवाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फळ मिळाले आणि ससा जागे होण्यापूर्वीच त्याने अंतिम रेषा ओलांडली. आणि शर्यतीमध्ये कासव जिंकला.पण सदा मात्र अजून झोपला होता.या कथेतून तुम्हाला काय बोध मिळाला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.
आता इथेपर्यंत कथा तर सर्वांनाच माहित आहे की कासव जिंकतो आणि ससा हरतो. पण मग याच्यापुढे होते काय?
ससा आणि कासवाची गोष्ट | sasa ani kasav story in marathi writte
सशाला आपल्या चुकीची जाणीव होते. स्वतःवर आत्मविश्वास असने खूप चांगली गोष्ट आहे परंतु अति आत्मविश्वास असणे खूप चुकीचे आहे.सशाला आपल्या ह्या चुकीची जाणीव होते.कशाला वाटते की आपण अंतिम स्थानावर पोहोचल्यानंतर थांबायला हवे होते.
पुन्हा दुसऱ्या दिवशी ससा कासवाला जाऊन म्हणतो आपण पुन्हा एकदा शर्यत करूया.आता कासवाची सुद्धा आत्मविश्वास वाढलेला असतो म्हणून कासव पटकन हो म्हणतो आणि शर्यतीची सुरुवात होते.मात्र या शर्यतीमध्ये ससा अंतिम स्थानावरच जाऊन थांबतो आणि ससा या शर्यतीमध्ये जिंकतो.
आता कासवाला त्याच्या चुकीची जाणीव होते की आपण घाई घाई आणि अति आत्मविश्वासाने सशाला हो म्हणून चुकी केली.जशा पद्धतीने ससा व कासव या दोघांमध्ये शर्यत झाली त्या पद्धतीमध्ये कासव कधीच जिंकू शकत नाही हे कासवाला समजते.
परंतु याच्यावर कासव एक युक्ती तयार करतो आणि सशाला म्हणतो की आपण परत शर्यत करूया आणि मी तुला जो मार्ग सांगेल त्या मार्गाने आपण शर्यत ठेवूया.
आता शर्यत पुन्हा सुरू होते आणि कासवाने ठरवलेल्या मार्गाप्रमाणे ससा धावू लागतो. पण मार्गामध्ये एक भली मोठी नदी आडवी येते आता सशाला तर पोहोता येत नाही म्हणून अशा त्या नदीच्या किनाऱ्या लगतच थांबून जातो.
कसवाला पोहता येत असल्यामुळे कासव पटकन पोहून नदी पार करतो आणि या ठिकाणी कासव पुन्हा एकदा शर्यत जिंकतो.
ससा आणि कासव मध्ये अशा बऱ्याचशा शर्यतीनंतर सशा आणि दोघेही चांगल्या प्रकारचे मित्र बनतात. आणि दोघांनाही आपल्या शक्तीचे जाणीव होते. दोघीही अधिक चांगले मित्र झाल्यानंतर एकमेकांचा कमकुवतपणा आणि एकमेकांमध्ये असलेली शक्तीची जाणीव दोघांना होते आणि यापुढे कोणतेही होणारी शर्यत दोघे मिळवून ते पार करू लागतात.
ससा आणि कासवाच्या गोष्टीचे तात्पर्य | sasa ani kasav story in marathi writte | moral of the sasa ani kasav story in marathi writte
ससा आणि कासवाच्या गोष्टीचे तात्पर्य “हळू आणि स्थिर शर्यत जिंकतो.” केवळ वेगापेक्षा चिकाटी आणि सातत्य असणे अधिक महत्त्वाचे आहे हे या कथेच्या मार्फत आपणास समजते. जिद्द, चिकाटी आणि ध्येयापर्यंत आपल्या आपल्याला कशा प्रकारे पोहोचता येईल याच्या महत्त्व या कथेमध्ये दिले गेले आहे.