गुढीपाडवा हा सण विजयाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो.

'चैत्र शुद्ध प्रतिपदा' हा दिवस 'महापर्व' म्हणून साजरा करण्याची भारतीय परंपरा आहे.

घराच्या अंगणामध्ये गुढी उभारून गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो.

गुढीपाडवा साजरा करण्यामागे अनेक कथा सांगितल्या जातात…

शालिवाहन ह्या राजाने शालिवाहन शकास सुरुवात केली आणि या शकाची सुरुवात चैत्र शुद्ध प्रतिपदेला अर्थात म्हणजेच गुढीपाडवा होय.

गुढीपाडवा म्हणजे एक विजय ध्वज जेव्हा प्रभू श्रीराम हे लंकेवरून आले तेव्हा अयोध्येला ध्वज उभारत जनतेने त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले.

ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली ती ह्याच दिवशी..गुढीपाडव्याच्या दिवसापासून सत्ययुगाची कहाणी सुरू झाली..