आनंदाने उभारूया दारामध्ये गुढी,मराठी सणाची रंगतच न्यारी…

चैत्र शुद्ध प्रतिपदा हा मराठी नवीन वर्षाची सुरुवात दर्शवितो.

या महापर्वच्या दिवशी दारामध्ये गुढी उभारून गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो.

मोठ्या थाटामाटामध्ये अंगणात गुढी, दारात रांगोळी, खायला पुरणपोळी अशाप्रकारे हा गुढीपाडवा सण साजरा केला जातो.

रामायाणानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच प्रभू श्रीरामांनी बालीचा वध करून प्रजेला त्याच्या जाचापासून मुक्त केलं होतं.

रामाच्या विजयाच प्रतिक म्हणजे ही विजयाची गुढी उभारण्यात येते. त्यासोबत या तिथीला प्रभू रामाचा 14 वर्षांच्या वनवास संपला होता.

म्हणून गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत भारतात आनंदोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे.

नववर्षाची सुरूवात होवो न्यारी..सुखसमृद्धीने सजो आपली गुढी..

गुढी का उभारली जाते?.. का साजरा केला जातो गुढीपाडवा हा सण? गुढीपाडवा सण साजरा करण्यामागे अनेक कथा…